जाहीर निमत्रंण
भव्य नागरी सत्कार सोहळा
अखिल महाराष्टृ मध्यवर्ती गुरव समाज परिषद आणि पिपंरी चिंचवड गुरव समाज संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या समाजाचे जेष्ठ नेते ज्यांचे ॥राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक-शैक्षणिक -क्षैत्रात फार मोठे योगदान आहे आणि नुकतेच मा मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस साहेब यांचे हस्ते +कोकण साहित्यभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले असे "खोपोली "नगरपालीकेचे विद्यमान नगराध्यक्ष *मा .श्री दत्तात्रय मसूरकर यांचा समाजाचे वतीने मानपत्र देऊन भव्य सत्कार करण्यात येणार आहे तरी सर्व समाज बांधवानी हेच निमत्रंण समजून उपस्थित राहावे ही आग्रहाची विनंती
कार्यक्रम
रविवार दिनांक 13/12/2015 रोजी
वेळ-दुपारी ठिक 12-00वाजता
स्थऴ- चैतन्य सभागृह फत्तेचंद हायस्कूल जवळ बिजलीनगर रोड चाफेकर चौक चिंचवड गांव पुणे33
येथे संपन्न होणार आहे
मा अशोकजी शिलवंत
(चेअरमन अशोक नागरी सहकारी बॅक व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांचे शुभहस्ते
कार्यक्रमाचे अध्यक्ष:-मा. आझमभाई पानसरे(मा.ग्राहक हित संरक्षण चेअरमन(राज्यमंत्री दर्जा महाराष्टृ शासन)
प्रमुख ऊपस्थिती:-
मा सौ शकुंतला धराडे
(महापौर पिं चिं म.न.पा)
मा संजोगजी वाघेरे (अध्यक्ष-राष्टृवादी काॅग्रेस पार्टी पिं चिं शहर)व समाजातील ईतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत कार्यक्रम वेळेतच होणार आहे
कळावे आपले नम्र
प्रताप गुरव अध्यक्ष/प्रकाश गुरव सरचिटणीस /अखिल म.गुरव समाज षरिषद
आणि नारायण गुरव अध्यक्ष(पिं चिं गुरव स) व सर्व पदाधिकारी
विषेश सूचना-पिंपरी चिंचवड गुरव समाज संस्थेच्या वतीने आयोजित केलेला भव्य वधूवर परिचय मेऴावाही याच ठिकाणी आहे कृपया याची सर्वानी नोंद घ्यावी)
शनिवार, १२ डिसेंबर, २०१५
जाहीर निमत्रंण
बुधवार, २५ नोव्हेंबर, २०१५
दत्ता मसुरकर - भामरे आण्णा
मी कर्जत दहिवेली ला भालचंद्र घुमरेंकडे भाड्याच्या घरात रहात असतांना ;माझी समाजसेवा व शिक्षकी पेशाची माहिती कै.खंडाळकर गुरूजीं मार्फत गुरव समाजाचे अध्यक्ष कै.शंकर पांडूरग गुरवांच़्या कानावर गेली.
त्यांनी आवर्जून जेवणाचे आमंत्रण दिले.
गप्पांमध्ये १९७२लाच सर्व शाखिय रोटी बेटी व़्यव्हाराला गुरव समाज ऊन्नती संस्थेने केलेल्या ठरावाची माहिती दिली.
जवळिकता वाढली व खोपोलीला गगनगिरी आश्रमात संपन्न होणाय्रा अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रीत केले.
अधिवेशनाचे आयोजक होते ऊमद्या व्यक्तिमत्वाचे तरूण दत्तात्रय मसुरकर.
प्रस्तावने पासून स्वागत कसे शिस्तिने चालू होते.
मी आमच्या संस्थेची माहिती दिली समाजाने व मसुरकरांनी सुद्धा कौतुक केले.
मी निघतांना शंकररावांनसमोर
मसुरकरांचे वक्रुत्वाची व कार्यत्परतेची वास्तवता मसुरकरांसमोर कथन केली की यांचे भविष्य फारच ऊज्वल आहे.
अन तो दिवस आला दत्ताजींनी ऊद्दोग मय खोपोलीवर ठसा उमटायला सुरवात केली
त्याच काळी मी धुळ्याकडे समाजसेवेच्या वेडापायी बदली करून घेतली.
नगरसेवक व हा हा म्हणता खोपोलीचे नगराध्यक्ष पद.
राष्ट्रवादी व शरदजींचा विश्वासू सहकारी;म्हणून संपूर्ण कोकणभर नाव लौकिक मिळवला.
मी त्यांना आमच्याकडील कामकाजाचे टपाल कायम पाठवत राहिलो
कार्यबाहुल्यामुळे १९९५ च्या सुरत गुजरात येथिल अधिवेशनात सत्कार गुजराथ समाज कल्याण मंत्री फकिरभाई वाघेला यांचे शूभ हस्ते ठेवला असतांना अचानक पवारांच्या कार्यक्रमात हजर रहावे लागले. घरी येवून पहातो तर दिलगिरीचे पत्र.
हे ऊमदे नेत्रुत्व १९८०/८१च्या दरम्यान जर प्रयत्न वादी राहिले असते ;अन बी एल पाटलाची साथ सोडली असती तर कदाचीत तुकाराम सुर्वेच्या जागी आमदार राहिले असते.
ते फक्त गुरवांचे न रहाता सर्वांनांच हवेसे वाटतात.
त्याचाही अनुभव जेव्हा कर्जतचे आमदार सुरेश लाड त्यांना शोधत आले तेव्हाच मला आला.
अशा या उमद्या व्यक्तीमत्वाने
आपल्या विधायक कामाच्या
जोरावर कोकण ज्ञानपिठ पुरस्कार मिळवला व मुख्यमंत्र्यामच्या शुभ हस्ते तो स्विकारला सुद्धा.
गुरव समाजाचा गौरव वाढविणाय्रा या गुरव संमाजाच्या शिखर परिषदेच्या कार्याध्यक्षाला त्रिवार वंदन
सांमाजीक विधायक कामातूनच हा मित भाषी नेता
राजकारणाचा बादशहा शरदरावजी पवाराच्या विश्वासू नेत्यापैंकी एक झाले आहेत .
अशा गौरवशाली नेत्याचे अभिनंदन !!!
विश्वासराव भामरे आण्णा
अध्यक्ष
अँड सुरेंद्र सोनवणे जन. सेक्रेटरी
अखिल भारतिय गुरव समाज हितवर्धक संस्था
बुधवार, १८ नोव्हेंबर, २०१५
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिना निमित्त प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम
नाशिक शिवसेना प्रभाग क्र. 46 , शिवमुद्रा युवक मित्र मंडळ श्रीइच्छापुर्ति गणेश मंदिर रायगड चौक यांच्या वतीने रायगड चौक येथे स्व. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिना निमित्त प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजीत केला होता .
या वेळी शेकडो दिप प्रज्वलित करून आदरांजली वहान्यात आली कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना माजी उपविभाग प्रमुख किरण शिंदे यांनी केले होते या कार्यक्रमास शिवमुद्रा युवक मित्र मंडळाचे योगेश गांगुर्डे, श्रीकांत शिंदे, युवासेना उप महानगर अधिकारी युवराज दराडे , भारतीय विद्यार्थी सेना विभाग प्रमुख ललित वाघ , शिवराणा मित्र मंडळाचे योगेश पाटिल, रायगड चौक मित्र मंडळाचे अमोल डावखर, दैवत प्रतिष्ठानचे मनोज सावंत , गणेश अवस्थी , बाळा अमृतकर , निलेश तनपुरे , शिरीष सोनवने , दिपक साळुंखे , निलेश नेहते गणेश गवळी , नितिन झांबरे , शिवा शिंदे , महेश पवार , बापु गवळी , सुधिर भदाने , अश्विन पाटिल , स्वप्निल शिंदे, सौरभ संधान, राकेश भागडे , गौरव शिंदे , पंकज चौधरी, संदीप शिरसाठ , प्रशांत पवार , कुनाल वाणी , हरीष कुंभारे , बंटी चौधरी , प्रशांत ठाकरे , संदीप कुर्हे, दिपक पाटे ,शांतनु भोर, यांच्या सह परिसरातील नागरिक व्यापारी मोठया संखेने उपस्थित होते
मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०१५
राज्यसरकारच्या प्रथम वर्षपुर्तीबद्दल भाजपा वेल्हे आयोजीत आनंद सोहळा
राज्यसरकारच्या प्रथम वर्षपुर्तीबद्दल भाजपा वेल्हे आयोजीत आनंदसोहळ्याचा एक भाग फुल पिच टेनिस टुर्नामेंटचा पारीतोषिक वितरण समरंभ विंझर येथे प्रचंड जल्लोषात संपन्न झाला. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेमध्ये भोर, वेल्हे, मुळशितील एकूण ४६ संघानी आपले सामने खेळले रविवारी अंतीम फेरीचा सामना झाल्यावर पारीतोषिक वितरण व नागरीकांना मिठाई वाटप करून आनंद सोहळ्याची सांगता झाली.
पारीतोषीक वितरण कार्यक्रम मा. आमदार शरदभाऊ ढमाले, मनपा गटनेते मा. अशोकआण्णा येनपुरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ सुर्वे, जिल्हा उत्पादन शुल्क समिती सदस्या सौ. शोभाताई पासलकर, मा. भाऊसाहेब पडवळ, पै. बाबाशेठ चोरघे, पै. लालाशेठ रेणुसे, Adv. अनिलजी कदम, प्रदेश सदस्य मा. दादासाहेब धोंडे, माजी नगरसेवक तानाजीराव पानसरे, ह.भ.प. गणेश महाराज भगत इ. मान्यवरांच्या हस्ते आणी उपस्थीती मध्ये संपन्न झाला.
यावेळी विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य, सोसायट्यांचे चेअरमन, गावांमधील विविध प्रतिष्ठनचे अध्यक्ष इत्यादी मान्यवर आणी भाजपा आजी माजी पदाधीकारी व तालुक्यातील बंधु भगीनी आणी मातांनी उपस्थीत राहून खेळाडुंच्या कौतक सोहळ्याची शोभा वृद्धिंगत केली.
कार्यक्रमाचे संयोजक Adv. आण्णासाहेब शिंदे (संचालक कृ. उ. बाजार समिती पुणे) आणी मित्र परीवार, इंजी. सुनिल जागडे आणी मित्रपरीवार, श्री. भरतशेठ सोळंकी मित्र परीवार.......
कार्यक्रमाची क्षणचित्रे
शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०१५
भगवा प्रतिष्ठान यूवासेना शिवसेना ब्राह्मणगाव ( मालेगाव ) तर्फे फराळ वाटप कार्यक्रम संपन्न
या कार्याकार्माचे आयोजन युवासेना तालुका उपाध्यक्ष व भगवा प्रतिष्ठानचे श्री.विजय दिलीपराव गुरव यांनी केले होते.
या कार्याकार्मात गोर गरिबांना सुमारे 500 bags फराळ वाटप करण्यात आले. कार्य क्रमास सुरुवात एकलव्य नगर येथे झाली व सांगता बेघर इंदिरा नगर येथे झाली. कार्य क्रमास भरगोस प्रतिसाद मिळाला.
या फराळ वाटप कार्याकार्मास युवासेना तालुका उपाध्यक्ष विजय दिलीपराव गुरव, शाखा प्रमुख प्रवीण वाडकर, उप शाखा प्रमुख चेतन बागुल ,धान्द्रिचे युवासेना शाखा प्रमुख चेतन चव्हाण, लीलाधर लांडगे, अमित मोरे,पपु बागुल ,श्याम कुमावत ,योगेश कुमावत, गणेश शेवाले, धीरज पवार व समस्त शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.

