बुधवार, २५ नोव्हेंबर, २०१५

����संत श्रीपाद बाबा����

तै ह्रदयामध्ये  रामू । असता सर्व सुखाचा आरामू । की भ्रांताशी कामू । विषयावरी ॥
सर्व सुखाचा विसावा आत्मा आहे, मग आत्मा तुम्ही आहांत कां देह तुम्ही आहात. हा धर्म नको कां अगोदर कळायला? कां नको? तुम्ही  इथे आत्मा आहात देह नाही, निश्चित निर्विवात कोणत्या ही न्यायाधीशापुढे गेले तरी त्यालाही कबूल करावे लागेल, नाक घासून. साहेब तुम्ही‍ जे बोलता ते चेतना आहे म्हणून कां तुम्ही म्हणून? साहेबाला सुध्दा कबूल करावे लागेल चेतना आहे म्हणून? नाही ती चेतना गेली तर साहेबांना डयुटीवर जाता येईल कां ड्यूटीवर साहेब जात होता की चेतनेमुळे जात होता. याचीच ओळख करुन घेतली म्हणजे तैसा ह्रदयामध्ये असलेला राम कळेल एरव्हीच नाही कळायचे. माऊली ज्ञानोबांनी आपल्याला या ओवीद्वारे आपल्या जवळच्या आत्मारामाची ओळख करुन घेण्यासाठी याद्वारे आपणास मोलाचा संदेश दिला आहे. तुज आहे तुजपाशी। परी तू जागा चुकलाशी माऊलींनी वरील दृष्टांत देऊन ह्रदयातील भगवंताची ओळख करुन घेण्यासाठीच मनुष्य जन्म आहे. याच जन्मी ओळखी करा आत्माराम । संसार श्रम भोगू नका ॥ तृणअग्‍नीमेळे समरस झाले । तैसे नामे केले जपता हरी ॥ तसेच भगवंताच्या नामाने भक्तांच्या अंतकरणावर परिणाम होतो. हि अनुभूती माउलीनि ह्या ओवी द्वारे जगाला सांगितली. तैसा हृदयामध्‍ये मी रामु । असता सर्व सुखाचा आरामू ।का भ्रांताशी कामु । विषयावरी ॥ पुंडलीक वरदे हरी विठठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.
��������������

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा