सैनिक हो तुमच्या साठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सैनिक हो तुमच्या साठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १८ मे, २०१६

फौजी

फौज में मौज है;
हजार रूपये रोज है;
थोड़ा सा गम है;
इसके लिए भी रम है;
ज़िंदगी थोड़ी रिस्की है;
इसके लिए तो व्हिस्की है;
खानें के बाद फ्रुट है;
मरनें के बाद सैलूट है;
पहनने के लिए ड्रैस है;
ड्रैस में जरूरी प्रेस है;
सुवह-सुबह पी.टी है;
वॉर्निग के लिए सीटी है;
चलने के लिए रूट है;
पहनने के लिए D.M.S बूट है;
खाने के लिए रिफ्रैशमेंन्ट है;
गलती करो तो पनिशमेंट है;
जीते-जी टेंशन है;
मरने के बाद पेंशन है।

फौजी म्हणजे………

फौजी म्हणजे फीरता वारा
फौजी म्हणजे वाहता झरा।
फौजी म्हणजे रात्री एकटाच
अंधारात चमकनारा तारा।।

      फौजी अंगावरील शहारा
      फौजी रात्रीचा पहारा।
       फक्त फौजीच आहे
       सुख अन दु:खाचा सहारा।।

फौजी जन हिताचा नारा
फौजी आहे अनमोल हिरा।
फौजी म्हणजे गुन्हेगारांचा
एक बापच आहे दुसरा।।

       फौजी म्हणजे धाक दरारा
       त्याचाच आहे वचक सारा।
       काहीही करु शकतो पोलीस
       जर असेल तो नितीनं खरा।।

फौजीवर प्रेम करुन पहा

एकदा तरी फौजीवर
प्रेम करुन पहा।
मनापासुन त्याच्यावर
तुम्ही मरुन पहा।।

         जीवाला जीव देईल तुमच्या
         त्याचा हात धरुन पहा।
         त्याचं नाव काळजावर
         एकदातरी कोरुन पहा।।

कसा जगतो एकटा
तुम्ही चोरुन पहा।
प्रेमाचे दोन शब्द
त्याच्याशी बोलून पहा।।

          त्याच्या सारख्या यातना
         एकदा तरी सोसुन पहा।
          अनोळखी जगात तुम्ही
           एकटे बसुन पहा।।

दु:ख असुन मनात
तुम्ही हसुन पहा।
त्याच्या सारखे तुम्ही
ऊन्हात ऊभे राहुन पहा।।

         एकदा तरी फौजीवर
          प्रेम करुन पहा।
          तो रोज मरतो तुम्ही
          एकदातरी मरुन पहा।।

लेकरासाठी झुरतो तो
तसं भेटीसाठी झुरुन पहा।
तुम्हाला काय वाटतं तुम्ही
फौजीच्या यातना सोसुन पहा।।

         एकदा तरी फौजीवर
          तुम्ही प्रेम करुन पहा………

शनिवार, २३ एप्रिल, २०१६

What is military Life?

1.  I learnt to operate 3 critical machines
*         Scanner
*         Printer
*         Xerox Machine

2.  I learnt usage 3 things are national threat
*         pen drive
*         CD/DVD
*         high end mobiles

3.  I learnt to use 3 great short cuts:-
*         Ctrl+C
*         Ctrl+V
*         Ctrl+S

4. I learnt to say three very important words for professional life:-
*         jai hind sir
*         yes sir.
*         sorry sir

5.  When I really wanted to quit, I learnt : -
*         I am the only entity to run defence
*         AFO's have changed
*         Continue to Work

6.  I learnt to: -
*         survive sleepless nights
*         travel 1000's of KM without reservation
*         live without family

7.  I learnt to make every hard leap to keep my identity in society as I am a
*         forgotten son/brother/lover
*         mysterious morning guy
*         nonproductive jobber.

8.  I learnt to celebrate these things far away from loved ones:-
*         Birthday
*         New Year
*         Festivals

9.  At the end, People say:-
*         You had best job in the world with free wine ...
*         You Earned lakhs with pension as bonus
*        You Enjoy rest of ur life...

10.  But when I compare me with my self...
*         I just Sustained bond years ...
*         I just Tolerated mental trauma and aftermath...
*         I just Survived... For pension

11.  After joining I learnt :-
*         nothing is for free ... From wine to canteen goods
*         I pay tax for my every earned penny as my counterparts in civil..
*         I have no normal life after 15 years...

12.  I have survived:-
*         For convenience of my Family...
*         To avoid blame of Society...
*         To get tag of Employment...

13.  When I already knew that I have got the wrong train.
*         I learnt to Rejoice...
*         To be Happy...
*         To Smile..

In defence social life exists only in dreams . . . . .������

मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०१६

नीरजा भनोत

आज आपल्या पैकी खुप जणांना नीरजा भनोत कोण हे ही माहीत नसेल . नीरजा भनोत ही एक भारतीय विरांगना होती जीने 1986 साली तिच्या जीवावर खेळून आणि बुद्धिचातुर्याने 400 जणांचे जीव वाचवीले आणि वयाच्या 23 वर्षी शहीद झाली . ती भारतातील सर्वात लहान वयाची अशोक चक्र हां वीरता पदक मिळविनारि भारतीय ठरली होती . पण नंतर भारतीय त्यांच्या सवयी प्रमाणे या विरांगणेला विसरून गेले .
नीरजा भनोत ही हरीश भनोत या हिन्दुस्थान टाइम्स मध्ये असणाऱ्या पत्रकाराची मुलगी आणि Pan Am 73 या एयरलाइंस कंपनी मध्ये सीनियर पर्सर म्हणून काम करणारी मुलगी .
5 सप्टेम्बर 1986 मध्ये पाकिस्तान मधील कराची या विमानतळावर मुंबई ते अमेरिका अश्या जाणाऱ्या Pan Am 73 एयरलाइंस च्या विमानाला चार अतिरेक्यांनी गन पॉइंट वर वेठीस धरले . त्या विमानात 400 प्रवासी होते . निरजा सुद्धा याच विमानात होती . अतिरेक्यांना ते विमान त्यांना इस्राइल मधल्या कोणत्या तरी इमारतीला धड़कावयाचे होते .
विमानात पायलट नसल्यामुळे अतिरेकी विमान घेवुन जाऊ शकत नव्हते . अतिरेक्यांनी पाकिस्तान सरकारला एका पायलट ची मागणी केली . पण पाकिस्तान सरकारने ती मागणी फेटाळली . अतिरेक्यांनी पाकिस्तान सरकारला वेठीस धरण्यासाठी प्रवाश्यांना मारायची धमकी दिली . त्यांनी निरजाला सर्व प्रवाश्यांचे पासपोर्ट गोळा करायला सांगितले . त्यातून त्यांना अमेरिकन प्रवाश्यांना निवडून मारायची धमकी देवून पाकिस्तानवर आणि अमेरिकेवर दबाव टाकू इच्छित होते .
निरजाने पासपोर्ट गोळा केले पण शिताफिने त्यातील अमेरिकन प्रवाश्यांचे पासपोर्ट लपवून बाकीचे पासपोर्ट अतिरेक्यांना दिले . त्यानंतर त्या अतिरेक्यांनी एका ब्रिटिश प्रवाश्याला मारायची धमकी देवून पाकिस्तान सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला . पण निरिजाने त्या अतिरेक्यांना समजावून त्या ब्रिटिश प्रवाश्याचे प्राण वाचविले .
निरिजाच्या एका क्षणी असे लक्षात आले की आता विमानातील इंधन संपेल आणि विमानात पूर्ण अंधार होईल . या परिस्थितीचा फायदा उठवायचा असे निरजाने ठरविले त्याप्रमाणे तिने प्लानिंग सुरु केले . तिने प्रवाश्यांना जेवण देण्याच्या बहाण्याने विमानातील आपत्कालीन दरवाजा बद्दल माहिती देणारी पत्रक प्रवाश्यां पर्यंत पोहोचविले . निरजाने जसा विचार केला होता तसेच घडले . थोड्या वेळाने विमानातील इंधन संपले आणि विमानात पूर्ण पणे अंधार पसरला या परिस्थितीचा फायदा घेवुन निरजाने विमानाचे सर्व आपत्कालीन दरवाजे उघडले . प्रवाश्यांनी देखील पटापट विमाना बाहेर उड्या मारल्या .
अतिरेक्यांच्या लक्षात ही गोष्ट आली त्यांनी बेछूट गोळीबार सुरु केला . काही प्रवाश्यांना गोळ्या लागल्या पण ते बचावले . सर्व प्रवासी विमानातून बाहेर पड़ेपर्यंत निरजा विमानात थांबली होती . आता ती विमानातून बाहेर पडणार एतक्यात तिला एका लहान मुलांचा रडण्याचा आवाज ऐकायला आला . एव्हड्या वेळात पाकिस्तानी कमांडोज पण विमानाच्या आत पोहोचले होते . त्यांनी त्या चार अतिरेक्यां पैकी तिन जणांना मारून टाकले . निरजा त्या मुलांना शोधून विमानाच्या बाहेर पडत होती तेव्हड्यात तो चौथा अतिरेकी निरजाच्या समोर आला . निरजानी त्या मुलांना आपत्कालीन दरवाजाच्या बाहेर फेकून दिले आणि त्या अतिरेक्याने झाडलेल्या गोळ्या अंगावर घेतल्या . त्यातच तीचा अंत झाला . 17 तास अतिरेक्यांशी झुजंत चारशे प्रवाश्यांना वाचवुन निरजाचा झालेला अंत सर्व जगाला दुःख देवून गेला .
निरजाने वाचविलेल्या त्या लहान मुलां पैकी एक जण मोठा झाल्या वर वैमानिक झाला . त्याने त्याच्या भावना व्यक्त करताना म्हणाला माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणावर निराजाचा हक्क आहे .
भारताने निरजाला अशोक चक्र हां सर्वोच्च नागरी पुरस्कार देवून सन्मानित केले .
पाकिस्तानने तमगा-ए-इन्सानियत हां सर्वोच्च पुरस्कार दिला .
अमेरिकेने जस्टिज फॉर विक्टम ऑफ क्राइम अवार्ड हां वीरता पुरस्कार देवून सन्मानित केले .
( निरजा च्या जीवनातील त्या घटनेवर सध्या एक सिनेमा येत आहे . म्हणून तिच्या आठवणी ताज्या झाल्या . )

