वैचारिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वैचारिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २६ मे, २०१६

स्पर्धक आणि विरोधक


☄स्पर्धक आणि विरोधक

आपण आपले जीवन जगत असताना आपल्याला स्पर्धक आणि विरोधक यांची गरज असतेच.

स्पर्धक आपल्याला सतत गतिशील आणि क्रियाशील ठेवतात. तर विरोधक आपल्याला कायम सतर्क आणि सावधान बनवतात.

हे दोघे मिळून कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या प्रगतिला कायमच पोषक वातावरण तयार करत असतात.

लक्षात ठेवा, ठरवुन कुणाला स्पर्धक किंवा विरोधक करता येत नाही, आणि हे दोघे आयुष्यात यावेत यासाठी कष्ट ही करावे लागत नाहीत. म्हणुन त्यांच्यावर चीडू नका, उलट त्यांचे स्वागतच करा.

कारण त्यांच्या मुळेच आपल्याला  चांगले, नव्हे नव्हे अजुन चांगले करण्याची प्रेरणा मिळते.
हो ना ?
शुभरात्री

गुरुवार, १० डिसेंबर, २०१५

आजची चांगली गोष्ट काय?'

रोजच्या जीवनात बरेच वेळा असं वाटतं की आपल्या मनासारखं काहीच होत नाही. होतील असं वाटणारी कामं ठप्प पडतात, अडकतात. कितीही प्रयत्न केले तरी ज्या गोष्टी व्हायच्या असतात त्या होत नाहीत. मग निराशा येते, राग येतो आणि आपली खूप चिडचिड होते. आपण रागावलो की तो राग मित्रांवर किंवा घरच्यांवर काढला जातो. मग राग गेला की आपल्याला वाईट वाटतं, आपण त्यांची क्षमा मागतो आणि ते आपल्याला माफही करतात. पण बोललेले शब्द परत घेता येत नाहीत. आपण ज्या कारणामुळे चिडलो होतो ती गोष्ट शुल्लक वाटू लागते.

असं झालं की मला एक गोष्ट आठवते. एक माणूस देवाचे आभार मानत असतो. तो म्हणत असतो की "माझ्याकडे नवे बूट नव्हते म्हणून मी दु:खी होतो त्या वेळी तू मला एक माणूस दाखवलास ज्याच्याकडे पाय पण नव्हते. मग माझी तकरार आपोआप मुकी झाली." थोडक्यात सांगायचं तर आपण छोट्या दु:खांकडे लक्ष देऊन त्यांना मोठं करतो पण छोट्या सुखांकडे लक्षच देत नाही. जसं बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहिजे तशा होत नाहीत, तसं त्याहून कितीतरी जास्त गोष्टी आपल्याला खुश करायचा प्रयत्न करत असतात. पण आपल्या एक लहानशा दु:खाच्या नादात आपण त्या दहा खुश करणाऱ्या गोष्टींना विसरतो.

जर आतापर्यंतचे विचार पटले असतील, तर मनात एक प्रश्न पण आला असेल. आपण या लहान सुखांकडे लक्ष कसं द्यावं? काही मनासारखं नाही झालं तर त्याला पटकन मनातून बाहेर काढून जे आपल्याला सुख देतं ते कसं करावं? याचं उत्तर माझ्या एका मैत्रिणींकडून मला शिकायला मिळालं. आमची मैत्री जशी वाढू लागली तसं त्यांनी मला एक मजा सांगितली. त्या म्हणाल्या की आम्ही एकामेकांशी बोलायला लागलो की 'आजची चांगली गोष्ट काय?' असा प्रश्न विचारायचा. प्रश्न सोपा आहे पण पहिले काही दिवस मला नीट उत्तरंच देता येत नव्हतं. मी 'आजची चांगली गोष्ट काही नाही' आसं म्हटलं की त्या 'काहीतरी असेल, नीट विचार कर' असं म्हणायच्या. मग मी काहीतरी छोट्यातलं छोटं छान आहे म्हणून सांगायचो. त्या पण साध्या सोप्या गोष्टी 'आजची चांगली गोष्ट' म्हणून सांगायच्या.

पण काही दिवस हा प्रकार सुरू राहिला आणि मला लहानातल्या लहान गोष्टी पण 'आजची चांगली गोष्ट' वाटू लागल्या. आज एका दुकानात मस्त कॉफी प्यायली, आज मस्त आठ तास गजर न लावता झोप झाली, आज अचानक एक जुना मित्र भेटला अशी आमची उत्तरं येऊ लागली. मग त्यांच्या प्रश्नाचा खरा अर्थ लक्षात आला. जसं आपण लहान दु:खांकडे लक्ष देतो तसं या प्रश्नामुळे आम्ही लहान सुखांकडे लक्ष देत होतो आणि कोणालातरी सांगितलं की ते सुख परत मनात यायचं. मग 'आजची चांगली गोष्ट'च्या ऐवजी 'आजच्या चांगल्या गोष्टी' अशा वाढू लागल्या. खरंच दिवसातल्या वाईट गोष्टी या चांगल्या गोष्टींसमोर शुल्लक वाटू लागल्या. आता तर मी स्वत:ला हा प्रश्न रोज झोपायच्या आधी विचारतो. गेलेला दिवस संपवताना त्यांतली एकतरी चांगली आठवण परत जगली पाहिजे. अशा छोट्या सुखांकडे नीट लक्ष दिलं तर एक एक करून सगळेच दिवस मजेत जाऊ लागतात.

तुम्ही पण हा प्रयोगकरुन बघा , अट फक्त एकच, की तुम्ही 'आजची चांगली गोष्ट काय?' या प्रश्नाला काहीतरी उत्तरं द्या

शुक्रवार, ४ डिसेंबर, २०१५

खर प्रेम काय असत?

2
एक धनगर मेढया चरायला सोडुन ढोल वाजवत बसला होता.

त्याने
पाहीलं की ढोलच्या आवाजाने एक
हरीणी त्याच्या शेजारी येऊन
बसली,
जसजशी त्या ढोलवर धनगराची थाप
पडायची तसतसं त्या हरीणीच्या डोळ्यांतुन अश्रु यायचे,
एक दिवस गेला,

दोन दिवस
गेले, तीन, चार, पाच दिवसांमागुन दिवस गेले.

पण परिस्थिती काही बदलत नव्हती,

धनगर जसजसं
ढोल वाजवायचा ती हरीणी तिथे येऊन जवळ बसुन रडु लागायची..

एक दोनवेळा त्या धनगराने त्या हरीणीला हाकलले
देखील पण जसजशी ती थाप ऐकु
यायची ती पुन्हा त्या आवाजाने तिकडे ओढली जायची...

मग एक दिवस धनगर ढोल
वाजवता वाजवता मध्येच थांबला,

ती हरीणी रडणं
थांबवुन निघुन जाऊ लागली.

त्याने
पुन्हा वाजवायला सुरुवात
केली.

हरीणी पुन्हा जवळ आली,

धनगराने हरीणी समोर हात जोडले आणि म्हणाला,

माझं काही चुकतं का गं?

मी कित्येक दिवस बघतोय
जेव्हा जेव्हा मी ढोल वाजवतो तेव्हा तेव्हा तु ईथे येऊन रडतेस.

कारण काय आहे.

सांगना माझं
काही चुकतं का गं?

तेव्हा ती हरीणी म्हणाली,

तुम्ही कोण आहात
मला माहीती नाही,

हे काय वाद्य आहे मला माहीती नाही,

पण जेव्हा तुम्ही हे वाद्य
वाजवता,

यावर पडणारी तुमच्या हाताची प्रत्येक थाप माझ्या काळजावर घाव घालते हो, कारण
याला जे कातडं लावलंय ना,

ते माझ्या आयुष्याचा साथीदार,माझ्या नवर्याचं आहे..

हे ऐकुन धनगर निशब्द झाला..

हरीणी पुढे म्हणाली,

माझी एक विनंती आहे तुम्हाला॥

माझ्या मृत्युनंतर
या वाद्याच्या एका बाजुला माझं कातडं लावा,

कारण या वाद्यातुन मनाला परमोच्च सुख
देणारे संगीत तेव्हाच बाहेर पडेल


जेव्हा दोन्ही बाजुंनी ढोल तितक्याच लयमध्ये
वाजवला जाईल.

म्हणजेच त्याच्या एवढंच दुःख
मलाही सहन करावं लागेल..

असं म्हणुन
त्या हरीणीने जागीच प्राण सोडले..

दुःखी मनाने त्या धनगराने त्या हरीणीचं कातडं
ढोलच्या एका बाजुला लावलं. आज तो ढोल
वाजवताना त्या हरीणीच्या डोळ्यातुन पाणी येत
नाही

पण तो ढोल
वाजवणार्या धनगराच्या डोळ्यांत मात्र अश्रु दाठुन येतात कारण जेव्हा तो ढोल दोन्ही बाजुने
वाजतो तेव्हा त्याला वाटतं ते जोडपं एकमेकांशी बोलुन आपली सुख दुःखं वाटुन घेत
आहेत.

ज्यांनी जन्मच नाही तर मरण देखील वाटुन घेतलं.......

Its call True Love

ब्राम्हण आणि शुद्र...

एका ब्राम्हणाने पत्नीला विचारले...

" पाणी छान आणि थंड आहे.
आपल्या घरात फ्रिज नाही,
कुठुन आणलेस..?"

पत्नीः-
"शेजारच्या कुंभारा कडुन.!"

ब्राम्हण ः-   काय..?

त्या शुद्राचे पाणी मला पाजलेस, तुला लाज वाटत नाही...? आपण ब्राम्हण आहोत...
आपल्याला शुद्राचे
काही चालत नाही..?"

पत्नीः- (घाबरली व म्हणाली)
" मला माफ करा,
या पुढे अशी चुक
होणार नाही....

[दुस-या दिवशी.]

ब्राम्हण ः-
"अग...
जेवायला वाढ..!"

पत्नीः
"काही-नाही..!"

ब्राम्हण ः-
"काय...?
पोळी केली नाही..?"

पत्नीः-
" नाही....!
कारण...
तवा व चुल शुद्र लोहाराने
व चुल कुंभाराने बनवलेली असल्याने मी त्या वस्तू
फेकून दिल्या..!"

ब्राम्हण ः- "वेडी आहेस काय..?
बरं दुध आण..!"

पत्नीः-
"मी दुध फेकुन दिले
कारण....
ते शुद्र कुणब्याने दिले.

मी म्हटले
'उद्या पासुन दुध आणू नकाे'
आम्हांला शुद्रांचे
काही चालत नाही..!"

ब्राम्हण ः (किंचाळला)
" काय...?"
ब्राम्हण :- "बरंबर" ...
झोपायला खाट लाव..!"

पत्नी म्हणाली ः-
"मी खाट तोडून टाकली
व लाकडे जाळुन टाकली.
मेलं शुद्राचं काहीच नको
आपल्याला..!!"

ब्राम्हणाने डोक्याला हात लावला
म्हणाला :- "अरे...
ईथली धान्याची पोती
कुंठ आहेत..?''

पत्नीः-
"मी धान्य लोकांना वाटून टाकले कारण....
ते आपण कुणबी शुद्रां कडुन
घेतले होते.
नकोच ते आपल्याला ..!"

ब्राम्हणाला भाेवळ आली
व म्हणाला,
" माझे आई...
घरात काहीच दिसत नाही.
वस्तू कुठं गेल्या..?"

पत्नी म्हणाली :-
"नाथ...
घरातली प्रत्येक वस्तू कुण्यातरी
शुद्रांनेच बनवली आहे.
त्यामुळे...
मी त्या तोडुन मोडुन
जाळुन टाकल्या..!"

ब्राम्हण मोठयाने ओरडला
म्हणाला,
" अरे आपण
पार भिकारी झालो...
एवढे घरंच काय ते
उरले आता...!"

पत्नी म्हणाली,
" नाथ...
चिंता करू नका,
मी आपल्या आज्ञे पुढे नाही,
मी हे घर दान करून टाकले आहे.
कारण... हे घर त्या शुद्र गवंडी वडार व शुद्र मजुरांनी बांधले होते,
नकोच बाई आपल्याला शुद्राचे."
"नाथ....
चला आपण जंगलात जावू
कारण...
इथे सर्व शुद्र आहेत,

भिक्षा काय शुद्राला मागायची..?
नको नको..!"

ब्राम्हण चक्कर येवुन
खाली पडला,
"हे देवा...
मी तर पार शुद्रापेक्षा
अतिशुद्र आहे.
माझ्याकडे कांहीच नाही,
मीच खरा शुद्र आहे,
माझे पानही शुद्रा शिवाय
हालत नाही...
देवा...
खरे उच्च 'कुणबी' शेतकरी
सर्व अठरा पगडं जातीच महान
व वंदनीय आहेत, मी मात्र  काहीच कामाचा नाही..!"

मग त्या ब्राम्हणाने संपुर्ण समाजाची खाली डोके टेकुन
माफी मागीतली
व पत्नीच्या चरणावर
लोटांगण घालुन
तीची...
कान उघडल्यामुळे
आभार मानले..!

लक्षात ठेवा
जगात कुणीही
'श्रेष्ठ'  वा  'नीच' नाही,  सर्व समान व एकमेकांस पुरक आहेत..

पुजेला मांडलेली खारीक आपल्या लहान मुलाने
उचलुन खाल्ली तर त्याच्या गालाफाडात वाजवणारा बहुजन, तीच खारीक खाऊन भटजीचं
पोरग गुटगुटीत होत आहे,
याचा आपण कधीच विचार करीत नाही.
शेतात राब-राब राबुन हाडाची काडं केलेल्या आपल्या पत्नीला ती खारीक खाऊ घालावी,
हा विचार पण करीत नाही.
पुजेची तीच खारीक, खोबर, काजु, बदाम भटजीला देऊन, दक्षिणा देऊन
त्याच्या पाया पडायचा.
ही खुप मोठी गुलामगिरी आहे.
हे बहुजनांना कधी समजलंच
नाही .
पण फुले, शाहु, आंबेडकरांनी सांगितलं कि ही गुलामगिरी तोडा.
अरे, छत्रपती शिवरायांनी एवढे गड-किल्ले बांधले-जिंकले.
पण एकाही गड-कोटाची
पुजा-सत्यनारायण
कधी घातले नाही,
कधी मुहुर्त - पंचांग पाहुन
लढाया केल्या नाहीत...
मग त्या छत्रपती शिवरायांचे मावळे तुम्ही हे अंधश्रद्धा-कर्मकांड करायचं बंद करा.
ही गुलामगिरी तोडा .
"भटमुक्त व्हा भयमुक्त व्हा".
कोणतही कार्य करताना बुद्ध, कबीर, रविदास, महात्मा बसवन्ना ,संत तुकाराम, जिजाऊ, शिवराय, संभाजीराजे, महत्मा फुले, सावित्रीमाई, बाबासाहेब आंबेडकर,
संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमांना हार घालुन आपले कार्य पार पाडा.
यासाठी तुम्हाला कोणत्याही ब्राम्हण भटजीची गरज नाही, दक्षीणेचीे गरज नाही...
आपण आता भटमुक्त आणि भयमुक्त झालो पाहिजे ...

तीच खारीक, खोबरे, बदाम, काजु आता आपल्या पत्नीला, मुलांना चारली पाहिजे.

दक्षीणा देण्यापेक्षा मुलांना कँम्प्युटर, पुस्तके दिली पाहिजे.
उच्चशिक्षणासाठी परदेशात पाठवले पाहिजे .
विज्ञानवादी झालो पाहिजे, शाहणे झालो पाहीजे निरोगी - आनंदी झालो पाहिजे...

पटलं तर चार मित्रांचेही डोळे उघड़ा.

जुगार.

दोन मिनिटं वेळ काढुन नक्की वाचा "
"  ".
-----------------
पहिल्याच दिवशी वर्गामध्ये सरांचेआगमन
झाले.
ओळखीचे सत्र सुरु करण्यात आले.
तुमचे नाव काय.....?
तुमचे गाव काय....?
असे प्रश्न विचारण्यात आले....
कुणाचे बाबा वकील, डॉक्टर तर कुणाचे
इंजिनीअर.....
माझा नंबर येताच...
मी पटकन उभा राहिलो व चटकन
सांगितले
“सर, माझे बाबा शेतकरी आहेत.”
मी असं म्हणताच सगळा वर्ग
हसायला लागला.....
मला याचा फार राग आला.....
मी म्हटले “सर मी नाही म्हणत,
या साऱ्यांचा धंदा छोटा हाय,
पण,....या काळ्या आईची शपथ
सर...या साऱ्याहून
माझा बाप मोठा हाय....
हाडाची काडं करून रात दिन राबत
असतो,
तो राबतो म्हणून तुम्ही आम्ही दिसतो...
काड्याकुड्याचं जिनं त्याचं
पण,
साऱ्या जगाला भाकर देतो..
अन् साऱ्या जगाला भाकर देणारा,
कधी कधी उपाशीच झोपतो
माहित नसताना पाऊस येईल-नाही येईल,
हजारो रुपये मातीत गाळतो,
खरंच सर तो मातीसंग जुगारच खेळत असतो.
सगळे जण जगण्यासाठी जुगार खेळतात
पण,
माझा बाप जगवण्यासाठी जुगार खेळतो.
अन्,
या जगण्याच्या जुगारीमध्ये तो नेहमीच
हरतो.
माणुसकीच्या गावामध्ये अजून
त्याची वस्ती हाय,
खरंच सर माझ्या बापाची मरणा संग
दोस्ती हाय....
फाटके तुटके कपडे सर
तो अजूनही अंगावर घालतो....,
पण,
सर मला तुमच्या कपडयाचाही
त्याचाच घामाचा वास येतो.
टाकून पहा मातीत सर तुम्ही
पाच-पन्नास हजार, तेव्हाच तुम्हाला कळेल,
त्याच्या जगण्याचा जुगार.
म्हणून,
म्हणतो सर अभिमान हाय मला
माझा बाप शेतकरी असल्याचा
अभिमान आहे मला
मी या शेतकऱ्याचा वारस असल्याचा
जग लिहिते आईसाठी,
जग लिहिते साऱ्यांसाठी पण,
मी लिहितो बापासाठी, त्याच्याच
जीवनाचा जुगार........”
दारूचा स्टाॅक संपत नाही
तंबाखू-शिगरेट चा स्टॉक संपत नाही
ऐवढच काय तर गुटका बंदी असुनही गुटक्याचा स्टॉक
कधी संपत नाही.
तर मग ऐण पेरणीच्या दिवसात खता-बियांण्याचा
स्टॉक कसा काय संपतो......?
आणी वाढीव पैसे देताच लगेच कसा काय उपलब्ध
होतो.....
दलाल व्यापार्यांनो पुरे करा हा हरामखोरपणा.....
.
बस करा आता शेतकर्यांना लुबाडुन खाणं. ....
कारण,
ज्या दिवशी आम्हा शेतकर्यांचा अन्नधान्याचा
स्टाँक संपेल ना
तेव्हा तुम्हाला भिक पण मिळणार नाही.
सर्वानसाठी पोस्ट केला पन
जगाचा पोशिंदा शेतकऱ्यासाठी एक पोस्ट
मनापासून पटल तर शेयर करा.
कधी मोकळ्या आकाशाखाली तुमची कमाई ठेवून बघा,
रात्रभर झोप नाही येणार.
विचार करा शेतकऱ्याच कस होत असेल !!����

बुधवार, २५ नोव्हेंबर, २०१५

जरूर वाचाच


केस अर्पण
करून कुठे पुण्य मिळते,

नारळ अर्पण
करून कुठे भाग्य उजळते,

केस अन् नारळ
विकुनी होतो व्यापार.

सोनं- चांदी अर्पण
करून कुठे काय मिळते.

सोने -चांदीच्या
दागिन्यांचा होतो लिलाव.

काय उपयोग सांग मानवा
अशा या दान धर्माचा ???

कधी शेतक-याला
बियाणं दान देऊन बघा.

कधी निराधार
कन्येचा विवाह लाऊन बघा.

कधी एखाद्या निराधार
बालकाचा पालक होऊन बघा.

कधी एखाद्या
उपाश्याला भरवुन बघा.

कधी एखाद्या
अपंगाला आधार देऊन बघा.

कधी एखाद्या शाळेचा
जीर्णोध्दार करून बघा.

कधी एखाद्या
वृध्दाश्रमास दान करून बघा.

कधी एखाद्या आश्रमातील
निराधारांवर प्रेम करून बघा.

एकदा दान धर्माच्या
व्याख्या बदलून तर बघा !!!

जेव्हा मंदिरात जाणाऱ्या
रांगा वाचनालयात जातील,

तेव्हा भारत
जगात महासत्ता बनेल...

पुस्तक वाचनाने
माणसाचं मस्तक सशक्त होतं...

सशक्त झालेलं मस्तक
कुणाच हस्तक होत नसतं...

आणि हस्तक न झालेलं मस्तक
कुठेही नतमस्तक होत नसतं...!

शाळेचे छत गळके आणि
मंदिराचे छत मात्र सोन्याचे ?

शाळेत आज मुलांना
बसायला साधी फरशी नाही.

आणि
मंदिराला मात्र संगमरवरी ?

शाळेला दोन रुपये देतांना दहा
वेळा चौकश्या करणारा पालक,

मंदिराला दोन हजार देतांना
अजिबात चौकशी करत नाही..

आपला भारत
नक्की महासत्ता होणार ?

पायात घालायची चप्पल
ए सी मधे विकायला ठेवतात,

आणि
भाजीपाला फूटपाथवर...!

आणि म्हणे
आमचा देश कृषी प्रधान..!

आणि
आत्महत्या करतो शेतकरी..

शेकडो
मैल चालतो वारकरी...

अन विठोबाचे
पहिले दर्शन घेतो मुख्यमंत्री..!

वाचा, विचार करा, आणि
पटलं तरच पुढे पाठवा..!
.