॥व्यक्तिरेखा॥ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
॥व्यक्तिरेखा॥ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ११ सप्टेंबर, २०१६

तात्यासो. धोंडूपंत वल्लभ गुरव यांना चतुर्थ पुण्यतिथी निमित्त भावपूर्ण श्रद्धांजली


 भावपूर्ण श्रद्धांजली

 

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः .
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि :
या शरीराला शस्त्र कपू शकत नाही.  कारण हे प्राकृत शस्त्र तेथपर्यंत
पोहचूच शकत नाही. जेवढी शस्त्रे  आहेत ती सर्व पृथ्वी- तत्वापासून
उत्पन्न झालेली असतात. हे पृथ्वी तत्व या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा
विकार निर्माण करू शकत नाही. एवढेच नव्हे  तर  हे पृथ्वी तत्व
शरीरापर्यंत पोहचूच शकत नाही तर मग विदृती करण्याची गोष्ट तर दूर राहिली.

नैनं दहति पावकः
अग्नी या शरीराला जाळू शकत नाही कारण अग्नी तेथपर्यंत पोहचूच शकत नाही तर
मग त्याचेकडून जाळणे कसे संभावते? तर्पार्य अग्नी- तत्व ह्या शरीरामध्ये
कधीहि कसल्याच प्रकारचा विकार निर्माण करू शकत नाही.

न चैनं क्लेदयन्त्यापो
पाणी याला भिजवू शकत नाही कारण पाणी तेथपर्यंत पोहचूच शकत नाही. तर्पार्य
जल-तत्व ह्या शरीरामध्ये कधीहि कसल्याच प्रकारचा विकार निर्माण करू शकत
नाही.

न शोषयति मारुतः
वारा ह्याला वाळवू शकत नाही कारण अर्थात वारा या शरीराला वाळविण्यास
असमर्थ आहे. कारण वारा तेथपर्यंत पोहचूच शकत नाही. तर्पार्य वायू-तत्व
ह्या शरीरामध्ये कधीहि कसल्याच प्रकारची विकृती निर्माण करू शकत नाही.

पृथ्वी, जल, तेज. वायू, आकाश - हे पंचमहाभूते म्हणविले जातात. भगवंतानी
यापैकी चारच महाभूतान्विषयी म्हटले आहे की ; हे पृथ्वी, जल, तेज, वायू,
या शरीरात कोणत्याही प्रकारची विकृती निर्माण करू शकत नाहीत परंतु
पाचव्या महाभूत आकाशाविषयी काहीही चर्चा केलेली नाही. याचे कारण असे आहे
की, आकाशात कोणतीच क्रिया करण्याची शक्ती नाही. क्रिया (विकृती) करण्याची
शक्ती तर या चार महाभूतांमध्ये आहे आकाश केवळ या सर्वाना अवकाश (जागा)
देते



येथे युद्धाचा प्रसंग आहे "हे सर्व कुटुंब मृत्युमुखी पडतील" या कल्पनेने
अर्जुन शोक करीत आहे म्हणून भगवान म्हणतात की, हे कसे मरतील? वर
सांगितल्याप्रमाणे शस्त्राने शरीर कापले गेले तरी शरिरी कापला जात नाही,
अग्नी द्वारा शरीर जाळून गेले तरी शरिरी जळत नाही. वरुणास्राद्वारा शरीर
भिजविले गेले तरीही शरीरी ओला होत नाही आणि वायव्यास्राद्वारा शरीर
वाळविले गेले तरीही शरिरी वाळला जात नाही. तर्पार्य अस्र-शास्राद्वारा
शरीर मृत्युमुखी पडते तरीही शरीर मरत नाही तर जसाच्या तसा निर्विकार
राहतो. म्हणून याविषयी शोक करणे हे केवळ तुझे अज्ञान आहे.

तात्यासो. धोंडूपंत वल्लभ गुरव यांना चतुर्थ पुण्यतिथी निमित्त सोनवणे परिवार विखरण (देवाचे) कडून विनम्र अभिवादन !!!


भावपूर्ण श्रद्धांजली

अँड. सुरेंद्र राजाराम सोनवणे

नाशिक




शुक्रवार, २० मे, २०१६

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

  • हिन्दुस्थानच्या स्वातन्त्र्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रांतिकारक चळवळ संघटित करणारे आद्य क्रांतिवीर
  • दोन देशांच्या सरकारांनी ज्यांच्या ग्रंथावर प्रसिद्धिपूर्वीच प्रतिबन्ध घातला असे जगातील आद्य लेखक
  • हिन्दुस्थानच्या स्वातन्त्र्यलढ्यात भाग घेतला म्हणून ज्यांची पदवी विद्यापीठाने काढून घेतली असे आद्य पदवीधर
  • हिन्दुस्थानच्या स्वातन्त्र्यलढ्यात सहभागी झाल्यामुळे ज्यांना बॅरिस्टर पदवी नाकारण्यात आली असे आद्य विधिज्ञ
  • विदेशी कपड्यांची निर्भयपणाने प्रकट होळी आयोजित करणारे आद्य देशभक्त
  • हिन्दुराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सर्वस्पर्शी विचार करणारे, अस्पृश्यता व जातिभेद यांच्याविरुद्ध बंड पुकारणारे आद्य क्रांतिवीर
  • ब्रिटिश न्यायालयाचा अधिकार नाकारणारे आद्य भारतीय बंडखोर नेते
  • पन्नास वर्षे सीमापारीची काळ्यापाण्याची शिक्षा झालेले आणि ती पुरुन उरल्यानंतर सक्रिय कार्य करणारे जगातील आद्य राजबंदी
  • कारागृहात लेखनसाहित्य न मिळाल्यामुळे काट्याकुट्यांनी कारागृहाच्या भिंतींवर सुमारे दहा सहस्त्र ओळींचे काव्य कोरून लिहिणारे आणि ते सहबंदिवानांकडून मुखोद्गत करवून घेऊन प्रसिद्ध करविणारे जगातील आद्य कवी
  • हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात ज्यांची अटक गाजली असे हिन्दुस्थानचे आद्य राजबंदी
  • योगशास्त्राच्या उत्तुंग परंपरेनुसार प्रायोपवेशनाने मृत्युला कवटाळणारे आद्य आणि एकमेव क्रांतिकारक महायोगी
  • "झाले बहु, होतील बहु, परंतु या सम हा"

    बुधवार, २३ डिसेंबर, २०१५

    अशफ़ाक़उल्ला खान

          खुदा का सच्चा बंदा : अशफ़ाक़उल्ला खान

                 तीसचं दशक हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील अत्यंत धामधुमीचं दशक. गांधीजीं सविनय कायदेभंगाच्या तयारीत व्यस्त होते, तर नुसत्या अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळणं अशक्य आहे, अशी विचारधारा असलेला तरुण वर्ग, सशस्र क्रांतीकडे आकर्षित होऊ लागला होता.

                 अहिंसक आंदोलनात हिरीरीने भाग घेणारा मुस्लिम तरुण मात्र, सशस्र क्रांतीपासून चार हात दूरच होते. नेमकी हीच गोष्ट मुस्लिम विरोधकांना, मुस्लिमांच्या मर्मावर बोट ठेवण्यासाठी पुरेशी होती.

                 काकोरी कटाचे मुख्य सूत्रधार थोर क्रांतिकारक रामप्रसाद 'बिस्मिल' हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे कट्टर समर्थक होते. मुस्लिम समाजाच्या देशभक्तीविषयी घेतल्या जाणा-या शंकेमुळे, त्यांना असह्य वेदना होत. परिणामी सशस्त्र क्रांतीकडे मुस्लिम तरुणांचं मन वळवण्यासाठी ते प्रयत्नशील होते. या प्रयत्नात त्यांना गवसलेलं अमूल्य रत्न म्हणजे, अशफ़ाक़ उल्ला खान !

                 अशफाक़ उल्ला खान म्हणजे रामप्रसाद 'बिस्मिल' यांचा उजवा हातच! रामप्रसादांच्या खांद्याला खांदा लावून ते काकोरी कटात सहभागी झाले. या कटातील सहभागामुळे रामप्रसाद 'बिस्मिल', अशफाक उल्ला खान, राजेंद्रनाथ लाहिरी आणि ठाकूर रोशनसिंह या चौघा क्रातीविरांना फाशीची शिक्षा झाली. १९ डिसेंबर १९२७ रोजी त्यांना फाशी देण्यात आले.

                 पवित्र कुराणाची प्रत काखेत घेऊन एखाद्या हज यात्रेकरुच्या थाटात अशफ़ाक उल्ला खान फाशीच्या तख्ताच्या दिशेने मोठ्या रुबाबात चालत गेले. फासाचे चुंबन घेऊन त्यांनी अल्लाची प्रार्थना केली. हिंदू - मुस्लिमांना एकजूटीने स्वातंत्र्यलढा लढण्याचं अपिल केलं. आणि देशातल्या सात कोटी मुसलमानांपैकी मी पहिला मुसलमान आहे, जो देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर चढत आहे, अशी कृतार्थता व्यक्त करून ते फाशी गेले. त्यांचा मृतदेह मालगाडीच्या डब्यातून शाहजहाँपूर या त्यांच्या गावी नेण्यात आला. दहा तासांनंतरही त्यांच्या चेह-यावरचं तेज नि प्रसन्नता लोप पावली नव्हती.

                 रामप्रसादांचं हिंदू-मुस्लिम ऐक्याचं स्वप्न साकार झालं होतं. फासावर जाण्यापूर्वी ते म्हणाले होते- "अशफाक ! तू माझी आणि देशातील सर्व मुसलमानांची लाज राखली. हिंदू युवकांप्रमाणे मुस्लिम युवकही  देशासाठी हिरीरीने प्राणार्पण करू शकतो हे मला दाखवून द्यायचं होतं. मुसलमानांवर विश्वास टाकता येणार नाही असं म्हणण्याचं आता, कुणालाही धाडस होणार नाही."

                 कूटनीतिचा भाग म्हणून रामप्रसाद यांनी अशफ़ाक उल्ला खान यांना प्रिव्ही कौंसीलकडे माफीनामा देण्यास सांगितले होते. त्याला ते अजिबात तयार नव्हते. रामप्रसादांच्या इच्छेखातर त्यांनी तो दिला पण अतिशय बाणेदारपणे ते म्हणाले होते, "बंदा खुदा के सीवा किसीसे माफी मांगना हराम समझता है." प्रिव्ही कौंसीलने तो माफीनामा फेटाळल्यामुळे, कूटनीति तर सफल झाली नाही, पण अशफाक उल्ला खान यांचं, आपण ईमान पणाला लावलं, याचं शल्य मात्र रामप्रसाद 'बिस्मिल' यांना अखेर पर्यंत बोचत राहिलं.

                 हिंदू-मुस्लिम क्रांतीविरांची ही जोडी हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीक बनून अजरामर झाली. काकोरी कटातील हुतात्म्यांना  त्यांच्या स्मृतींना सैनिक दर्पणचा कोटी कोटी प्रणाम !