गेला दसरा गेली दिवाळी
दिवस स्वातंत्र्याचा येईना....
काय करु सांगा मित्रांनो
काही केल्या बायको माहेरी जाईना...
किती सांगितलं दमलीस खूप
आता माहेरी जाऊन आराम कर,जरा.
म्हणते इतकच आसेल,प्रेम माझ्यावर
तर तुम्हीच स्वयंपाक भांडी करा..
अर्थ माझ्या म्हणण्याचा ध्यानात तिच्या येईना....
काय करु सांगा राव बायको माहेरी जाईना....
सारख लावतोय गाण फियवून फिरवून
आपण मामाच्या गावाला जाऊया....
मला म्हणते किती छान स्वभाव तुमचा
चला भाचा भाचीला बोलवून घेऊया...
तगमग माझ्या मनाची समजून ती घेइना,.:..
काय करु सांगा तुम्हीच बायको माहेरी जाईन
किती सांगितलं तिला प्रिय भाऊ
तुझी तिथ तुझी वाठ पाहत आसेल..
काळजी नका करु म्हणते मला तुम्ही
सकाळी तो पहिल्याच गाडीला बसेल..
फारच हट्टी समजून काही घेईना
मगाशी बसवली कशी तरी गाडीत
तिला अशी लावून लाडीगोडी...
पण फारच प्रेम माझ्यावर तिचे
बघा मारली चालू गाडीतून उडी ...
मित्रां बरोबर पार्टी करण्याचा योग काही येईना...
काय करु बायको माहेरी जाईना..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा