गुरव कट्टा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गुरव कट्टा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २०१५

सुखांमागे धावता धावत - श्री कल्पेश शिरसाठ

सुखांमागे धावता धावता
विवेक पडतो गहाण
पाण्यात राहूनही माशाची मग
भागत नाही तहान
स्वप्न सत्यात आणता आणता
दमछाक होते खूप
वाटी-वाटीने ओतलं
तरी कमीच पडत तूप
बायको आणि पोरांसाठी
चाले म्हणे हा खेळ
पैसा आणून ओतेन म्हणतो
पण मागू नका वेळ
करिअर होतं जीवन मात्र
जगायचं जमेना तंत्र
बापाची ओळख मुलं सांगती
पैसा छापणारं यंत्र
चुकून सुट्टी घेतलीच तरी
पाहुणा 'स्वतःच्या घरी'
दोन दिवस कौतुक होतं
नंतर डोकेदुखी सारी
मुलच मग विचारू लागतात
बाबा अजून का हो घरी?
त्यांचाही दोष नसतो
त्यांना याची सवयच नसते मुळी
सोनेरी वेली वाढत जातात
घरा भोवती चढलेल्या ,
आतून मात्र मातीच्या भिंती
कधीही न सारवलेल्या
आयुष्याच्या संध्याकाळी मग
एकदम जाणवू लागतं काही,
धावण्याच्या हट्टापायी आपण
श्वासच मुळी घेतला नाही
सगळं काही पाहता पाहता
आरशात पाहणं राहून गेलं
सुखाची तहान भागवता भागवता
समाधान दूर वाहून गेल...

बाप - आई -- श्री कल्पेश शिरसाठ


शाळेपासून बापाच्या,
धाकात तो राहत असतो.
कमी मार्क पडलेलं,
प्रगतीपुस्तक लपवत असतो.

आईच्या पाठी लपून तो,
बापाशी बोलत असतो.
डोळा चुकवून बापाचा,
हुंदडायला जात असतो...

शाळा संपते, पाटी फुटते,
नवं जग समोर येतं.
कॉलेज नावाच्या भुलभुलैयात,
मन हरखून जात असतं.

हाती असलेले मार्क घेऊन,
पायरया झिजवत फिरतअसतं.
बाप पाहतो स्वप्नं नवी,
हे मुखडा शोधत असतं...

सुरू होतं कॉलेज नवं,
दिवस भुर्रकन उडून जातात.
एटीकेटीच्या चक्रातून,
वर्षं पुढे सरत जातात.

ग्रुप जमतो, दोस्ती होते,
मारामाऱ्या दणाणतात.
माझा बाप ठाऊक नाही,
अशा धमक्या गाजतअसतात.

परीक्षा संपते, अभ्यास सरतो,
डिग्री पडते हाती याच्या.
नोकरी मिळवत, आणि टिकवत,
कमावू लागतो चार दिडक्या.

आरामात पसरणारे बाजीराव,
घोड्यावरती स्वार होतात,
आणि नोकरीच्या बाजारात,
नेमानं मोहिमा काढू लागतात...

नोकरी जमते, छोकरी सापडते,
बार मग उडतो जोरात.
एकट्याचे दोघे होतात,
सुखी संसार करू लागतात.

दोघांच्या अंगणात मग,
बछडं तिसरं खेळू लागतं.
नव्या कोऱ्या बापाला,
जुन्याचं मन कळू लागतं...

नवा कोरा बाप मग,
पोरा सवे खेळू लागतो,
जुना बाप आता नव्याने,
आजोबाच्या कायेत शिरतो.

पोराशी खेळता खेळता,
दोघेही जातात भूतकाळात.
एकाला दिसतो दुसरा लहान,
दुसरा पाहतो गोष्ट महान...


लेकरासाठी मग त्याला,
कळवळणारा बाप दिसतो,
त्याची लाल रेघ जो, 
उरात घेऊन फिरत असतो...

दोन घास कमी खाईल;
पण पोरांना गोड देतो.
हट्टासाठी पोरांच्या,
ओव्हरटाईम करत असतो...


बाप कधी रडत नाही, 
बाप कधी खचत नाही,
बाप कधी उतत नाही,
बाप कधी मातत नाही.

पोरं सोडतात घरटं अन्,
शोधू लागतात क्षितिजं नवी.
बाप मात्र धरून बसतो,
घरट्याची प्रत्येक काडी...

पोरांच्या यशासोबत,
त्याचं मन हसत असतं,
अपयश पचवताना,
मात्र आतून रडत असतं.

काही झालं, कितीही झालं,
तरी कणा ताठ असतो.
खचलेल्या पोराला, 
तोच तर उभारी देत असतो...

सारी कथा समजायला,
फार मोठं व्हावं लागतं.
बापाचं मन कठीण फार,
चटकन हाती लागत नसतं.

आकाशाहून भव्य अन्,
सागराची खोली असते.
बाप या शब्दाची,
महतीच मोठी न्यारी असते...

कळत नाही बापाचं मन,
स्वतः बाप झाल्याशिवाय.
बापमाणूस असतो तो,
कसा कळणार बापांशिवाय ? 

असतं न्यारंच रसायन,
त्याची फोड उकलत नाही.
म्हणून तर बापावर कविता,
कधी कोणी करत नाही...

करणार कशी कविता कोणी ?
तो त्यात मावत नाही.
चार ओळीत सांगण्यासारखा,
बाप काही लहान नाही.

सोनचाफ्याचं फूल ते,
सुगंध कुपीत ठरत नाही.
बाप नावाच्या देवाचा,
थांग कधी लागत नाही...

एक मात्र अगदी खरं,
त्याच्याशिवाय जमत नाही.
आईमार्फत बोललं तरी,
बोलल्याशिवाय राहवत नाही...

बाप नावाच्या पारिजातकाचं,
असंच काहीसं जिणं असतं... 
ते समजून घेण्यासाठी,
बापच होणं भाग असतं.........    

========≠======

शेवटचे वाक्य महत्वाचे आहे
जेव्हा फुटत होती प्लेट
बालपणी तुमच्या कडुन
आता आई कडुन फुटली 
तर तिला काहीही बोलु नका
   
जेव्हा मागत होते फुगा
लहानपणी आई जवळ
आता आई चष्मा मागते
तर तिला नाही म्हणु नका 
तुम्ही


जेव्हा मागत होते चॉकलेट 
लहानपणी आई जवळ
आता आई औषध मागते
तिला आणायला विसरु नका तुम्ही
  

आई रागवत होती तुम्हाला
जेव्हा मस्ती करीत होत तुम्ही
आता तिला ऐकु येत नाही
तर तिला रागावु नका तुम्ही


जेव्हा चालत नव्हते तुम्ही
आई बोट धरुन चालवत होती
आता ती चालु शकत नाही
तर तिचा हात पकडुन सहारा द्या तुम्ही
   

जेव्हा रडत होते तुम्ही
आई छातीला लावत होती
आता सहन करा दु:ख 
तुम्ही तिला रडु देवु नका तुम्ही


जेव्हा जन्मले होते तुम्ही
आई तुमच्या जवळ होती
जेव्हा आईचा शेवटचा क्षण येईल
तेव्हा तिच्या जवळ नक्की थांबा तुम्ही.....


============

आईने बनवलं,
बाबांनी घडवलं,
आईने शब्दांची ओळख करून दिली,
बाबांनी शब्दांचा अर्थ समजवला
आईने विचार दिले,
बाबांनी स्वातंत्र्य दिले,
आईने भक्ती शिकवली,
बाबांनी वृत्ती शिकवली,
आईने लढण्यासाठी शक्ती दिली,
बाबांनी जिंकण्यासाठी नीती दिली,
त्यांच्या परिश्रमामुळे यश माझ्या
हाती आहे
म्हणून तर माझी आज ओळख आहे.


==============
ओंजळीतील मायेची इथे 
कुणा किंमत कळत नाही,
तिचं ते ओंजळीतल देणं 
काही केल्या सरत नाही...

================

"आई"..."आई"..."आई"...असते...
देऊळ नसते...
देव नसते...
दुधावरली साय नसते...
फुल नसते...
चंद्र, तारा, वारा, चांदण्या, आकाश नसते...
अथांग अथांग सागर नसते...
"आई"...म्हणजे नक्की काय...?
कोणीही सांगू शकणार नाही...
पण तरीही मला वाटते...
"आई"... म्हणजे तीच्या मुलाला...
या जगात तुच "सर्वश्रेष्ठ" आहेस...
असा आत्मविश्वास देणारी...
एक महान...प्रेमळ...व्यक्ती...असते !!!
"आई"..."आईच"...असते...!!!!


=============
ऊन डोईवर घेवून बघं त्याची 
माय रोज राबते शेतात आहे,
बापाबद्दल विचारलं तर म्हणे 
तो लपला कधीच ढगात आहे...

_______

एक सुंदर पत्र आईविना असलेल्या एका मुलाने आपल्या आईस

काव्य रूपाने लिहुन पाठविले आहे ते मला आवडले म्हणून मी तुम्हा सर्वांना पाठवित आहे.

प्रिय आईस,

पत्ता: देवाचे घर,

तुझा हात हवा होता
सदा माझ्या उश्यावर,

           थोपटून मला झोपवायला
           अचानक जाग आल्यावर.

मी अजून सुद्धा दचकून
जागा होतो मधिच,

             तुझी काळजी रात्रभर       
            सतावत राहते उगीच.


तू का इतक्या लवकर
सोडून गेलीस गाव माझं,

             'आईविना पोर' असं
            घेतात लोकं नाव माझं.


वरवरच्या पदार्थांची मला
चवच लागत नाही,

                       काय करू तुझ्या दुधाविना माझी भूकच भागत नाही.

पोरकेपणाची माझ्या भोवती
का ठेऊन गेलीस जाळ,

                       का खरंच इतकी कच्ची                   होती, तुझ्या माझ्यातली नाळ.

तिथं कुणी आहे तुझ्याशी
बोलायला भरपूर,

                 उगाच रडत राहू नकोस
                दाबून स्वतःचा  ऊर.


बघ आई आता मी
रडत नाही पडलो तरी,

              मला ठावूक आहे तू
             गेली आहेस  देवाघरी.


भूक लागली तरी
बिलकूल मी रडत नाही,

              कारण मी हसल्या शिवाय
              तुला चैन पडत नाही.

पण रोज रात्र झाली कि तुझ्या आठवणींचा थवा येतो,

                     अंथरुणात लपून,  पुसून डोळे, मी गप्प झोपी जातो.

बघ तुझं बाळ किती
समजूतदार झालं आहे,

               आणि वय कळण्याआधी   
               वेडं वयात आलं आहे.

अजिबात म्हणजे अजिबात
त्रास देत नाही पप्पाला,

               तुझी काळजी तेवढी मात्र घ्यायला सांग बाप्पाला.


आणि सांग कि
हे शहाण बाळही आहे हट्टी,

                  जर का काही झालं तुला तर घेईल म्हणावं कट्टी.

मी आता थकलोय
तुला ढगांमध्ये पाहून,

                  ये आता भेटायला      
               नजर तिथली चुकवून.

जमलं जर का सुट्टी घ्यायला
तर ये निघून अशीच,
             
          पोट भरतं ग रोज
       पण मायेची भूक अजून तशीच....
             
             मायेची भूक अजून तशीच....
             
             मायेची भूक अजून तशीच....
आईची किम्मत हि ती नसल्यावरच कळनार्याला कळते  म्हनुन,,,,
त्या माउलीची तिच्या हयातीतच सेवा करा आणि आईला दु:ख देउ नका !

शनिवार, २१ नोव्हेंबर, २०१५

बहीण: एक अनोखं नातं


आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे बहीण.
असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली. आई फार काळ असू शकत नाही म्हणून कदाचित त्याने आईला समर्थ पर्याय होऊ शकेल अशी बहीण निर्माण केली कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी असते. गुणांचं तोंड भरून कौतुक करते. अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते. बाजू घेऊन भांडायला ती सदैव तत्पर असते. ‘माझा भाऊ’ अशी ओळख करून देताना तिचा चेहरा अभिमानाने डवरलेला असतो. तिचं अख्खं माहेर त्या एका भावात एकवटलेलं असतं....!

आई - श्री कल्पेश शिरसाठ


आई हे ईश्वराचे
पवित्र-पावन नाव
माया,प्रेम,आपुलकी
व वात्सल्याने गजबजलेले  गाव.
आई हे देवासमोर
सतत जळणारी निरांजन,
जगातील सर्वात मोल्यवान
कधीही न संपणारे धन.
आई हे प्रेम देणारा
अमृताने भरलेला झरा,
मनाच्या जखमेवर
मायेची फुंकर घालणारा वारा.
आई हे वात्सल्याने
काठोकाठ भरलेला सागर,
रसाळ मधुर वाणीने भरलेली घागर.
आई हे मृत्यूवर
मात करणारे अमृत,
सदा आशीर्वाद देणारा
देवतुल्य हस्त.

आई -- श्री कल्पेश शिरसाठ

Ek aai कामावर जाताना सर्व  गृहिणींच्या भावना
बाळा तुला सोडून जायला मन घट्ट कराव लागत.
मनात दुख साठवून चेहर्यावर हसू दाखवाव लागत.
बाळा तुला सोडून जायला खूप त्रास होतो मला.
तुज्या विना करमेना काय सांगू तुला ..

या आईला काही कळतच नाही...' - श्री कल्पेश शिरसाठ

'
या आईला तर काही, काही कळत नाही
ओरडत असते सदानकदा.. जरा ब्रेक नाही..
झोपेतून उठवून नेते.. खाण्यासाठी मागे लागते
इतक्या सक्काळी कधी.. भूक लागत नाही
या आईला ना काही कळतच नाही
दूध पितांना कार्टून मला, बघू देत नाही..
बाबा बघतात बातम्या त्यांना काही म्हणत नाही
सारखी सारखी घड्याळ बघते.. बसू देत नाही
बाथरूममधे ओढत नेते.. रडू देत नाही
या आईला ना काही कळतच नाही
कपडे, भांग, पावडर, शूज.. सारं करून देते
बस येईल म्हणून मला .. बाहेर खेचत नेते
उशीर झाला किती म्हणून.. भरभर येते
नमस्कार करायला लावते.. कौतुक करत नाही
या आईला ना काही कळतच नाही
शाळेमधून आल्यावरही, डबा आधी पाहते
संपवला का नाहीस शोनू... नेहमीच ओरडते
अभ्यास काय दिलाय माझा हेच पाहत बसते
मी चित्रं काढलेलं... लक्ष देत नाही
या आईला ना काही कळतच नाही
होमवर्क..खाणं, क्राफ्ट, डायरी शोधून घेते
मला मात्र बीनची गंमत आठवत असते
लक्ष कुठंय विचारते.. धपाटाही देते
तिच्या कसं लक्षात येतं कळतच नाही
या आईला ना काही कळतच नाही
दमून जाऊन झोप येते..मग मला बिलगते
तेव्हां म्हणते शोन्याला वेळ देता येत नाही
पापा घेत राहते हळूच .. अश्रू पुसून घेते
आई अशी रडलेली मला आवडत नाही
पण या आईला ना काही म्हणजे काही कळतच नाही...
Being a mother is one of the highest paid jobs in the world since the payment is PURE LOVE . You must appreciate..............

आई माझी .. श्री कल्पेश शिरसाठ,

एका खेडे गावात एक आई आणि तिचा १०-१२ वर्षाचा मुलगा राहत होते. उद्या आपला मुलगा जत्रेला जाणार त्याच्या हातात १० रुपये तरी असावे, पण घरात १० रुपये नाही म्हणून त्या माऊलीने बाजूच्या शेतात राबायला गेली. संध्याकाळी मजुरीचे पैसे आणले. तितक्यात मुलगा शाळेतून आला आईला म्हणाला मला जेवायला दे मी लवकर झोपतो उद्या जत्रेला जायचे आहे सकाळी लवकर उठेन.
मुलगा सकाळी लवकर उठला त्या माऊलीला पण उठवले. मुलगा अंघोळीला जाताना आईला म्हणाला आई लवकर न्याहारी तयार ठेव मी लगेच अंघोळ करून घेतो. माऊलीने भाकर करून ठेवली, दुध चुलीवर होते, मुलगा अंघोळ
करून आला आई जवळ बसला आणि आईला म्हणाला मला लवकर दुध आणि भाकरी दे मला उशीर होतोय.
आई ने आजूबाजूला पहिले दुध उतरवायला काहीच सापडत नव्हते. पुन्हा मुलाचा आवाज आला आई लवकर कर. माउलीने विचार न करता तसाच दुधाचा टोप हाताने उतरवला. गरम दुधाच्या टोपाचे चटके मस्तकाला वेदना देऊ लागल्या, हाताची लाही लाही झाली. पुन्हा मुलाचा आवाज आला आई लवकर कर न उशीर होतोय. त्या माउलीने पुन्हा टोप उचलून दुध प्यालात ओतले आणि मुलाला दिले. त्या माऊलीच्या डोळ्यातले अश्रू पाहून त्या मुलाने मान खाली घालून न्याहरी केली.
आई ने जवळचे १० रुपये त्या मुलाला दिले, मुलगा जत्रेत गेला संध्याकाळी परतला आई ने विचारले बाळा जत्रेत काय काय पहिले ? मुलाने जत्रेतल्या गमती जमाती सांगितल्या, मग आईने विचारले दिलेल्या १० रुपयाचे काय केलेस काही खाल्लेस कि नाही. त्या मुलाने आई ला सांगितले की तू डोळे बंद कर मी काहीतरी आणले आहे तुज्यासाठी माऊलीने डोळे बंद केले मुलाने खिश्यातून पक्कड काढून आईच्या हातात दिली. आईच्या डोळ्यात त्या पक्कडीच्या स्पर्शाने अश्रू आले आई धन्य झाली.....
आईच्या हाताला झालेली इजा त्या मुलाच्या मनावर इजा करून गेली ."
"दोस्तानो ,आईच्या पायाशी स्वर्ग आहे ..कधी हि तिला दु:खवू नका ....
डोंगरा आड गेलेला सूर्य पुन्हा दिसतो पण मातीआड गेलेली आई
पुन्हा दिसत नाही "
"फक्त Like किंवा Share नका करू, आपल्या आई साठी काही तरी करा .....!
आई माझा गुरु ..
आई कलपतरु . .
आई सैख्याचे सागरु..
आई माझी ..

घरट - श्री कल्पेश शिरसाठ

आपल घरट कस घडवायच ते या चिमुकल्या पक्ष्यांनकडुन शिकाव आपण..
जेव्हा ते आपल घरट विणत असतात ना तेव्हा नर पक्षी हा
छोट्या छोट्या काड्या आपल्या चोचीत धरुन आणतो..
आणी आपल्या घरट्याला जी योग्य वाटेन तिच काडी किँवा गवत मादा पक्षी निवड करते..
या मधे काही काड्या घरट्यासाठी
निवडल्या जात नाही म्हणुन नर पक्षी नाराज होत नाही..
त्याची मेहनत ही तशिच चालु राहते...
कारण त्याला ठाऊक असत की जे योग्य आहे तेच आपल्या घरट्याला सहारा देईन..
मजबुत बनवेल.. आपल्या येणार्या पिलांचे संरक्षण करेन...
.
त्या दोघांच्या कष्टान आखेर एक सुरेख घरट तयार होत..
.
आयुष्यात काही आवडीनीवडी ह्या भवितव्याला मजबुत बनवतात..
आणी नात्याला टिकावुन ठेवतात...

गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०१५

सुन - श्री कल्पेश शिरसाठ

एकदा सून आणि मुलगा बेडरूम मध्ये बोलत
असताना
आईच लक्ष जातं,
मुलगा - "आपल्या job मुळे
आईकडे लक्ष देता नाही येणार गं,
तिचं आजारपण आणि देखभाल
कोण करेल......?"
त्यामुळे आपण वृद्धाश्रमात ठेवलं तर तिच्याकडे
लक्ष
सुद्धा देतील ते "
त्या वर त्याच्या बायकोचे उत्तर ऎकून आईच्या
डोळ्यात पाणी आले.
.
.
.
.
.
.
..
सून - "पैसे कमवण्यासाठी पूर्ण जन्म बाकी आहे
ऒ ,
पण
आईंची माया किती कमवली तरी कमी आहे,
त्यांना पैश्यापेक्षा आपल्या सहवासाची गरज
आहे
,
मी जर job नाही केला तरी जास्त नुकसान
होणार
नाही.
मी आईंजवळ थांबेन.
घरी tution घेईन ,
त्यामुळे आईं जवळही राहता येईल.
विचार करा लहानपणी बाबा नसूनही घरकाम
करून
तुम्हाला आईने वाढवलंय.
त्यांनी तेंह्वा कधी शेजारच्या बाईकडे
सुद्धा तुम्हाला ठेवल नाही,
कारण तुमच्या कडे व्यवस्थित लक्ष देणार
नाहीत
म्हणून,
आणि तूम्ही आज हे असं
बोलताय...?
तूम्ही कितीही म्हणा पण आई
आपल्या जवळच राहतील.
अगदी शेवटपर्यंत "
सुनेने दिलेल्या उत्तरामुळे आई खूप रडते आणि
बाहेरच्या खोलीत
येउन देवा जवळ
उभी राहते . . .
आई देवाऱ्यापुढे
उभी राहून त्याचे आभार
मानते ,
आणि म्हणते
" देवा मला मुलगी नव्हती म्हणून
खूप भांडली रे मी तुझ्याशी,
पण
हि भाग्यलक्ष्मि दिल्याबद्दल
तुझे आभार कसे मानू मी.....?"
खरच देवा सार्थक केलस माझ आयुष्य अशी सुन
देऊन .��������

रविवार, १५ नोव्हेंबर, २०१५

निवडक - श्री कल्पेश शिरसाठ

हवीहवीशी माणसं
नकळत दुर निघून जातात
त्यांच्याशिवाय जगण्याचं
शिकवून जातात.......
आपण बसतो उगाच
रडत.......
त्या विरहात.......
ते मात्र आपल्या जगण्यावर
आस लावून जातात.......
जे आपल्यापासून दुर गेलेत.......
ते कधी आपले नव्हतेच.......
जे आहेत सोबत.......
तेच आपले हक्काचे.......
तेच देतील साथ
शेवटच्या क्षणापर्यंत .
जिवाचे जिवलग
मोठ्या नशिबाने मिळतात......

–--------------------

नात्याचीं दोरी नाजुक असते.
डोळ्यातिल भाव
हि,ह्रदयाची भाषा असते.
जेव्हा-जेव्हा विचारतो भक्ती
व,
प्रेमाचा अर्थ,
तेंव्हा
एक बोट आईकडे तर दुसरे बोट
बाबाकडे असते.

सुखी होने के तरीके हैं - श्री कल्पेश शिरसाठ

हमेशा खुशहाल बने रहने की
इच्छा रखने का अर्थ यह कदा पि
नहीं होता कि हम ये मनाने बैठ
जाएँ कि"हे ईश्वर"मुझे कभी
कष्ट न देना !

दुःख और कष्ट तो अपने समय
पर आयेंगे ही उसी"ईश्वर"ने
हमें जन्म के साथ ही होंठों पर
मुस्कान के साथ साथ आँखों में
आंसुओं की भी व्यवस्था की है ।

हमेशा खुशहाल रहने का अर्थ
है कि हम कष्टों को भी खुले
दिल से स्वीकार करें ।

और उनसे विचलित न होकर
मन को शांत बनाये रखें ।

कष्टों का मुकाबला करने की
ताकत पैदा कर पाना ही
सुख का पहला सूत्र है ।

सीधे शब्दों में दुनिया मुझे क्या
देती है ये उसकी मर्ज़ी है,,

लेकिन मैं उसे किस तरह से
स्वीकार करता हूँ उसके प्रति मैं
कैसी प्रतिक्रिया देता हूँ,

ये पूरी तरह मेरे ऊपर निर्भर है ।

इसे कोई मुझसे नहीं छीन सकता !

रोना बुरा नहीं है लेकिन हमेशा
रोते रहना वाकई बुरा है ।

दूसरों की मदद करना माफ़ कर
देना और माफ़ी मांग लेना..

ये सब सुखी होने के सबसे
आसान और आज़माए हुए
तरीके हैं !!

BETI

BETI ki mohabbat ko
kabhi Aazmana nahi,

woh phool hai usse
kabhi Rulana nahi,

BAAP ka toh
Maan hoti hai BETI,

Zinda Hone ki
Pehchan Hoti
hai BETI,

Uski Ankhe kabhi
Num na Hone dena,

Uski zindagi se
khushiya kabhi
kam na Hone dena,

Ungli pakad ke
kal jis ko Chalaya
tha tum ne,

Phir Usko hee Doli
mai Beethana hai
tumhe,

Bahut Chota sa Sa
far Hota hai BETI ka
saath Bahot kum
Waqt ke Liye hoti hai
woh hamare pass..

"Without U The World
Would Be NOTHING !!

Stay Blessed..

Stay Happy..

Keep Smiling !!

निवडक - श्री कल्पेश शिरसाठ

"शत्रु ला हजार संधी द्या
मित्र बनण्यासाठी..

"मित्राला एकही संधी देऊ नका
शत्रु बनण्यासाठी..

नाती जपण्यात मजा आहे !
बंध आयुष्यचे विणण्यात मजा आहे !!

जुळलेले सूर गाण्यात मजा आहे !

येताना एकटे आलो तरी
सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे !
--------------------

Real humility is rare because to have it you have to want nothing, yet when you have it you get everything.

--------------------

कुबेर भी अगर अपनी आय से ज्यादा खर्च करे, तो कंगाल हो जाता है।
--------------------
मां तो जन्नत का फूल है,
प्यार करना उसका उसूल है,
दुनिया की मोह्ब्बत फिजूल है,
मां की हर दुआ कबूल है ,
मां को नाराज करना
इंसान तेरी भूल है ,
मां के कदमो की मिट्टी
जन्नत की धूल है !!

शनिवार, १४ नोव्हेंबर, २०१५

दुनिया - कल्पेश शिरसाठ

ये दुनीया इसलिए बुरी नही के यहाँ बुरे लोग ज्यादा है बल्की इसलिए बुरी है कि यहा अच्छे लोग खामोश है..