बोधकथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बोधकथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ४ मे, २०१६

रामराव आणि श्यामराव,


कधीही एकमेकांना न भेटलेल्या दोन व्यक्ती.
आजारपणामुळे एकत्र आलेल्या. रुग्णालयाच्या एका खोलीत दोघांचे दोन बेड. रामराव कर्करोगाने त्रस्त. शेवटच्या पायरीवर असलेले.

तर श्यामरावांना पॅरालिसीसचा अटक येऊन अंगं लुळं पडलेलं. रामराव सुदैवी होते. त्यांच्या बेडच्या बाजूलाच एक भली मोठी खिडकी होती. त्या खिडकीशी ते कायम बसलेले असत. बाहेर घडत असलेल्या अनेक गमतीजमती श्यामरावांना सांगत. "बाहेर एक भली मोठी बाग आहे," ते सांगत. वेगवेगळ्या रंगांची, आकारांची फुलं तिथे फुलत. त्यावर अनेक फुलपाखरं फिरत. झाडावर पक्षी आपली घरटी बांधत.

एके दिवशी रामरावांनी श्यामरावांना सांगितलं, आंब्याच्या झाडावर कबुतराने घरटं बांधलंय. मग त्या दिवसानंतर दोघांचा तो छंदच झाला. कबुतराचं जोडपं नेमकं काय करतंय ते बघण्याचा. श्यामराव सारं काही रामरावांच्या नजरेने पाहत होते. घरटं बांधणं. कबुतराने कबुतरणीची वाट पाहणं. एके दिवशी रामरावांनी चांगली बातमी दिली. कबुतरणीने तीन अंडी दिल्याची. नवे जीव जन्माला येणार होते. दोघंही उल्हसित झाले होते.
श्यामरावांची तब्येत झपाटय़ाने सुधारू लागली. कबुतरणीचं अंडी उबवणं सुरू होतं आणि श्यामराव उठून उभं राहण्याची शक्ती स्वत:त आणत होते. एके दिवशी रामरावांनी बातमी दिली एक अंड फोडून इवलंस पिल्लू बाहेर आलंय. श्यामरावांना पिल्लू बघण्याची उत्सुकता वाढू लागली. आपण स्वत: चालत त्या खिडकीपाशी जायचंच, त्यांनी ठरवलं.

त्याच दिवशी रामरावांच्या दुखण्याने जोर धरला. त्यांचा कर्करोग अंतिम टप्प्यातच होता. आपण जगणार नाही याची कल्पना त्यांना फार पूर्वीच आली होती. त्यासाठी ते स्वत:ला तयार करत होते. अखेर तो क्षण आलाच. त्यांच्या रूममध्ये प्रचंड धावपळ उडाली. रामरावांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं.

दुसऱ्या दिवशी ते गेल्याचीच बातमी आली. श्यामराव खिन्न झाले. आता त्यांना ओढ लागली होती घरटं बघण्याची. दोन पिल्लं अंडय़ाच्या बाहेर येणार होती. श्यामरावांची तब्येत खूपच सुधारली होती. ते आता स्वत:च्या हाताने खाऊ लागले होते. त्यांनी डॉक्टरांना विनंती केली. खिडकीजवळच्या बेडवर जाण्याची. ते खिडकीपाशी आले. त्यांना वाटलं आता कबुतराची पिल्लं नक्कीच चिवचिवत असतील. कबुतरीण त्यांना खायला घालत असलेली पाहायला मिळेल. पण बघतात तो काय.

त्या खिडकीपलीकडे काहीच नव्हतं. रुग्णालयाची भलीमोठी रूक्ष भिंत समोर उभी होती. त्यांनी नर्सला विचारलं, "इथली बाग कुठे गेली?" नर्स हसली. म्हणाली, "ती रामरावांच्या कल्पनेत होती. तुम्हाला बरं वाटावं. तुम्हाला जगण्याची उमेद वाढावी म्हणून रामरावांनी ती तयार केली होती, खास तुमच्यासाठी."

श्यामराव नि:शब्द झाले. आपल्या थरथरत्या हाताने त्यांनी ती खिडकी बंद करून टाकली.. 
शब्दांची जादू अशी असते. ती नवं काही तरी जन्माला घालत असते. सकारात्मक काही घडवत असते. फक्त आपला त्या शब्दांवर विश्वास हवा. पण तोच कमी पडतो.
आपण स्वत: काय आहोत यापेक्षा इतर लोक काय सांगतात त्यावर आपण आपलं आयुष्य घडवत असतो अनेकदा.

भिकारी

✍��
        ☄एक आंधळा भिकारी रस्त्यावर एका बाजूला बसलेला.
त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नाही.
तो एवढा दरिद्री आहे की,
त्याला अश्रूदेखील महाग झालेत.
गेली कित्येक वर्षे तो रडलेला नाही.

एक लेखक पूर्णपणे दिवाळं वाजलेला.
खिशात दमडीदेखील नाही आणि फिरायला बाहेर पडतो.

त्याची नजर त्या भिकार्‍याकडे आणि त्याच्या त्या करूण अवस्थेकडे जाते.

त्या भिकार्‍याच्या बाजूला एक पाटी आणि दोन-तीन खडू पडलेले.

हा लेखक त्या भिकार्‍याकडे जातो आणि म्हणतो,
'मित्रा, मी एक लेखक आहे,
ज्याच्याकडे एक 'पै' देखील नाही.
पण माझ्याकडे कला आहे.
माझ्याकडे शब्दांची शक्ती आहे.
ती मी तुला देऊ शकतो.
तुझ्या परवानगीने मी या पाटीवर काही लिहू का?'

'साहेब', भिकारी म्हणतो,
'माझ्याशी कुणी बोलतदेखील नाही.
मी एक गरीब आंधळा भिकारी. तुम्हाला त्या पाटीचं जे ठिक वाटतं ते करा.'

तो लेखक त्या पाटीवर काहीतरी लिहून निघून जातो.

त्या क्षणापासून भिकार्‍याच्या लक्षात येते की,
एकदम जाणार्‍या-येणार्‍यांपैकी प्रत्येकजण त्याच्याजवळ थांबून त्याच्या पुढ्यात पैसे टाकू लागलाय.

थोड्याच वेळात तिथे पैशाची रास जमते.

तो भिकारी बेचैन होतो.
नाण्यांची रास वाढतच जाते.

तो एवढा अस्वस्थ होतो की, पैसे टाकणार्‍यांपैकी एकाचा हात पकडतो आणि म्हणतो, 'साहेब, माफ करा तुमचा हात पकडल्याबद्दल.
मी एक गरीब आंधळा भिकारी आहे.
मला कृपा करुन जर या पाटीवर काय लिहिलंय ते वाचून दाखवलेत तर फार उपकार होतील हो.'

तो माणूस पाटी उचलतो आणि वाचायला लागतो.

'वसंत ऋतू म्हणजे बहरलेली सृष्टी
आणि माझ्या नशिबी हरवलेली दृष्टी.'

भिकार्‍याच्या गालावरुन अश्रू ओघळायला लागतात.

आयुष्य कुणी जास्त जाणलं?

या ओळी लिहिणार्‍या लेखकानं?
त्या ओळी वाचून पैसे टाकणार्‍या लोकांनी?
...कि इतक्या वर्षांनी रडणार्‍या
त्या भिकार्‍यानं?

तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल.

...पण जर तुमची वाणी गोड असेल,
तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल.

माणसाला बोलायला शिकण्यास (किमान) २ वर्ष लागतात.

पण 'काय बोलावे?' हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते.

'ओढ म्हणजे काय?'
हे जीव लावल्याशिवाय कळत नाही.

'प्रेम म्हणजे काय?'
हे स्वतः केल्याशिवाय कळत नाही.

'विरह म्हणजे काय?'
हे प्रेमात पडल्याशिवाय कळत नाही.

'जिंकण म्हणजे काय?'
हे हरल्याशिवाय कळत नाही.

'दुःख म्हणजे काय?'
हे अपेक्षाभंग झाल्याशिवाय कळत नाही.

'सुख म्हणजे काय?'
हे दुसऱ्याच्या हास्यात शोधल्याशिवाय कळत नाही.

'समाधान म्हणजे काय?'
हे आपल्यात शोधल्याशिवाय कळत नाही.

'मैत्री म्हणजे काय?'
हे ती केल्याशिवाय कळत नाही.

'आपली माणसं कोण?'
हे संकटांशिवाय कळत नाही.

'सत्य म्हणजे काय?'
हे डोळे उघडल्याशिवाय कळत नाही.

'उत्तर म्हणजे काय?'
हे प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही.

'जबाबदारी म्हणजे काय?'
हे त्या सांभाळल्याशिवाय कळत नाही.

'काळ म्हणजे काय?'
हे तो निसटून गेल्याशिवाय कळत नाही
��������������������������������

सोमवार, १४ डिसेंबर, २०१५

संगत

एकदा नारद मुनींनी श्रीकृष्णांना
सहज विचारले-

"देवा सत्संग सत्संग म्हणतात
त्याचा एवढा काय हो महिमा"?
.
यावर देवांनी त्यांना काही एक उत्तर न देता
.
एका किटकाचा निर्देश करून सांगितले कि
तो कीटक तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल.
.
नारद मुनी त्या किटकाला शोधत
नरका पर्यंत गेले आणि
त्यांनी त्या किटकाला विचारले-
"सत्संगा चे काय फळ आहे तुला माहित आहे का?"
.
कीटका ने त्यांचे कडे एक कटाक्ष टाकला
आणि तो मृत झाला.
.
प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने
ते पुन्हा श्रीकृष्णा कडे आले म्हणाले
देवा तो कीटक तर काही बोलल्या
विनाच मृत झाला आता
तुम्हीच उत्तर सांगा.
.
देवांनी नारदां चे म्हणणे ऐकून घेतले
आणि ते म्हणाले "तेथे पहा त्या समोरच्या
झाडावर घरट्यात एक नुकतेच जन्मलेले
पोपटाचे पिलू आहे
ते तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल."
.
नारदमुनी त्या पोपटाचे पिला जवळ गेले
आणि त्यांनी त्यालाही तोच प्रश्न विचारला.
.
पोपटाचे पिलाने एकदा डोळे उघडून
त्यांचे कडे पहिले आणि
त्याने डोळे मिटले ते कायमचेच.
.
नारद मुनी मनाशीच विचार करू लागले
काय सत्संग करण्याचे फळ मृत्यू आहे.
.
कारण मी ज्यांना ज्यांना हा प्रश्न केला?
ते मृत्यू पावले.
.
अत्यंत दुखी होहून ते पुन्हा श्रीकृष्णा पाशी आले.
म्हणाले "देवा आपलाल्या सांगायचे नसेल
तर नका सांगू नका
पण मी ज्यांना ज्यांना हा प्रश्न विचारतोय
ते मृत होत आहेत -
अजून किती जणांच्या हत्येच्या पापाचे
धनी मला करणार आहात"
.
तेंव्हा देव त्यांना म्हणाले "
त्याची चिंता तू करू नकोस
तुला खरेच जर या प्रश्नाचे उत्तर हवे असेल
तर ते पहा नुकत्याच तिथे एका गाईने बछड्या ला
जन्म दिलाय
तो बछडा तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल."
.
दुखी अन्त: कारणाने नारदांनी तेथे जावून
.
त्या बछड्या च्या कानाशी लागून
त्यालाही तोच प्रश्न केला;
.
त्यानेही नजर वळवून त्यांचे कडे पहिले
आणि ते तेथेच लुढकले.
.
नारद मुनी घाबरून देवांकडे कडे परत आले
तथापि त्यांना पुन्हा एकदा आश्वासित करून
श्रीकृष्ण म्हणाले
.
"राज्यात नुकताच एक राजपुत्र जन्माला आहे
त्याचे कडून तुम्हाला निश्चित या प्रश्नाचे उत्तर मिळेल."
.
नारदांनी विचार केला आता पर्यंत
कीटक पोपट व बछड्या चे मृत्यू ने
माझ्यावर काही आपत्ती आली नाही
पण राजकुमाराचे जर काही बरे वाईट झाले
तर माझे प्राणही संकटात येवू शकतात.
.
तथापि देवाचे भरवश्यावर ते राजकुमारा कडे गेले
आणि त्यांनी धाडस करून राजकुमाराला मांडीवर घेतले
आणि पापा घेण्याचे निमित्त करून हळूच
त्याचे कानात विचारले-
.
सत्संगतीत राहिल्याने काय लाभ होतो ?
.
प्रश्न ऐकून राजकुमार हसू लागला
आणि म्हणाला मुनिश्रेष्ठ अजून आपण नाही समजलात.
.
आहो आपण पहिल्यांदा मला भेटला
.
तेंव्हा मी कीटक होतो
आपण मला हा प्रश्न विचारला
आणि मी मेलो
आणि पोपट झालो ;
.
नंतर आपल्या दर्शनाने मी घरट्यात मेलो
आणि मला बछड्या चा देह प्राप्त झाला ;
.
पुन्हा आपले दर्शन घडले
आणि बछड्या चा देह पडून
.
सर्व देहा मध्ये श्रेष्ठ असा हा मनुष्य देह प्राप्त झाला
.
आणि पुन्हा आत्ताच्या दर्शनाने मला पूर्णत्व प्राप्त झाले ;
.
हे सर्व आपल्या सारख्या संतांचे दर्शनाचेच फळ आहे. .
ज्यांना आपल्या सारख्या संतांचा सहवास मिळतो
ते धन्य आहेत.
.
नारदांना त्यांचे प्रश्नाचे उत्तर मिळाले
व सत्संगाचा महिमा हि कळाला,
.
ते देवांकडे आले आणि म्हणाले
"देवा जशी आपली लीला अगाध
तशीच आपली समजावून देण्याची पद्धत
हि दीव्य आहे "
.
.
म्हणून मित्रांनो जिवन जगताना
संगत ही खुप महत्वाची आहे
.
बाभळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर
.
बाभळीच्या काट्याने त्याची संपुर्ण पाने फाटून जातात
.
या उलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचे झाड वाढले तर
.
लिंबाच्या गाभ्याला चंदनाचा सुवास येतो
.
ज्या प्रमाणे रामाच्या सहवासात हनुमान धन्य झाला
.
श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वोश्रेष्ठ योद्धा झाला
.
याउलट दुर्योधनाच्या सहवासाने भीष्म ,
कर्ण सर्वोश्रेष्ठ असुन ही त्याचा नाश झाला
.
आपण ज्या सोबत रहातो त्याच्या विचारांचा,
रहाणीचा, वागणीचा, अंमल
हा आपल्यावर होत असतो.
.
संगतीने विचार श्रेष्ठ अथवा दुषित होतात
.
संगत कशी हवी याचा विचार करावा...

बुधवार, २५ नोव्हेंबर, २०१५

हार्ट टचिंग लवस्टोरी

..

मुलगा : हॅलो हनी..
मुलगी : I MISS U …आज सकाळ पासून खूप आठवण येते तुझी…
I LOVE YOU MAZA RAJA..
मुलगा : (थोडा वेळ शांत राहतो)
हनी.. तू आता माझ्या जवळ येऊ शकतेस का ???
मुलगी : हो… I Love You SONA... मला हि तुला खूप भेटावंस वाटतंय..
मुलगा : मी हॉस्पिटल मध्ये आहे.. प्लीज ये हा..
मुलगी : (थोडी घाबरते) काय झालाय तुला..??
प्लीज सांगा न… (आणि रडते)
मुलगा : हनी.. रडू नकोस फक्त माझ्याजवळ ये स्विटहार्ट..
प्लीज... आय मिस यू..
(मुलगी लगेच फोन कट करते आणि मुलाजवळ
पोहचते, मुलगा बेशुद्ध असतो हॉस्पिटल मध्ये.. मुलगी मुलाच्या पप्पांना विचारते)
मुलगी : काका... सोना ला काय झालंय....?
मुलाचे पप्पा : तू सोनाला ओळखतेस का...?
मुलगी : हो.. मी त्याची बेस्ट फ्रेंड आहे..
मुलाचे पप्पा : (थोडा उदास होऊन लहान आवाजात) सोनाला ब्लड कॅन्सर झाला आहे, प्लीज तू त्याला जेव्हा भेटशील तेव्हा त्याला काही सांगू नकोस कि त्याला कॅन्सर झाला आहे. त्याला काहीच माहिती नाही याबद्दल...
(हे ऐकुन तिला काहिच सुचत नाही, तिला वाटते हे सर्व स्वप्न तर नाही ना… हे स्वप्नंच असावं…)
काही वेळानंतर मुलाला शुध्द येते.
मुलगा त्याच्या पप्पांना विचारतो….
मुलगा : पप्पा कोणी भेटायला आलंय
का मला…?
पप्पा : हो बाळा.. तुझी कुणी बेस्ट फ्रेंड आली आहे..
मुलगा : प्लीज पप्पा , मी तिला एकांतात भेटू शकतो का..?
पप्पा : मी तिला पाठवतो
(मुलाचे पप्पा बाहेर जातात आणि मुलीला बोलतात, बाळा तुला तुझा सोना बोलावतो आहे..  लगेच  स्वताःची बॅग जमिनीवर टाकून ती मुलाच्या रूमकडे धावत जाते, रूमच्या दरवाजाजवळ थोडा वेळ थांबून आपले डोळे पुसते आणि रूम मध्ये अशी जाते..  कि जसा तिला काही माहिती नाही)
मुलगी : माझ्या सोना..  तू बरा आहेस आता...!!!
मुलगा : हनी... तू आलीस ना, मग आता मी ठीक आहे..
मुलगी : (खूप रडू येतं.. पण मुलासमोर गप्प राहते) हो.. तू लवकर बरा होशील...
मुलगा : (हसत) हनी... उद्या परत कॉलेजच्या मागच्या सीटवर बसू...
पण हो...तू उद्या माझ्याकडे जास्त
नको बघू, उद्या फक्त स्टडी.. ओके...
तू तर वेडी आहेस, तू पण स्टडी करत नाहीस आणि मला पण करू देत नाहिस...
सारखी मलाच पाहत असतेस…
मुलगी : (डोळ्यातून पाणी येत पण, मुलाने पाहु नये म्हणून लगेच डोळे पुसते... थोडी हसते आणि बोलते)
हो सोना...
उद्या तू स्टडी करून घे, नाही पाहणार मी तुला बस्स्स……
मुलगा : (हळू आवाजात बोलतो)
हनी…
मुलगी : काय …? बोल ना…
मुलगा : तू प्रत्येक वेळी माझी किती काळजी घेतेस...
मुलगी : (डोळ्यात पाणी थांबवू शकत
नाही, ती रडते)
मुलगा : काय झाल हनी....
मी ठीक आहे…. प्लिझ...रडू नकोस स्वीटहार्ट…….
मुलगी : मी रडत नाहीये….
माझे आयुष्य तुला मिळो.. हीच इच्छा आहे देवाकडे... तुला काही होवू देणार नाही मी… (डोळे पुसून बोलते )
मुलगा : प्लीज.. हनी.... मला मिठीत घे ना..!
(मुलगी मुलाच डोक मांडीवर ठेवते )
मुलगा : आज तुझ्या मांडीवर शांत झोपावंस वाटतंय...
मुलगी : (डोळ्यातून पाणी येत असत)
प्लीज सोना... असा बोलू नकोस प्लीज...
मुलगा : फक्त थोडा वेळ झोपू दे ना..
स्वीटहार्ट...खूप छान वाटतय…
काय माहिती...? परत कधी वेळ मिळेल कि नाही...?
मुलगी : ओके माझ्या राजा...
झोप तु….!
मुलगा : हनी...
"I WILL ALWAYS MISS U...
फक्त तुझाच..
("आय विल ओल्वेज मिस यु")
(आणि मुलगा डोळे बंद करतो... काही वेळानंतर मुलीला कळतं कि तीचा सोना... आता या जगात नाही राहिला, तरीही ती त्याला सोडत नाही, मांडीवर घेऊन तशीच बसते आणि तीही स्वताःचे डोळे बंद करते)

खूप उशीर झालेला असतो, म्हणून मुलाचे पप्पा रूममध्ये जातात आणि बघतात की, त्यांच्या प्रेमळ मुलाने त्याच्या बेस्ट फ्रेंडच्या मांडीवर जीव
सोडला होता...

... आणि त्या मुलीचा श्वासही थांबला होता....!!!

दोघेही सोबतच जीव सोडतात...!!!
.
.
.
.
.
.
.
जर तुम्ही हि कुणावर प्रेम केलं असेल
तर..... तुम्हाला त्याची शपथ... !!!
या स्टोरीला एवढ शेअर करा कि,
जो कुणी हि स्टोरी वाचेल,त्याच्या डोळ्यातून पाणी येइल….!!!