चौदा प्रकारचे जप - १ नित्यजप , २ नैमित्तिक , जप , ३ कम्यजप , ४ निषिद्ध जप , ५ प्रायश्चित्त जय , ६ अचल जप , ७ चल जप , ८ वाचिक जप , ९ उपांशु जप , १० भ्रमर जप , ११ मानस जप , १२ अखंड जप , १३ अजपा जप , आणि १४ प्रदक्षिणा जप .
चौदा प्रकारचा भूतसमुदाय - १ सिद्ध , २ गुह्मक , ३ गंधर्व , ४ यक्ष , ५ राक्षस , ६ सर्प , ७ विद्याधर , ८ पिशाच - या आठ देवयोनि आणि ९ सरीसृप , १० वानर , ११ पशुअ , १२ मृग ( जंगली प्राणी ) १३ पक्षी - या पांच तिर्यग् योनि व १४ मनुष्य योनि . असा चौदा प्रकारचा भूतसमुदाय अथवा प्राणिमात्र होत .
चौदा प्रकार यज्ञाचे - १ अग्निष्टोम , २ अत्यग्निष्टोअम , ३ उक्थ , ४ षोडशी , ५ वाजपेअय , ६ अतिरात्र , ७ आप्तोर्याम , ह्मा सात सोमसंस्था आणि ८ अग्निहोत्र , ९ दर्शपूर्णमास , १० आग्रयण , ११ पिण्डपितृयज्ञ , १२ चातुर्मास्य , १३ निरूढ पशुबंध आणि १४ सौत्रामणि . अशा सात हवियज्ञ संस्था मिळून चौदा प्रकार होत .
चौदा प्रकार रुद्राक्षांचे - एक ते चौदा मुखें असलेल्या रुद्राक्षांचीं चौदा नांवें क्रमानें :- १ शिव . २ देवदेवेश्वर , ३ अनल , ४ ब्रह्मा , ५ कालाग्निरुद्र , ६ कार्तिकेय , ७ अनङ्ग , ८ विनायक , ९ मैरव , १० नजार्दन , ११ रुद्र , १२ आदित्य , १३ विश्चेदेव व १४ परम - शिव .
चौदा प्रकारच्या शालिग्राम शिला - १ प्रलंबघ्न , २ पुंडरीक , ३ वैकुंठ , ४ मधुसूदन , ५ सुदर्शन , ६ नर ७ राम , ८ लक्ष्मीनारायण , ९ वीरनारायण , १० क्षीराव्धिशयन , ११ माधव , १२ हयग्रीव , १३ परमेष्ठी व १४ विष्वक्सेन . असे एक चक्र असलेले शालिग्रामाचे चौदा प्रकार . माध्व संप्रदायांत शालिग्रामपूजनाचें विशेष महत्त्व मानलें आहे .
चौदा प्राकृत भाषा - १ शौरसेनी , २ महाराष्ट्री , ३ मागवी , ४ अर्धमागधी , ५ प्राच्य किंवा गौडी , ६ अवन्तिका ७ दाक्षिणात्य ८ शाकरी , ९ बाल्हिकी , १० द्राविडी , ११ आभीरी , १२ चाण्डाली , १३ शाबरी व १४ पैशाची . ( भारतीय साम्राज्य )
चौदा प्रांत भाषा - १ आसामी , २ बंगाली , ३ गुजराथी , ४ हिंदी , ५ कानडी , ६ काश्मिरी , ७ मल्याळी , ८ मराठी , ९ ओरिया , १० पंजाबी , ११ संस्कृत , १२ तामिळ , १३ तेलगु व १४ ऊर्दू . या चौदा प्रमुख भाषा प्रांतभाषा म्हणून भारतीय घटनेनें मान्य केल्या आहेत . ( हिंदी राज्यघटना ) खेरीज साहित्य अकॅडमीनें इंग्रजी व सिंधी या दोन भाषांस कांहीं प्रमाणांत मान्य्ता दिली आहे .
चौदा प्रमुख नाडया - १ सुषुम्ना , २ इडा , ३ पिंगला , ४ कुहु , ५ गांधारी , ६ हस्तिजिव्हा , ७ सरस्वती , ८ पूषा , ९ पयस्विनी , १० शंखिनी , ११ यशस्विनी , १२ करुणा , १५ विश्बोदरा आणि १४ अलम्बुषा . ( योगशास्त्र )
चौदा प्रमुख स्त्रोते - १ प्राणवह २ उदकवह , ३ अन्नवह , ४ रसवह , ५ रक्तवह , ६ मांसवह , ७ मेदोवह , ८ अस्थिवह , ९ मज्जावह , १० शुक्रवह , १२ आर्तववह , १३ पुरीषवह , व १४ स्वेदवह , शरीरांत उत्पन्न होणार्या असंख्य भावांचें उत्पादन व वहन करणार्या अंसख्य स्त्रोतसांत चौदा प्रमुख खोतसें शास्त्रकारांनीं वर्णिलीं आहेत.
चौदा बलें राज्यशासकांचीं - ( अ ) १ देश , २ दुर्ग , ३ रथ , ४ हत्ती , ५ घोडे , ६ योद्धे , ७ राज्याधिकारी , ८ अंतःपुर , ९ अन्नव्यवस्था , १० अश्वरथादिकांचा पुरवठा , ११ नीति , १२ आयव्यय , १३ द्वव्य - पुरवठा आणि १४ गुप्तशत्रु , हीं चौदा राज्यशासकांचें बलाबल अजमावण्याचीं स्थानें होत . ( आ ) १ अंगबल , २ स्वतःचें शरीरबल . ३ सेनाबल , ४ कोशबल , ५ दुर्गबल , ६ कोटकिल्ले , ५ शक्तिबळ , ६ मंत्रबळ , ९ - १० - ११ वेदत्रयबळ ( आयुर्वेद , धनुर्वेद व गांधर्ववेद ) १२ बुद्धिबळ , १३ ब्राह्मणशेष सुकृतबळ आणि १४ अन्य राज्यांचें साह्मबळ .
चौदा ब्रह्में - १ शब्दब्रह्म , २ नित्येकाक्षरब्रह्म , ३ खंब्रह्म , ४ सर्वब्रह्म , ५ चौतन्यब्रह्म , ६ सत्ताब्रह्म , ७ साक्षिब्रह्म , ८ सगुणब्रह्म , ९ निर्गुणब्रह्म १० वाच्याब्रह्म , ११ अनुभवब्रह्म , १२ आनंदरब्रह्म , १३ तदाकारब्रह्म व १४ अनिर्वाच्यब्रह्म .
चौदा मनु - १ स्वायंभुव , २ स्वारोचिष , ३ उत्तमननु , ४ तामसमनु , ५ रैवत , ६ चाक्षुष , ७ वैवस्वत , ८ सावर्णि , ९ दक्षसावर्णि , १० ब्रह्मा सावर्णि , ११ धर्मसावर्णि , १२ रुद्रसावर्णि , १३ देवसावर्णि व १४ इंद्रसावर्णि . सृष्टिचक्रांत असलेली , कोकस्थिति कांहीं कालानें बिघडते व पुन्हां ती ताळ्यावर आणण्यासाठीं जुळबाजुळव होते . हा जो जुळवाजुळव होऊन मोडेपर्यंतचा काल त्यास मन्वन्तर म्हणतात . त्या मन्वन्तराचा अधिपति तो मनु . असे चौदा मनु आहेत , अशी कल्पना आहे .
चौदा मन्वन्तरें - १ स्वायंभुव , २ स्वारोचिष , ३ उत्तम , ४ तामस , ५ रैवत , ६ चाक्षुष , ७ विवस्वत , ८ सावर्णी , ९ धर्म , १० सावर्णिक , ११ पिशंग , १२ अपिशंगाम , १३ शबल आणि १४ वर्णक . ब्रह्मदेवाचें एक अहोरात्र म्हणजे कल्प , असे तीस कल्प सांगितले आहेत . एका कल्पांत चौदा मन्वन्तरें होतात . सध्यां चालू असलेल्या वाराह कल्पांतल्या सातव्या मन्वन्तराचें नांव वैवस्वत आहे .
चौदा मन्वतरावतार - १ यज्ञ , २ विभु , ३ सत्यसेन , ४ हरि , ५ वैकुंठ , ६ अजित , ७ वामन , ८ सार्वभौम , ९ ऋषभ , १० विष्वक्सेन , ११ धर्मसेतु , १२ सुदामा , १३ योगेश्वर व १४ बृहद्भानु .
चौदा माहेश्वरी सूत्रें - १ अ इ उ ण् , २ ऋ लृ क् , ३ ए ओ ङ् , ४ ए ओ च् , ५ ह य व र ट् , ६ ल ण् , ७ ञ म ङ ण न म् , ८ झ भ ञ् , ९ घ ढ ध ष् , १० ज ब ग ड द श् , ११ ख फ छ ठ थ च ट त व् , १२ क प य् , १३ श ष स र् आणि १४ ह ल् . हीं मूळ सूत्रें पाणिनीनें अठ्ठावीस दिवस तप करून शंकराकडून मिळविलीं . ( भ . प्रतिसर्ग ४ - ३० ) पाणिनीच्या कठोर तपामुळें भगवान् शंकरानें प्रसन्न होऊन ताण्डव नृत्य करीत असतांना जो डमरू वाजबिला त्यांतून निघालेल्या चौदा ध्वनि - नादामुळें हीं मूळ चौदा सूत्रें ध्वनिरूपानें निघालीं .
चौदा यज्ञ ( गीतोक्त )- १ ब्रह्मयज्ञ , २ द्र्व्यज्ञ , ३ देवयज्ञ , ४ ज्ञानेंद्रिययज्ञ , ५ विषययज्ञ , ६ स्वाध्याय - ज्ञानयज्ञ , ७ प्राणयज्ञ , ८ अपानयज्ञ , ९ प्राणापानयज्ञ , १० आंतरपानयज्ञ , ११ योगयज्ञ , १२ तपोयज्ञ , १३ जपयज्ञ व १४ इंद्रियप्रान - कर्मयज्ञ . या सर्वांत जपयज्ञ महत्त्वाचा होय .
चौदा यमधर्म - १ यम , २ धर्मराज , ३ मृत्यु , ४ अंतक , ५ वैवस्वत , ६ नील , ७ दध्न , ८ काल , ९ सर्वभूत , १० षरमेष्ठी , ११ वृकोदर १२ औदुंबर , १३ चित्र व १४ चित्रगुप्त .
चौदा रत्नें -
( अ ) देव आणि दानव यानीं समुद्र्मंथन करून चौदा रत्नें अथवा मूल्यवान् वस्तु काढल्या त्या - १ लक्ष्मी , २ कौस्तुभ , ३ पारिजातक , ४ सुरा , ५ धन्वंतरी , ६ चंद्र , ७ कामधेनु , ८ ऐरावत , ९ रंमा ( आदि अप्सरी ), १० उच्चैःश्रव नामक सप्तमुखी अश्व ( हा श्चेतवर्ण व उन्नतकर्ण असा होता ), ११ कालकूट विष , १२ शाङ्र्ग धनुष्य , १३ पांचजन्य शंख व १४ अमृत होय .
( आ ) प्रत्येक जातींतील श्रेष्ठं वस्तूला रत्न अशी संज्ञा आहे. अशी चौदा प्रकारचीं रन्तें पुराणांत वर्णिलीं आहेत तीं :- १ हत्ती , २ घोडा , ३ रथ , ४ स्त्री , ५ पुरुष , ६ कोश ( धन ), ७ पुषमाला , ८ वस्त्र , ९ वृक्षराजि , १० शक्ति , ११ पाश , १२ मणि , १३ छत्र व १४ विमान .
चौदा रत्नें वेदाब्धिमंथनांतून निघालेली - १ विष - काम , २ मणि - अर्थ , ३ रंभा - नरकप्रदवेश्या , ४ वाजी.५ श्री - शक्ति , ६ वारुणी - अभिमान , ७ धन्वतरि - विष्णु , ८ शंख - मोक्ष , ९ धेन - धर्म , १० धनु - मर्न्य - युद्ध - संघंर्ष , ११ चंद्र - आल्हाद तत्त्व शिव , १२ कल्पवृक्ष - खर्ग ( त्रिवर्गभोग ), १३ गज ऐरावत - गणेश गजानन आणि १४ अमृत - कथा .
चौदा रोगभेद - १ सहजरोग , २ गर्मजरोग , ३ जातज्ञातरोग , ४ पीडाजनितरोग , ५ कालरोग , ६ प्रभावजरोग , ७ स्वभावजरोग , ८ देशजरोग ९ आगंतुकरोग , १० कायिकरोग , ११ आंतररोग , १२ कर्मजरोग , १३ दोषजरोग आणि १४ कर्मदोषजरोग .
चौदा लाभ शिखा धारणानें प्राप्त होणारे - १ निष्णातता , २ जीवनशक्तिन , ३ दीर्घायुष्य , ४ बल , ५ तेज , ६ अन्न , ७ धन , ८ सुमन , ९ द्दष्टि , १९ देवताप्रसाद , ११ यश , १२ प्रजननशक्ति , १३ सुप्रजा आणि १४ उत्तम वीर्य .
चौदा वाचा दोष - १ पद्यांतील प्रयोग गद्यांत व गद्यांतील प्रयोग पद्यांत करणें , २ नाददोष , ३ क्रमदोष , ४ पददोष , ५ वाक्यदोष , ६ शक्तिदोष , ७ सामर्थ्यदोष , ८ गुणदोष , ९ प्रसाददोष , १० माधुर्य व ओजदोष , ११ अर्थदोष , १२ उपदेशदोष , १३ क्रियादोष व १४ अकांक्षा दोष.
चौदा विद्या -
( अ ) १ ऋग्वेद , २ यजुर्वेद , ३ सामवेद , ४ अथर्ववेद हे चार वेद व १ छंद , २ शिक्षा ३ व्याकरण , ४ निरुक्त , ५ ज्योतिष व ६ कल्प - हीं सहा वेदांगें आणि १ न्याय , २ मीमांसा , ३ पुराणें व ४ धर्मशास्त्र - हीं सर्व मिळून चौदा विद्या होत .
( आ ) १ आत्मज्ञान , २ वेदपठण , ३ धनुर्विद्या , ४ लिहिणें , ५ गणित , ६ पोहणें , ७ विणणें , ८ शस्त्र धरणें , ९ वैद्यक , १० ज्योतिष , ११ रमलविद्या , १२ सूपशास्त्र , १३ गायन व १४ गारुड . ( मूळ स्तंभ , ) ( इ ) १ ब्रह्मज्ञान , २ रसायन , ३ श्रुतिकथा , ४ विद्यक , ५ नाटय , ६ ज्योतिष , ७ व्याकरण , ८ धनुर्विद्या , ९ जलतरण , १० कामशास्त्र , ११ सामुद्रिकशास्त्र , १२ तन्त्रशास्त्र , १३ मंत्रशास्त्र आणि १४ परस्वहरण.
चौदा वेग मानव शरीरांतले - १ अधो वायुवेग , २ रेचन ( मल ) वेग , ३ मूत्रवेग , ४ ढेकर , ५ शिंक , ६ तृषा , ७ क्षुधा , ८ निद्रा , ९ खोकला . १० श्रमजनित श्वासवेग , ११ जांभई , १२ अश्रुवेग , १३ वमन ( ओकारी ) आणि १४ कामवेग . या वेगांच अवरोअध केला असतां शरीरांत विकृति निर्माण होते .
चौदा शिलाशासन लेख व विषय ( अशोकाचे )- १ अहिंसा , २ धार्मिक कृत्यें , ३ अधिकार्याची पंचवार्षिक फिरती , ४ धर्माचरण , ५ धर्म महासभा , ६ कामाचा उरक , ७ धार्मिक गुण , ८ धर्मयात्र , ९ मंगल समारंभ , १० यश व कीर्ति , ११ दानधर्म , १२ परमतसहिष्णुता , १३ धर्मविजय व १४ उपसंहार , असे चौदा महत्त्वाचे शिलाशासन लेख सर्व भारतांत अनेक ठिकाणीं आढळले असून त्यावरून भारताच्या प्राचीन इतिहासाची महत्त्वाची माहिती मिळते .
चौदा शुभयोग - १ आनंद , २ प्रजापति , ३ सौम्य , ४ घ्वज , ५ श्रीवत्स , ६ छत्र , ७ मित्र , ८ मानस , ९ सिद्धि , १० शुभ , ११ अमृत , १२ मातंग , १३ स्थिर व १४ वर्धमान . हे चौदा संपूर्ण शुभयोग मानले आहेत .
चौदा शैव ( वेदकालीन )- १ दुर्वास , २ विश्वामित्र , ३ चतुरानन , ४ मार्कंडेय , ५ इंद्र , ६ बाणासुर , ७ नारायण , ८ कार्तिकेय , ९ दधिचि , १० श्रीराम , ११ कण्व , १२ भार्गव , १३ बृहस्पति व १४ गौतम.
चौदा समाधिस्थानें चांगदेवाचीं - १ ब्रह्मगिरि , २ पुण्यस्तंभ , ३ नारायण डोह , ४ गिरनार , ५ निर्मळ , ६ प्रयाग , ७ निर्गुंद , ८ सेतुबंध , ९ जगन्नाथपुरी , १० मणिपुरी , ११ चंद्रगिरि , १२ शरय़ूतीर , १३ अविमुक्त क्षेत्र ( वाराणशी ) व १४ गोदातीरां पुणतांबें , चांगदेव महायोगी होतो .
दर शंभर वर्षांनीं योगसामर्थ्यांनें जुना देह टाकून नवा देह धारण करीत . अशा रीतीनें ते चवदाशें वर्षें जगले . शेवटची समाधि पुणतांबे येथें गोदातीरीं आहे .
चौदा सहजप्रवृत्ति व त्यांच्या जोडीनें प्रगट होणार्या भावना - १ विमोचन प्रवृत्ति - भीति , २ युद्ध प्रवृत्ति - राग , ३ जुगुप्सा प्रवृत्ति - तिटकारा , ४ वात्सल्य प्रवृत्ति - मृदुभाव , ५ याचना प्रवृत्ति - आर्तभाव , ६ संभोग , प्रवृत्ति - कामभाव , ७ आत्मसमर्पण प्रवृत्ति - हीनभाव , ८ जिज्ञासा प्रवृत्ति - आश्वर्य , ९ आत्मविधान प्रवृत्ति - अहंभाव , १० संध प्रवृत्ति - एकाकी भाव , ११ अन्नसंशोधन प्रवृत्ति - क्षुधा , १२ निर्माण प्रवृत्ति - कर्तृभाव , १३ संपादन प्रवृत्ति - स्वाम्यभाव व १४ हास्य प्रवृत्ति - विनोदभाव.
चौदा हेर प्राणिमात्रांच्या वर्तनावर देखरेख करणारे - १ सूर्य , २ चंद्र , ३ बायु , ४ अग्नि , ५ आकाश , ६ भूमि , ७ जल , ८ अंतःकरण , ९ यम , १० दिवस ११ रात्र , १२ सूर्योदय व १३ सूर्यास्त समयींचे संधिकाल आणि १४ धर्म ....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा