विनोद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विनोद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २४ मे, २०१६

II मनाचे श्लोक - *आजच्या युगातले* II

II मनाचे श्लोक - *आजच्या युगातले* II

*विषय- लाइफ स्टाईल मॅनेजमेंट*

*व्यायाम*
         प्रभाते मनी देह हा जागवावा,
         पांघरुणात लोळून, वाया न जावा
         नमस्कार घालावे , सूर्यासी दहा
         दिवस जातो आनंदे, मित्रांनो पहा II 

*वॉटसएप*
         मना सज्जना, हाती व्हाट्‌सअॅप नकोरे 
         उतु दूध जाई, कुकर शिट्टी मारे 
         पती दावी क्रोध, भुकेलेली पोरे 
         बुडे बोट संसार, व्यसन नाही बरे  II

*बैठी जीवन शैली*
         घरी यावे ऑफीस मधूनी उशिरा
         टीव्ही बघत खावा, फास्ट फूड कचरा
         सकाळी न होई, मलाचाही निचरा
         कुठुन येई शक्ति, आरोग्यास विसरा II


*अध्यात्म*
        नको रे मना, लागू भोन्दुंच्या नादी
        नको अंधश्रद्धा, नको घेऊ ऊदी
        सदुगृरू खरा तो, मनाचा विवेक
        नको वेळ दवडू, हृदय सांगे ऐक II
      
*मद्य*
        मना सज्जना मद्य, भयंकर पाश
        घरा राख रांगोळी, होई सर्वनाश
        नको तो सुधाकर, नको तोच प्याला
        सुरुवातीस एक, मग घरीच मधुशाला II 

*धूम्रपान*
        मना सांग का ओढिशी धूम्रकांडी
        फूफ़्फुसास भोके, आरोग्यही सान्डी
        हृदयास झटके, व्यसन हाची रोग
        आयसीयूत नेई, कर्माचाच भोग II

*टेंशन*
         विचारी मना तूची शोधूनी पाहे
         टेंशन किती या आयुष्यांत आहे
         उद्याचे कसे हो, मना जाळी चिंता
         प्याला अमृताचा, तोही भासे रीता
         किती हवा पैसा, नको धावु मागे​ 
         आयुष्य निसटले, आता व्हावे जागे II


*कर्ज़*
         नको रे मना, काढ़ु भले मोठे कर्ज़
         गिळे जसा अजगर, दया माया वर्ज्य
         पोखरी मनास, आनंदा सुरंग
         जितेपणी नको तो , सोनेरी तुरंग II

*फास्ट फूड*
         मना सांग पा, जेवणा काय झाले ?
         पोळी भाजी सोडोनी, बर्गर मिळाले
         चढे चरबी अंगा, ड्रेस तंग सगळे
         वजन काटा पाहुनी, मिटुन घेई डोळे II

            *II   जय जय रघुवीर समर्थ II*

शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०१५

बायकोच्या नजरेतून - श्री सतीश आहेर

बायकोच्या नजरेतून जगाकडे पाहूया  :

जगातील सगळ्यात उत्कृष्ट माणूस - तिचे बाबा

जगातील सगळ्यात प्रेमळ स्त्री - तिची आई

जगातील सगळ्यात हुशार स्त्री -     ती स्वत:

जगातील सगळ्यात दु:खी नवरा -   तिचा भाऊ

जगातील सगळ्यात मोठी शत्रू -     तिची नणंद

जगातील सगळ्यात सुंदर पुरुष -     तिचा मुलगा

जगातील सगळ्यात नशीबवान नवरा - तिच्या बहिणीचा नवरा

जगातील सगळ्यात अडाणी स्त्री -   तिची सासू

आणि

आणि जगातील सगळ्यात खराब, कामचोर, स्वार्थी, खोटारडा, कंजूस, बेकार माणूस कोण ?

आता हेदेखील सांगायला पाहिजे का ?
                  पटल असेल तर लाईक करा न घाबरता आणि शेयर पण करा घाबरु नका मि आहे .

गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०१५

विनोद - सौ मनीषा नरेंद्र गुरव, धुळे


गुन्हेगार कोण नवरा का बायको ? एक दिवसी नवरा आणि बायको झोपले होते, अचानक बायको स्वप्न बघून जोरात ओरडली “लवकर पळ” “लवकर पळ” माझा नवरा आला आहे. तिचा नवरा झोपेतून उठतो आणि खिडकीतून उडी मारतो…….!!

गर्दीत चालता चालता कुशाभाऊंचा एक मुलीला धक्का लागला.
कुशाभाऊं : sorry

मुलगी (फणकारून) : डोळे फुटलेत का?

कुशाभाऊं
घाबरून गुपचूप तिचा मागून चालू लागले. एवढ्यात एका तरुणाचा त्या मुलीला
धक्का लागला. तो पण sorry म्हणाला. मुलगी (लाजत) : इट्स ओक.

कुशाभाऊं (दबकत) : माझ्या sorry च काय स्पेलिंग चुकीच होत?

गुरूजी : २ मधून २ गेले किती राहिले ?
झम्प्या : काही समजले नाही गुरूजी...
गुरूजी : अरे तुझ्याकडे २ चपात्या आहेत त्यातल्या तू २ चपात्या खाल्ल्यास तर तुझ्याकडे काय उरले ?
झम्प्या : भाजी..

गम्प्याला ते बूट खुप लहान होत होते, त्यामुले चालताना त्याला चांगलाच त्रास होत होता, हे पाहून झमप्याने विचारले "अरे कुठून आन्लेस हे बूट?"
गम्प्या वैतागला होता त्याने उत्तर दिले "झाडावरचे तोडून आन्लेत तुला का्य करायचे?".....
झम्प्या म्हणाला "अरे मग इतकी गड़बड़ कशाला केलिस? जरा पिकुन मोठे तरी होवून द्यायचेस.."

कई  प्रेम कहानिया इसलिए भी
अधूरी रह जाती हे क्योंकि...
.
.
.
.
.
.
.
.

पोरीच्या गावात uninor च्या सिम ला रेंज नसते............��������������