शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २०१५

बाप - आई -- श्री कल्पेश शिरसाठ


शाळेपासून बापाच्या,
धाकात तो राहत असतो.
कमी मार्क पडलेलं,
प्रगतीपुस्तक लपवत असतो.

आईच्या पाठी लपून तो,
बापाशी बोलत असतो.
डोळा चुकवून बापाचा,
हुंदडायला जात असतो...

शाळा संपते, पाटी फुटते,
नवं जग समोर येतं.
कॉलेज नावाच्या भुलभुलैयात,
मन हरखून जात असतं.

हाती असलेले मार्क घेऊन,
पायरया झिजवत फिरतअसतं.
बाप पाहतो स्वप्नं नवी,
हे मुखडा शोधत असतं...

सुरू होतं कॉलेज नवं,
दिवस भुर्रकन उडून जातात.
एटीकेटीच्या चक्रातून,
वर्षं पुढे सरत जातात.

ग्रुप जमतो, दोस्ती होते,
मारामाऱ्या दणाणतात.
माझा बाप ठाऊक नाही,
अशा धमक्या गाजतअसतात.

परीक्षा संपते, अभ्यास सरतो,
डिग्री पडते हाती याच्या.
नोकरी मिळवत, आणि टिकवत,
कमावू लागतो चार दिडक्या.

आरामात पसरणारे बाजीराव,
घोड्यावरती स्वार होतात,
आणि नोकरीच्या बाजारात,
नेमानं मोहिमा काढू लागतात...

नोकरी जमते, छोकरी सापडते,
बार मग उडतो जोरात.
एकट्याचे दोघे होतात,
सुखी संसार करू लागतात.

दोघांच्या अंगणात मग,
बछडं तिसरं खेळू लागतं.
नव्या कोऱ्या बापाला,
जुन्याचं मन कळू लागतं...

नवा कोरा बाप मग,
पोरा सवे खेळू लागतो,
जुना बाप आता नव्याने,
आजोबाच्या कायेत शिरतो.

पोराशी खेळता खेळता,
दोघेही जातात भूतकाळात.
एकाला दिसतो दुसरा लहान,
दुसरा पाहतो गोष्ट महान...


लेकरासाठी मग त्याला,
कळवळणारा बाप दिसतो,
त्याची लाल रेघ जो, 
उरात घेऊन फिरत असतो...

दोन घास कमी खाईल;
पण पोरांना गोड देतो.
हट्टासाठी पोरांच्या,
ओव्हरटाईम करत असतो...


बाप कधी रडत नाही, 
बाप कधी खचत नाही,
बाप कधी उतत नाही,
बाप कधी मातत नाही.

पोरं सोडतात घरटं अन्,
शोधू लागतात क्षितिजं नवी.
बाप मात्र धरून बसतो,
घरट्याची प्रत्येक काडी...

पोरांच्या यशासोबत,
त्याचं मन हसत असतं,
अपयश पचवताना,
मात्र आतून रडत असतं.

काही झालं, कितीही झालं,
तरी कणा ताठ असतो.
खचलेल्या पोराला, 
तोच तर उभारी देत असतो...

सारी कथा समजायला,
फार मोठं व्हावं लागतं.
बापाचं मन कठीण फार,
चटकन हाती लागत नसतं.

आकाशाहून भव्य अन्,
सागराची खोली असते.
बाप या शब्दाची,
महतीच मोठी न्यारी असते...

कळत नाही बापाचं मन,
स्वतः बाप झाल्याशिवाय.
बापमाणूस असतो तो,
कसा कळणार बापांशिवाय ? 

असतं न्यारंच रसायन,
त्याची फोड उकलत नाही.
म्हणून तर बापावर कविता,
कधी कोणी करत नाही...

करणार कशी कविता कोणी ?
तो त्यात मावत नाही.
चार ओळीत सांगण्यासारखा,
बाप काही लहान नाही.

सोनचाफ्याचं फूल ते,
सुगंध कुपीत ठरत नाही.
बाप नावाच्या देवाचा,
थांग कधी लागत नाही...

एक मात्र अगदी खरं,
त्याच्याशिवाय जमत नाही.
आईमार्फत बोललं तरी,
बोलल्याशिवाय राहवत नाही...

बाप नावाच्या पारिजातकाचं,
असंच काहीसं जिणं असतं... 
ते समजून घेण्यासाठी,
बापच होणं भाग असतं.........    

========≠======

शेवटचे वाक्य महत्वाचे आहे
जेव्हा फुटत होती प्लेट
बालपणी तुमच्या कडुन
आता आई कडुन फुटली 
तर तिला काहीही बोलु नका
   
जेव्हा मागत होते फुगा
लहानपणी आई जवळ
आता आई चष्मा मागते
तर तिला नाही म्हणु नका 
तुम्ही


जेव्हा मागत होते चॉकलेट 
लहानपणी आई जवळ
आता आई औषध मागते
तिला आणायला विसरु नका तुम्ही
  

आई रागवत होती तुम्हाला
जेव्हा मस्ती करीत होत तुम्ही
आता तिला ऐकु येत नाही
तर तिला रागावु नका तुम्ही


जेव्हा चालत नव्हते तुम्ही
आई बोट धरुन चालवत होती
आता ती चालु शकत नाही
तर तिचा हात पकडुन सहारा द्या तुम्ही
   

जेव्हा रडत होते तुम्ही
आई छातीला लावत होती
आता सहन करा दु:ख 
तुम्ही तिला रडु देवु नका तुम्ही


जेव्हा जन्मले होते तुम्ही
आई तुमच्या जवळ होती
जेव्हा आईचा शेवटचा क्षण येईल
तेव्हा तिच्या जवळ नक्की थांबा तुम्ही.....


============

आईने बनवलं,
बाबांनी घडवलं,
आईने शब्दांची ओळख करून दिली,
बाबांनी शब्दांचा अर्थ समजवला
आईने विचार दिले,
बाबांनी स्वातंत्र्य दिले,
आईने भक्ती शिकवली,
बाबांनी वृत्ती शिकवली,
आईने लढण्यासाठी शक्ती दिली,
बाबांनी जिंकण्यासाठी नीती दिली,
त्यांच्या परिश्रमामुळे यश माझ्या
हाती आहे
म्हणून तर माझी आज ओळख आहे.


==============
ओंजळीतील मायेची इथे 
कुणा किंमत कळत नाही,
तिचं ते ओंजळीतल देणं 
काही केल्या सरत नाही...

================

"आई"..."आई"..."आई"...असते...
देऊळ नसते...
देव नसते...
दुधावरली साय नसते...
फुल नसते...
चंद्र, तारा, वारा, चांदण्या, आकाश नसते...
अथांग अथांग सागर नसते...
"आई"...म्हणजे नक्की काय...?
कोणीही सांगू शकणार नाही...
पण तरीही मला वाटते...
"आई"... म्हणजे तीच्या मुलाला...
या जगात तुच "सर्वश्रेष्ठ" आहेस...
असा आत्मविश्वास देणारी...
एक महान...प्रेमळ...व्यक्ती...असते !!!
"आई"..."आईच"...असते...!!!!


=============
ऊन डोईवर घेवून बघं त्याची 
माय रोज राबते शेतात आहे,
बापाबद्दल विचारलं तर म्हणे 
तो लपला कधीच ढगात आहे...

_______

एक सुंदर पत्र आईविना असलेल्या एका मुलाने आपल्या आईस

काव्य रूपाने लिहुन पाठविले आहे ते मला आवडले म्हणून मी तुम्हा सर्वांना पाठवित आहे.

प्रिय आईस,

पत्ता: देवाचे घर,

तुझा हात हवा होता
सदा माझ्या उश्यावर,

           थोपटून मला झोपवायला
           अचानक जाग आल्यावर.

मी अजून सुद्धा दचकून
जागा होतो मधिच,

             तुझी काळजी रात्रभर       
            सतावत राहते उगीच.


तू का इतक्या लवकर
सोडून गेलीस गाव माझं,

             'आईविना पोर' असं
            घेतात लोकं नाव माझं.


वरवरच्या पदार्थांची मला
चवच लागत नाही,

                       काय करू तुझ्या दुधाविना माझी भूकच भागत नाही.

पोरकेपणाची माझ्या भोवती
का ठेऊन गेलीस जाळ,

                       का खरंच इतकी कच्ची                   होती, तुझ्या माझ्यातली नाळ.

तिथं कुणी आहे तुझ्याशी
बोलायला भरपूर,

                 उगाच रडत राहू नकोस
                दाबून स्वतःचा  ऊर.


बघ आई आता मी
रडत नाही पडलो तरी,

              मला ठावूक आहे तू
             गेली आहेस  देवाघरी.


भूक लागली तरी
बिलकूल मी रडत नाही,

              कारण मी हसल्या शिवाय
              तुला चैन पडत नाही.

पण रोज रात्र झाली कि तुझ्या आठवणींचा थवा येतो,

                     अंथरुणात लपून,  पुसून डोळे, मी गप्प झोपी जातो.

बघ तुझं बाळ किती
समजूतदार झालं आहे,

               आणि वय कळण्याआधी   
               वेडं वयात आलं आहे.

अजिबात म्हणजे अजिबात
त्रास देत नाही पप्पाला,

               तुझी काळजी तेवढी मात्र घ्यायला सांग बाप्पाला.


आणि सांग कि
हे शहाण बाळही आहे हट्टी,

                  जर का काही झालं तुला तर घेईल म्हणावं कट्टी.

मी आता थकलोय
तुला ढगांमध्ये पाहून,

                  ये आता भेटायला      
               नजर तिथली चुकवून.

जमलं जर का सुट्टी घ्यायला
तर ये निघून अशीच,
             
          पोट भरतं ग रोज
       पण मायेची भूक अजून तशीच....
             
             मायेची भूक अजून तशीच....
             
             मायेची भूक अजून तशीच....
आईची किम्मत हि ती नसल्यावरच कळनार्याला कळते  म्हनुन,,,,
त्या माउलीची तिच्या हयातीतच सेवा करा आणि आईला दु:ख देउ नका !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा