संस्कृती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
संस्कृती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २३ जून, २०१६

लग्नातिल हे माहित आहे का ??

हे माहित आहे का ??
1)लग्नात मांडव कशासाठी ???
= मातेनं माझ्या मुलीचं मनही मंडवासारखा मोठं आहे,हे सांगण्यासाठी !!!

2).विहिनबाईला आणि नवरदेवाला स्वागतास पायघड्या कशासाठी???
= माझ्या मुलीला तुम्ही असचं अलगद सांभाळा,हे सांगण्यासाठी !!!

3)नवरदेवाची कानपिळी वधुच्या भावानेचं पिळायची,हे कशासाठी???
=माझ्या बहिणीला तुमच्या जीवनात नीट आणि चांगलं वागवा,हे सांगण्यासाठी !!!

4)मुलीच्या मागं मामाचं उभा राहतो,हे कशासाठी???
= मुलीच्या आईला,मी तुझ्या पाठिशी भक्कम उभा आहे,हे सांगण्यासाठी !!!

5)लग्नात वधु-वरांनी एकमेकास घास द्यायचा,हे कशासाठी???
= प्रेमाचं हे प्रतिक आहे। तुझ्या- माझ्यात काही अंतर राहिलेलं नाही,हे सांगण्यासाठी !!!

6)लग्नात सप्तपदी हे माहित आहे का ?? ,हे कशासाठी???
= तुमच्या सुख-दु:खात मी आता सोबत आहे. सात पावलं हि मर्यादा आहे,हे सांगण्यासाठी !!!

7)लग्नात तांदळाची अक्षता उधळण कशासाठी???
= तुमच्या घरात धान्य भरपुर असु दे.त्यात सारं मांगल्य आहे,हे सांगण्यासाठी !!!. —

रविवार, १९ जून, २०१६

वटपौर्णिमा !! काय आहे *७* जन्माचे रहस्य?

वटपौर्णिमा !!!

काय आहे *७* जन्माचे रहस्य?

उद्या वटपौर्णिमा. *७* जन्म हाच पती मिळवा
यावरून खूप विनोद होत आहेत. पण हे सगळेच अज्ञान मूलक आहेत.

मुळात या *७* जन्म मागणीत पुढच्या जन्माचा संबंधच नाही. तो होणार का नाही? माहित नाही. माणसाचा मिळेल का? माहित नाही. हीच पुन्हा ओळखायची कशी? अशा निरर्थक बाबी आपल्या शास्त्रात नाहीत.

मग काय आहे *७* जन्म?

ही शुद्ध जीवशास्त्रीय भूमिका आहे.

शरीरविज्ञान सांगते की आपल्या शरीराची रचना राज्यसभेसारखी असते.
काही पेशी मरतात काही नवीन जन्माला येतात. शरीर सतत बदलत असते आणि तरीही अखंड वाटते.

या शरीरातील एकूण एक पेशी बदलायला काळ लागतो *१२* वर्षे.
म्हणून तप करायचे *१२* वर्षे.

*१२* वर्षांनी आपले शरीर पूर्ण बदलत असते. जणू एक नवा जन्म.

असे सात जन्म म्हणजे *१२×७=८४.*

पूर्वी लग्न होत *१६* व्या वर्षी.

त्यावेळी ती नवविवाहिता प्रार्थना करायची की सात जन्म हाच पती भेटो अर्थात पती _*१६+८४=१००*_ वर्षे जगो !!!

पतीच्या शतायुत्वाची कामना आहे सात जन्म.

पुढच्या जन्माचा काहीही संबंध नाही.

वटसावित्रीच्या शतायुत्वाच्या शुभेच्छा.

(विद्यावाचस्पती श्री. स्वानंद पुंड यांच्या विवेचनावरून !!!))

शनिवार, २१ मे, २०१६

श्री सत्यनारायन पुजा विधी चौरंगावर

श्री सत्यनारायन पुजा विधी चौरंगावर

एक चौरंग, एक पाट, चौरंगाभोवती चार बाजूला चार आंब्याची डगळे (फांदी) लावावेत. चौरंगावर शुभ्र वस्त्र टाकावे. त्यावर मध्यभागी थोडे गहू टाकावे. त्यावर एक कलश , त्यात (कलशात) पाणी भरून ठेवावे , त्यात पाच विड्याची ठेवावीत. त्यावर ताम्हण (तांब्याचे ताट) तांदळाने पुर्ण भरून त्यात बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी.
कलशासमोर चौरंगावरती तीन सुपार्या जोड (दोन) पानावर मांडाव्यात.

पहिल्या जोडपानावरची सुपारी गणपतीची दुसर्या जोडपानावरची सुपारी कुलदेवतेची व तिसर्या जोडपानावरची सुपारी वरूण देवतेची.
या प्रमाणे मांडामांड करून सर्वांची पंचोपचार पुजा करावी. आपण पुजेकरीता भरून घेतलेल्या कलशात गंध , अक्षता , फुले टाकावे. मंत्र म्हणून कलश पुजन करावे.

❗पुजेचे साहित्य ❗

१. सत्यनारायनाचा फोटो -१
२. श्री बाळकृष्णाची मुर्ती -१
३. तांब्याचे कलश -२
४. ताम्हण (तांब्याचे) -१
५. सुपारी -३
६. विड्याची पाने -१५
७. नारळ -१
८. तांदूळ - पाव किलो
९. आंब्याचे डगळे - ४
१०. चौरंग -१
११. गहू - अर्धा किलो
१२. हळद
१३. कुंकू
१४. अष्टगंध
१५. अगरबत्ती
१६. कापूर
१७. दिवा
१८. फुले
१९. पांढरा कपडा - १
२०. प्रसादासाठी - शिरा
२१. नैवद्द - अन्नाचा

सत्यनारायन पुजन महिला - पुरुष कुणीही घरच्या घरी करू शकते.

आर्थिक प्रगतीसाठी दर पोर्णिमेला घरी सत्यनारायन पुजन करावे.

अधिक  सविस्तर माहीतीकरीता सत्यनारायन पोथी वाचावी.

गुरुवार, १९ मे, २०१६

देऊळ

!! श्री !!
देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ उर्जा असते हे आपण पाहिले. देवळे म्हणजे जणू काही ब्रम्हांडाचा/भवतालाचा पंचमहाभूतांसहीत असलेला छोटासा तुकडाच जणू.

सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शुभ उर्जेची जागा निश्चित झाली की तिथे खड्डा खणून त्यात एक तांब्याचा तुकडा टाकला जाई. तांबे हे वीज व चुंबकीय उर्जेचे उत्तम वाहक ( good conductors) आहेत हे आपल्याला माहित आहेच. त्यामुळे जास्तीत जास्त शुभ चुंबकिय वैश्विक उर्जा स्वतःत सामावून घेऊन नंतर ती भवतालात रेडीएट करणे हा तांब्याचा तुकडा मुर्तीखाली ठेवण्यामागचा प्रमुख उद्देश. त्यानंतर विधीपूर्वक मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाई व त्यानंतर त्याभोवती मंदिर बांधले जाई.

आता देवळात जातांना काय करावे, कसे दर्शन घ्यावे ह्याबाबत आपण जे नियम पूर्वापार पाळत आलो आहोत त्यातही 100% विज्ञान कसे आहे ते पाहू.

1) देवळात जाण्यापूर्वी आपण चपला/बूट काढून पाय धुवून मगच मंदिरात प्रवेश करतो........

ह्यामागे स्वच्छतेचे कारण आहेच, की आपण चपला/बूट घालून सर्वत्र फिरत असतो. मंदिरातील शुभ व पवित्र व्हायब्रेशन्स (positive & pure vibrations) दुषित होऊ नयेत हा एक उद्देश. पण त्याहीपेक्षा एक मोठे वैज्ञानिक सत्य यामागे दडलेले आहे. मंदिराच्या मध्यभागातील फरशी अशी निवडलेली असे ( उदा. संगमरवर ) की, मंदिरातील शूभ उर्जेची ती उत्तम वाहक तर असेलच पण आपण जेव्हा तिच्यावरुन अनवाणी (bare footed) चालू तेव्हा तळपायावर असलेल्या एनर्जी पाॅइंटस् मधून ती आपल्या शरिरात प्रवेश करेल.

जर तुमची पंच ज्ञानेद्रिये receiving mode मध्ये असतील तरच मंदिरातील शुभ उर्जा तुम्ही स्वतःमध्ये सामावून घेऊ शकाल,तेव्हा पुढचे नियम त्याकरीता..

2) मंदिराच्या गर्भगृहात/मूलस्थानात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशव्दाराशी असलेली घंटा वाजवणे......

ह्यामागेही दोन उद्देश आहेत.. पहिला म्हणजे.. ह्या घंटा विशिष्ट सप्तधातू योग्य प्रमाणात घेऊन बनविल्या जातात. घंटा वाजविल्यानंतर ती तीव्र परंतू किमान सात सेकंद रहाणारा प्रतिध्वनित नाद निर्माण करतील अशा बनविल्या जातात. घंटा वाजवून पुढे निघून न जाता तिच्या खाली उभे राहून नादाची व्हायब्रेशन्स स्वतःमध्ये सामावून घेणे. ह्यामुळे आपली सप्तचक्र तर उद्दीपित होतातच,पण आपला उजवा व डावा मेंदू एकतानतेने ( inco-ordination) काम करु लागतात. तसेच आपल्या मनातील नकारात्मक विचारांचा निचराही होतो. गर्भगृहातील मूर्तीमध्येही ही व्हायब्रेशन्स शोषली जातात.

3) आपले पांच sences म्हणजे दृष्टी, ऐकणे, स्पर्श, चव घेणे, वास घेणे. यापुढील रुढी हे पांच सेन्सेस उद्दीपित करतात.

अ. कापूर जाळणे -- दृष्टी

ब. कापूरारतीवर हात फिरवून ते डोळ्याना लावणे... स्पर्श

क. मुर्तीवर फुले
वाहणे...फुलांच्या अरोमामुळे वास.

ड. कापूर व तुळशीपत्र घातलेले तीर्थ प्राशन करणे..चव.
हे तीर्थ तांब्याच्या / चांदीच्या भांड्यात 8 तास ठेवलेले असते, त्यामुळे कफ- ताप असे आजारही जातात.

ई. घंटानाद व मंत्रोच्चरण....ऐकणे.
अशाप्रकारे उद्दीपित अवस्थेत व reveiving mode मध्ये आपण गर्भगृहातील आवश्यक तेवढी शुभ उर्जा स्वतःत सामावून घ्यायची असते.
मूर्तीच्या मागील बाजूस व भवतालात पसरलेली उर्जाही मिळावी म्हणून प्रदक्षिणेचे प्रयोजन..

पूर्वसुरी म्हणतात, हे सगळे केल्यावर पटकन गजबजाटात जाऊ नका. मंदिरात जरा वेळ टेका. शरिरात उर्जेला समावायला, settle व्हायला वेळ द्या आणि अत्यंत शांत मनाने, आनंदाने, उर्जापूर्ण अवस्थेत आपल्या कामाला जा.
मित्रमैत्रिणींनो आपल्या पुढच्या पिढीला देवळात कां जायचे हा मोठ्ठा प्रश्न पडलेला असतो.

ह्यापुढे देवळातजाण्यामागचा उद्देश लक्षात घेऊनच मंदिरात जा आणि पुढच्या पिढीपर्यत हे ज्ञान पोहोचवण्यासाठी मदत कराल अशी अपेक्षा .
शुभंम् भवतू !!

प्रणाम का महत्व

प्रणाम का महत्व ~~~~~

प्रणाम प्रेम है |

प्रणाम अनुशासन है |

प्रणाम शीतलता है |
            
प्रणाम आदर सिखाता है |

प्रणाम से सुविचार आते है।

प्रणाम झुकना सिखाता है।

प्रणाम क्रोध मिटाता है |

प्रणाम आँसू धो देता है |

प्रणाम अहंकार मिटाता है।

प्रणाम हमारी संस्कृति है

देवी देवता भी अपने आराध्य को प्रणाम करते है।
                 ������
        �� श्री स्वामी समर्थ ��
           ����सबको प्रणाम ����

वाढदिवस कसा साजरा करावा.. ?


वाढदिवस कसा साजरा करावा.. ?

थोरा-मोठ्यांच्या जयंतीप्रमाणे प्रत्येकाने आपल्या कुटुंबातील लहान मुला-मुलींचे वाढदिवस साजरे करण्याची प्रथा तशी फार पुरातन आहे.
हल्ली तर एक किंवा दोनच मुलांच्या कुटुंबात त्या मुलांवर दरवर्षी, त्यांच्या जन्मदिनी, वाढदिवसाचा संस्कार होण्याची फार आवश्यकता आहे.
या मंगल दिवशी, दीर्घायुष्य लाभावे म्हणून श्री कुलदेवता स्मरण करून पुढील प्रमाणे संस्कार करावा.

हिंदू पंचांग प्रमाणे साजरा करावा.
(इंग्रजी तारखेनुसार नको.) कारण आपली सर्व देव दैवते, साधू संत, ऋषि मुनी यांचे जन्मोत्सव तसेच आपल्या मृत आई-वडिलांचे श्राध्द पक्ष ही सर्व तिथी प्रमाणे करायची असतात,
म्हणून वाढदिवसही तिथी प्रमाणे करावा.

वाढदिवस आपल्या कुलदेवतेच्या साक्षीने व आशिर्वादाने साजरा करावा. ज्यांचा वाढदिवस असेल त्याला त्या दिवशी नवे वस्त्र घ्यावे.
(हे वस्त्र आपल्या पैशाने घ्यावे).
त्या व्यक्तीला अभ्यंग व सचैल स्नान घालावे.
अभ्यंग: -सुवासिक तेल लावून.
सचैल:- ज्या वस्त्रांवर स्नान करायचे ती वस्त्रे नंतर दान करावी.
(स्वतः वापरू नये.),
त्याला नवे कपडे घालून रंगीत पाटावर बसवावे.
औक्षण करून ओवाळावे नंतर दोन्ही हातात तांदूळ (अक्षता) घेऊन
श्री रामरक्षेतील पहिले ९ श्लोक (या ९ श्लोकात डोक्यापासून पायापर्यंतच्या प्रत्येक अवयवांचा उल्लेख आहे.)
म्हणून त्या-त्या अवयवांवर थोडे थोडे तांदूळ टाकत जावे.
समोर श्री कुलदेवतेचा फोटो ठेवावा.
कुलदेवतेच्या फोटोला नैवेद्य दाखवावा आणि विनंती करावी की, या मुलाला दीर्घायुष्य, चांगलं शिक्षण, चांगले आरोग्य देऊन याचा सांभाळ कर.ङ्घ उपस्थितांना गोडधोड खायला द्यावे. मात्र आहेर कुणाचाही घेऊ नये. या पध्दतीने वाढदिवस साजरा करावा.

टीप: आजकालच्या वाढदिवशी मेणबत्त्या लावून त्या मुद्दाम विझवितात.
हे अशुभ आहे. केक करतात व त्यावर सुरी फिरवतात. अन्न शस्त्राने कापणे हे सुध्दा अशुभ. म्हणून या दोन्ही गोष्टी टाळून वरील पध्दतीने वाढदिवस साजरा करावा.

*याशिवाय आपण खूप चांगले उपक्रम राबवू शकतो

१. गरीब विद्यार्त्याना वह्या, पुस्तके,पेन अशा वस्तूंचे वाटप करणे.
२. एखाद्या अनाथ आश्रमात जावून खाद्य पदार्थाचे वाटप करणे. ज्यावेळी त्यांचा आत्मा खावून तृप्त होयील त्यांचे मिळालेले आशीर्वादाचे मोल कोणत्याच भेटवस्तूला येणार नाही.
३.वृद्धाश्रमात वेळ घालवू शकतो , तिथेही असे उपक्रम राबवू शकतो.
४. वृक्षारोपण करू शकतो किंवा कमीत कमी एक झाड लाऊन ते जागवू शकतो.
५.एखाद्या शाळेस पुस्तके भेट देवू शकतो.
६.हमाल, कष्टकरी लोकांना आपल्या मर्जीने काही भेटवस्तू देवू शकतो
♻♻♻♻

मंगळवार, ३ मे, २०१६

टांगीनाथ धाम

टांगीनाथ धाम :- इथे आज सुद्धा आहे परशुरामांचा परशु
भारत हा चमत्कारांनी भरलेला देश आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला काही
ना काही चमत्कारिक वस्तू दिसतेच.संस्कृतीने भरलेल्या ह्या देशात खुप अशा घटना ज्यांचा उल्लेख वेद आणि पुराणांत असून त्या कुठे तरी पुराव्यााच्या स्वरूपात आढळतांना दिसतात .आज आपण अशाच एका जागेची माहीती घेणार आहोत जी जागा झारखंड राज्यात असून तिथे आजही भगवान परशुरामांचा परशु दृष्टीस पडतो.हा तोच परशु आहे ज्याने परशुरामांनी पृथ्वीवरील अधर्मीय प्रवृत्तीचा पराभव करून धर्माचे रक्षण केले.
टांगीनाथ धाम झारखंड राज्यात गुमला शहरापासून ७५ कि.मी.आणि रांची शहरापासून १५० कि.मी.अंतरावर वसलेल्या घनदाट जंगलाच्या मधोमध आहे. इथे आज ही भार्गवरामांचा परशु जमिनित गाडलेला आहे.
परशुला झारखंडच्या भाषेत टांगी म्हटल जात. ह्यावरूनच ह्या जागेत नाव टांगीनाथ अस पडल.त्या जागी श्री परशुरामांचे पदचिन्ह सुद्धा दिसतात.
श्री परशुराम आणि टांगीनाथ ह्यांची अख्यायिका:-
सितास्वयंवरा वेळी मर्यादा पुरूषोत्तमाच्या हातून जेव्हा महादेवाचं धनुष्य भंग पावत आणि हे जेव्हा परशुरामांना कळत तेव्हा ते क्रोधावस्थेत तिथे येतात आणि रामावर त्या क्रोधाचा वर्षाव करतात परंतु ह्या क्रोधाला राम शांतपणे सामोरे जात असतामना लक्षमणाला मात्र ते सहन होत नाही व तिथे लक्ष्मण आणि श्रीपरशुराम ह्यांच्यात शाब्दिक द्वंद होत त्यावेळी श्री परशुरामांना ज्ञात होत की श्रीराम हे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात सृष्टी पालनकरता ज्यांचा अवतार आपण स्वतः ही आहोत अशा विष्णुंचाच अवतार आहे तेव्हा स्वतःच्या अशा वागण्याच्या त्यांना पश्चाताप होतो व त्याच प्रायश्चित करण्यासाठी ते तपश्चर्येला एका घनदाट वनात जातात .इथे येऊन ते महादेवाची स्थापना करतात..व तिथे तपश्चर्येस बसतात बसतेवेळी त्यांच्याजवळील परशु ते जमिनीत गाडतात..ह्याच जागेला आज टांगिनाथ म्हणून ओळखले जाते..
जागेसंबंधित काही आश्चर्यकारक गोष्टी :-
१)इथे असलेल्या परशुबद्दल सर्वात आश्चर्यजनक बाब आहे ती म्हणजे हजारो वर्ष सतत हवा आणि पाणी ह्यांच्या संपर्कात राहून ही त्या परशुला अजून ही गंज चढलेला नाही आहे त्या अवस्थतेत अजून ही सुस्थितीत आहे.
२) दुसर आश्चर्य म्हणजे जमिनीत गाडला गेलेला परशु किती खोलवर आहे ह्याची अजूनही निश्चीती नाही पण हा परशु अंदाजे १७ फुट असावा असा अनुमान आहे..
३) सांगितल जात कीएक वेळा ह्या परिसरात राहणाऱ्या व लोहार काम करणाऱ्या समाजातील काही लोकांनी लोखंड मिळवण्याचा हेतूने परशु ला कापण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात ते अपयशी ठरले.उलट तसा प्रयत्न करणाऱ्यांचा एक एक करून मृत्यू होऊ लागला ह्याने भयभीत झालेली त्या जमातीने जसा तो परिसर सोडला तसा आजही त्या परिसराच्या १५ कि.मी च्या घऱ्यात अजून ही लोहार जातीचे लोक राहत नाही.
सन १९८९ मध्ये पुरातत्व विभागाद्वारे केलेल्या खोदकामात सोने चांदीचे आभुषणांसह अनेक मौल्यवान व पुरातन वस्तू आढळून आल्या उदा.हिरे जडीत मुकुट चांदीचे अर्धगोलाकार शिक्के कानात घालण्यात येणारी सोन्याची बाळी तांब्याचा डबा ज्यात काळीतीळ आणि तांदूळ होते .ह्या सगळ्या गोष्टी आजही डमुरी येथील संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आल्या आहेत...
टांगीनाथ येथे आढळलेल्या असंख्य अवशेष व वस्तूंवरून एक बाब ध्यानात येत ती म्हणजे हे स्थळ कधीकाळी हिंदूच एक प्रमुख तिर्थ स्थळ असाव . सरकारची उदासिनता आणि परिसरात असेलेल्या नक्षलवादाच्या प्रभावामुळे ह्या क्षेत्राकडे पुर्णपणे दुर्लक्ष झाल आहे. त्यामुळे लोकांपर्यंत ह्या परशुरामांच्या पदस्पर्शाने व सहवासाने पवित्र झालेल्या ह्या तिर्थक्षेत्राची माहीती लोकापर्यंतलपोहचण शक्य झालेले दिसत नाही..कदाचीत सरकारने ह्याकामी लक्ष घातले तर ह्या संबंधित अधिक माहीती वैदिक महत्व लोकांना कळू शकते.
अशा ह्या टांगीनाथ क्षेत्री असलेल्या परशुचा आणि पुरात्तव विभागाला मिळालेल्या अमुल्य वस्तुंचा फोटो सोबत जोडला आहे...
जय परशुराम.

शनिवार, १३ फेब्रुवारी, २०१६

मंदिर या शब्दाचा अर्थ काय?

मंदिर या शब्दाचा अर्थकाय?
हा शब्द कसा तयार झाला माहित आहे?
मंदिर हा शब्द "मन"आणि "दर"या दोन शब्दांची संधी आहे.'मन' म्हणजे अर्थातच आपलं 'मन'आणि 'दर' म्हणजे दार!
तात्पर्य- इतकंच जिथे आपण मनाचे दरवाजे खुले करतो ते स्थान म्हणजे मंदिर!
  आणि मन् म्हणजे म * न
    म म्हणजे मी
     न म्हणजे नाही
     अर्थात जिथे मी नाही असे स्थान म्हणजेच ज्या ठिकाणी "मी" पणाचा अहंकार गळून पडतो ते स्थान म्हणजे मंदिर!
      सगळेच जाणतात की,परमेश्वर प्रत्येकाच्या मनात असतो.
   आणि जे मन् अहंकार विरहित असतं
  तेच खरे मन् हे मंदिर असतं.
♻♻♻सुप्रभात♻♻♻

शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१६

श्रीगणेशाची साडेतीन पीठे

श्रीगणेशाची साडेतीन पीठे

उद्या श्रीगणेश जंयती आहेत या निमित्याने श्रीगणेशाची साडेतीन पीठाची
माहिती करून घेऊया

सध्याच्या काळात ज्याच्या केवळ आराधनेने मनाला उभारी येऊन मनाची ताकद वाढते, आत्मविश्‍वास निर्माण होतो, दु:ख विसरले जाऊन आत्मबल वाढते व प्राप्त परिस्थितीवर मात करण्याची किंवा मात करता न आल्यास ती सहन करण्याची शक्ती निर्माण होते असा सुखकर्ता - दु:खहर्ता  श्रीगणेश जास्तच लोकप्रिय झाला आहे. यामुळे दरवर्षी कोट्यावधी गणेशभक्त्‍ा अष्टविनायक, गणेशाची साडेतीन पिठं व पुराणोक्त गणेश यांची मोठ्या भक्तिभावाने यात्रा करताना आढळतात.

महाराष्ट्र मध्ये गणेशाची साडेतीन पीठे आहेत मोरगावी कमलासुराचा मयुरेश्व्रराने
वध केला  त्याचे शीर जिथे पडले ते प्रथम पीठ मोरगाव व जिथे कमरे पर्यंतचा भाग पडला ते राजूर  येथे दुसरे पीठ .कमरे पासून पाया पर्यंतचा भाग जिथे पडला ते पद्मालय हे तिसरे पीठ महान गाणपत्य मोरया गोसावी याना करा नदीत स्नान करताना त्याच्या ओंजळीत गणपतीची मूर्ती आली .हि मूर्ती घेऊन मोरया गोसावी भाद्रपद व माघी चतुर्थीला मोरगोंवी जात असत .मोरगावचा मोरेश्वर चिंचवडी आला .म्हणून हे अर्ध पीठ ओळखले जाते ."गणपती बाप्पा मोरया " हा घोष  हा तेव्हा पासून सुरु झाला .
या पीठाची अवश्य यात्रा करा याने
श्री गणपती सर्व इच्छा पूर्ण करतील

मोरगाव - 'भूस्वानंदपूर ' म्हणजेच आजचे प्रचलित 'मोरगाव'. गाणपत्य सांप्रदायाचे आद्यपीठ मोरगाव. या क्षेत्राचा आकार मोरासारखा आहे. ब्रम्ह, विष्णू, महेश, सूर्य व शक्ती या पंचदेवांनी ॐकार स्वरूपी गणेशाची तिथे स्थापना केली. उन्मत्त सिंदुरासुराचा वध करून त्याचा सेनापती कमलासूर याचाही वध श्री गणेशाने केला. कमलासूराचे शीर  जमिनीत गाडून त्याच्यावर तो आरूढ होऊन बसला. आजही त्याचे प्रतिक म्हणून विजयादशमीच्या दिवशी मोठा   उत्सव होतो. येथे गणेशापुढे नंदी आहे हे याचे वैशिष्ठ्य.
              पुण्यापासून ५२ कि.मी. वर मोरगाव क्षेत्र आहे.पुणे ते मोरगाव एस.टी. आहे.

राजूर - राजूर म्हणजेच पूर्वीचे राजापूर. वरण्य राजाचा राजवाडा या भागात होता. वरण्य राजाला श्री गणेशाने 'गणेशगीता' सांगितली.  कृष्णाच्या तोंडून म्हणजेच प्रत्यक्ष भगवंताच्या तोंडून अर्जूनाने गीता ऐकली. तद्वत साक्षात गणेशाने आपल्या मुखातून वरण्य राजाला गणेशगीता सांगितली. त्यामुळे गाणपत्य सांप्रदायात या स्थानाला  फार महत्व आहे. राजा वाराण्याने प्रतिष्ठापना केलेल्या या क्षेत्राला राजूरचा 'महागणपती' म्हणतात.
         मराठवाड्यातील जालन्यापासून २२ कि.मी. वर हे क्षेत्र आहे. राजूर गावानजीक एका टेकडीवर हे गणेश मंदिर असून येथे वरण्य राजाची मूर्ती आहे. या ठिकाणाला गड म्हणतात.
               हा गणपती नवसाच्या सामाईला पावतो. येथील मूर्तीपुढे अंदाचे सव्वाशे समया तेवत असतात. शेकडो सामायांतील ज्योतींच्या मंद व मंगल प्रकाशात हि मूर्ती फारच विलोभनीय दिसते. पराशर ऋषींच्या आश्रमातून श्री गणेशाला वरण्य राजाने चैत्र शु.प्रतिपदेला राजूर,राजापूर येथे आणले. म्हणून गुढीपाडव्याला या गणेशाचे दर्शन घेणे हि पर्वणी मानली जाते.

पद्मालय - येथे दोन गणेश मूर्ती आहेत. महान दत्तभक्त सहस्त्रार्जुनाने स्थापन केलेला 'प्रवाळ गणेश' आणि त्याच्या शेजारी शेषाने स्थापन केलेला 'धरणीश्वर गणेश'. यातील गणेशाची मूर्ती एक उजव्या सोंडेची व दुसरी डाव्या सोंडेची आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल गावापासून ८ कि.मी. वर पद्मालय आहे. हे मंदिर डोंगरावर असून तेथील तलावात विविध प्रकारची पद्म कमले फुलतात. म्हणून या क्षेत्राला 'पद्मालय' असे नाव पडले.
               समुद्रामान्थानाच्या वेळी शेष समुद्रतळाशी होता. अमृत कुंभ देवांना आपल्यामुळे मिळाला असा अहंकार त्याला निर्माण झाला. त्याचा अहंकार पाहून संतप्त होऊन शिवाने त्याला खडकावर आपटले. त्याच्या डोक्याचे दहा तुकडे झाले. नारदाने त्याचे सांत्वन करून त्याला गणेश उपासना करावयास सांगितले. त्यानुसार त्याने ती केली. गणेश त्यावर प्रसन्ना झाले व तू सहस्त्रवदन होशील आणि माझा सहवास तुला लाभावा यासाठी मी तुला माझ्या उदरावर धारण करीन. तसेच पृथ्वी,तू तुझ्या फण्यावर फुलासारखी तोलून धरशील असा आशीर्वाद दिला. म्हणून शेषाने स्थापन केलेल्या मूर्तीला 'धर्निश्वर गणेश' म्हणतात.

चिंचवड - चिंचवड हे गणपती क्षेत्र पुराणोक्त नाही. महान गाणपत्य साधू मोरया गोसावीच्या मुले याला महत्वाचे स्थान प्राप्त झाले. मोरया गोसाव्यांना मोरगाव येथे करा नदीत स्नान करताना गणेश तांदळा स्वरुपात आला. तो घेऊन ते मोर्गावी वारी करीत असत. सध्या तो तांदळा चिंचवड येथे देऊळवाड्यात आहे. मोरया गोसावींनी मार्गशीर्ष वद्य षष्ठी शके १३८३ रोजी जिवंत समाधी घेतली.
चिंचवड हे ठिकाण पुण्यापासून १८ कि.मी. आहे.

बाण स्तंभ। -प्रशांत पोळ

अतिशय सुंदर वाचण्यासारखा आणि आपल्या संस्कृतीविषयी अभिमान बाळगण्या सारखा लेख आहे. नक्की वाचा

बाण स्तंभ। -प्रशांत पोळ

: अनेकांच्या मागणी वरुन या मालिकेतील पहिला लेख, 'बाणस्त॔भ' येथे देतोय -

बाण स्तंभ। -प्रशांत पोळ 

इतिहास हा फार चकवणारा विषय आहे. आणि इतिहासाचा मागोवा घेता घेता आपण एखाद्या अश्या जागी येऊन उभे राहतो की मन अक्षरशः थक्क होऊन जाते. हे असं शक्य आहे कां, या विषयी मनात गोंधळ उडतो. दीड हजार वर्षांपूर्वी हे इतकं प्रगत ज्ञान आपल्यापाशी होतं यावर विश्वासच बसत नाही.

