अहिराणी भाषा हि खान्देशातील प्रमुख भाषा आहे. हि भाषा खान्देशात प्राचीन काळापासून बोलली जात आहे. परंतु, आता दिवसेंदिवस नवनवीन शोध लागत आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्याच बरोबर भाषा ही बदलत चालल्या आहेत. अहिराणी आता काही खान्देश वासींना आवडत नाही. आणि या भाषेला तर आता मृत भाषा म्हणून घोषित करण्यात आले आहे. म्हणून या आपल्या अहिराणी मातेला वाचविण्याचा प्रयत्न करायला हवा .
मंडळी, अहिराणी भाषा म्हणजे श्री कृष्णदेवांचा आशिर्वाद आहे. महाभारतात खान्देशावर एक कथा आहे. श्री कृष्णदेव आणि जरासंध यांच्यात चौदा वेळा युद्ध झाले. तेरा वेळा श्री कृष्णदेवांचा विजय झाला. चौदाव्या युद्धात मात्र जरासंधाला विजय मिळाल्यावर जीव वाचवण्यासाठी देव मथूरेहूण द्वाराकेला पळाले, म्हणून त्यांस रणछोडदास असे म्हणतात. हे रणछोडदास द्वारकेकडे जात असतांना रस्त्यात खांडव वन लागले. इथे त्यांनी काही वर्षे मुक्काम केला. ते पशूपालांचा राजा असल्यामुळे त्यांच्या सोबत असंख्य मेढपाळ व गोपाळांचा समूह होता. खांडव वनात चारा पाणी भरपूर होते. मैलोनमैल जमीन होती. या ठिकाणी हे पशुपाल खुपच रमले. या पशूपालांना अहिर म्हणत. आणि त्यांची बोलण्याची भाषा म्हणजे अहिराणी भाषा होय. पुढे द्वाराकेच्या दिशेने जायचे ठरल्यावर काही लोकांनी नकार दिला. कृष्णदेवांच्या संमतीने त्यांनी खांडव वनातच वसाहत निर्माण केली. आपल्या लाडक्या राजाचे नाव या प्रदेशाला दिले. कन्हैयाचा कान्हदेश. पुढे याच कान्हदेशाचा अपभ्रंश खान्देश असा झाला. या कान्हदेशाची राजधानी नंद राजाच्या नावावरून वसवली. तिचे नाव नंद दरबार व पुढे याचा अपभ्रंश नंदुरबार असा झाला .
खान्देशात महाभारतातील कौरव, पांडवाच्या नावावरून तर भरपूर गावे आहेत.
आणि ते पुढीलप्रमाणे :
नन्द राजाच्या नावावरून नंदान
धर्म च्या नावावरून धमानं
भीमच्या नावावरून बामनं
अर्जुन च्या नावावरून जूनून
जयद्रथ च्या नावावरून जैतान
श्रीधर च्या नावावरून शिरधार
मुकुंदा च्या नावावरून कुंडान
गोविन्दा च्या नावावरून वैदान अस्वत्थामा च्या नावावरून आस्तान
बलराम च्या नावावरून बळसान
दुशासन च्या नावावरून दूसान
अशा प्रकारची नावे गावांची आहेत व् त्या समोर त्यांची अपभ्रंश झालेली नाव आहेत तर काही नाव जशीच्या तशी आहेत. श्रीकृष्णाचा चुलता म्हणजे उध्दवाचे वडिल देवाभान हे नाव जसच्या तस एका गावाच आहे. भगवान श्रीकृष्णाच्या धनुष्याच नाव सारंग धनुष्य होत या नावाच गाव दोंडाइचे आणि शहाद्याच्या मधे तापीच्या काठावर आहे याच जागी भगवान श्रीकृष्ण धनुष्य बाणाचा सराव करायचा त्याच मैदानात त्याने नारायणी सेना घडवीली त्या जागेवर जे गाव वसले त्याच नाव सारंगखेडा या ठिकाणी महानुभाव पंथियांचा दत्त आहे त्याची मोठी यात्रा भरते तो त्रिमुखी दत्त नसून एकमुखी दत्त म्हणजेच दत्तात्रय प्रभु म्हणजेच श्रीकृष्ण श्रीकृष्णाची जात अहीर होती. अहीर म्हणजे गवळी ते अहीर लोक. हे अहीर लोक जी भाषा बोलतो ती अहिराणी. अहिरांची भाषा ती अहिराणी. अशी ही श्रेष्ठ अहिराणी भाषा. या अहिराणी भाषेवर आणि खान्देशावर कितीही लिहिले तरी कमीच आहे. कारणकी, हि एक वीरांची भूमी आहे. या भूमीवरती शूरवीर जन्माला आले, आणि या भूमातेला आणखीन पवित्र केले. भक्तप्रल्हाद, बळीराजा, सितेची आबरू वाचवण्यासाठी बलिदान करणारा घृधराज महाबली जायल. अर्जूनापेक्षाही वरचड असलेला धनुरधारी निषाध राजा एकलव्य, रामभक्त शबरी भिल्लिण, दरभंग रूषी, पवनपुत्र हनुमान हे सर्व मंडळी खान्देशी होती.
महाराष्ट्राबाहेर मराठी साम्राजाचा विस्तार करणारे लढवय्ये खान्देशीच आहेत. इंदूरचे मल्हारराव होळकर तळोदयाचे होते. बुंदेल खंडाची राणी लक्ष्मीबाई झांसीवाली पारोळ्याची कन्या होती. बडोद्याचे दानशूर राजे सयाजीराव गायकवाड कौळाणे (मालेगाव) येथील होते. अहिल्याबाई होळकर अशी कितीतरी नावे घेता येतील.
राम रावण युद्धात न्यायाच्या बाजूने लढतांना पहिला बळी जटायूंच्या नावाने जसा खान्देशी माणसाचा गेला, अगदी तसेच बलिदान ब्रिटीशांविरोधात लढताना खान्देशी लोकांनी केले. ब्रिटिश सत्ते विरूध्द स्वातंत्र्य युद्ध पेटवून ब्रिटिशांची पहिली गोळी छातीवर झेलणारी झाशीची राणी जशी होती तशी या युद्धात शेवटची गोळी छातीवर झेपणारा विर बालक शिरीष कुमार खान्देशी होता.
आशा या पावन भूमी वर महान मोठमोठे अहिराणी भाषिक होऊन गेले. खाज्या नाईक (शिरपूर, सेंधवा), महाराजा सयाजीराव गायकवाड (कवळाणे), रा.ग.गडकरी (गणदेवी), वि. का. राजवाडे (धुळे), महादेव गो. रानडे (निफाड), डॉक्टर. उत्तमराव पाटील (डांगरी), डॉ. लिलाताई पाटील (डांगरी), बहिणाबाई चौधरी (असोधा), पां. स. साने गुरुजी (अमळनेर),भाऊसाहेब हिरे (दाभाडी), ध.ना.चौधरी (फैजपूर), ग.द.माळी गुरूजी (शिरपूर), शिरीष कुमार मेहता (नंदुरबार), दादासाहेब गायकवाड (आंबे-दिंडोरी), श्री. अ.डांगे (करंज), दादासाहेब फाळके (नाशिक), वि. वा. शिरवाडकर (नाशिक), तर्कतिरथं लक्ष्मणशास्त्री जोशी (पिंपळनेर), लताताई मंगेशकर (थाळनेर),तंटया भिल्ल (रावेर-बरहाणपुर).हे खान्देशातील माणिकमोती. या बरोबरच आणखीन भरपूर अहिराणी माणिकमोती आहेत.
परंतु, आज याच अहिराणी मातेवरती खुप वाईट दिवस आले आहेत. आज तिच्याच काही पुत्रांना जन्मभूमी बद्दल ज्ञात नाही. अतिशय मायाळू असणारी या आईचे तिचेच काही पुत्र तिरस्कार करत आहेत. मंडळी, भाषा निर्माण होण्यासाठी हजारो वर्षे लागतात. आणि तिचाच आज नकार करणे हे चुकीचे आहे. आणि ते ही आपल्या अहिराणी भाषेचे.
आज अहिराणीला वाचवणे ही काळाची गरज आहे. कारण अहिराणी गेली की, सगळेच संपेल. आपले अस्तित्व ही संपेल. कारण ही महाराष्ट्रात मराठी भाषेसारखीच पवित्र भाषा आहे. म्हणूनच या
भाषेला जिवंत ठेवायला हवे. तिचा आदर करायला हवे. अहिराणीच काय प्रत्येक भाषेचा मानवाने आदर करायला हवी...
गुरुवार, १७ डिसेंबर, २०१५
अहिराणी प्रांताचा इतिहास
शुक्रवार, ४ डिसेंबर, २०१५
अहिराणी कविता
कोणा हिस्सामा तुप ऊन ,
ते कोणा हिस्सामा साय ऊनी !
मी घरमा बठ्ठास्थीन धाकला व्हतु ,
मना हिस्सामा माय ऊनी !
.
.
दोन्ही भाऊ पैसाना भुक्या ,
त्यासना हातमा पैसा ऊना
मी व्हतु प्रेमना भुक्या ,
मना डोकावर मायना हात ऊना !
.
कोणा ताटमा मटण पुलाव ,
ते कोणा ताटमा दाय ऊनी !
मी घरमा बठ्ठास्थुन धाकला व्हतु ,
मना हिस्सामा माय ऊनी !
.
.
बाप जाताज भाऊस्ना मनमा वाटा घुसना !
आयी देखीनी जणु मायना कलेजामा काटा घुसना !
.
कोले खेत सम्मद बैल ऊनात ,
ते कोले दुध-दुभती गाय ऊनी !
मी घरमा बठ्ठस्थुन धाकला व्हतु,
मना हिस्साले माय ऊनी !
.
.
वावरमा दिनरात बाप राबना !
तवय यास्ले घरन छप्पर लाभन !
माले मनी मनी माय भेटनी ,
माले मायना पदर लाभना !
.
जेवढ लिखता ऊन तेवढ लिख!
मी घरमा बठ्ठास्थुन धाकला व्हतु ,
मना हिस्सामा माय ऊनी !
बहिणाबाई चौधरी
बहिणाबाई चौधरी
(१८८०- ३ डिसेंबर, १९५१)
बहिणाबाई नथूजी चौधरी ( full name : - bahinabai Nathuji chaudhari) ह्या पुर्व खान्देशात (आताच्या जळगांव जिल्ह्यातील) असोदा येथे जन्मलेल्या प्रसिध्द कवयित्री होत्या. लिहीता न येणार्या बहिणाबाई 'लेवा' बोलीत आपल्या कवीता करत व त्यांचे चिरंजीव सोपान चौधरी त्या कागदावर लिहून ठेवत.
त्यांच्या कविता मराठी साहित्यातील अनमोल साठा आहे.
बहिणाबाईंची प्रसिध्द कविता .....
मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर । किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ।।
मन मोकाट मोकाट, त्याले ठायी ठायी वाटा । जशा वार्यानं चालल्या, पानावर्हल्यारे लाटा ।।
मन लहरी लहरी, त्याले हाती धरे कोन? । उंडारलं उंडारलं जसं वारा वाहादन ।।
मन जह्यरी जह्यरी, याचं न्यारं रे तंतर आरे । इचू साप बरा, त्याले उतारे मंतर ।।
मन पाखरू पाखरू, त्याची काय सांगू मात?। आता व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायात ।।
मन चप्पय चप्पय, त्याले नही जरा धीर । तठे व्हयीसनी ईज, आलं आलं धर्तीवर ।।
मन एवढं एवढं, जसा खाकसचा दाना । मन केवढं केवढं? आभायात बी मायेना ॥
देवा, कसं देलं मन आसं नही दुनियात । आसा कसा रे तू योगी काय तुझी करामत ॥
देवा, आसं कसं मन? आसं कसं रे घडलं । कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं ॥
---------------------
अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर,
आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर ।
अरे संसार संसार, होटा कधी म्हनू नाही
राउळीच्या कयसाले, लोटा कधी म्हनू नाही ।
अरे संसार संसार, नाही रडन कुढन
येड्या, गयांतला हार, म्हणू नकोरे लोढनं ।
अरे संसार संसार, खिरा येला वरचा तोड
एक तोंडामधी कडू, बाकि लागतो रे गोड ।
अरे संसार संसार, म्हनू नकोरे भिलावा,
त्याले गोड भिम फुल, मधी गोडंब्याचा ठेवा ।
देखा संसार संसार, शेंग वरतून काटे,
अरे वरतून काटे, मधी चिकणे सागर गोटे ।
एक संसार संसार, दोन्ही जिवांचा इचार,
देतो सुखाले नकार, अन् दुखाले होकार ।
देखा संसार संसार, दोन्ही जिवांचा सुधार
कदी नगद उधार, सुखदुखःचा बेपार ।
अरे संसार संसार, असा मोठा जादुगर
माझ्या जिवाचा मंतर, त्यच्यावरती मदार ।
असा संसार संसार, आधी देवाचा इसर
माझ्या दैवाचा जोजर्, मग जिवाचा आधार ।
--बहिणाबाईची कविता
आणखी काही कवितांच्या ओळी :
१.
सोन्यारूपान मढला, मारवाड्याचा बालाजी ।
शेतकऱ्याचा इठोबा, पानाफूलामधी राजी । अरे बालाजी-इठोबा, दोन्ही एकज रे देव ।
गरीबीनं सम्रीतीनं, केला केला दुजाभाव ।
२.
बापा नको मारू थापा,
असो खर्या, असो खोट्या ।
नाही नशीब नशीब,
तय हाताच्या रेघोट्या ।
नको नको रे जोतिष्या,
नको हात माझा पाहू ।
माझं दैव मला कये,
माझ्या दारी नको येऊ ।
३.
येरे येरे माझ्या जिवा,
काम पडलं अमाप ।
काम करता करता,
देख देवाजीचं रूप ।
अरे खोप्या मध्ये खोपा अरे खोप्या मध्ये खोपा , सुगारानिचा चांगला , देखा पिलासाठी तीन , झोका झाडाला टांगला , पिल निजली खोप्यात , जसा झुलता बंगला , तिचा पिलान्माधी जीव , जीव झाडाले टांगला , खोपा आणला आणला , जसा गिलक्याचा कोसा, पाखरांची कारागिरी, जरा देखरे माणसा, तिची एवूलीशी चोच, तेच दात तेच ओठ, तुले देलेरे देवान, दोन हात दहा बोट
आपला जीवनानुभव परिपूर्णतेने अभिव्यक्त करत, वैश्र्विक सत्यही अगदी सहजतेने उलगडणार्या महाराष्ट्रातील श्रेष्ठतम कवयित्री!
महाराष्ट्रातील खानदेश (उत्तर महाराष्ट्र) या भागातून लेवा (खानदेशी) भाषेतून; अतिशय सोप्या शब्दांत जीवनाचे तत्त्वज्ञान व्यक्त करणारे एक काव्य-रत्न आपल्याला लाभले. आजपर्यंत भल्या भल्या कवींना, पंडितांनाही साधलेली नाही अशी अभिव्यक्ती साधणारी, अशी काव्यरचना सहज उत्स्फूर्तपणे करणारी कवयित्री म्हणजे बहिणाबाई चौधरी होत. ‘जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे बावनHकशी सोन्याप्रमाणे बहिणाबाईंचे काव्य आहे’, अशा शब्दांत आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंच्या काव्याविषयी अभिप्राय दिला होता.
खानदेशातील आसोद हे बहिणाईंचं जन्मगाव. तिथला परिसर, तिथे बोलली जाणारी खानदेशी/लेवाबोलीभाषा त्यांच्या काव्यातून जिवंत होते. त्या स्वत: शेतकरी जीवन जगत असल्याने शेती, जमीन, शेतकर्यांची सुख-दु:खे, त्यातले चढउतार, झाडे, प्राणी, निसर्ग - या सार्यांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती असे त्यांच्या काव्यातून दिसून येते.
उदा. ‘असा राजा शेतकरी, चालला रे आलवानी (अनवाणी)
देखा त्याच्या पायाखाले, काटे गेले वाकीसनी.’
तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षण, उपजत विनोदबुद्धी, जीवनातील सुखदु:खांकडे समभावाने पाहू शकणारे शहाणपण आणि जगण्यातून कळलेले तत्त्वज्ञान ही त्यांच्या कवित्वाची वैशिष्ट्ये होत.
‘आला सास, गेला सास, जीवा तुझं रे तंतर, अरे जगनं-मरनं एका सासाचं अंतर!’
किंवा
‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’
अशा किमान शब्दात अर्थाची कमाल गाठणारे शब्द लिहायला दैवी प्रतिभाच लागते. ती त्यांच्यात होती हे त्यांचे काव्य वाचताना क्षणोक्षणी जाणवते.
बहिणाबाईंचे हे अमोल काव्य जगासमोर आणायला आचार्य अत्रे खरं तर कारणीभूत ठरले. एखाद्या जातिवंत हिर्याला जाणकार जोहरी भेटावा तसा हा साहित्यक्षेत्रात रत्नकांचन योग घडून आला. बहिणाबाईंचे सुपूत्र कविवर्य सोपानदेव व त्यांचे मावसबंधू श्री. पितांबर चौधरी यांनी लिहून घेतलेली बहिणाबाईंची गाणी हस्तलिखित स्वरूपात होती. आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या चीजवस्तू पाहताना हे हस्तलिखित सोपानदेवांच्या हाती लागले. सहज म्हणून, अत्रे यांच्याशी जवळून परिचय असल्याने भीत भीतच हे हस्तलिखित त्यांनी अत्रे यांना दाखवले. ते वाचून, चाळून झाल्यावर अत्रे त्यांच्या स्वभावानुसार त्यांना मोठ्याने म्हणाले - ‘अहो, हे तर बावनकशी सोनं आहे! हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे!’ आणि खरंच बहिणाबाईंच्या कविता वाचल्यावर वाटतं, जर या कविता जगासमोर आल्या नसत्या, तर एका फार मोठ्या प्रतिभासंपन्न कवयित्रीला, तिच्या कवितेला आपण मुकलो असतो.
संत कबीरांच्या दोह्याप्रमाणेच बहिणाबाईंचे काव्यही सर्व स्तरांवर जीवन जगणार्या रसिकांना भारावून टाकते. साधूसंतांना तपस्येनंतर जे जीवनाचे शहाणपण, तत्त्वज्ञान सापडते तेच त्यांच्या काव्यातही सापडते.
‘अरे संसार संसार - जसा तवा चुल्यावर
आधी हाताले चटके - तव्हा मीयते (मिळते) भाकर’
किंवा
‘देव कुठे देव कुठे - आभायाच्या आरपार
देव कुठे देव कुठे - तुझ्या बुबुयामझार’
एखाद्या मोठ्या ग्रंथाचा विषय असणारे जीवनाचे तत्त्वज्ञान त्या साध्या, सोप्या, (अन् कमी) शब्दांत सहजपणे सांगून जातात. त्यांच्या काव्यप्रतिभेला खरंच सलाम करावासा वाटतो. अशी कवयित्री महाराष्ट्रात जन्माला आली, आणि अशी अद्भूत प्रतिभा महाराष्ट्राच्या मातीत बहरली हे आपले महत्भाग्यच!
बहिणाबाईं चौधरींची लेवा भाषेतील कविता मातीतून रुजून आली आहे, जमिनीशी नाते जपणारी आहे. निसर्गाशी नाते सांगणाऱ्या बहिणाबाईंच्या कविता आपल्याला खूप काही शिकवून जातात. आपल्या अस्सल ग्रामीण ढंगातील कवितांमधून वाचकांचे केवळ साहित्यच नव्हे तर जगणेही समृद्ध करणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना मासिक सैनिक दर्पण तर्फे स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन !!!