शनिवार, २१ नोव्हेंबर, २०१५

असे जगावे दुनियेमध्ये

जबरदस्त कविता!एकदा वाचली तर आणखी एकदा वाचल्याशिवाय रहावणार नाही....
असे जगावे दुनियेमध्ये,
आव्हानाचे लावुन अत्तर,
नजर रोखुनी नजरे मध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर..
नको गुलामी नक्षत्रांची,
भीती आंधळी ताऱ्यांची,
आयुष्याला भिडतानाही,
चैन करावी स्वप्नांची..
असे दांडगी इच्छा ज्याची,
मार्ग तयाला मिळती सत्तर,
नजर रोखुनी नजरे मध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर..
पाय असावे जमिनीवरती,
कवेत अंबर घेताना,
हसू असावे ओठांवरती,
काळीज काढुन देताना..
संकटासही ठणकावुन सांगावे,
आता ये बेहत्तर,
नजर रोखुनी नजरे मध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर..
करुन जावे असेही काही,
दुनियेतुनी या जाताना,
गहिवर यावा जगास  सा-या,
निरोप शेवटचा देताना..
स्वर कठोर त्या काळाचाही,
क्षणभर व्हावा कातर कातर,
नजर रोखुनी नजरे मध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर...


१२ टिप्पण्या:

  1. हि कविता गुरू ठाकूरची आहे. कै. विंदा करंदिकरांच्या कुठल्याही संग्रहात हि कविता सापडत नाही.
    महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या शालेय अभ्यासक्रमात, इयत्ता सातवीच्या पुस्तकात ह्या गुरू ठाकूरच्या कवितेचा समावेश करण्यात आलाय. ह्या कवितेची निर्मिती आणि स्फुर्ती बद्दलची गोष्ट खालिल लिंक वर वाचा
    http://www.guruthakur.in/ayushyala-dyave-uttar/
    वेबसाईट वरील ब्लॉग टॅब वर मराठी कविता क्लिक केल्यास आपणास संपूर्ण कविता वाचता येईल.

    उत्तर द्याहटवा
  2. हि कविता कवी गुरू ठाकूरांची आहे. कै. विं दा करंदिकरांच्या कुठल्याही संग्रहात हि कविता सापडत नाही.
    महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या शालेय अभ्यासक्रमात, इयत्ता सातवीच्या पुस्तकात ह्या गुरू ठाकूरच्या कवितेचा समावेश करण्यात आलाय.
    http://www.guruthakur.in/ase-jagave-in-m-s-b-7th-std-syllabus/
    ह्या कवितेची निर्मिती आणि स्फुर्ती बद्दलची गोष्ट खालिल लिंक वर वाचा
    http://www.guruthakur.in/ayushyala-dyave-uttar/

    कृपया चुकिची दुरूस्ती करावी. कै. विं दा करंदीकरांबद्दल मला भरपुर आदर असला तरी मी हा कवी गुरू ठाकूरांचा अपमान समजतो.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. बाज विंदांचा असल्याने व विंदा पूर्वसूरी आणि थोर असल्याने त्यात अपमान नसून सन्मानच समजावा. शैलीविशेषामुळे असे खूपदा गुलजारांबद्दल, केदारनाथसिंह, गालिबबद्दल घडत राहिले आहे.

      हटवा
  3. एकच सांगावेसे वाटते ही कविता फारच छान आहे.

    उत्तर द्याहटवा
  4. एक सुंदर अप्रतिम कविता. अर्थ पुर्ण जीवन दर्शन घडविणारी कविता. गुरू ठाकूर 🙏

    उत्तर द्याहटवा
  5. पहिली ओळ ' असे जगावे छाताडावर आव्हानांचा लावून अत्तर' अशी आहे का?

    उत्तर द्याहटवा