................
१ जानेवारी ! नव्या वर्षाचा नवा दिवस. ३६५ दिवसांचा काळखंड संपला की दरवर्षी हा 'नवा दिवस' उगवतो. भिंतीवर लटकवलेलं मागील वर्षाचं कॅलेंडर काढून त्या जागी नवं कॅलेंडर घरा - घरात लावलं जातं. पुन्हा नव्या उमेदीने, नव्या उत्साहाने आपण कामाला लागतो. नव्या वर्षाची सोनेरी पाऊले पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी उत्सुकतेचे पंख घेऊन उभे राहतो.सरत्या वर्षातील सुख - दु:खाचे हिशेब मांडून या वर्षात चुका सुधारण्याचा आपण प्रयत्न करतो. नव्या स्वप्नांना उजाळा देतो. दिवस जाऊन रात्र येते, हे अनादी काळापासून सुरु असलेलं निसर्गाचे चक्र. तसं नवीन काहीच नाही. या एका दिवसाने आपल्या आयुष्यात तसा फारसा काही फरक पडत नाही. तरीही नवीन वर्षाचा नवा दिवस हा नवी अनुभूती देऊन जातो आणि म्हणूनच या नव्या दिवशी नव्याने जगण्यासाठी आपण स्वत:हुन संकल्प करतो. दृढ निश्चय करतो आणि तो अमलात आणण्याचा काटेकोरपणे प्रयत्न करतो.यावर्षीही नवीन वर्षाच्या सुरुवातीला सर्वजन संकल्प करतील आणि संकल्पाप्रमाणेचजीवन जगण्याचा प्रयत्न करतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. कारण नवीन वर्षाचा संकल्प हा कधीच पूर्ण होत नाही, असं प्रत्येकजण बोलतो. केलेला संकल्प फार तर आठ दिवस टिकतो. पुन्हा ये रे माझ्या मागल्या. जसं मागील वर्षी जगलो तसंच या वर्षीही जगतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात फार फरक पडत नाही. आपण बदलण्याचा प्रयत्न करतो पण बदलतनाही तीच मोठी मानवी जीवनाची शोकांतिका आहे. त्यामुळे जीवन दु:खमय होत चाललंय. सुख माणसापासून शेकडो कोस दूर चाललंय. जगायचं म्हणून जगायचं हे रडगाणं वर्षानुवर्षे सुरु आहे. परिस्थिती बदलत नाही. जन्माला आल्यापासून मृत्यू पर्यंत हाच प्रकार चालत आल्यानेआपल्याला त्याची सवय झालीय. ही सवय वेळीच बदलली नाही तर आपलाही 'डायनासोर' होईल. डायनासोर बदलला नाही म्हणून संपला. आपण ही एक दिवस संपू आणि आपलं नामोनिशान मिटून जाईल. आपण जन्माला का आलो? आणि कधी मेलो? हेही कळणार नाही. म्हणून नव्या वर्षात नव्या जिद्दीने जगण्याचा संकल्प करण्याची ही वेळ आली आहे. चहूबाजूंनी अंधार दाटून आलाय. संकटांवर संकटं कोसळत आहेत. ज्यांच्याकडे मोठया आशेने पाहावं तेच हतबल आहेत. दहशतवाद फोफावलाय. भ्रष्टाचाराने कहर केलाय. निसर्ग कोपलाय. महागाई गगणाला भिडलेय. अशा परिस्थितीमध्ये सुखाने जगायचं कसं? हाच मोठा प्रश्न आहे. या अशा भीषण परिस्थितीवर मात करण्यासाठी नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच संकल्प करूया, नव्याने नवीन जीवन जगण्याचा संकटांवर मात करत लढण्याचा. अपयश झटकुन यश मिळवण्याचा आणि दु:खावर विजय मिळवत सुखी होण्याचा.दरवर्षी नव्या वर्षाच्या सुरुवातील प्रत्येक माणूस नव - नवीन संकल्प करतो आणि केलेला संकल्प आठवडाभरातच मोडण्यासाठीच असतो असं मानून तोमोडतो. आपण संकल्प म्हणून जे - जे ठरवतो ते - ते प्रत्यक्षात कधी उतरतच नाही. पूर्ण होतच नाही. हाच प्रत्येकाचा अनुभव असतो. त्यामुळे संकल्पांचं चऱ्हाट हे वर्षानुवर्ष मरे पर्यंत चालुच असतं. मागील वर्षी केलेले संकल्प या वर्षाच्या पहील्या दिवशी आठवतात. मागील वर्षी केलेलं सर्व संकल्प मोडलेले असतानाच आपण नवीन संकल्प करतो आणि तेही मोडतो. त्यामुळे वर्ष संपताना, नवे वर्ष उजाडताना किंवा मधुनच एखादया चुकार क्षणीआपल्याला वाटतं, मागील वर्षी काय केलं आपण? कुठे होतो वर्षभर? काहीच कसं घडलं नाही आपल्या हातुन? 'क्षण ना क्षण महत्वाचा आहे' ,असे आपणच म्हणतो आणि क्षण सोडा अख्खे वर्षच्या वर्ष आपण मोफत घालवतो. हे असं होतच कसं? असे प्रश्न सर्वांना पडतात आणि तरीही नव्या वर्षाचे नवे संकल्पजाहीर केले जातात.यावर्षी मात्र भविष्याचा वेध घेऊन, आगामी संकटाची चाहुल लक्षात घेऊन आपण नवीन वर्षाला सामोरं जाऊ या. जो संकल्प करू तो वर्षभर नित्यनेमाने पाळू असा निश्चय करू या. काही लोकं खुप साधे - साधे संकल्प करतात. तेही त्यांना पूर्ण करता येत नाहीत. पुढील वर्षात दारूच्या थेंबालाही स्पर्श करणार नाही असे म्हणत एक दिवस अगोदर थर्टीफर्स्टलाच फुल टाइट होणारे दुसऱ्या दिवशी सकाळीच नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच 'उतारा' म्हणून पुन्हा दारू पितात आणि 'आम्ही दारू सोडली होती पण दारूच आम्हाला सोडत नाही' असे म्हणतात. कुणी दररोज व्यायाम करण्याचा संकल्प करतो. दररोज रोजनिशी लिहीन म्हणत नवीनडायरी आणतो पण सुरुवातीची दोन-चार पाने सोडली तर पूर्ण डायरी वर्षभर कोरीच असते तरीही नव्या वर्षी नवीन डायरी घेतो. हे असे साधे - साधे संकल्प आपण पूर्ण करू शकत नाहीत म्हणून पूर्ण जीवन जगण्याचा संकल्पही पूर्ण होत नाही. शंभरातुन एखादयाचा संकल्प पूर्ण होतो. त्यासाठी जिद्द लागते. नेहमीची सवय लागते. स्वत:च स्वत:शी प्रामाणिक असावे लागते. पण तसं होत नाही त्यामुळे संकल्प मोडतात.बहुतांशी लोकांच्या बाबतीत हे असेच होते. याचे कारण म्हणजे, बदलण्याची सवय ही आपल्याला लहानपणापासून नसते. कधीतरी लक्षात आल्यावर, समजायला लागल्यावर आणि त्याच परिस्थितीमध्ये जगण्याची सवय लागल्यानंतर या संकल्पांच्या वाटेला जातो. त्यामुळे आपल्याला पटकन बदलता येत नाही. बदलण्याचा निर्णय आपल्या तार्किक मेंदूने घेतलेला असतो. पण वर्षानुवर्षाच्या सवयीमुळे मेंदू आपली ठरावीक चाकोरी बदलायला तयार होत नाही मग बंड करतो आणि आपला संकल्प फसतो. म्हणूनच वेळ निघून गेल्यानंतर संकल्प करण्यापेक्षा हातात वेळ असतानाच मेंदूला बदलण्याची सवय हळूहळू लावायला हवी. कुठलीही कृती एका दिवसात करण्यापेक्षा त्याची तयारी खुप आधीपासून करायला हवी. त्यामुळे मेंदूला सवय होते व शरीराला त्रास होत नाही. एकाच वेळी एकच संकल्प करावा व त्यामध्ये ह्ळुहळु प्रगती करत राहावी. संकल्प करतानाच आपल्याला झेपेल, पचेल असाच मात्र पूर्णत:जीवन बदलवून टाकणारा व नव्याने चांगले जीवन जगायला लावणारा संकल्प करावा. तेच-तेच जीवन जगण्याचा अक्षरश: कंटाळा येतो. जे काही जीवन हातात आहे ते चांगल्या पद्धतीने जगण्याचा संकल्प आपण निवडायला हवा. तरच त्यामध्ये यश मिळते नाहीतर आठवडाभरातच त्या संकल्पाची मोडतोड होते. पुन्हा आहे तेच आपण जगतो आणि मग तेच-तेच जीवन जगण्याचा आपल्याला कंटाळा येतो. आपल्याच जीवनाला आपण कंटाळतो, त्रासतो. कधी एकदा मरण येतं याची वाट पाहत बसतो किंवा दु:खात, संकटात कसेबसे दिवस ढकलतो. म्हणूनच सुरुवातीचा संकल्प हा विचार करूनच निवडायलाहवा. आपण आपल्या आयुष्यात आपला जीवन साथी निवडताना खुप विचार करतो. सर्वप्रकारची काळजी घेतो आणि त्यानंतरच निर्णय घेऊन लग्नकरतो व आयुष्यभराची सोबत करतो. जे विचार करत नाहीत काळजी घेत नाहीत त्याचं जीवन गाणे हे रडगाणे होऊन बसते आणि ते आयुष्यभर पस्तावतात. संकल्पाचेही अगदी तसेच असते. म्हणून संकल्प चांगला करा. तो निवडताना काळजी घ्या आणि जीवनातयशस्वी व्हा.ज्यांना आयुष्यात सुखी व्हायचे आहे. आपल्या मनाप्रमाणे सुंदर आयुष्य जगायचे आहे त्यांनी संकल्प सिद्धीस न्यायलाच हवेत आणि त्यासाठी १ जानेवारी सारखा मुहर्त शोधून सापडत नाही. नवीन वर्षाची सुरुवात याच दिवसापासून होते. नवीन वर्षात आपण नव्याने जीवन जगु असा संकल्प करून पाऊल पुढे टाकले की यश मिळतेच मिळते. संकल्प जसे आपोआप मोडतात तसेच ते निश्चय केला तर आपोआप पूर्णही होतात. फक्त मनाशी निश्चय केला पाहिजे आणि आपण आपल्या निश्चयाशी प्रामाणिक असले पाहीजे. नव्या वर्षात प्रामाणिकपणे निश्चय करण्याचे बळ सर्वांच्या अंगी येवो, हीच विश्वविधात्या समोर विन्रम प्रार्थना. सर्वाना नव्या वर्षाच्या लाख - लाख शुभेच्छा !
शनिवार, २ जानेवारी, २०१६
संकल्प
वर्ष येतात नि जातात
वर्ष येतात नि जातात,
वर्षाचा शेवटचा दिवस आला कि, "गेलेलं संपूर्ण वर्ष कसं गेलं...?" याचा हिशोब लावायला सुरुवात होते.
गेलेल्या वर्षात खूप काही झालं, खूप काही मिळालं, खूप काही गमावलं...
आता जे कमवलं किंवा जे गमावलं, त्याला "खूप" कसे म्हणता येईल हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे...
नवीन माणसं भेटली "जीव" बनली, काही "जीव" लावलेली माणसं दुरावली..
काही श्वास भास ठरले आणि काही भास श्वास ठरले.
जे चांगलं होतं, मनापासून हवं होतं आणि ते आयुष्याने आपल्याला मिळवून दिलंय त्याची किंमत ठेवायची, मिळालंय ते जपून ठेवायचं...
"सगळेच नशीबवान नसतात, आपण नशीबवान निघालो"
असे म्हणून आयुष्याचे आभार मानून मिळालेलं टिकवून ठेवायचं...
कारण
आयुष्य आपल्याला "मिळवून द्यायचं" काम करतं. ते जपणं आपल्या हातात असतं..
आपण चालायचे थांबतो पण आपण थांबलो म्हणून घड्याळाचे काटे थांबतात का...?
नाही, त्यांची टिकटिक चालूच राहते "वेळ थांबत नसतो"...
"दु:ख मनाच्या कुपीत बंद करायचं आणि सुखाच्या स्वागतासाठी सज्ज रहायचं"
.
अँड.सुरेन्द्र सोनवणे, नाशिक http://sainikdarpan.blogspot.in/
http://adharvad.blogspot.in
नववर्षातील काही ठळक घडामोडी
येत्या शुक्रवारपासून '२०१६' या नव्या वर्षाची सुरुवात होत आहे. या वर्षात काय घडणार आहे, या वर्षाची वैशिष्ट्ये काय. याविषयी पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिलेली ही विस्तृत माहिती...
•✨यावर्षी ३६६ दिवस
२०१६ हे वर्ष लीप वर्ष असल्याने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात २८ ऐवजी २९ दिवस आहेत. त्यामुळे हे वर्ष ३६५ ऐवजी ३६६ दिवसांचे असेल. त्यामुळे आपल्याला एक जास्त दिवस काम करण्याची संधी मिळणार आहे.
•✨मकर संक्रांत १५ जानेवारीला
मकर संक्रांती दरवर्षी १४ जानेवारीला येते असा आपला समज आहे. पण, प्रत्यक्षात तसे नसते. मकर संक्रांतीचा दिवस पुढे जात असतो. नव्या वर्षी मकर संक्रांती १५ जानेवारीला येणार आहे.
•✨रविवारला धरून सुट्ट्या
मार्च, एप्रिल, ऑगस्ट, ऑक्टोबर महिन्यात सलग चार दिवस सुट्या आल्याने चाकरमान्याना बाहेरगावी जायची संधी मिळेल. या सुट्या रविवारला जोडून येत आहेत.
•✨गणपती लवकर येणार!
नव्या वर्षी गणेशाचे आगमन दहा दिवस अगोदर म्हणजे पाच सप्टेंबर रोजी होत आहे. गौरींसोबत विसर्जन होणाऱ्या गणपतींचा मुक्काम सहा दिवसांचा असणार आहे.
•✨गुरुपुष्यामृत योग
सन २०१६मध्ये १४ एप्रिल, १२ मे, ९ जून, असे तीन दिवस गुरुपुष्यामृत योग सुवर्ण खरेदीसाठी येत आहेत.
•✨एकही अंगारकी नाही!
संकष्टी चतुर्थी मंगळवारी न आल्याने नूतन वर्षामध्ये एकही अंगारकी चतुर्थी नाही.
•✨खगोलीय घटना...
> बुधवार, ९ मार्च रोजी होणारे खंडग्रास सूर्यग्रहण पूर्व भारतातून दिसणार आहे. मुंबई पुण्यातून दिसणार नाही.
> बुधवार, २३ मार्च रोजी होणारे छायाकल्प चंद्रग्रहण रात्री ७-२५ पूर्वी चंद्रोदय होईल तेथून दिसेल.
> सोमवार, ९ मे, बुधाचे अधिक्रमण - बुध ग्रह ज्यावेळी सूर्यबिंबावर आलेला दिसतो त्याला 'बुधाचे अधिक्रमण' म्हणतात. नूतन वर्षी बुधाचे अधिक्रमण भारतातून दिसणार आहे. सोमवार, ९ मे रोजी सायंकाळी ४.४४ वाजता बुध ग्रह सूर्यबिंबावर येईल. तो सूर्यबिंबावरून बाहेर पडण्यापूर्वीच सायंकाळी ७.३ वाजता सूर्यास्त होईल. हे दृश्य साध्या डोळ्यांनी पाहू नये. जाणकारांच्या मदतीने दुर्बिणीच्या साहाय्याने सूर्याची प्रतिमा पांढऱ्या कागदावर पाडून त्यामध्ये हे दृश्य पाहावे. सूर्यबिंबावर बुधाची काळी तीट लावलेले दृश्य दिसेल. हे बुधकृत सूर्यग्रहणच असेल. यानंतर ११ नोव्हेंबर २०१९ रोजी बुधाचे अधिक्रमण होईल.
> १८ ऑगस्ट रोजी होणारे छायाकल्प चंद्रग्रहण आणि एक सप्टेंबर रोजी होणारे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही.
> १६ सप्टेंबर रोजी होणारे छायाकल्प चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे.
•✨विवाह मुहूर्त
सन २०१६मध्ये वर्षी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, जुलै, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात विवाह मुहूर्त आहेत. १ मे रोजी मुहूर्त आहे. नंतर शुक्र अस्त असल्याने उर्वरित मे-जून मध्ये मुहूर्त नाहीत.
•✨पाऊस समाधानकारक
जुन्या ठोकताळ्याप्रमाणे पर्जन्य नक्षत्रे-वाहने पाहता सन २०१६ मध्ये पाऊस समाधानकारक पडेल.
इंग्रजी 2016 वर्षाचे स्वागत✨
नववर्ष तुम्हाला सुख़-समृद्धि आणि भरभराटीचे जावो✨✨✨✨