गुजराथ च्या सोमनाथ मंदिरापाशी येऊन आपली अशीच परिस्थिती होते. मुळात सोमनाथ मंदिराचा इतिहासच विलक्षण. बारा ज्योतिर्लिंगांतील हे एक देखणं, वैभवशाली शिवलिंग. इतकं समृध्द की उत्तर पश्चिमेतून येणाऱ्या प्रत्येक आक्रमकाचं लक्ष सोमनाथ कडे गेलं आणि अनेकवार सोमनाथ लुटल्या गेलं. सोनं, नाणं, चांदी, हिरे, माणकं, रत्न. . . सर्व गाडे भरभरून नेलं. आणि इतकी संपत्ती लुटल्या जाऊन ही दर वेळी सोमनाथ चं शिवालय परत तश्याच वैभवानं उभं राहायचं.

मात्र फक्त ह्या वैभवासाठी सोमनाथ महत्वाचं नाही. सोमनाथ चं मंदिर भारताच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावर आहे. विशाल पसरलेला अरबी समुद्र रोज सोमनाथाचे पादप्रक्षालन करत असतो. आणि गेल्या हजारो वर्षांच्या ज्ञात इतिहासात ह्या सागराने कधीही सोमनाथाचा उपमर्द केलेला नाही. कोणत्याही वादळामुळे सोमनाथाचे गौरवशाली मंदिर कधी उध्वस्त झाले नाही.

ह्या सोमनाथाच्या मंदिराच्या आवारात एक स्तंभ आहे. हा ‘बाण स्तंभ’ म्हणून ओळखला जातो. हा केंव्हापासून त्या ठिकाणी आहे, हे सांगणं अवघड आहे. इतिहासाचा धांदोळा घेत घेत मागे गेलो की कुठेतरी सहाव्या शतकापाशी आपण पोहोचतो, जिथे ह्या बाण स्तंभाचा उल्लेख आढळतो. पण म्हणजे हा सहाव्या शतकात उभारल्या गेलाय असं सिध्द होत नाही. हा स्तंभ किती जुना आहे, याबद्दल नक्की सांगणं शक्य नाही.

हा बाण स्तंभ म्हणजे दिशादर्शक स्तंभ आहे. यावर एक बाण उभारलाय आणि खाली लिहिलंय –

‘आसमुद्रान्त दक्षिण धृव पर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग’

याचा अर्थ असा – या बिंदुपासून दक्षिण धृवा पर्यंत सरळ रेषेत एकही अडथळा नाही. अर्थात या मार्गात एकही जमिनीचा तुकडा नाही.

ज्याक्षणी सर्वप्रथम मी हा स्तंभ बघितला अन हा शिलालेख वाचला, तो वाचून डोक्यात त्याचा अर्थ जाता क्षणीच अंगावर काटा उभा राहिला ! हे ज्ञान इतक्या पूर्वी आपल्याला होतं..? कसं शक्य आहे हे? आणि जर हे खरच असेल तर किती समृध्दशाली ज्ञानाचा वैश्विक वारसा आपण बाळगतोय..!

संस्कृत मधे कोरलेल्या ह्या एका ओळीच्या अर्था मधे अनेक गूढ अर्थ सामावलेले आहेत. ह्या ओळीचा सरळ अर्थ आहे, सोमनाथ मंदिराच्या त्या बिंदुपासून दक्षिण धृवा पर्यंत (म्हणजे अन्टार्टिक पर्यंत) एक सरळ रेघ ओढली तर मधे एकही भूखंड लागत नाही. आता हे खरं कश्यावरून..? आजकालच्या ह्या तंत्रज्ञानाच्या युगात हे शोधणं सोपं व्हावं. मात्र हे तितकंसं सोपं नाही. गुगल मेप वरून बघितलं तर वर वर बघता भूखंड दिसत नाही. मात्र तो मोठा भूखंड. एखादा लहान भूखंड शोधायचा असेल तर त्या पूर्ण मार्गाला ‘एन्लार्ज’ करत करत पुढे जायचे. हे तसं किचकट काम. मात्र संयम ठेऊन, चिकाटीने हळू हळू बघत गेलं की मार्गात एकही मोठा भूखंड, म्हणजे 10 Km X 10 Km चा, लागत नाही. त्या खालचा भूखंड हा विशेष तंत्रज्ञानानेच शोधावा लागेल. थोडक्यात, तो संस्कृत श्लोक खरा आहे असं धरून चालू.

पण मूळ प्रश्न तसाच राहतो. अगदी सन ६०० मधे हा बाण स्तंभ उभारला असं जरी म्हटलं, तरी त्या काळात पृथ्वीचा दक्षिण गोलार्ध आहे, हे ज्ञान कुठून मिळालं ? बरं, दक्षिण गोलार्ध माहीत होता हे गृहीत धरलं तरी सोमनाथ मंदिरापासून दक्षिण धृवापर्यंत सरळ रेषेत गेलं की मध्ये कोठेही एकही भूखंड येत नाही, हे ‘मेपिंग’ कोणी केलं ? सारंच अद्भुत..!
याचाच अर्थ, बाण स्तंभ उभारण्याच्या काळात, भारतीयांना पृथ्वी गोल आहे हे माहीत होतं आणि फक्त तितकंच नाही, तर ह्या पृथ्वीला दक्षिण धृव आहे (म्हणजेच अर्थात उत्तर धृव ही आहेच), हे ज्ञान ही होतं. हे कसं काय शक्य झालं ? त्यासाठी पृथ्वीचा ‘एरियल व्ह्यू’ घेण्याचं काही साधन होतं कां ? नसल्यास पृथ्वीचा नकाशा त्या काळी अस्तित्वात होता कां ?
नकाशाशास्त्र (इंग्रजीत ‘कार्टोग्राफी’ – मूळ फ्रेंच भाषेतून उचललेला शब्द) हे फार प्राचीन शास्त्र. ख्रिस्तपूर्व सहा ते आठ हजार वर्षांपूर्वी गुहेत कोरलेल्या आकाशस्थ ताऱ्यांचे नकाशे मिळाले आहेत. मात्र पहिल्यांदा पृथ्वीचा नकाशा कोणी काढला, यावर एकमत नाही. भारतीय ज्ञानाचे पुरावे मिळाले नसल्याने ‘एनेक्झीमेंडर’ ह्या ग्रीक शास्त्रज्ञाकडे हा मान जातो. ख्रिस्तपूर्व ६११ ते ५४६ हा त्याचा कालखंड. मात्र त्याचा नकाशा हा अत्यंत ढोबळ आहे. त्या काळात जिथे जिथे ज्ञात मनुष्यवस्ती आहे, तो भाग या नकाशात दाखविण्यात आलेला आहे. या नकाशात उत्तर आणि दक्षिण धृव दिसण्याचं ही काही कारण नाही.
आजच्या वास्तविक जगाच्या जवळ जाणारा पृथ्वीचा नकाशा हेनरीक्स मार्टेलस ने साधारण सन १४९० च्या आसपास केलेला आढळतो. असं म्हणतात, कोलंबस ने ह्याच नकाशा चा आधार घेतलेला होता.

‘पृथ्वी गोल आहे’ हे मत युरोपातील काही शास्त्रज्ञांनी ख्रिस्तपूर्व काळात व्यक्त केलेले आढळते. एनेक्झीमेंडर ने ख्रिस्तपूर्व ६०० वर्षांपूर्वी पृथ्वीला एका ‘सिलेंडर’ च्या स्वरूपात बघितले होते. एरिस्टोटल ने ही पृथ्वीला गोल म्हटलेले आहे.

मात्र भारता जवळ हे ज्ञान फार आधीपासून होते ह्याच्या अनेक खुणा मिळतात. याच ज्ञानाच्या आधारावर सन ५०० च्या आसपास आर्यभट्ट ने फक्त पृथ्वी गोल आहे, हेच सांगितले नाही, तर पृथ्वीचा व्यास ४,९६७ योजने आहे (म्हणजे नवीन मापना प्रमाणे ३९,९६८ कि. मी.) हे देखील ठासून सांगितले. आज सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून पृथ्वीचा काढलेला व्यास ४०,०७५ कि. मी. आहे. अर्थात आर्यभट्ट च्या आकलनात चूक होतेय ती फक्त ०.२६ %. सोळाशे वर्षांपूर्वी आर्यभट्ट जवळ हे ज्ञान आले कोठून..?
सन २००८ मधे जर्मन इतिहासतज्ञ जोसेफ श्वार्टझबर्ग ने हे सिध्द केले की ख्रिस्तपूर्व दोन / अडीच हजार वर्षांपूर्वी पासून भारतात नकाशाशास्त्र अत्यंत विकसित होते. नगर रचनेचे नकाशे तर त्या काळात उपलब्ध होतेच, पण नौकानयना साठी आवश्यक असे नकाशे असल्याचे ही पुरावे आढळतात.

भारतात नौकानयन शास्त्र फार पूर्वीपासून विकसित होतं. संपूर्ण दक्षिण आशियात ज्या प्रकारे हिंदू संस्कृतीच्या पाउलखुणा आढळतात, त्यानुसार भारताची जहाजं पार पूर्व टोकापर्यंत, म्हणजे जावा, सुमात्रा, यवद्वीप ओलांडून जापान पर्यंत समुद्रात विहार करत होती याचे भरभक्कम पुरावे मिळाले आहेत. १९५५ साली शोधण्यात आलेल्या गुजरात च्या लोथल मधे अडीच हजार वर्षांपूर्वीचे अवशेष सापडले आहेत. यात भारताच्या प्रगत नौकानयना विषयी अनेक पुरावे दिसतात. 
अर्थात सोमनाथ मंदिर उभारण्याच्या काळात दक्षिण धृवापर्यंत चे दिशादर्शन त्या काळातील लोकांना असेल हे निश्चित.

दुसरा अजून एक विचार समोर येतो की दक्षिण धृवा पर्यंत सरळ रेषेत जमीन नसलेला समुद्र आहे हे नंतर शोधून काढण्यात आलं की दक्षिण धृवापासून जमीन नसलेल्या सरळ रेषेची सांगता भारतात जिथे होते, तिथे सोमनाथ हे ज्योतिर्लिंग उभारण्यात आलं..? त्या बाण स्तंभावर लिहिलेल्या ओळीत उल्लेख केलेला आहे, (‘आसमुद्रान्त दक्षिण धृव पर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग’) तो ज्योतीर्मार्ग म्हणजे नेमकं काय..?

सध्या तरी हे