शनिवार, २८ नोव्हेंबर, २०१५

संतवचन - ह.भ.प. वासुदेव महाराज सोनवणे


तुका म्हणे थोरपणे | नरक होती अभिमाने ||
~~~~~~~~~~~~~~~~~~
मानुस आयुष्यभर मोठेपणासाठी धडपडत असतो.त्याची ही धडपड योग्य मार्गानेच असेल असे नाही. योग्य-अयोग्य मार्गाचा अवलंब यात केला जातो.तो मोठेपणा मिळवणे व टिकवणेही अवघड असते.त्यात मीपणाचा शिरकाव झाल्यास सर्वस्व हरणास कारणीभुत होतो.खरा मोठेपणा व अहंकारी मी एकत्र नांदु शकत नाही.अनेक लोक अहंकारात वावरतांना लयास गेले.कंस, रावण, हिरण्यकशपू आदी अत्यंत महान व्यक्तीमत्व असणारी मीपणा मुळे लयास गेली.महापुरात मोठमोठी झाडे वाहुन जातात व लव्हाळे मात्र टिकुन राहतात.त्याप्रमाणे आपणही नम्र असले पाहीजे. व तो नम्रपणा आपल्या वर्तनातुन सिध्द करायचा असतो.
  ज्ञानोबा-तुकोबा हे महान संत या भुमीमध्ये होउन गेले परंतु मोठेपणाचा कधीही गाजावाजा केला काही.
��जयहरी��

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा