बुधवार, २५ नोव्हेंबर, २०१५

पैसा

पैशाने मंदीर बांधता येईल
परंतु मंजिल बांधु शकत नाही

पैशाने देऊल बांधता येईल
परंतु देव बांधु शकत नाही

पैशाने मुर्ती सजवता येईल
परंतु भक्ति सजवु शकत नाही

पैशाने खाद्य विकत घेता येईल
परंतु चवी विकत घेऊ शकत नाही

पैशाने चष्मा  विकत घेता येईल
परंतु नजर विकत घेऊ शकत नाही

पैशाने तलवार विकत घेता येईल
परंतु हिंमत विकत  घेऊ शकत नाही

पैशाने सुवास विकत घेता येईल
परंतु श्वास विकत घेऊ शकत नाही

पैशाने चप्पल विकत घेता येईल
परंतु चाल विकत घेऊ शकत नाही

पैशाने  माळ विकत घेता येईल
परंतु जप विकत घेऊ शकत नाही

पैशाने जग जिंकता येईल
परंतु मन जिंकु शकत नाही

पैशाने अहंकार विकत घेता येईल
परंतु नम्रता विकत घेऊ शकत नाही

पैशाने विषय वासना विकत घेता येईल
परंतु वैराग्य विवेक  विकत घेऊ शकत नाही

पैशाने घर सजवता येईल
परंतु शांती सजवु शकत नाही

पैशाने शेत लावाल
परंतु पिक लावु शकत नाही

पैशाने आरसा विकत घेता येईल
परंतु रुप विकत घेऊ शकत नाही

पैशाने शुंगार सजवता येईल
परंतु सौभाग्य सजवता येऊ शकत नाही

पैशाने विज्ञान जमवता येईल
परंतु आत्मज्ञान कमवता येणार नाही

पैशाने गुरु मिळवता येतील
परंतु सदगुरु मिळवता येणार नाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा