मन मोठं पाहिजे...
कुणाचं कौतुक करायला,
पाठीवर शाबासकी द्यायला,
एखाद्याच्या डोळ्यातील अश्रू
अलगदपणे पुसायला...
मन मोठं पाहिजे.
मन मोठं पाहिजे...
कुणाची चुक पोटात घालायला,
भांडणाराशी गोड बोलायला,
रस्त्यावरील लेकराच्या हातात
आपल्या पैशानं खाऊ द्यायला...
मन मोठं पाहिजे.
मन मोठं पाहिजे...
मोडुन पडलेल्यांना सावरायला,
विश्वासानं हातात हात द्यायला,
आयुष्याची नश्वरता समजुनही
जीवापाड प्रेम करायला....
मन मोठं पाहिजे.
मन मोठं पाहिजे...
मैत्रीत जीवाला जीव द्यायला,
प्रेमात शब्द पूर्ण करायला,
दुनियादारी जपुनही
आपली माणसं सांभाळायला....
मन मोठं पाहिजे
मन मोठं पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा