रविवार, २२ नोव्हेंबर, २०१५

तुळशी विवाह ....!!!


"ॐ श्री तुल्स्ये विधमहे,         
विश्नुप्रियाय धीमहि,
तन्नो वृंदा:प्रचोदयात "

तुळशी विवाह ....!!!...
आज पासून तुळशी विवाहास प्रारंभ होतोय.!!!
आधारवड परिवार तर्फे हार्दिक शुभेच्छा..!!!

कार्तिक शुक्ल एकादशीला तुळशी विवाह साजरा केला जातो.
तुळशीचे जीवनचक्र वैष्णवजनांच्या श्रद्धेशी व समर्पणाशी जोडले गेले आहे.
विष्णूचे भक्त नियमित तुळशीची पूजा करतात.
तुळशीशिवाय आपले घर व अंगण अगदी ओकेबोके, संस्कारहीन वाटते.
तुळस घरादारातील वातावरण पवित्र करते.

तुळशीचे एक पान देवाच्या समकक्ष बसण्याचे सामर्थ्य ठेवते.
तुळशी म्हणजेच
'तुलां सादृश्यंस्यति नाशयती इति तुलसी ..!!!
देवाला पूर्णपणे वरण्याची क्षमता राधा, सत्यभामा, रूक्मणी व सोळा हजार पट्टराण्यांमध्येही नाही.
देवाला वरण्यासाठी जो पवित्र गंध व श्रध्दा, सात्विक एकांत हवा तो तुळशीत आहे.....

तुळशी विवाहाचा अर्थ विश्वव्यापी सत्तेला,  वृक्षातील चेतनेची करूण हाक असा होतो.
या विवाहामागचा गर्भितार्थ लक्षात घेतला पाहिजे.
हा विवाह पृथ्वीचे सुख-समृध्दी भरपूर पाऊस व चांगले पीक या सोबतच लोककल्याणाची आस या गोष्टींचे प्रतीक आहे....
म्हणूनच या भूतलावर असलेले दु:ख-दारिद्र्य, रोग-राई, भय, द्वेष, नैसर्गिक आपत्ती यापासून मुक्ती मिळविण्यासाठी सर्वजण मिळून तुळशीला साकडे घालू या...!!!

आषाढीला झोपलेले देव जेव्हा जागे होतात, त्यावेळी हरीवल्लभा तुळशी त्यांची प्रार्थना ऐकते.
तुळशी विवाह देव जागे होण्याच्या काळातील पवित्र सोहळा मानला जातो.
तुळशी विवाह संपूर्ण वैष्णवी चेतनेद्वारा पाहिलेले एक महास्वप्न आहे, ज्यात देव स्वत: खाली उतरतात व या पृथ्वीतलावर अणूरेणूंना तेजाने प्रकाशमय करतात....

तुळशी विवाहाचा सरळ अर्थ तुळशीच्या माध्यमातून देवांना आवाहन करणे असा होतो.
तुळशीला केलेली प्रार्थना देवांपर्यंत पोहोचते. यामुळे तुळशीला सामान्यांचा कल्पवृक्ष संबोधतात.
आपल्यात देवांपर्यंत पोहोचण्याचे सामर्थ्य नसते. तुळशी आपले दु:ख ऐकून ते देवांपर्यंत पोहचवते, असे मानले जाते.
म्हणूनच तुळशी व‍िवाह करविला जातो आणि या भूतलावर असलेले दु:ख-दारिद्र्य, रोग-राई, भय, द्वेष, नैसर्गिक आपत्ती यापासून मुक्ती मिळविण्यासाठी सर्वजण मिळून तुळशीला साकडे घालू या..!!!.

हिंदुधर्मात श्रीविष्णूची पूजा करताना तुळस अत्यावश्यक मानली गेली आहे.
पद्मपुराणात सांगितले आहे की तुळशीच्या रोपाभोवतालची मातीसुद्धा पवित्र असते. पूजेसाठी दिवा लावताना त्यात तुळशीची काडी घातली, तर लाखो दिवे लावल्याचे श्रेय लाभते..
तुळस म्हणजे विष्णुपत्नी लक्ष्मीचा अवतार.
कृष्णाची राधा म्हणजे तुळसच.
बालपणी कृष्ण मथुरेजवळच्या ज्या उपवनात राधेबरोबर क्रीडा करत असे, त्या उपवनाला वृंदावन असे म्हणतात. वृंदा म्हणजे राधा, म्हणून तुळशीला वृंदा असेही नाव आहे.

कार्तिक महिन्यातील शुक्ल द्वादशीला तुळशीचे लग्न समारंभपूर्वक बाळकृष्णाशी लावण्यात येते.
तुळशी घराघरात असायलाच हवी, अशी बहुगुणी वनस्पती आहे.
पूजेअर्चेच्या निमित्ताने तिला आपलेसे केले आणि गरजेनुसार वापरले तर आरोग्याचा लाभ होण्यासाठी निश्‍चितच हातभार लागेल...!!!..

तुलसी म्हणजे एकमेव, अद्वितीय.
वृंदा म्हणजे फुलांचा घोस.
प्राचीन काळी मंदिरे ही पांथस्थांची आश्रयस्थाने होती.
मंदिरांच्या प्रांगणांत तुळशी लावलेल्या असत.
तृषा शमवण्याचा उत्तम गुणधर्म तुलसीपत्रात आहे. चार पाने जिभेखाली ठेवली, तर थकल्या-भागल्या, तहानलेल्या पांथस्थाची तहान कमी होते. काळाच्या ओघात तुळशीचा हा गुणधर्म स्मृतीआड झाला आणि मंदिरांच्या प्रांगणांत तुळशीला धार्मिक वनस्पती म्हणून महत्त्व आले......
धार्मिक व्यक्ती तसेच वारकरी भक्ताच्या गळ्यात तुळशी काठमाळा शोभते.
तुळशीमध्ये औषधी गुणधर्म भरपूर आहेत....

गृहस्थाच्या अंगणात हवे तुळशीचे रोप
तुळस ही हे माझे आई...
तुच आमची पूण्याई......!!!!
घराचे अंगण' हे तुळशीने सुषोभित होते.....

तुळस ही एकमेव वनस्पति अशी आहे की जी रात्रंदिवस फक्त प्राणवायु घेते, हेच माणसाला आरोग्यदायी असते.....
कोणतेही दान करताना त्यावरती तुळशीचे पान ठेवण्याची प्रथा रूढ आहे...
पूर्वी काशी यात्रेला जायचे त्यावेळी मोह , माया सोडून घरावर तुळशीपत्र ठेवून जायचे.....!!!!

पंढरीचा पांडुरंग तुळस -मंजिरीच्या हाराशिवाय राहूच शकत नाही.....!!!
तुळशी विवाहच्या सर्वांना आधारवड परिवार तर्फे हार्दिक शुभेच्छा..!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा