बुधवार, २५ नोव्हेंबर, २०१५

दत्ता मसुरकर - भामरे आण्णा


मी कर्जत दहिवेली ला भालचंद्र घुमरेंकडे भाड्याच्या घरात रहात असतांना ;माझी समाजसेवा व शिक्षकी पेशाची माहिती कै.खंडाळकर गुरूजीं मार्फत गुरव समाजाचे अध्यक्ष कै.शंकर पांडूरग गुरवांच़्या कानावर गेली.
त्यांनी आवर्जून जेवणाचे आमंत्रण दिले.
गप्पांमध्ये १९७२लाच सर्व शाखिय रोटी बेटी व़्यव्हाराला गुरव समाज ऊन्नती संस्थेने केलेल्या ठरावाची माहिती दिली.
जवळिकता वाढली व खोपोलीला गगनगिरी आश्रमात संपन्न होणाय्रा अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रीत केले.
अधिवेशनाचे आयोजक होते  ऊमद्या व्यक्तिमत्वाचे तरूण दत्तात्रय मसुरकर.
प्रस्तावने पासून स्वागत कसे शिस्तिने चालू होते.
मी आमच्या संस्थेची माहिती दिली समाजाने व मसुरकरांनी सुद्धा कौतुक केले.
मी निघतांना शंकररावांनसमोर
मसुरकरांचे वक्रुत्वाची व कार्यत्परतेची वास्तवता मसुरकरांसमोर कथन केली की यांचे भविष्य फारच ऊज्वल आहे.
अन तो दिवस आला दत्ताजींनी ऊद्दोग मय खोपोलीवर ठसा उमटायला सुरवात केली
त्याच काळी मी धुळ्याकडे समाजसेवेच्या वेडापायी बदली करून घेतली.
नगरसेवक व हा हा म्हणता खोपोलीचे नगराध्यक्ष पद.
राष्ट्रवादी व शरदजींचा विश्वासू सहकारी;म्हणून संपूर्ण कोकणभर नाव लौकिक मिळवला.
मी त्यांना आमच्याकडील कामकाजाचे टपाल कायम पाठवत राहिलो
कार्यबाहुल्यामुळे १९९५ च्या सुरत गुजरात येथिल अधिवेशनात सत्कार गुजराथ समाज कल्याण मंत्री फकिरभाई वाघेला यांचे शूभ हस्ते ठेवला असतांना  अचानक पवारांच्या कार्यक्रमात हजर रहावे लागले. घरी येवून पहातो तर दिलगिरीचे पत्र.
हे ऊमदे नेत्रुत्व १९८०/८१च्या दरम्यान जर प्रयत्न वादी राहिले असते ;अन बी एल पाटलाची साथ सोडली असती तर कदाचीत तुकाराम सुर्वेच्या जागी आमदार राहिले असते.
ते फक्त गुरवांचे न रहाता सर्वांनांच हवेसे वाटतात.
त्याचाही अनुभव  जेव्हा कर्जतचे आमदार सुरेश लाड त्यांना शोधत आले तेव्हाच मला आला.
अशा या उमद्या व्यक्तीमत्वाने
आपल्या विधायक कामाच्या
जोरावर कोकण ज्ञानपिठ पुरस्कार मिळवला व मुख्यमंत्र्यामच्या शुभ हस्ते तो स्विकारला सुद्धा.
गुरव समाजाचा गौरव वाढविणाय्रा या गुरव संमाजाच्या शिखर परिषदेच्या कार्याध्यक्षाला त्रिवार वंदन
सांमाजीक विधायक कामातूनच हा मित भाषी नेता
राजकारणाचा बादशहा शरदरावजी पवाराच्या विश्वासू नेत्यापैंकी एक झाले आहेत .
अशा गौरवशाली नेत्याचे अभिनंदन !!!
विश्वासराव भामरे  आण्णा
       अध्यक्ष
अँड सुरेंद्र सोनवणे जन. सेक्रेटरी
अखिल भारतिय गुरव समाज हितवर्धक संस्था

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा