कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १८ जुलै, २०१८

नवरा

आता पर्यंत बायको वरील कविता ऐकली असेल व वाचली असेल पण नवऱ्या वरील एकदा वाचा

*नवरा म्हणजे समुद्राचा*
*भरभक्कम काठ*
*संसारात उभा राहतो*
*पाय रोवून ताठ      ll*

*कितीही येवो प्रपंच्यात*
*दुःखाच्या लाटा*
*तो मात्र शोधीत राहतो*
*सुखाच्या वाटा   ll*   

*सर्वांच्या कल्याणा करता*
*पोटतिडकीने बोलत राहतो*
*न पेलणारं ओझं सुद्धा*
*डोक्यावर घेऊन चालत राहतो  ll*

*कधी कधी बायकोलाही*
*त्याचं दुःख कळत नसतं*
*आतल्या आत त्याचं मन*
*मशाली सारखं जळत असतं  ll*

*नवरा आपल्या दुःखाचं*
*कधीच प्रदर्शन मांडत नाही*
*खूप काही बोलावसं वाटतं*
*पण कुणाला सांगत नाही   ll*

*बायकोचं मन हळवं आहे*
*याची नवऱ्याला जाणीव असते*
*दुःख समजून न घेण्याची*
*अनेक बायकात उणीव असते  ll*

*सारं काही कळत असून*
*नवऱ्याला अपमान गिळावे लागतात*
*वेदनांना काळजात दाबून*
*पुन्हा कष्ट उपसावे लागतात    ll*

*सगळ्यांच्या आवडी जपता जपता*
*मन मारीत जगत असतो*
*बायको , पोरं खूष होताच*
*तो सुखी होत असतो  ll*

*इकडे आड तिकडे विहीर*
*तशीच बायको आणि आई*
*वाट्टेल तसा त्रास देतात*
*कुणालाच माया येत नाही ll*

*त्याने थोडी हौसमौज केली तर*
*धुसफूस धुसफूस करू नका*
*नवऱ्या विरुद्ध विनाकारण*
*दारू गोळा भरू नका  ll*

*दोस्ता जवळ आपलं मन*
*त्यालाही मोकळं करावं वाटतं*
*हातात हात घेऊन कधी*
*जोर जोरात रडावं वाटतं ll*

*समजू नका नवरा म्हणजे*
*नर्मदेचा गोटा आहे*
*पुरुषाला काळीज नसतं*
*हा सिद्धांत खोटा आहे  ll*

*मी म्हणून टिकले इथं*
*दुसरी पळून गेली असती*
*बायकोनं विनाकारण*
*नवऱ्याला धमकी दिलेली असती ll*

*घरात तुमचं लक्षच नाही*
*हा एक उगीच आरोप असतो*
*बाहेर डरकाळ्या फोडणारा*
*घरी म्यांव म्यांव करीत बसतो ll*

*सारख्या सारख्या किरकिरीनं*
*त्याचं डोकं बधिर होतं*
*तडका फडकी बाहेर जाण्यास*
*खूप खूप अधीर होतं  ll*

*घरी जायचं असं म्हणताच*
*त्याच्या पोटात गोळा येतो*
*घरात जाऊन बसल्या बसल्या*
*तोंडात आपोआप बोळा येतो ll*

*नवरा म्हणा , वडील म्हणा*
*कधी कुणाला कळतात का ?*
*त्यांच्या साठी कधी तरी*
*कुणाची आसवं गळतात का ? ll*

*पेला भर पाणी सुद्धा*
*चटकन कुणी देत नाही*
*कितीही पाय दुखले तरी*
*मनावर कुणी घेत नाही  ll*

*वेदनांना कुशीत घेऊन*
*ओठ शिउन ' तो ' पडून राहतो*
*सर्वांच्या सुखासाठी*
*एकतारी भजन गातो  ll*

*बायको आणि मुलांनी*
*या संताला समजून घ्यावं*
*फार काही नकोय त्याला*
*दोन थेंब सुख द्यावं    ll*

*मग बघा लढण्यासाठी*
*त्याला किती बळ येतं*
*नवऱ्याचं मोठेपण हे*
*किती जणांच्या लक्षात येतं ? ll*
🌺🌺👏🌸🌸

बुधवार, १८ मे, २०१६

फौजी

फौज में मौज है;
हजार रूपये रोज है;
थोड़ा सा गम है;
इसके लिए भी रम है;
ज़िंदगी थोड़ी रिस्की है;
इसके लिए तो व्हिस्की है;
खानें के बाद फ्रुट है;
मरनें के बाद सैलूट है;
पहनने के लिए ड्रैस है;
ड्रैस में जरूरी प्रेस है;
सुवह-सुबह पी.टी है;
वॉर्निग के लिए सीटी है;
चलने के लिए रूट है;
पहनने के लिए D.M.S बूट है;
खाने के लिए रिफ्रैशमेंन्ट है;
गलती करो तो पनिशमेंट है;
जीते-जी टेंशन है;
मरने के बाद पेंशन है।

फौजी म्हणजे………

फौजी म्हणजे फीरता वारा
फौजी म्हणजे वाहता झरा।
फौजी म्हणजे रात्री एकटाच
अंधारात चमकनारा तारा।।

      फौजी अंगावरील शहारा
      फौजी रात्रीचा पहारा।
       फक्त फौजीच आहे
       सुख अन दु:खाचा सहारा।।

फौजी जन हिताचा नारा
फौजी आहे अनमोल हिरा।
फौजी म्हणजे गुन्हेगारांचा
एक बापच आहे दुसरा।।

       फौजी म्हणजे धाक दरारा
       त्याचाच आहे वचक सारा।
       काहीही करु शकतो पोलीस
       जर असेल तो नितीनं खरा।।

फौजीवर प्रेम करुन पहा

एकदा तरी फौजीवर
प्रेम करुन पहा।
मनापासुन त्याच्यावर
तुम्ही मरुन पहा।।

         जीवाला जीव देईल तुमच्या
         त्याचा हात धरुन पहा।
         त्याचं नाव काळजावर
         एकदातरी कोरुन पहा।।

कसा जगतो एकटा
तुम्ही चोरुन पहा।
प्रेमाचे दोन शब्द
त्याच्याशी बोलून पहा।।

          त्याच्या सारख्या यातना
         एकदा तरी सोसुन पहा।
          अनोळखी जगात तुम्ही
           एकटे बसुन पहा।।

दु:ख असुन मनात
तुम्ही हसुन पहा।
त्याच्या सारखे तुम्ही
ऊन्हात ऊभे राहुन पहा।।

         एकदा तरी फौजीवर
          प्रेम करुन पहा।
          तो रोज मरतो तुम्ही
          एकदातरी मरुन पहा।।

लेकरासाठी झुरतो तो
तसं भेटीसाठी झुरुन पहा।
तुम्हाला काय वाटतं तुम्ही
फौजीच्या यातना सोसुन पहा।।

         एकदा तरी फौजीवर
          तुम्ही प्रेम करुन पहा………

सोमवार, ९ मे, २०१६

लग्न म्हणजे काय असतं...!

लग्न म्हणजे काय असतं...!

तो कितीही वेंधळा असला तरी
त्याला सांभाळून घ्यायचं असतं...!!
तिने कसाही स्वयंपाक केला तरी
त्याला "मस्त" म्हणायचं असतं...!

लग्न म्हणजे काय असतं...!
क्रिकेटमध्ये कितीही interest नसला तरी
त्याच्यासाठी ते enjoy करायचं असतं...!!
तुळशीबागेत जायचा कंटाळा आला असला तरी तिच्यासोबत आनंदाने जायचं असतं...!!!

लग्न म्हणजे काय असतं...!
तो कितीही "म्हातारा" झाला तरी
त्याला चिरतरूण भासवायचं असतं...!!
"मी जाड झालेय का...?"
या वाक्याला कधीही "हो" म्हणायचं नसतं...!!!

लग्न म्हणजे काय असतं...?
दोन्ही घरच्या नात्यांना
आपुलकीने जपायचं असतं...!
वेळप्रसंगी आपल्या इच्छांना
हसत हसत विसरायचं असतं...!!
थोडक्यात काय...???
लग्न लग्न म्हणजे काय असतं...???

छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये केलेलं compromise असतं...!
कारण "we will grow old together"
असं एकमेकाला केलेलं promise असतं...!!

लग्न हे सुद्धा अंदाजावर जन्म घेणारेच नाते असते...!
तिथली आकडेवारी ही चुकायचीच...!!
पण आपला साथीदार हा इतकाही वाईट नाही हे जितक्या कमी वेळात जाणून घ्याल, तितक्या जास्त वेळाचा सुखाचा संसार पुढे आपली वाट पाहत असतो....!!!!!!

शब्दांच्या चकमकीत नाती मारली जातात...!
शब्दांची ओंजळ बनवा...!
थोडंसं गळेल पण तुटणं टळेल...!!
लग्नानंतर खरंतर आपल्या जोडीदाराला मिठीत ठेवण्यासाठी धडपड व्हायला हवी,
पण इथे 'मिठीत' नाही तर 'मुठीत' ठेवण्यासाठी धडपड चालू असते...!!!

संसार हे मुठीचे नाही तर मिठीचे प्रकरण आहे हे ज्यांना कळले,
ते संसारात जिंकतात...!
नाती मुठीत घुसमटतात, मिठीत फुलतात...!!

रविवार, ८ मे, २०१६

आई

�� *आई* ��

आई, तू आहेस म्हणूनचं माझ्या
अस्तित्वाचं इथे नांदणं
आहेसंस्कारांच्या असंख्य चांदण्यांनी
हृदयाच्या आभाळभर गोंदणं आहे

आई, तुझ्या रागवण्यातही
अनूभवलाय वेगळाच गोडवा
तुझ्या मायेच्या नित्य नव्या सणात
फिका पडतो दसरा नि पाडवा

आठवतं तापाने फणफणायचो तेव्हां
तू रात्रभर कपाळावर घड्या घालायचीस
सर्वत्र दिवे मिणमिणू लागायचे, तरी
तुझ्या डोळ्यातली ज्योत एकटीच लढायची

एकदा जरासं कुठे खरचटलो
आई, किती तू कळवळली होतीस
एक धपाटा घालून पाठीत
जखमेवर फुंकर घातली होतीस

जखम ती पुर्ण बुजली आता
हरवून गेली त्यावरची खपली
तो धपाटा, ती फुंकर, ती माया
ती हरेक आठवण मनात जपली

आई, किती ते तुझं निस्वा:र्थ
प्रेमहृद्याच्या किती कप्प्यात साठवू
मी कितींदा नव्या हृदयाचा
संदेश देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू

मी आई, हजार जन्म घेतले तरी
एका जन्माचे ऋण फिटणार नाही
आई, लाख चुका होतील मज कडून
तुझं समजावनं मिटणार नाही

आई, करोडोंमध्ये जरी हरवलो
तरी तू मला शोधून काढशील
आई, तुला एकदाच हाक दिली
तरी अब्जांनी धावून येशील.

*मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा*

����������

बुधवार, ४ मे, २०१६

आई

आई म्हणायची 'श्री' लिहावे
नव्या पानावरती,
वापरावी नवी वस्तू,
कुंकू लावल्या वरती.

आई म्हणायची संध्याकाळची,
झोपी जातात झाडे,
अजून फुलं तोडायला हात,
होत नाहीत पुढे.

आई म्हणायची मिळतेच यश,
तुम्ही करत रहा काम,
भीती वाटली कि फक्त म्हणावे,
राम,राम,राम.

आई म्हणायची काहीही असो,
होतो सत्याचाच जय,
अजूनही वाटत नाही,
खरं बोलायचं भय.

आई म्हणायची ठेवा श्रद्धा
आपल्या प्रयत्नात,
चुकूनही दाखवू नका
ज्योतिष्याला हात.

आई म्हणायची निर्मळ मन तर
राहतो चेहरा साफ,
उपयोग नाही लाऊन काकडी
अन घेऊन सारखी वाफ.

आई म्हणायची राष्ट्रध्वजाचा
राखावा नेहमी मान,
जन गण मन म्हणतांना असावी
ताठ आपली मान.

आई म्हणायची अन्नावर कधी
काढू नये राग,
लावायची कोणाला लागली लाथ तर,
पाया पडायला भाग.

दूध ऊतू गेल्यावर चुकचुकू नये
म्हणावं 'कृष्णार्पण अस्तु',
वाईट शब्द आणू नयेओठांवर,
वास्तू म्हणत असते तथास्तु.

आई म्हणायची पहाटेची
स्वप्न होतात खरी,
आई म्हणायची दिवा लावा,
सांजेला लक्ष्मी येते घरी.

आई म्हणायची खाऊन माजावं
पण टाकू नये ताटात,
अजूनही मी संपवते सगळं,
जरी आता सगळं माझ्या हातात!

आई म्हणायची येतेच झोप
जर मनात नसेल पाप,
जड व्हायच्या पापण्या अन
मिटायचे डोळे आपोआप.

अजूनही वाटतं बसलाय देव
घेऊन पाप पुण्याचा घडा,
आई सांगते तसं लक्ष ठेऊन
टाकतोय त्यात खडा.

जेव्हा जेव्हा व्हायची भांडणं
आम्हा भावंडात,
आई म्हणायची अरे एक तीळ
वाटून खायचे सात.

आई म्हणायची,......,आई म्हणायची
��मरण यातना सोसताना
आई जन्म देत असते
आपलं हसू पहात पहात
वेदना विसरून हसत असते.

बाबा मात्र हसत हसत
दिवस रात्र झटत असतो
शिस्त लावत आपल्यामधला
हिरवा अंकुर जपत असतो.

त्याला कसलंच भान नसत
फक्त कष्ट करत असतो
चिमटा घेत पोटाला
बॅकेत पैसा भरत असतो.

तुमचा शब्द तो कधी
खाली पडू देत नाही
तुमची हौस भागवताना
पैशाकड पहात नाही.

तुम्ही म्हणजे त्याची स्वप्नं
तुम्ही म्हणजे त्याचा आभाळ
तुमच्यासाठी गिळत असतो
नामुष्कीची अवघी लाळ.

तुम्ही जेव्हा मान टाकता
तेव्हा बाबा खचत असतो
आधार देता देता तरी
मान मारून हसत असतो.

तुमच्याकडनं तसं त्याला
खरंच काही नको असतं
तुमचा यश पाहून त्याचं
अवघं पोट भरत असतं.

त्याच्या वेदना कुणालाही
कध्धीसुद्धा दिसत नाही
जग म्हणत, “ आई एवढ
बाबा कधी सोसत नाही.”

त्याच्या वेदना आपल्याला
तशा कधीच कळणार नाहीत
आज त्याला मागितल्या तर
मुळी सुद्धा मिळणार नाहीत.

एक दिवस तुम्हीसुद्धा
कधीतरी बाबा व्हाल
त्या बाळाच्या डोळ्यात तुमच्या
स्वप्नांचं आभाळ पहाल

तेव्हा म्हणाल, “ आपलं बाबा
खरंच कधी चुकत नव्हता
आपल्यासाठीच आयुष्यभर
रक्तसुद्धा ओकत होता.”

तेव्हा सांगतो मित्रांनो
फक्त फक्त एक करा
थरथरणारा हात त्यांचा
तुमच्या हातात घट्ट धरा.

आपल्या आई-वडिलांवर
खरोखर प्रेम करा..��������������

गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०१६

षंढ मी षंढ तू..

षंढ मी षंढ तू...
अन षंढ आपण सारे.
खुशाल आम्ही ऐकून घेतो
देशविरोधी नारे !
जीवावरति उदार होऊन
लढतो शूर जवान.
काळी माती कसून पिकवितो
धान्य गरीब किसान !
सीमेवरती शहिद होणारे
अश्रू नाही ढाळत.
कर्जबाजारी शेतकरी सुद्धा
देशविरोधी नाही बोलत ?
१० वी १२ वी पास वेडे
सीमेचे रक्षण करती.
पीएचडी करणारी तरणी पोर
गरळ विखारी उगळती !
कुणी मागतो आरक्षण
अन कुणी मागतो आझादी.
हिंदुस्तानात राहून सुद्धा...
स्वप्न हिंदुस्तानाची बरबादी !
वर्षश्राद्ध अफजलगुरुच
अन घोषणा पाकिस्तान जिंदाबाद.
काश्मीर, बंगाल अन केरळ का
होऊ पाहतय आता आझाद ?
भविष्य घडविण्या देशाचे
कर भरते जनता भोळी.
अनुदानावर चालणारी विद्यापीठ
मग का घडवतात अतिरेक्यांची टोळी ?
कुणा दिसते असहिष्णुता
कुणा जावस वाटत देश सोडून.
कसे झाले मग हे सुप्पर स्टार ?
सांगा एकदा गळा काढून !
कुणी परत दिले पुरस्कार
अन परत केला तो सन्मान.
साहित्यीकारांना आत्ताच कशी
जाग आली करण्या देशाचा अपमान ?
गोहत्या बंदीच
राजकारण कस दाटल..
हैद्राबाद साठी पहा
दलित राजकारण पेटल ?
गोर गरीबांचा न्याय कसा
तारखांवर तारखा घेतो.
याकुबसाठी मात्र आम्ही
मध्यरात्री न्यायालय उघडतो ?
इशरत साठी काही पक्ष
बिनधास्त पुरवितात पैसे !!
घोटाळेबाज आमुचे नेते
निवूडून येतात कैसे ?
शहीद होती पवनकुमार,
महाजन, महाडिक, अन हनुमंतप्पा.
४ दिवस चर्चिल्या जाती
देशप्रेमाच्या ढोबळ गप्पा !
मिडिया करते समर्थन
अन राजकारणी करतात पाठराखण.
देशप्रेम कस निर्मिणार आपण ?..
जिथ शेतपिक खातंय कुंपण !!
मतदान करून अभिमानाने
आम्ही करतो वर हात.
सरकार च्या माथी खापर फोडून
विकासाची मारतो बात.
अहो एकटा मोदी काय करील ?
आपण बसतो थंड !
कुठेही काहीही वाच्यता नाही
जेव्हा देशाविरुद्ध घडतंय बंड !
अफजल, कसाब, अन याकुब ठरतात
आयडॉल जेंव्हा त्यांचे.
सियाचीन,काश्मीर,लडाख सीमेवर
का जवान शहीद ते आमचे ?
याकुब साठी लिहिली जातात
राष्ट्रपतींना पत्र.
किती दिवस हे चालू राहील
आतंकवादाच सत्र ?
आपण का मग झोपून आहोत ?
वाट कशाची पाहतोय ?
देशद्रोह्यांना मोकाट सोडून
न्यायासाठी का रडतोय ?
व्हाटस अप, फेसबुक, इंटरनेट
वापरणारी हुश्शार आमची पिढी.
नाक्यावरती विषय चघळून
ओढत बसलोय बिडी.!
गर्लफ्रेंड ,जॉब, बियर,
विस्की, कार, आणि डिस्को
यातच आम्ही अडकून पडलोय
फिकर साला किसको ?
जवानांनी मात्र लढत राहव
आम्ही आहोत घरात सुखरूप.
हि तर विद्रोहाची नांदी आहे..
ज्याच पुढल भविष्य कुरूप !!
हिंदुस्तानाच्या अखंडतेला
आव्हान त्यांनी दिलंय.
उठा मर्दहो..आहे का कोणी
ज्यांन खऱ्या मायचं दुध पिलंय ?
आपण काय करणार आपण
लाचार कुटुंबाची आहे जबाबदारी
काही नाही तर निवेदन-पत्राद्वारे
भावना पोचवा सरकार दरबारी !!
मंदिरांवर घण बसले
महाराष्ट्र अस्मिता नंगी नाचवली अन नासवली
निर्मिण्या हिंदवी स्वराज्य
जिजाऊ मातेची कुस होती उजवली!
तोच शिवाजी म्हणे आजही
आमुच्या रक्तात सळसळतो.
देशाचा अपमान सहन करून
मग आम्ही दूर असे का पळतो ?
आफ्झुल्याचा कोतळा काढला
शाहिस्त्याची छाटली बोट
राजा अमुचा आम्ही विसरलो ..
सार सार वाटतय आता खोट!
थाटा माटात शिवजयंती करून
मराठी असल्याचा करतोय माज.
हीच काय शिकवण शिवरायांची ?...
राखुया थोडीतरी लाज !
कविता असली वाचून
रक्त झाल आमुच गरम.
४ दिवस गरम राहील
५ व्या दिवशी पडणार आम्ही नरम.!
देशद्रोही विचारांनी
पुकारलय आता बंड.
आम्ही मात्र असेच पडून
राहू खुशाल थंड !!
उत्तर याच एकाच मित्रा
मी षंढ तू षंढ..
अन आपण सारेच षंढ

सोमवार, २१ डिसेंबर, २०१५

व्यसन

खाऊनिया तंबाखू मारीतो शान।
करितो इकडचा तिकडचा परिसर घाण। 
सोडून दे तंबाखू होईल तुझा सन्मान।
ओढूनीया सिगारेट काढीतो धुर।
म्हणे माझ्यासारखा नाही कोणी शुर।
असेल तुमच्यात दम तर काढा नाकातुन धूर।
खाऊनीया गुटखा।
देतो मानेला झटका।
सोडून दे हा नाद लटका।
नाहीतर बसेल आरोग्याला फटका।
पेउनिया बिअर।
म्हणतो विस यु happy new year।
सोडून दे बिअर कशाला टाकतो आयुष्याचा  rivers gear।
तुका म्हणे जो व्यसनी रंगला।
त्याचा संसार लवकरच भंगला।
     

ही कविता सर्वांना पाठवा

कविता

ऐ उम्र !
कुछ कहा मैंने,
पर शायद तूने सुना नहीँ..
तू छीन सकती है बचपन मेरा,
पर बचपना नहीं..!!

हर बात का कोई जवाब नही होता
हर इश्क का नाम खराब नही होता...
यु तो झूम लेते है नशेमें पीनेवाले
मगर हर नशे का नाम शराब नही होता...

खामोश चेहरे पर हजारों पहरे होते है
हंसती आखों में भी जख्म गहरे होते है
जिनसे अक्सर रुठ जाते है हम,
असल में उनसे ही रिश्ते गहरे होते है..

किसी ने खुदासे दुआ मांगी
दुआ में अपनी मौत मांगी,
खुदा ने कहा, मौत तो तुझे दे दु मगर,
उसे क्या कहु जिसने तेरी जिंदगी की दुअा मांगी...

हर इंन्सान का दिल बुरा नही होता
हर एक इन्सान बुरा नही होता
बुझ जाते है दीये कभी तेल की कमी से....
हर बार कुसुर हवा का नही होता !!!

   -  गुलझार

शनिवार, १२ डिसेंबर, २०१५

दर पार्टीच्या शेवटी एक क्वार्टर कमीच पडते

|| Kavita ||

दर पार्टीच्या शेवटी एक क्वार्टर कमीच पडते !

*दरपार्टीच्याशेवटी*

*एक क्वार्टरकमी पडते**
**
दारु काय गोष्ट आहे**
**मला अजुन कळली नाही**
**कारण प्रत्येक पिणारा म्हणतो**
**मला काहीच चढली नाही*

*
**सर्व सुरळीत सुरु असताना**
**लास्ट पेग पाशी गाडी अडते**
**
**आणि दर पार्टीच्या शेवटी**
**एक क्वार्टर कमी पडते*...

*
**पिण्याचा प्रोग्राम म्हणजे जणु**
**विचारवंतांची गोलमेज परीषदच भरते**
**रात्री दिलेला शब्द प्रत्येक व्यक्ती**
**सकाळच्या आत विसरते*

*
**मी इतकीच घेणार असा**
**प्रत्येकाचा ठरलेला कोटा असतो**
**पेग बनवणारा त्यदिवशी**
**जग बनवणार्‍यापेक्षा मोठा असतो*

*
**स्वताच्या स्वार्थासाठी**
**प्यायच्या आग्रहाची फेरी घडते**
**
आणि दर पार्टीच्या शेवटी**
**एक क्वार्टर कमी पडते*...

*
**पिण्याचाकार्यक्रम म्हणजे पिणार्‍याला** **दरवेळेस नवीन पर्व असते** **लोकांना अकँडेमीक्सपेक्षा* *पिण्याच्या क्षमतेवर श्रद्धा असते*

*
**आपण हीच घेतो म्हणत**
**ऐकमेकाचे ब्रँडप्रेम जागवतात**
**वेळ आली आणि पैसा नसला की**
**देशीवरही तहान् भागवतात*

*
**शेवटी काय
दारु दारु असते**
**कोणतीही चढते**...
**
**पण दर पार्टीच्या शेवटी**
**एक क्वार्टर कमी पडते**
**
**पिणार्‍यामध्ये प्रेम हा**
**चर्चेचा पहिला विषय आहे**
**देवदासचे खरे प्रेम**'**पारो की दारु**'
**याचा मला अजून संशय आहे*

*
**प्रत्येक पेग मागे तीची**
**आठवण दडली असते**
**हा बाटलीत बुडला असतो**
**ती चांगल्या घरी पडली असते*

*
**तीच्या आठवणीत थर्टीची लेवल**
**लगेच सिक्स्टीला भिडते**...
**
आणि दर पार्टीच्या शेवटी**
**एक क्वार्टर कमी पडते**!
**

**चुकून कधीतरी गंभीर विषयावरही**
**चर्चा चालतात**
**सगळे जण मग त्यावर**
P.HD.**केल्यासारखे बोलतात*

*
**प्रत्येकाला वाटते की त्यालाच**
**यामधले जास्त कळते**
**ग्लोबल वार्मिंगची चर्चा**
**गावच्या पोटनिवडणूकीकडे वळते*

*
**जसा मुद्दा बदलतो**
**तशी आवाजाची पातळी वाढते**
**
आणि दर पार्टीच्या शेवटी**
**एक क्वार्टर कमी पडते**!*
*
**फेकणे**,**मोठेपणा दाखवणे याबाबतीत्**
**यांच्यासारखा हात नाही**
**ऐरवी सिंगल समोसा खाणारा**
**गोष्टीत पीझ्झाशीवाय् खात नाही*

*
**पैशे पैशे काय आहे ते फक्त**
**खर्च करण्यासाठीच असतात**
**पेगजवळ झालेली अशी गणिते**
**सकाळी चहाच्या कटींगपाशी फसतात*

*
**रात्री थोडी जास्त झाली**
**की मग त्याला कळते**
**
पण दर पार्टीच्या शेवटी**
**एक क्वार्टर कमी पडते**!**
**
**यांच्यामते मद्यपान हा**
**आयुष्याचा महत्वाचा पार्ट आहे**
**बीयर पिण्यामागे सायन्स**
**तर देशी पिण्यामागे आर्ट आहे*

*
**यामुळे धीर येतो**,**ताकद येते**
**यात वेगळीच मजा असते**
**आयुष्यभराची मवाळ व्यक्ती**
**त्या क्षणी राजा असते*

*दारुमुळे आपल्याला घराच्या**
**चिवड्याचे महत्व कळते**...
**
परंतु दर पार्टीच्या शेवटी**
**एक क्वार्टर कमी पडते !!!* cherrsssssss

गुरुवार, १० डिसेंबर, २०१५

आई म्हणायची

कोरी पाटी...

लहान मुलांचं मन ,
म्हणजे कोरी पाटी,
आईच्या हातात खडू,
त्यावर लिहिण्यासाठी.

आई म्हणायची 'श्री' लिहावे
नव्या पानावरती,
वापरावी नवी वस्तू,
कुंकू लावल्या वरती.

आई म्हणायची संध्याकाळची, झोपी जातात झाडे,
अजून फुलं तोडायला हात,
होत नाहीत पुढे.

आई म्हणायची मिळतेच यश,
तुम्ही करत रहा काम,
भीती वाटली कि फक्त म्हणावे,
राम,राम,राम.

आई म्हणायची काहीही असो,
होतो सत्याचाच जय,
अजूनही वाटत नाही,
खरं बोलायचं भय.

आई म्हणायची ठेवा श्रद्धा
आपल्या प्रयत्नात,
चुकूनही दाखवू नका
ज्योतिष्याला हात.

आई म्हणायची निर्मळ मन तर
राहतो चेहरा साफ,
उपयोग नाही लाऊन काकडी
अन घेऊन सारखी वाफ.

आई म्हणायची राष्ट्रध्वजाचा
राखावा नेहमी मान,
जन गण मन म्हणतांना असावी
ताठ आपली मान.

आई म्हणायची अन्नावर कधी
काढू नये राग,
लावायची कोणाला लागली लाथ तर,
पाया पडायला भाग.

दूध ऊतू गेल्यावर चुकचुकू नये
म्हणावं 'कृष्णार्पण अस्तु',
वाईट शब्द आणू नयेओठांवर,
वास्तू म्हणत असते तथास्तु.

आई म्हणायची पहाटेची
स्वप्न होतात खरी,
आई म्हणायची दिवा लावा,
सांजेला लक्ष्मी येते घरी.

आई म्हणायची खाऊन माजावं
पण टाकू नये ताटात,
अजूनही मी संपवते सगळं,
जरी आता सगळं माझ्या हातात!

आई म्हणायची येतेच झोप
जर मनात नसेल पाप,
जड व्हायच्या पापण्या अन
मिटायचे डोळे आपोआप.

अजूनही वाटतं बसलाय देव
घेऊन पाप पुण्याचा घडा,
आई सांगते तसं लक्ष ठेऊन
टाकतोय त्यात खडा.

जेव्हा जेव्हा व्हायची भांडणं
आम्हा भावंडात,
आई म्हणायची अरे एक तीळ वाटून खायचे सात.

आई घालायची वाट पाहतांना
कोपऱ्यात पालथा पेला,
एव्हढा भाबडा विश्वास  हिने
कुठून पैदा केला?

आई म्हणायची,......,आई म्हणायची,
आता खडू माझ्या हाती,
होता येईल का मला
असं माझ्या चिमण्यासाठी??

शनिवार, ५ डिसेंबर, २०१५

छे ती कुठे माझी मुलगी


छे ती कुठे
माझी मुलगी
ती तर आहे
श्वास माझा
उद्या मनांवर
राज्य करेल
स्वप्नं नाही
विश्वास माझा...
वडील होण्या इतपत जगात
कोणताच प्रचंड आनंद नाही
नि कन्या झाली तर कोणतचं सुख
त्याहून बेधुंद नाही...
.
मुठ आवळून तू बोट धरतेस
तो हरेक क्षण माझा खास होतो
तुझ्या इवल्या इवल्याश्या मुठीत
मला जग जिंकल्याचा भास होतो...
.
माझ्या गाण्यापेक्षा बेडकाचं
किंचाळणं जरी मधूर आहे
माझ्या अंगाईने झोपतं पिल्लू माझं
हे समाधान भरपूर आहे...
.
असावं लागतं पुण्यवान,
नि त्याही पेक्षा खूप भाग्यवान
ज्या पित्याचे हात उरकती
सर्वात श्रेष्ठ कार्य कन्यादान...
.
मुला-मुलीत भेदभावाचा
तो प्रश्नच मी उगारत नाही
वडीलांचं मुलीवर प्रेम जास्त
हे सत्यही मी झुगारत नाही...
.
संसारात रमण्या पेक्षा मी
मुलीच्या भातुकलीच्या खेळात रमतो
भावनांच्या खेळात आई नंतर
मुलीचाच तर क्रम येतो...
.
बाबा म्हणत माझ्या मुलीचे
जसे नाजूक ओठ हलू लागतात
समाधानाची इवली इवली फुलं
ह्या निवडुंगाच्या देहावर फुलू लागतात...
.
तू सुखी राहावीस
देवाकडे एवढचं मागणं आहे
म्हणूनच तुझ्या भविष्यासाठी
दिवसरात्र झिजणं, जागणं आहे...
.
आनंदाचे अगणित क्षण तिच्या
नाजूक हास्यात दडले आहेत
तिला कायम हसतं ठेवण्यासाठी
मलाही प्रयत्नांचे वेड जडले आहे...
.
भाग्य ज्याला म्हणतात ते
माझ्या मुलीतच सापडलं आहे
माझ्या ग्रहांचे मन कदाचित
तिच्याच पायांशी अडलं आहे...
.
मुलगी सासरी जाण्याचा क्षण
वडीलांसाठी मोठी अग्नीपरीक्षा असते
स्वतःच्या काळजा पासून दुरावणं
जगातली सर्वात मोठी शिक्षा असते...
.
आभाळा एवढं सुख काय ते
मुलगी झाल्यावर कळतं
एक वेगळच आपलेपण
तिचं प्रत्येक हास्य उधळतं...
.
इतरांचे नशीब घेऊन येतात
त्या बाबतीत मुली माहीर आहेत
मुलगी म्हणजे धनाची पेटी
हे सत्यही तसं जग जाहीर आहे...
.
मुलींचे एक छान असतं
मुलगी असण्याचा अभिमान असतो
त्यांचा अभिमान वडीलांसाठी
मान, शान व सन्मान असतो...
.
छे ती कुठे माझी मुलगी
ती तर आहे श्वास माझा
उद्या मनांवर राज्य केरल
स्वप्नं नाही विश्वास माझा...
DEDICATED TO ALL FATHERS & THEIR BELOVED DAUGHTERS..

शुक्रवार, ४ डिसेंबर, २०१५

अहिराणी कविता

कोणा हिस्सामा तुप ऊन ,
ते कोणा हिस्सामा साय ऊनी !
मी घरमा बठ्ठास्थीन धाकला व्हतु ,
मना हिस्सामा माय ऊनी !
.
.
दोन्ही भाऊ पैसाना भुक्या ,
त्यासना हातमा पैसा ऊना
मी व्हतु प्रेमना भुक्या ,
मना डोकावर मायना हात ऊना !
.
कोणा ताटमा मटण पुलाव ,
ते कोणा ताटमा दाय ऊनी !
मी घरमा बठ्ठास्थुन धाकला व्हतु ,
मना हिस्सामा माय ऊनी !
.
.
बाप जाताज भाऊस्ना मनमा वाटा घुसना !
आयी देखीनी जणु मायना कलेजामा काटा घुसना !
.
कोले खेत सम्मद बैल ऊनात ,
ते कोले दुध-दुभती गाय ऊनी !
मी घरमा बठ्ठस्थुन धाकला व्हतु,
मना हिस्साले माय ऊनी !
.
.
वावरमा दिनरात बाप राबना !
तवय यास्ले घरन छप्पर लाभन !
माले मनी मनी माय भेटनी ,
माले मायना पदर लाभना !
.
जेवढ लिखता ऊन तेवढ लिख!
मी घरमा बठ्ठास्थुन धाकला व्हतु ,
मना हिस्सामा माय ऊनी !