शनिवार, १३ फेब्रुवारी, २०१६

शहीद भगतसिंग

भगतसिंग (जन्म : सप्टेंबर २७, १९०७ - मृत्यू : मार्च २३, १९३१) लाहोरच्या तुरुंगात २३ मार्च,१९३१ रोजी हसत हसत फासावर गेले. फाशी जाताना त्यांचे वय अवघे २३ वर्षांचे होते. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेकांनी हौतात्म्य पत्करले. अनेक वीर शहीद झाले. त्या सर्वांनाच इतिहासात एक मानाचे स्थान आहे. पण त्या सशस्त्र क्रांतिकारकांतही भगतसिंग यांचे स्थान अद्वितीय आहे. म्हणूनच त्यांनी ’शहीद-ए-आलम’ असा किताब दिला जातो. त्यांच्या स्मरणार्थ २३ मार्च हा दिवस, भारतात शहीद दिन म्हणून पाळला जातो. भगतसिंग यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून युवकांनी वर्तन केले पाहिजे.
अमृतसर ते चंदीगड महामार्गावर असलेले खटकरकलां येथे भगतसिंग यांचे वडिलोपार्जित घर आहे. तिथे हुतात्मा भगतसिंग स्मृति संग्रहालय आहे. संग्रहालय सोमवारी बंद असते. येथे अनेक दुर्मिळ फोटो आहेत. हुतात्मा भगतसिंग यांची स्वाक्षरी असलेली त्यांना लाहोर तुरुंगात भेट दिली गेलेली भगवद्‌गीतेची प्रत येथे आहे.
 
भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना जी फ़ाशी झाली ती कायदेमंडळात बाँब फ़ेकला म्हणून नाही, तर सेंडर्सच्या हत्येच्या आरोपाखाली त्यांना फ़ाशी देण्यात आली. ही हत्या १७ डिसेंबर, १९२८ रोजी झाली होती. त्यावर खटला चालवण्यात आला आणि त्याच्या अखेरीस २३ मार्च, १९३१ रोजी फासावर लटकविण्यात आले. .

महात्मा गांधींनी या संदर्भात लक्ष घालावे अशी त्यांना विनंती करण्यात आली. भगतसिंग व त्यांच्या सहकार्‍यांची फ़ाशीच्या शिक्षेतून सुटका व्हावी म्हणून १९ मार्च रोजी गांधींनी दिल्ली येथे व्हॉइसरॉय लॉर्ड आयर्विन यांची भेट घेतली. पण गांधींच्या रदबदलीचा काही उपयोग झाला नाही. परंतु या रदबदलीची बातमी पंजाबच्या तत्कालीन गव्हर्नरला मिळाली. ही रदबदली कदाचित यशस्वी होईल असे त्यांना वाटले. त्यामुळे २४ मार्च हा फ़ाशीचा दिवस ठरला असूनही, आदल्या दिवशी रात्रीच लाहोरच्या तुरुंगात त्यांना फ़ाशी देण्याचा कार्यक्रम उरकून घेण्यात आला

सैनिक

आमचे जवान शहिद झाले की आम्हाला एक उमाळा येतो..
श्रध्दांजलीची लाट येते
15  आँगस्ट आणि 26 जानेवारी ला जसे  आमचे देश प्रेम उफाळून येते आणि दोन दिवसा नंतर त्याचा ज्वर आपोआप कमी होतो ...
तसे एखादा जवान शहिद झाला की सोशल मेडिया आहेच दुख व्यक्त करायला .... शहिद जवान अमर रहे
अशा घोषणा देतात ...
पण असे कितीसे शहिद जवान आपल्या लक्षात राहतात हो ...
गेल्या 60 वर्षात भारताने पाकीस्तानच्या एकतरफा युद्धा मुळे 60 हजार जवान गमावले  ....
कितींची आठवण आहे आपल्या सर्वांनाच ...त्यांच्या कुटूंबाचे काय झाले असेल कुणाचा एकुलता एक मुलगा
कुटूंबाचा एकमेव आधार , नविनच लग्न झालेला तरूण  ,  कुणाचा  भाऊ
असे किती तरी  कुटूंब उध्वस्त झाली असतील ...अशा शहिद झालेल्या जवांनाच्या कुटूंबाची नंतरची परिस्थिति काय असेल याचा मागमुस घेण्याचा प्रयत्न एखादा मेडीया किंवा आपण करत असतो का?
गेली 40 वर्ष माजीसैनिक  आपल्या निवृत्ति वेतनासाठी झटत आहेत
पण त्यांच्या मागण्यामान्य होत नाही
डॉक्टर, वकिल , शिक्षक आणि काय कुठल्याही सरकारी कर्मचार्यांच्या मागण्या चुटकीसरशी मान्य करणारे सरकार सैनिकांच्या मागण्या मान्य का करत नाही ?
कारण त्यांचे युनियन नसते सरकारी कर्मचार्यांन प्रमाणे.म्हणून का?
गेले वर्ष भर  माजी सैनिक दिल्लीच्या जंतरमंतर वर पेन्शन साठी आंदोलन करत आहे . प्रसार माध्यमांनी किती दखल घेतली ...किती जनता त्यांच्या न्याय मागण्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरली ....जय जवान लिहून चालत नाही ....
ज्या देशात सैनिक आणि शेतकरी यांचा सन्मान केला जातो त्या देशाचे भविष्य उज्ज्वल असते . या महान खंडप्राय देशात रक्षक आणि पोशिंदा कष्टात असेल तर आमचे  भवितव्य अंधकारमय असणार आहे
फ्रांन्स मध्ये सैनिकांना सर्वात जास्त पेन्शन दिले जाते..  एकूण निवृत्ति वेळेच्या वेतनाच्या 70% भारतात ते फक्त 40 % आहे
तेव्हा आता वेळ आहे की सैनिकांचे वेतनमान प्रचंड प्रमाणात वाढवून निवृत्ति नंतर  त्यांचे योग्य पुनर्वसन करणे आणि त्यांचे निवृत्ति वेतन योग्य प्रमाणात वाढवण्याची....
प्रसार माध्यमांनी आणि जनतेने शासनावर दबाव निर्माण करणे गरजेचे आहे ...नाही तर ज्या दिवशी  या देशाचा सैनिक युनियन बनवून वेतना साठी संपावर जाईल त्या दिवशी या देशाचे  काय होईल ही कल्पना न केलेलीच बरी....
जय हिंद जय जवान

शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१६

सियाचिन

सियाचिन : ...इथे पावलापावलावर मृत्यूशी संघर्ष असतो... तिथलं सगळ्यात मोठं आव्हान कुठलं असेल तर ते म्हणजे जगणं... इथे तैनात असलेला जवान तीन महिन्यांनी सुखरुप बेस कॅम्पवर परतला तर तो असतो त्याचा पुनर्जन्म...

सियाचिन... जगातली सगळ्यात उंचावर असलेली युद्धभूमी... इथलं सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे जगणं... जिवंत राहणं... सियाचीन या शब्दाचा अर्थ 'गुलाबांचं खोरं'.... पण इथे गुलाबांपेक्षा बोचणारे काटेच जास्त आहेत... नजर जाईल तिथपर्यंत बर्फच बर्फ... पण समुद्रसपाटीपासून तब्बल २२ हजार फुटांवरचा बर्फ प्रचंड जीवघेणा.

चीन-भारत सीमारेषा

हिमालयाच्या काराकोरम रांगांमध्ये सियाचिन वसलंय. चीन आणि भारतीय उपखंडाला वेगळी करणारी ती रेषा... सियाचिन सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं... म्हणूनच सियाचिनच्या सुरक्षेशी अजिबात तडजोड केली जात नाही.

सुरक्षेवर १५०० कोटींचा खर्च

७६ किलोमीटरचं असलेलं सियाचिन जगभरातलं दुसरं मोठं हिमशिखर... इथलं तापमान उणे ४० ते ५० अंश असतं, थंडीत ते उणे ७० पर्यंत खाली जातं... वारे वाहतात ते बंदुकीच्या गोळीच्या वेगानं... सियाचिनमध्ये जवळपास भारताची दीडशे पोस्ट आहेत. त्यावर सुमारे १० हजार जवान तैनात असतात. सियाचिनच्या सुरक्षेवर वर्षाकाठी १५०० कोटी खर्च होतात. इथे तैनात असलेल्या सैनिकांवरचा रोजचा खर्च ४ ते ८ कोटी इतका आहे.

चालतानाही मृत्यू देतो चकवा

बेसकॅम्पपासून सगळ्यात लांब असलेली चौकी म्हणजे इंद्राकॉल... बेसकॅम्पपासून या चौकीवर चालत जायला तब्बल २० ते २२ तास लागतात. कंबरभर बर्फात चालायचं म्हटलं तर २ किलोमीटरचं अंतर चालायला सहा सात तास लागतात. दहा पावलं चाललं की विश्रांतीसाठी थांबावंच लागतं... इथे सगळे सैनिक एकापाठोपाठ एक आणि एकमेकांच्या कंबरेला दोरी बांधून चालतात... कुठल्याही क्षणी बर्फ खचू शकतो आणि एखादा जवान गाडला जाऊ शकतो... एखादा जवान असा गाडला गेलाच, तर बाकीचे जवान त्याला ओढून काढू शकतील, यासाठी या दोरीचं प्रयोजन... शरीराच्या हालचालीही प्रचंड नियंत्रित असतात.

...तर दृष्टीही जाऊ शकते

इथे सूर्यप्रकाश बर्फावर पडला आणि तो थेट डोळ्यांत परावर्तित झाला तर दृष्टीच जाऊ शकते. इथे आंघोळ करणं निव्वळ अशक्य.... दाढीही करता येत नाही... चुकून त्वचा कापली गेलीच तर जखमही भरुन येत नाही... बर्फात कुठलंही मनोरंजन नाही... महिनाभरानं घरुन येणारं एखादं पत्र तेव्हढंच काय ते मिळणारं मनोबल आणि जिवंत असल्याचं लक्षण...

झोपेतून उठवण्यासाठी चौकीदार

जेवायचं काय तर फक्त चॉकलेटस आणि ड्रायफ्रुटस... जेव्हा एखादं विमान येईल तेव्हा ते रेडी टू इट फूडची पॅकेटस टाकून जातं. सियाचिनमध्ये फक्त चिता हेलिकॉप्टरच उतरू शकतं... पण तेही ३० सेकंदांपेक्षा जास्त तिथे थांबू शकत नाही. सियाचीनमधले जवान झोपतात लाकडाच्या बाकांवर, स्लीपिंग बॅगमध्ये... ऑक्सिजन कमी झाला तर झोपेतच मृत्यू होऊ शकतो.... म्हणून तिथला चौकीदार प्रत्येक जवानाला मधून - मधून उठवत राहतो... अस पावलापावलावर मृत्यू तिथे लपाछपी खेळत असतो... आणि त्याही परिस्थितीत भारताचा जवान तिथे घट्ट पाय रोवून उभा असतो, तुमच्या आमच्या सुरक्षेसाठी... सुखासाठी... या जवानांना, त्यांच्या धैर्याला आणि शौर्याला सलाम...!!!

हिमालयाचा विर हणुमंतप्पाने अखेर

हिमालयाचा विर हणुमंतप्पाने अखेर भारत मातेचा निरोप घेतला सलग तेरा वर्ष भारतमातेच्या रक्षणासाठी आपले घरदार सोडून हिमालयात -४५ अंश सेल्सियस तापमानात स्वत:च्या जिवाची पर्वा न करता भारतमातेचा हा वीर देशाचे संरक्षण करत होता.सहा दिवस तीस फुट खाली बर्फाच्या ढिगार्याखाली अडकलेल्या शूर हणुमंतप्पा च्या वीरतेला सलाम करून त्यांच्या पवित्र आत्म्यास सदासर्वदा शांती मिळो हिच प्रार्थना. 
....................................................
हिंदूस्तान अबाधित राहिला पाहिजे माझा देश दुष्मणांपासून सुरक्षित राहिला पाहिजे या भावनेने हजारो युवक देशाच संरक्षण करण्याकरता मिलेट्रीत भरती होतात.कोण जम्मू काश्मिर मधे तर कोण पंजाबच्या सिमेवर तर कोण हिमालयातील बर्फाच्छदित भागामधे आपल्या देशाचं चोवीस तास संरक्षण करत असतो.एखादा तंबू,झोपडी टाकून आकाशालाच आपल पांघरूण समजून ते दिवस काढत असतात.भूक लागल्यावर कुठेतरी एखादी शेकोटी पेटवून काय असेल ते कच्चे-पक्के अन्न खावून देशाच्या इमानापोटी ते आपले दिवस काढत असतात.दुष्मण केंव्हाही आपल्यावर हल्ला करू शकतो या भावनेने ते सुखाची झोप ही घेऊ शकत नाहीत.दोन वेळेसच जेवण ही त्यांना वेळेवर मिळत नाही.देशाचा दुष्मण आपल्या देशात पाऊल ठेवता कामा नये माझ्या देशातले माय-बाप आया-बहिणी सुरक्षित राहिले पाहिजे त्यांना कोणत्याही अतिरेक्यांकडून धोका नाही झाला पाहिजे एवढच ध्येय उराशी बाळगून स्वत:चा जीव देशाच्या कार्याला ते अर्पण करतात.
....................................................
आज आपल्या घरातला एखादा माणूस मेल्यानंतर आपल्याला किती दुख: होतं.परंतू सिमेवर राजरोस पणे भारतमातेचे जवान शहिद होतात.त्यांनापण आई-वडील बायका-लेकरं असतातच मग त्यांना किती दुख:वाटत असेल.आज आपण जे सुखाचे दिवस पाहतो ते सिमेवर तैनात असणार्या जवानांमुळेच..
काही मुलं बापाने दिवसरात्र एक करून कमावलेल्या पैशावर उड्या मारतात,मस्ती करतात आणि मित्रांच्या संगतीने दारू पितात, एैयाशी करतात,कुठल्यातरी दिन दुबळ्या मुलाला चारचौघजण मिळून मारहान करतात हा बूळसटपणा समाजाला लागलेली महाभयंकर किड आहे.अरे मस्तीच दाखवायची असेल तर हातात ए के ४७ घेऊन देशाच्या दुष्मणांशी लढा,पाकिस्तानच्या अतिरेक्यांशी लढा..!दादागिरी गरीबांपाशी काय दाखवताय..! दादागिरी दाखवायचीच असेल पाकिस्तानच्या अतिरेक्यांना दाखवा, जिहाद्यांना दाखवा..!!!!
....................................................
एक जवान शहिद झाला तर आपण फक्त त्यांना श्रद्धांजलीच अर्पन करतो.राजकारणी लोकांना यांची काही दयामया वाटत नाही.लढणारे लढतात मरणारे मरतात आणि गादीवर सत्तेला चाटणारे अतिरेक्यांवर राजकारण करतात.अमिरेकेत कैद असलेला माफिचा साक्षीदार "डेव्हीड हेडलीने" इशरत जहॉंही सुसाईट बॉंम्बर होती अशी साक्ष नुकतीच दिली आहे.याच्यावरून इशरतला मुलगी माणणार्यांचा पुरता"पर्दाफाश" झाला आहे.
एकडे जवानांच्या अंतयात्रेला जाण्याची पुरसत नसणार्यांना गुलाम अलींचे तळवे चाटायला वेळ असतो यालाच भारतीय राजकारण्यांचा 'नासलेला धंदा' म्हटल तर वावग ठरणार नाही.
................................................
हे जावान तु आमच्यासाठी लढतो,आमच्या सुखासाठी तू स्वत:च्या सुखाचा त्याग करतो.भारतमातेसाठी तु जीव अर्पण करतो तुझे हे बलिदान निदान आम्ही सामान्य माणूस तरी कधीच विसरणार नाहीच... नाही.......
....... जय महाराष्ट्र जय हिंदूस्तान.......
        

