शनिवार, २१ नोव्हेंबर, २०१५

आसवे.....श्री रवि शिरसाठ

आसवांचा गाव सारा आसवांचा पूर येथे
आसवांच्या आश्रयाला मायममता तिष्ठते

लेकरांच्या कौतुकाचा आसवांना हर्ष होतो
अन कुणाच्या मर्तिकाला आसवांचा अर्घय देतो

आसवे मातेस जैसी  दु:खवेगे प्रिय होती
विरहसाही प्रेमिकेला आसवे आधार देती

आसवांचा बांध जेव्हां फुटता प्रपात होतो
साचलेला शोक सारा मोकळा निश्वास देतो

आसवांचे मोल मोठे जिव्हाळ्याचे बंध नाते
जगण्यासाठी दान कुणी आसवांचे मागते !

      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा