Motivational लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Motivational लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ३१ मे, २०१६

एका वडिलांचं मुलाला पत्र

|| एका वडिलांचं मुलाला पत्र ||

बघ, वाच, ठरव !
       माझ्या लाडक्या मुला.
मी हे असं तुला पत्र लिहितोय,
त्याची कारणं तीन. -
1) जगणं, नशीब आणि अपघात या तीन गोष्टी कधी घडतील-बिघडतील सांगता येत नाही. सगळंच अत्यर्र्क्य आपण अमुक इतके दिवस जगू हे कुणी सांगू नाही शकत. त्यामुळे काही गोष्टी वेळेवर बोललेल्या ब-या.
2) मी बाप आहे तुझा, मी तुला जे सांगेन ते इतर कुणी कदाचित कधीच नाही सांगणार.
3) मी माझ्या आयुष्यात ज्या चुका केल्या त्या तुला टाळता आल्या तर तुझे कष्ट, जिवाचे चटके आणि मनाचा त्रास बराच कमी होईल, म्हणून काही गोष्टी तुला सांगतोय.
वाचून ठरव, जमल्यास लक्षात ठेव,
आयुष्यभर!

* माणसांविषयी मनात आकस ठेवू नको, कुणाचा द्वेष करू नकोस. तुझ्याशी कायम चांगलंच वागलं पाहिजे अशी इतर लोकांवर काही आपण सक्ती नाही करू शकत. त्यामुळे ते असंच का वागतात असं म्हणून तणतणू नको. तुझ्याशी कायम चांगलं वागण्याची जबाबदारी फक्त माझी आणि तुझ्या आईचीच आहे.

तेव्हा जी माणसं तुझ्याशी चांगलं वागतात, त्यांच्याशी चांगलं वाग. पण हे कायम लक्षात ठेव की प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट कुठल्या ना कुठल्या हेतूपोटी करतो. त्यामुळे जी माणसं गोड बोलतात, तुझ्याशी कायम चांगलीच वागतात त्यांना तू खरंच आवडतो असं काही नसेलही. जरा माणसं तपासून बघ, पटकन मित्र बनवून पूर्ण विश्वास टाकण्याची घाई करू नकोस.

* जगणं कशानंच कुणामुळेच थांबत नाही. त्यामुळे माणसं तुला सोडून जातील. नाकारतील, झिडकारतील किंवा ज्यांच्यावर तू जीव तोडून प्रेम केलंस तेच तुझ्या आयुष्यातून निघून जातील. तेव्हा हेच कायम लक्षात ठेव की, कुठल्याही माणसामुळे आपलं जगणं थांबत नाही. कधीच नाही.

* आयुष्य फार छोटं आहे. आणि तीच तुझी खरी पुंजी आहे. त्यामुळे आज वाया घालवलास तर उद्या कदाचित जगणंच तुला सोडून जाईल. त्यापेक्षा आज मनापासून, भरभरून जग. आनंदी राहा.

* प्रेम ही एक क्षणिक आणि चंचल भावना आहे. ती काळाप्रमाणे आणि मूडप्रमाणोही बदलते. ज्यांच्यावर तू जिवापाड प्रेम करतोस तेच समजा तुला सोडून गेले तर जरा धीर धर. काळाच्या मलमानं या जखमाही भरून निघतील. प्रेमात पडलास म्हणजे तेच सगळ्यात सुंदर आणि अतीव चांगलं असं समजू नकोस आणि प्रेमभंग झाला म्हणून त्या दु:खालाही जास्त कवटाळून बसू नकोस.

* अनेक यशस्वी माणसांनी शिक्षण अर्धवट सोडलं, तरी ते यशस्वी झाले अशा कहाण्या तू वाचल्या असशीलच! पण याचा अर्थ असा नाही की, एक शिक्षण सोडलं की तूही यशस्वी होशील. नॉलेज, ज्ञान हे एक शस्त्र आहे हे लक्षात ठेव. शून्यातून स्वर्ग निर्माण करता येतो हे खरंय, पण कुठल्या तरी शून्यापासून आधी सुरुवात तर करायला लागतेच ना!

* माझी अपेक्षाच नाही की मी म्हातारा झाल्यावर तू मला सांभाळावंसं. मीही तुला जन्मभर पोसणार नाहीच. तू स्वत:च्या पायावर उभा राहू शकशील तोर्पयत तुला सपोर्ट करणं ही माझी जबाबदारी. त्यानंतर तुला बसमधून फिरायचं की लिमोझीनमधून, गरीबच राहायचं की श्रीमंत व्हायचं हा निर्णय तुझा तू घ्यायचास.

* आणखी एक, मीही अनेकदा लॉटरीचं तिकीट काढलं, ते कधीच लागलं नाही. एका रात्रीत श्रीमंत होता येत नाही. श्रीमंत व्हायचं तर मेहनत करावीच लागते. जगात फुकट कधीच काहीच मिळत नाही.

- तूझे वडील

मंगळवार, १७ मे, २०१६

मैत्री तुटायला कधी सुरुवात होते..??

नक्कीच वाचा..
मैत्री तुटायला कधी सुरुवात होते..??

1) आपण मैत्री मध्ये व्यवहार आणतो तेव्हा..

2) मैत्रीमध्ये आपण खूप अपेक्षा ठेवायला सुरुवात करतो तेव्हा..

3) आपण मित्राला गृहीत धरायला सुरुवात करतो तेव्हा..

4) मैत्रीमध्ये आपणच कसे प्रामाणिक आहोत.. हे समोरच्याला सांगायला लागतो तेव्हा..

5) मित्र असे का वागला हे त्याला न विचारता.. आपणच मित्राच्या तसे वागण्यामागची कारणे शोधायला सुरुवात करतो तेव्हा..

6) आपण कसेही वागलो तरी मित्र आपल्याला समजून घेईल.. असे जेव्हा आपण समजायला लागतो तेव्हा..

7) मित्राने गमतीने बोललेल्या शब्दांचा अर्थ.. आपण आपल्या पद्धतीने घ्यायला सुरुवात करतो तेव्हा..

8) भांडण झाल्यावर पहिला फोन मित्रानेच केला पाहिजे.. असे आपण ठरवतो तेव्हा..

9) मित्र श्रीमंत झाल्यावर.. आपणच आपल्याला त्याच्या समोर गरीब समजायला लागतो तेव्हा..

10) आपला मित्र आता बदलत चालला आहे.. अशी आपली धारणा व्हायला लागते तेव्हा..

11) मित्र बिझी असेल.. त्यालाही त्याच्या अडचणी असतील.. हे आपण विसरायला लागतो तेव्हा..

12) आपल्या मित्राची आपण चार चौघात टर उडवायला सुरुवात करतो तेव्हा..

13) आपण जसा विचार करतो.. तशाच विचाराने मित्राने वागले पाहिजे.. असा दुराग्रह बनतो तेव्हा..

14) आपली चूक असतानाही मित्राने आपलीच बाजू कशी बरोबर आहे.. हे लोकांना सांगायला हवे.. अशी बावळट अपेक्षा आपण करायला लागतो तेव्हा..

15) खिशात पैसे असूनही जेवणाचे बिल भरताना आपला हात आपल्या पाकीटाकडे जात नाही तेव्हा..

16) कुठलातरी निकष लावत आपण आपल्या मित्राची इतरांबरोबर तुलना करायला लागतो तेव्हा..

17) आपले मित्रांशिवाय काही अडत नाही.. हे आपण नकळत मित्राला दर्शवायला लागतो तेव्हा..

18) आपल्या भल्यासाठी मित्राने सांगितलेल्या गोष्टी आपल्याला पकाऊ लेक्चर वाटायला लागते तेव्हा..

19) मित्र online दिसतोय पण आपल्या message ला reply देत नाही.. याचा अर्थ तो आपल्याला ignore करतोय.. असला सडका विचार आपल्या मनात येतो तेव्हा..

खरं तर कुठलीही मैत्री कधी तुटत नसते.. तर त्या मैत्रीमधील मित्र एकमेकांपासून तुटत असतात.. असे असेल.. तसे झाले असेल.. असे काल्पनिक विचार करीत आपण मैत्रीत संशयाचे वादळ निर्माण करीत असतो.. मित्र एकमेकांपासून तुटले तरी त्यांच्यातील मैत्री दोघांच्याही मनात जिवंत असते.. पण कुठेतरी गैरसमज, अहंकार असल्या फालतू गोष्टीमुळे ती मैत्री मनातल्या मनात दडपून जाते.. चांगली मैत्री बनायला अनेक काळ जावा लागतो.. पण मैत्रीमधील धागे तुटायला एका क्षणाचाही वेळ लागत नाही..

तेव्हा मित्रांनो..!!
तुमच्या मित्राकडून एखादी चूक झाली असेल तर त्याला माफ करा.. आणि तुमच्याकडून कुठली चूक घडली असेल तर मित्राची क्षमा मागायला लाजू नका..!!

सोमवार, १६ मे, २०१६

-बघा तुम्हालाच कसं वाटतंय-

-बघा तुम्हालाच कसं वाटतंय-

रात्रीच्यावेळी सुनसान रस्त्यावर, एखाद्या कुटुंबाची गाडी बंद पडलेली दिसली,
तर थांबून मदतीची चौकशी तरी करून बघा.
मदत पाहिजेच असेल असं नाही,
पण त्यांना थोडा धीर तर निश्चितच वाटेल.

नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय!

भरपूर ‘व्हर्च्युअल’ मित्र, मैत्रीण असण्याचा जमाना आहे हा,
पण कधी एखाद्या खऱ्या मित्राने बरं वाटत नाहीये म्हणल्यावर
त्याला ‘whatsapp’वर मेसेज मध्ये ‘Tc’ म्हणण्यापेक्षा सरळ त्याच्या घरी जाऊन
‘बरा हो लवकर’ म्हणून बघा.
खरं प्रेम तर मित्राचंच असतं ना?

नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय!

हल्ली लग्न समारंभात प्यायच्या पाण्याची सोय एकाच ठिकाणी असते.
तिथे पाणी प्यायला गेलो तर भांडे भरून,
नंतरच्या व्यक्तीला देऊन बघा
तहान तर सगळ्यांनाच लागते ना?

नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय!

नेहमीच्या हॉटेलमध्ये गेल्यावर सकाळच्या चहाची ऑर्डर द्यायच्या आधी वेटरला ‘गुडमॉर्निंग’ म्हणून तर बघा. त्याचा तर दिवस चांगला जाईलच.

नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय!

दिवसभर स्मार्टफोनेला सुट्टी देऊन, आपल्या लहानपणी ऐकलेल्या गोष्टी, शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहान मुलांनाही ऐकवा. पराक्रम तर अजूनही तेवढाच थोर ना?
तुमचीही उजळणी होईल.

नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय!

गाडी चालवताना कुठलीशी वृद्ध व्यक्ती/मुलं रस्ता ओलांडण्यासाठी भांबावून थांबलेली दिसतात,
दरवेळी गाडीतून नाही उतरता येत, पण निदान मागच्या गाड्यांना थांबवून आधी त्यांना रस्ता ‘क्रॉस’ करता येईल,
एवढं तरी करून बघा. रस्ता तर चालणाऱ्याचाही असतो ना?
फारतर १ मिनिट उशीर होईल पोचायला.
नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय!

मुद्दाम हायवेवरच्या एखाद्या टिनपाट टपरीवर, अर्ध्या फळकुटाच्या बाकड्यावर बसून सकाळपासून दहा वेळा उकळ्या आलेला चहा पिऊन वयस्कर चहावाल्याला बघा तर उगाचच सांगून ‘मामा चहा १ नंबर झाला आहे बरंका’
तो मनाशीच हसेल खुळ्यागत!
पण लाजून म्हणेल, ‘पाव्हनं म्होरच्या टायमाला च्यात दुध वाईच वाढवून देतो,
पर नक्की यायाच’!
जाताना त्याला शेकहॅण्ड करा न चुकता.
व्यावसायिक तर तोपण आहे ना?

नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय!

स्वतःच्या जुन्या कॉलेजमध्ये,
त्याच जुन्या मित्रांच्या बरोबर आपल्याच हक्काच्या ‘कट्ट्यावर’पुन्हा एकदा विना मतलब तंगड्या हलवत,
गाणी म्हणत बसून बघा.
एखादी शिट्टी पण मारा दणकून खूप वर्षांनी ..
नव्याने तरुण व्हायला कोणाला नाही आवडणार?

नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय!

आपल्याकडे कामाला असलेल्या माणसांच्या मुलांकरता कधीतरी स्वतःच्या मुलांसोबत एखादे छोटेसे खेळणे देऊन बघा.
पैसे नाही लागत त्याला जास्त ..
पण
नंतर बघा,तुम्हालाच कसं वाटतंय!

ऑफिसच्या केबिनमधे ‘रूम फ्रेशनर’ फसफसून मारण्यापेक्षा आपल्याच बाल्कनीतल्या कुंडीत लावलेले एखादे गुलाबाचे, चाफ्याचे फुल ठेवून बघा कधीतरी टेबलवर.
खरा सुगंध तर तोच ना ?

नंतर सांगा,तुम्हालाच कसं वाटतंय!

‘डोरक्लोजर’वाल्या दरवाजातून बाहेर पडल्यावर मागून येणाऱ्या ‘स्त्री’साठी दरवाजा आवर्जुन उघडा ठेवा,
ती ‘स्त्री’आहे म्हणून नाही,
पण तुम्ही ‘जंटलमन’ आहात म्हणून!

हे सगळं तुम्ही आधीपासूनच करत असाल तर क्या बात है! पण नसाल करत तर नक्कीच करून बघा..
नंतर सांगा,तुम्हाला कसं वाटतंय

बुधवार, ४ मे, २०१६

भिकारी

✍��
        ☄एक आंधळा भिकारी रस्त्यावर एका बाजूला बसलेला.
त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नाही.
तो एवढा दरिद्री आहे की,
त्याला अश्रूदेखील महाग झालेत.
गेली कित्येक वर्षे तो रडलेला नाही.

एक लेखक पूर्णपणे दिवाळं वाजलेला.
खिशात दमडीदेखील नाही आणि फिरायला बाहेर पडतो.

त्याची नजर त्या भिकार्‍याकडे आणि त्याच्या त्या करूण अवस्थेकडे जाते.

त्या भिकार्‍याच्या बाजूला एक पाटी आणि दोन-तीन खडू पडलेले.

हा लेखक त्या भिकार्‍याकडे जातो आणि म्हणतो,
'मित्रा, मी एक लेखक आहे,
ज्याच्याकडे एक 'पै' देखील नाही.
पण माझ्याकडे कला आहे.
माझ्याकडे शब्दांची शक्ती आहे.
ती मी तुला देऊ शकतो.
तुझ्या परवानगीने मी या पाटीवर काही लिहू का?'

'साहेब', भिकारी म्हणतो,
'माझ्याशी कुणी बोलतदेखील नाही.
मी एक गरीब आंधळा भिकारी. तुम्हाला त्या पाटीचं जे ठिक वाटतं ते करा.'

तो लेखक त्या पाटीवर काहीतरी लिहून निघून जातो.

त्या क्षणापासून भिकार्‍याच्या लक्षात येते की,
एकदम जाणार्‍या-येणार्‍यांपैकी प्रत्येकजण त्याच्याजवळ थांबून त्याच्या पुढ्यात पैसे टाकू लागलाय.

थोड्याच वेळात तिथे पैशाची रास जमते.

तो भिकारी बेचैन होतो.
नाण्यांची रास वाढतच जाते.

तो एवढा अस्वस्थ होतो की, पैसे टाकणार्‍यांपैकी एकाचा हात पकडतो आणि म्हणतो, 'साहेब, माफ करा तुमचा हात पकडल्याबद्दल.
मी एक गरीब आंधळा भिकारी आहे.
मला कृपा करुन जर या पाटीवर काय लिहिलंय ते वाचून दाखवलेत तर फार उपकार होतील हो.'

तो माणूस पाटी उचलतो आणि वाचायला लागतो.

'वसंत ऋतू म्हणजे बहरलेली सृष्टी
आणि माझ्या नशिबी हरवलेली दृष्टी.'

भिकार्‍याच्या गालावरुन अश्रू ओघळायला लागतात.

आयुष्य कुणी जास्त जाणलं?

या ओळी लिहिणार्‍या लेखकानं?
त्या ओळी वाचून पैसे टाकणार्‍या लोकांनी?
...कि इतक्या वर्षांनी रडणार्‍या
त्या भिकार्‍यानं?

तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल.

...पण जर तुमची वाणी गोड असेल,
तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल.

माणसाला बोलायला शिकण्यास (किमान) २ वर्ष लागतात.

पण 'काय बोलावे?' हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते.

'ओढ म्हणजे काय?'
हे जीव लावल्याशिवाय कळत नाही.

'प्रेम म्हणजे काय?'
हे स्वतः केल्याशिवाय कळत नाही.

'विरह म्हणजे काय?'
हे प्रेमात पडल्याशिवाय कळत नाही.

'जिंकण म्हणजे काय?'
हे हरल्याशिवाय कळत नाही.

'दुःख म्हणजे काय?'
हे अपेक्षाभंग झाल्याशिवाय कळत नाही.

'सुख म्हणजे काय?'
हे दुसऱ्याच्या हास्यात शोधल्याशिवाय कळत नाही.

'समाधान म्हणजे काय?'
हे आपल्यात शोधल्याशिवाय कळत नाही.

'मैत्री म्हणजे काय?'
हे ती केल्याशिवाय कळत नाही.

'आपली माणसं कोण?'
हे संकटांशिवाय कळत नाही.

'सत्य म्हणजे काय?'
हे डोळे उघडल्याशिवाय कळत नाही.

'उत्तर म्हणजे काय?'
हे प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही.

'जबाबदारी म्हणजे काय?'
हे त्या सांभाळल्याशिवाय कळत नाही.

'काळ म्हणजे काय?'
हे तो निसटून गेल्याशिवाय कळत नाही
��������������������������������

सोमवार, २ मे, २०१६

नवीन संकल्प करा.

✍��
       ☄आजपासून नवीन संकल्प करा.  ते डायरीत लिहून ठेवा. मित्र परिवारात जाहीर करा. वारंवार ते संकल्प आठवा.
        ☄काही संकल्प ---
१) प्रथम स्वतः वर प्रेम करा.
२) वडिलधा-यांना मान द्या.
३) बचत करायला शिका.
४) निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करा.
५) चांगला मित्र परिवार वाढवा.
६) व्यसनांपासून दूर रहा.
७) भक्तीमार्ग अवलंबा.
८) समाजसेवा करा.
९) आपल्या मागे आपली आठवण काढणारी माणसे आहेत, याची सदैव जाणीव ठेवा.
१०) सल्ला घेऊनच प्रत्येक काम करा.
११) आजच्या तरूण पणावरच उद्याचेवृद्धत्व अवलंबून आहे. हे विसरू नका.
१२) मागा म्हणजे मिळेल, आणि शोधा म्हणजे सापडेल. या प्रमाणे वागल्यास पुढेच जाल.
१३) यशोगाथांचे वाचन करा.
१४) नैसर्गिक जीवन जगा.
१५) आयुष्य फार लहान आहे. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या....

☄आदर्श जीवन जगण्यासाठी जरुर वाचा..
1) चूक झाली तर मान्य करा.
2) समोरच्याचे मत विचारात घ्या.
3) चांगल्या कामाची स्तुती करा.
4) आभार मानायला विसरू नका.
5) मी ऐवजी आपण शब्द प्रयोग करा.
6) सतत हसतमुख रहा.
7) दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा.
8) कुणाच्याही व्यंगावर हसु नका.
9) स्वतःची कुवत व ताकद ओळखा.
10) टिका तक्रार यात वेळ घालवु नका.
11) कृती पुर्व विचार करा.
12) लोकांच्या खांद्यावर अपयश लादू नका.
13) क्रोधावर नियंत्रण ठेवा.
14) मैत्री भावना कायम मनी राहु द्या.
15) नेहमी सत्याची कास धरा.
16) इतरांना चांगली वागणूक द्या.
17) सुखाचा गुणाकार व दुखाचा भागाकार करा.
18) विचार करून बोला.
19) प्रेमाचा आदर करा.
��������������������������������

शनिवार, २३ एप्रिल, २०१६

प्रेरणा द्या, प्रेरणा घ्या

प्रेरणा द्या, प्रेरणा घ्या आणि यशस्वी व्हा.

शिक्षणामूळे व्यक्तीची , समाजाची व अनुशंगाने देशाची प्रगती होत असते. यासाठी बरोबर दिशा देणारा पालक व समाज  ही असावा लागतो. 

आयुष्यात यशस्वी होण्याची असंख्य कारणे असतात. प्रत्येक यशस्वी व्यक्तीला मिळणारं यश हे त्याच्या कठोर परिश्रम, जिद्द , आत्मविश्वास , चिकाटी , आवड , ज्ञान अश्या महत्वपूर्ण गोष्टीमुळे प्राप्त झालेलं असतं. यश हे सहजा सहजी कधीच मिळत नाही. ते मिळवण्याकरता प्रत्येक व्यक्तीला खडतर प्रवास करावाच लागतो. अर्थात, ह्या सर्व गोष्टी साध्य करण्याची क्षमता त्या व्यक्ती मध्ये असायला हवी. यशाकडे वाटचाल करत असतांना आपल्याला बऱ्याचदा एक गोष्ट पाहायला आणि अनुभवायला मिळते आणि ती म्हणजे कमतरता. आणि ही कमतरता नेहमी कष्ट, जिद्द किंवा आत्मविश्वास यांचाशीच निगडीत असते असे नाही. कधी कधी असंही होतं की सर्व व्यवस्थित चालू असूनही यश मिळण्याची खात्री मनाला वाटत नाही. कुठेतरी काहीतरी कमी पडत असतं आणि आपल्याला काय कमी पडतंय नेमकं हेच कळत नसतं.

असं का होत असेल बरं ? आपण कुठे कमी पडतो का ? आपले प्रयत्न, जिद्द आणि आत्मविश्वास ह्याची ताकद कमी होऊन जाते का ? की आपल्यात मुळात तेवढी क्षमताच नसते यशा पर्यंतची वाटचाल करण्याची ? प्रश्न अनेक पडतात पण उत्तर सापडत नाही. असा कटू अनुभव बहुतांशी लोकांच्या वाट्याला येतो आणि ते यशस्वी व्हायचे राहूनच जातात. मग, ही यशस्वी लोकं यश मिळवतात तरी कशी ? फार कुतूहल वाटतं ना?

पण यातच तर आपल्या प्रश्नांची उत्तरे दडली आहेत.

खरं तर यशाकडे जातानाचा प्रवास हा एकट्याचा नसतो.
यशाची वाटचाल करताना सोबत ही हवीच. आणि सोबत अशी असावी जी नेहमी आपल्याला प्रेरणा देत राहील.
प्रेरणा. ......
ह्याच गोष्टीची कमतरता असते बहुतांशी लोकांकडे. बाकी सर्व गोष्टी असल्या मात्र यशापर्यंत जाण्याची प्रेरणाच मिळत नसेल तर सर्वच अशक्य वाटू लागते. म्हणूनच मनात आशेचा दिवा तेवत ठेवण्यासाठी एखादी व्यक्ती किंवा गोष्ट जवळ असणं फार महत्वाचं असतं.
पण प्रेरणा मिळते कशी ? की ती घ्यावी लागते ? आता ही गोष्ट मात्र नशिबानेच घडते.
प्रेरणा देणाऱ्या लोकांची साथ काहींना मिळते तर काहींना नाही मिळत. ज्यांना मिळते ते वाटचाल करत राहतात, ज्यांना मिळत नाही ते एक तर शोध घेतात किंवा थांबून जातात. खरं तर आपल्याला कोणीतरी प्रेरणा द्यावी, किंवा ती मिळावी अशी अपेक्षा करणे चुकीचे वाटते. प्रेरणा ही शोधली तर नक्कीच सापडते कारण जगात असंख्य गोष्टी आहेत ज्यांपासून आपण प्रेरणा घेऊ शकतो.

ज्या पासून आपल्याला प्रेरणा मिळते त्याला म्हणतात प्रेरणास्थान.

प्रेरणास्थान फक्त व्यक्तीच असते असे नाही तर ते काहीही असू शकते. सजीव, निर्जीव, व्यक्ती, निसर्ग, किंवा अशी कोणतीही गोष्ट जीच्याकडे पाहून आपल्याला नवीन उमेद मिळते, पुढे जाण्याची आणि यश मिळवण्याची. एखाद्यासाठी एखादं गाणं, तर एखाद्यासाठी एखादा चित्रपट प्रेरणादायी असू शकतो,
सुंदर आयुष्य जगण्यासाठी पण प्रेरणा लागते.
एखाद्या साठी त्याचे आई, बाबा, मित्र, नातेवाईक,  समाज बांधव  प्रेरणादायी असू शकतात  तर एखाद्यासाठी सकाळी बागेत फुलणारं फुलही प्रेरणादायी असू शकतं. काहींना बाहेरील गोष्टीकडून प्रेरणा मिळत नाही त्यामुळे ते स्वतः मध्ये प्रेरणा मिर्माण करतात आणि यशस्वी होऊन दुसऱ्यांसाठी प्रेरणास्थान बनतात. प्रेरणा कुठून आणि कशा स्वरुपात मिळतेय हे महत्वाचं नसतं मात्र प्रेरणा मिळणं आणि मिळत राहणं फार महत्वाचं असतं.
तसेच प्रेरणा देण्याचे कर्तव्य करणे हे जागरूक समाजाचे ओळख आहे.
प्रेरणा द्या, प्रेरणा घ्या आणि यशस्वी व्हा.
     मित्र हो एक जागरूक पालक, मित्र, नातेवाईक,  समाज बांधव म्हणून आपण हे आपले कर्त्तव्य करतोय का ?
  प्रेरणा देण्याचे कर्तव्य आपण करत असालच .... अन विसरले असाल तर आठवण करुन देण्याचा हा छोटाचा प्रयत्न...
 ������������������������������

संकलित

मंगळवार, २ फेब्रुवारी, २०१६

जेआरडी आणि सुधाताई !

ही गोष्ट आहे १९७४ ची.
तेव्हा बेंगलोर शहरात IISc. मधे
सुधा कुलकर्णी नावाची विद्यार्थीनी शिकत होती.
ती एकदा हॉस्टेलवरुन लेक्चर हॉल कडे जात असताना नोटीस बोर्ड
वर एक जाहीरात पाहीली. ती जाहीरात होती प्रसिद्ध
टेलको (आताची टाटा मोटर्स) . ती खालील प्रमाणे होती.
'The company required young, bright engineers, hardworking
and with an excellent academic background, etc. At
the bottom was a small line: ‘Lady Candidates need not
apply.’
त्या शेवटच्या ओळीने सुधाची तळपायाची आग मस्तकात गेली. तिने
सरळ टेलकोच्या मुख्य प्रबंधकाला पत्र लिहून जाब विचारायचे
ठरविले. पण त्या वेळी त्यांचे नाव माहीत नसल्याने तिने सरळ
टाटा ग्रुप्सचे प्रमुख जे.आर. डी. टाटा यांना पत्र लिहले आणि ती ते
विसरुन गेली.
१० दिवसात तिच्या पत्राला उत्तर आले. तिला टेलको पुणे ईथे
ईंटरव्हूसाठी बोलावले होते त्यासाठी लागणारा सर्व खर्च
टेलको कंपनी करणार होती. ईंटरव्हूसाठी सहा पॅनलिस्ट होते. सुधाने
एंट्री केल्याबरोबर त्यांच्यात 'हीच ती जे.आर.डीं. ना पत्र
लिहणारी वगैरे कमेंट झाले. सुधा हुशार असल्याने तिला तो ईंटरव्हू
फारसा जड गेला नाही. ईंटरव्हू झाल्यावर
त्या सहाजणांपैकी एकजण म्हणाला. 'त्या जाहिरातीत तसे
लिहण्याचे कारण म्हणजे ही जॉब शॉप फ्लोर ची आहे.
मुली सहसा तिथे काम करत नाहीत मग एव्हढा ईंटरव्हू घेउन
फायदा होत नाही पण तुम्ही स्वतः ईंट्रेस्ट दाखविल्या बद्दल
धन्यवाद. तुम्ही शॉप फ्लोरवर काम करणा-या पहील्या महिला आहात.
काही दिवस असे गेले तोच एक दिवस जे.आर.डी. टेलको पुणे ला भेट
द्यायला आले. त्यावेळी टेलकोचे मुख्य प्रबंधक सुमंत मुळगावकर होते.
सुमंत मुळगावकरांनी सुधाची ओळख शॉप फ्लोरवरची पहिली महिला अभियंता अशी करुन दिली. त्यांनी सुधाचे हस्तांदोलन केले. आता मात्र सुधाला भिती वाटत होता न करो सुमंत सर किंवा जे.आर.डीं नी पत्राचा विषय
काढला तर पण तिच्या सुदैवाने दोघेही ती गोष्ट विसरले होते. सर्व
पाहणी करुन निघण्यास त्यांना रात्रीचे ९ वाजले. तेव्हा पार्कींग
लॉट मधे नव-याची वाट पाहत असलेली सुधा दिसली.
जे.आर.डींनी विचारल्यावर तिने कारण सांगितले. तेव्हा ते म्हणाले.
' रात्र खुप झालीय आणि अशा वेळी एका स्त्रीने असे एकटे उभारणे
ठिक नाही. मी तुमच्या सोबतीला उभारतो तुमचे मिस्टर येईपर्यंत. '
आता मात्र सुधाला मनात कालवा-कालव जाणवू लागली.
ईतका मोठा माणूस आपल्याबरोबर शुल्लक वाट बघत उभा आहे.
ईतक्यात सुधाचे मिस्टर आले. सुधाने त्यांची आणि जे.आर.डीं ची ओळख करुन दिली. 'हे माझे मिस्टर नारायण मुर्ती आणि हे.. ' पुढे सुधाजी काही बोलणार एव्हढ्यात नारायण मुर्तींचा चेहरा 'अजि म्या ब्रह्म पाहिले ' असा झाला होता. जे.आर.डी. हस्तांदोलन करताना मुर्तींना म्हणाले. 'मिस्टर मुर्ती कितीही मोठे झालात तरी आपल्या बायकोला अशी वाट बघायला लावू नका ' ईतके बोलून ते निघून गेले.
पुढे जेव्हा सुधा मुर्तींनी नोकरीचा राजिनामा दिला तेव्हा सुमंत सरांनी तो सरळ जे.आर.डीं कडे पाठविला. तेव्हा जे.आर.डी. स्वत: सुधा मुर्तींना फोन करुन राजिनाम्याचे कारण विचारले.
तेव्हा सुधाजी म्हणाल्या ' माझ्या मिस्टरांनी ईन्फोसिस नावाची स्वतंत्र कंपनी काढली आहे तेव्हा त्यांच्या मदतीसाठी मला जाणे भाग आहे.
तेव्हा जे.आर.डीं.नी प्रतिप्रश्न केला, 'तुम्ही यशस्वी झाल्यावर काय करणार?'
तेव्हा सुधाजी म्हणाल्या.' काही ठरविले नाही. आम्हाला तर हो ही माहीत नाही की आम्ही यशस्वी होऊ का नाही...' मधेच वाक्य तोडत जे.आर.डी गरजले 'शट अप ! असले रडगाणे गाऊ नका. नवीन सुरवात करताय तेव्हा सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. ऑल दी बेस्ट!
आणि हो अयशस्वी होऊन माझ्या कंपनीत तुम्ही परत दिसता कामा नये.'
त्यांनी रिसीव्हर खाडकन ठेवला.
पण ते शेवटचे शब्द सुधाताईंच्या मनात शेवटपर्यंत घुमत राहीले
धन्य ते जेआरडी आणि धंन्य त्या सुधाताई !
आपल्यात त्यांच्यातले एक टक्का गुण जरी आले तरी आपण यशस्वी उद्योजक होऊ !

बुधवार, २० जानेवारी, २०१६

फिल्मों के संवाद.

फिल्मों के 10 ऐसे ही संवाद. ये आपको कहीं हिम्मत नहीं हारने देंगे और सफलता पाने का जज्बा हमेशा जगाए रखेंगे .

1. 3 Idiots: 
कामयाबी के पीछे मत भागो, काबिल बनो , कामयाबी तुम्हारे पीछे झक मार कर आएगी.

2. Dhoom 3:
जो काम दुनिया को नामुमकिन लगे, वही मौका होता है करतब दिखाने का.

3. Badmaash Company:
बड़े से बड़ा बिजनेस पैसे से नहीं, एक बड़े आइडिया से बड़ा होता है.

4. Yeh Jawaani Hai Deewani: 
मैं उठना चाहता हूं, दौड़ना चाहता हूं, गिरना भी चाहता हूं....बस रुकना नहीं चाहता .

5. Sarkar:
नजदीकी फायदा देखने से पहले दूर का नुकसान सोचना चाहिए.

6. Namastey London:
जब तक हार नहीं होती ना....तब तक आदमी जीता हुआ रहता है.

7. Chak De! India:
वार करना है तो सामने वाले के गोल पर नहीं, सामने वाले के दिमाग पर करो..गोल खुद ब खुद हो जाएगा.

8. Mary Kom:
कभी किसी को इतना भी मत डराओ कि डर ही खत्म हो जाए.

9. Jannat:
जो हारता है, वही तो जीतने का मतलब जानता है.

10.Happy New Year:
दुनिया में दो तरह के लोग होते हैं विनर और लूजर...लेकिन जिंदगी हर लूजर को एक मौका जरूर देती है जिसमें वह विनर बन सकता है..

Stay motivated!!
Be Happy.

गुरुवार, १७ डिसेंबर, २०१५

प्रेरणादायक -यशोगाथा एका बेफाम जिद्दीची

यशोगाथा एका बेफाम जिद्दीची
राधाबायींची ( लंडन मधील मराठी खानावळीची ) !
मित्रांनो मराठी असाल तर नक्कीच शेअर करा !
राधाबाई यवतमाळ च्या रस्त्यावर भाजी विकणारी एक
निरक्षर विधवा महिला. ५ मुली पदरात आणि अठराविश्व
दारीर्द्र्य घरात. अचानक एक दिवस इंग्लंड वरून तिच्याच
समाजातील एक माणूस उगवला. त्याची बायको हि
नुकतीच देवाघरी गेली होती. समाजातील प्रथे प्रमाणे दुसरे
लग्न करणे भाग होते. मग कोणा एका मध्यस्थाने या दोघांचे
लग्न लाऊन दिले.
वर्ष १९४८/४९ नवीन नवरा हिला घेऊन बोटीने लंडनला गेला.
बरोबर पाचातल्या दोन मुली घेतल्या. बाकीच्यांना
नातेवाईकांच्या भरवशावर इथेच ठेवले.तिथे त्याच्या मुलांनी
हिला ठेऊन घ्यायला नकार दिला. मग कसाबसा हा अजब
संसार चालू राहिला.
एक दिवस आकाश कोसळले. थोड्या आजाराचे निमित्त
होऊन नवर्याचा मृत्यू झाला. नंतर काही दिवसातच
घरातल्यांनी ह्या बाईच्या हातात बोटीची ३ तिकिटे
आणि ५० पौंड ठेवले आणि घरा बाहेर काढले ते हि ऐन
हिवाळ्यात. बाईच्या हाताल धरून दोन लहानग्या मुली,
एक वळकटी आणि जेमतेम चार इंग्रजी शब्द यावर हि
अशिक्षित ९ वारी नेसलेली बाई……… लंडन च्या बर्फात
सुन्न होऊन उभी होती. एका जवळ राहणार्या भल्या ज्यू
माणसाने तिला घरी नेले आणि कसाबसा संवाद साधत
तुला काय येते विचारले. हि म्हणाली "स्वयंपाक". त्याने
हिला आपल्या घरातील मोकळी जागा दिली आणि
म्हणाला मग कर स्वयंपाक. तुझ्या देशातले लोक येतील बघ
खायला.
..........आणि असा "आजीबाई वनारसे खानावळ " या लंडन
मधल्या खानावळीचा जन्म झाला.
लंडन मध्ये अस्सल मराठी जेवण मिळते हे कळल्यावर
त्यांच्याकडे तिथे गेलेल्या मराठी मुलांची आणि कामाला
गेलेल्या एकट्या बाप्यांची रीघ लागली, पुढे या बाईंनी
कॉट बेसिस वर रहायला जागा द्यायला सुरवात केली, असे
होता होता आजीबाईंची खानावळ इतकी प्रसिध्द झाली
कि लंडन ला जाऊन त्यांच्याकडे न गेलेला मराठी माणूस
मिळायचा नाही. पु ल, अत्रे, यान पासून अनेक मराठी
दिग्गज त्यांच्याकडे राहून, जेऊन गेले.
बाई ९ वारी साडी नेसून लंडन च्या मेट्रोने एकट्या प्रवास
करीत (शेवट पर्यंत त्या ९ वारी साडीच नेसत होत्या) स्टेशन
ची नावे वाचता येत नसत म्हणून कितवे स्टेशन ते विचारून घेत
आणि मोजून उतरत.
बाई वारल्या तेव्हा त्यांच्या मालकीची लंडन मध्ये ५ घरे
होती. लंडन मधला गणेशोत्सव त्यांनी चालू केला. तिथले
पहिले देऊळहि त्यांनीच बांधले.
त्यांच्या अंतयात्रेला राणीचा प्रतिनिधी म्हणून लंडन चा
मेयर हजर होता......... आणि सगळ्यात गम्मत म्हणजे त्या
शेवटपर्यंत अशिक्षितच राहिल्या. जेमतेम RADHABAI अशी
सही करीत.
लेख सहाय्य - गुगल
तात्पर्य = कोणतेही कामाचा दर्जा हा चांगला किंवा
वाईट नसतो तर तुमची जिद्द नि त्या कामा बद्दलची
तुमची निष्टा त्या कामाला उत्तम दर्जा प्राप्त करून देते.
व्यवसाया प्रती समर्पित भावना, चिकाटी , प्रामाणिक
पणा या गोष्टी अडचणीना दूर सारून यशाला खेचून
आणतात. एवढेच नाही तर यश मिळवायला त्या नेहमी
प्रेरणा देतात. मग देश आणि परिस्थिती कोणतीही असो
विजय हा तुमचाच असतो.

हि माहिती प्रेरणादायक ठरो ।

कर्तबगार अधिकारी जावेद अहमद यांचा आदर्श

> कर्तबगार अधिकारी जावेद अहमद यांचा आदर्श
मुंबई, दि. १२ (पीसीबी) -  मुंबईचे पोलीस आयुक्त जावेद अहमद यांची सौदी अरेबियातील भारताचे राजदुत म्हणून नियुक्ती झाली आहे. आपल्या कर्तबगारीने पोलीस दलात स्वतःचा वेगळा ठसा उमटविणारे आणि उत्तर प्रदेशातील श्रीमंत नवाब असलेले अहमद गेल्या ३५ वर्षांपासून अवघा १ रुपया पगार घेतात.  
भारत सरकारकडून काल रात्री उशिरा अहमद यांची सौदी अरेबियातील भारतीय राजदुतपदी नियुक्ती करण्यात आली.  यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शिफारस केली होती. मोदींनी अनुकूलता दर्शविल्यानंतर सौदी सरकारला जावेद यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. सौदीने हिरवा कंदील दाखविल्यानंतर याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. 
जावेद यांचा जीवनपट आदर्शवत असा आहे. उत्‍तर प्रदेशातील एका नबाबी कुटुंबातील तसेच वारशानेच अहमद हे कोट्यवधी रुपयांच्‍या संपत्‍तीचे मालक आहेत. त्‍यामुळे त्‍यांच्‍या अनेक पिढ्यामध्‍ये कुणी नोकरी केली नाही. आताही या कुटुंबातील सदस्‍य राजेशाही थाटात जगतात. मात्र,  जावेद यांनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीच्‍या प्रसिद्ध सेंट स्टीफन्स कॉलेजमधून त्‍यांनी पदवीचे घेतले.  १९८० च्‍या आयपीएस बॅचचे अधिकारी असलेले जावेद यांचे नाव पोलीस दलात विविध पदांवर काम केले. त्‍यांनी १९८३ ते ८५ पर्यंत दिल्‍ली पोलिस दलातही सेवा केलेली आहे. 
मुंबईच्‍या गुन्‍हेगारी जगतात जावेद यांना गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ओळखले जाते. मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्‍त असताना गेटवे ऑफ इंडिया आणि झावेरी बाजारात झालेल्‍या बॉम्‍बस्‍फोट प्रकरणाचा तपासही त्‍यांनीच केलेला आहे. होमगार्ड पोलीस महासंचालक असतानाही त्यांनी आपल्या कार्याची चुणूक दाखविली. जावेद यांची पोस्टिंग झाल्‍यापासून ते केवळ एक रुपयाच वेतन घेतात. आपला उर्वरित पगार ते पोलिस कल्‍याण निधी म्‍हणून आतापर्यंत दान करत आलेले आहेत. विशेष म्हणजे ते सरकारी वाहनाचा वापर न करता स्वतःचे वाहन वापरतात.  आता त्यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन सौदीच्या राजदुतपदी नियुक्ती झाली आहे. तेथेही ते १ रुपयाच पगार घेणार आहेत.