ज्ञानयोग
.
।।संत कबीराचे दोहे ।।
बार बार तोसो कहा ,
सुनरे मनवा नीच ।
बनजारे का बैल ज्यूं पैडा माही मीच ।।
मानसाच्या मनाची फार मोठीशोकांतीका अाहे की , ते कितीही वाईट अनुभव अाले तरीही कुत्र्याच्या शेपटा सारखे वाकडे ते वाकडेच रहाते .खाऊन अपचन होते अाणी माणसाचे मन ठरविते की अाता अाजपासून मर्यादीत प्रमाणातच खायचे .परंतू अावडता पदार्थ समोर अाला की ते हजार कारणे समोर करते ,अाणी खा-खा खात बसते .प्रकृतीच्या अनेक कुरबुरी सुरू होतात अाणी माणसाचे मन ठरविते की उध्यापासून दररोज योगासने करावयाची ,पहाटेचा गजर लावला जातो .पहाटे गजर बंद करतांना बेत बदलतो अाणी ,अाठवड्याच्या सुरूवाती पासून सोमवार पासून व्यायाम करायचे ठरते .सोमवारी ठरते की पहिल्या तारखे पासुन व्यायाम करावा .पहिल्या तारखेला ठरते की नव्या वर्षापासुन सुरू करूया , व्यसनी तर हद्द करतात .सिगरेट सोडतात . चार- सहा दिवस सिगरेट ओढत नाहीत .मग त्या खुशीत सिगरेट पेटवतात .
कबीरजी अशा मनाला नीच अशी शिवी हासडतात ,ते म्हणतात की हे मना तुला परत परत , पुन्हा पुन्हा किती अाणी कसे समजावू ? तुला किती उपदेश करू ? तु कधी सुधरणार ? कितीही सांगीतले तरी तुझे खरे असते . प्रसंग घडला की तू हो म्हणतोस अाणी प्रत्यक्ष कृती करताना मात्र तुझ्या मुळ मता प्रमाणेच वागतोस अरे महाभागा , जरा माझे ऐक .असे करू नकोस अशाने तुझे कधीॅही भले होणार नाही. क्षणाक्षणाला तू खोल चिखलात रूतत जात अाहेस .
बंजार्याचा बैल कसा मानेवर सतत जू पकडून असतो .त्यपासून त्याची कधीही सुटका होत नाही . केवळ मृत्युच त्याला या जन्मीच्या त्रासा पासून मोकळे करतो.तुझ्या बाबतीत तेही शक्य नाही . कारण तुझ्या मानेवर भोगाचे जू सतत वाढत अाहे .तुझी या पासून प्रत्यक्ष मृत्युही सुटका करू शकत नाही .कारण हेच ओझे तू मृत्युचे वेळी बरोबर घेवून पुढील जन्म घेणार अाहे .मृत्यु येईल , परंतु तुला मुक्ती कधीही मिळणार नाही .यावर एकच उपाय अाहे ,अाणी तो म्हणजे या मना पासून दूर होणे .यासाठी अध्यात्मात रत असावे , सत्संग करावा .
क्रमश:
सोमवार, ३० नोव्हेंबर, २०१५
मनापासुन दूर होणे महत्वाचे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा