आधारवड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आधारवड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ११ सप्टेंबर, २०१६

तात्यासो. धोंडूपंत वल्लभ गुरव यांना चतुर्थ पुण्यतिथी निमित्त भावपूर्ण श्रद्धांजली


 भावपूर्ण श्रद्धांजली

 

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः .
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि :
या शरीराला शस्त्र कपू शकत नाही.  कारण हे प्राकृत शस्त्र तेथपर्यंत
पोहचूच शकत नाही. जेवढी शस्त्रे  आहेत ती सर्व पृथ्वी- तत्वापासून
उत्पन्न झालेली असतात. हे पृथ्वी तत्व या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा
विकार निर्माण करू शकत नाही. एवढेच नव्हे  तर  हे पृथ्वी तत्व
शरीरापर्यंत पोहचूच शकत नाही तर मग विदृती करण्याची गोष्ट तर दूर राहिली.

नैनं दहति पावकः
अग्नी या शरीराला जाळू शकत नाही कारण अग्नी तेथपर्यंत पोहचूच शकत नाही तर
मग त्याचेकडून जाळणे कसे संभावते? तर्पार्य अग्नी- तत्व ह्या शरीरामध्ये
कधीहि कसल्याच प्रकारचा विकार निर्माण करू शकत नाही.

न चैनं क्लेदयन्त्यापो
पाणी याला भिजवू शकत नाही कारण पाणी तेथपर्यंत पोहचूच शकत नाही. तर्पार्य
जल-तत्व ह्या शरीरामध्ये कधीहि कसल्याच प्रकारचा विकार निर्माण करू शकत
नाही.

न शोषयति मारुतः
वारा ह्याला वाळवू शकत नाही कारण अर्थात वारा या शरीराला वाळविण्यास
असमर्थ आहे. कारण वारा तेथपर्यंत पोहचूच शकत नाही. तर्पार्य वायू-तत्व
ह्या शरीरामध्ये कधीहि कसल्याच प्रकारची विकृती निर्माण करू शकत नाही.

पृथ्वी, जल, तेज. वायू, आकाश - हे पंचमहाभूते म्हणविले जातात. भगवंतानी
यापैकी चारच महाभूतान्विषयी म्हटले आहे की ; हे पृथ्वी, जल, तेज, वायू,
या शरीरात कोणत्याही प्रकारची विकृती निर्माण करू शकत नाहीत परंतु
पाचव्या महाभूत आकाशाविषयी काहीही चर्चा केलेली नाही. याचे कारण असे आहे
की, आकाशात कोणतीच क्रिया करण्याची शक्ती नाही. क्रिया (विकृती) करण्याची
शक्ती तर या चार महाभूतांमध्ये आहे आकाश केवळ या सर्वाना अवकाश (जागा)
देते



येथे युद्धाचा प्रसंग आहे "हे सर्व कुटुंब मृत्युमुखी पडतील" या कल्पनेने
अर्जुन शोक करीत आहे म्हणून भगवान म्हणतात की, हे कसे मरतील? वर
सांगितल्याप्रमाणे शस्त्राने शरीर कापले गेले तरी शरिरी कापला जात नाही,
अग्नी द्वारा शरीर जाळून गेले तरी शरिरी जळत नाही. वरुणास्राद्वारा शरीर
भिजविले गेले तरीही शरीरी ओला होत नाही आणि वायव्यास्राद्वारा शरीर
वाळविले गेले तरीही शरिरी वाळला जात नाही. तर्पार्य अस्र-शास्राद्वारा
शरीर मृत्युमुखी पडते तरीही शरीर मरत नाही तर जसाच्या तसा निर्विकार
राहतो. म्हणून याविषयी शोक करणे हे केवळ तुझे अज्ञान आहे.

तात्यासो. धोंडूपंत वल्लभ गुरव यांना चतुर्थ पुण्यतिथी निमित्त सोनवणे परिवार विखरण (देवाचे) कडून विनम्र अभिवादन !!!


भावपूर्ण श्रद्धांजली

अँड. सुरेंद्र राजाराम सोनवणे

नाशिक




रविवार, १५ नोव्हेंबर, २०१५

कला - श्री भामरे आण्णा

कला म्हटल्यात म्हणजे त्या चौसष्ट कलांचा ईतिहास डोळ्यापुढे ऊभा रहातो.
    मात्र आनंद जर ऊपभोगायचा असेल तर मानव संगित कलेचाच आस्वाद घेतो.
   अस म्हणतात की --
  संगिताने सृष्ट्रितील तमाम प्राणी मंत्रमुग्ध होतात.
  आताच दिप पाडवा पहाटेचा संगितमय आस्वाद बय्राच जणांनी घेतला.
  वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे!!
  आपण जर यांच्यांशी एकरूप झालात तर खरोखरच नैसर्गिक संगित ऐकायचा आनंद ऊपभोगू शकाल.
शुभ प्रभात!!
जय शंभो!!

विचार - श्री राजेंद्र राजकुवर, मुम्बई

जेव्हा अंडे बाहेरील ताकदीमुळे फुटते
तेव्हा एक जीवन संपते..... 
पण तेच अंडे आतील ताकदीमुळे फुटते
तेव्हा एक जीवन सुरू होते.... 
आतून मिळालेली ताकद सदैव जीवन घडवतेच.
स्वत: वरील विश्वास कधी ही कमी होऊ देऊ नका.