माफ कर दोस्ता !

माफ कर दोस्ता !

खोटे नाही बोलणार
बघ काळजाचा कप्पा
उगीच आमच्यासाठी
जिव दिलास हनूमंतअप्पा

तू बाजी लावली प्राणाची
मनी स्वार्थ नव्हता काही
पण खरं सांगू का तुला
आम्ही त्या लायकीचेच नाही

मेणबत्त्या लावू
अन श्रध्दांजली वाहू
त्याच्या बातम्या आम्ही
टि व्ही, पेपरात देउ

जातीयवाद, भ्रष्टाचार
ईत्यादी ईत्यादी
लिहत बसलो तर
खुप मोठी होईल यादी

पण हे सारं ईत्यादी
करीत राहू आम्ही
अन आमच्यासाठी सिमेवर
लढत रहा तुम्ही

काल तर वाटलीच नाही
मग कशी वाटणार आज ?
खरंच सांगतो कशाचीही
आम्हाला वाटत नाही लाज

तुझ्या सारखे कितीतरी
आमच्यासाठी मेले
पण आमच्यात मात्र कोणतेही
परिवर्तन नाही झाले

उगीच आमच्यासाठी
कुणीही नका मरू
कारण आम्हाला जे वाटते
तेच आम्ही करू

शांती मिळो तुझ्या आत्म्याला
आम्हीच भोगु आमचे पाप
खरं तेच बोललो दोस्ता
करून टाक बाबा माफ

( ताजा कलम : शहिदांच्या मृत्यूचेही भांडवल करणा-या तमाम प्रसिद्धी पिसाटांसाठी आणि स्वतः च्या स्वार्थासाठी राजकारण करणाऱ्या
निगरगट्ट पुढा-यांसाठी नाईलाजाने
हा तळतळाट व्यक्त झाला )

अॅड, अनंत खेळकर
जठारपेठ, अकोला
मोबाइल : 9370061677