आरती संग्रह लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आरती संग्रह लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २१ मे, २०१६

!! श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती !!

!! श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती !!

जय जय सद्गुरु स्वामी समर्थाँ
आरती करु गुरुवर्या रे॥
अगाध महिमा तव चरणांचा
वर्णाया मती दे यारे॥धृ॥

अक्कलकोटी वास करुनिया
दाविली अघटीत चर्या रे ॥
लीलापाशे बध्द करुनिया
तोडिले भवभया रे॥१॥

यवने पुशिले स्वामी कहाँ है?
अक्कलकोटी पहा रे ॥
समाधिसुख ते भोगुनी बोले
धन्य स्वामीवर्या रे॥२॥

जाणसी मनीचे सर्व समर्थाँ
विनवू किती भव हरा रे ॥
इतुके देई दीन दयाळा
नच तवपद अंतरा रे॥३॥

जय जय सद्गुरु स्वामी समर्थाँ
आरती करु गुरुवर्या रे॥
अगाध महिमा तव चरणांचा
वर्णाया मती दे यारे॥धृ॥

सर्वांना शुभ संध्या......!!

स्वामी संध्या......!!

गुरुवार, १७ डिसेंबर, २०१५

खंडोबा महाराज तळी

खंडोबा महाराज तळी आरति||
॥ जय मल्हार ॥
बोल खंडेराव महाराज की जय॥
सदानंदाचा येळकोट ॥
येळकोट येळकोट जय म ल्हार॥
हर हर महादेव॥ चिंतामण मोरया॥
भैरोबाचा चांदोबा॥ अगडबंब नगारा॥
सोन्याची जेजुरी॥ मोत्याचा तुरा॥
निळा घोडा॥ पाई तोडा॥
कमर करगोटा ॥ बेंबी हिरा॥
गळयात कंठी॥ मोहन माळा॥
ङोईवर शेला॥ अंगावर शाल॥
सदा हिलाल॥ जेजुरी जाई॥
शिकार खेळी॥ म्हाळसा सुंदरी॥
आरती करी॥ देवा ओवाळी ॥
नाना परी॥ देवाचा श्रृंगार ॥
कोठ लागो शिखरा॥ खंडेरायाचा खंडका ॥
भंडाऱ्याचा भडका॥ बोल सदानंदाचा येळकोट ॥
येळकोट येळकोट जय मल्हार॥
हि आरती श्री खंडोबा महाराजांची तळी भरतांना संपुर्ण महाराष्ट्रात बोलली जाते.