प्रेम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रेम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ४ डिसेंबर, २०१५

'मेड फॉर इच अदर'


कागदावर जुळलेली पत्रिका आणि
काळजावर जुळलेली पत्रिका यात अंतर राहातं.
लाखो मनांच्या समुद्रातून योगायोगाने २ मनं अगदी एकमेकांसारखी समोर ठाकणं
जवळ-जवळ अशक्य आहे., हे मानूनच हा डाव मांडायचा असतो. वेगळ्या वातावरणात, संपूर्ण निराळे संस्कार लाभलेले २ जीव, एकमेकांसारखे असतीलच कसे? सुख-दुख:, प्रेम-भांडणाचे, काळे-पांढरे चौकोन ओलांडण्याचा खेळ खेळवण हीच तर नियतीची जुनी हौस आहे.
सरळ सोप आयुष्य नियतीने देवालाही दिलेले नाही. या न देण्याचंच 'देणं' स्वीकारून
संसारात पाऊल टाकायचं असतं.
निसर्गात १ पान दुसऱ्या पानासारखे
नाही, तर तुला मिळणारा 'जीवन-
साथीदार' अगदी तुला हवा तसा असणार कसा? ...... त्याचे आपले काही गुण जुळणारे नसणारच, ते तू स्वीकारणार असशील, त्या
वेगळ्या तुला न पटणाऱ्या गुणांतच, त्याचं माणूस म्हणून वेगळेपण आहे, हे मान्य करणार असशील तरच संसारात पाऊल टाक ---
अशा आशयाचं समुपदेशन हि काळाची गरज आहे कागदावरच्या कितीही कुंडल्या बघा, बघण्याच्या समारंभात गच्चीवर गप्पा
मारताना छंद ,महत्त्वाकांक्षा , श्रद्धा-
अंधश्रद्धा असे तेलकट प्रश्न विचारा, या प्रश्नांची उत्तरं हि सौंदर्य-स्पर्धेतील तात्पुरत्या सुंदर मुलींच्या भंपक उत्तरांसारखीच.
लग्नानंतर एकमेकांना कळतं, तेव्हा म्हणाली होती, 'वाचनाचा छंद आहे'- पण नंतर साधं वर्तमानपत्र एकदाही उघडल नाही बयेन.
जाब विचारू शकतो आपण ?
किंवा तो म्हणाला होता - 'प्रवासाची
आवड आहे; जगप्रवास करावा, हिमालयात ट्रेकिंग कराव - असं स्वप्न आहे !!! पण
प्रत्यक्षात कळत; कामावरुन आला , कि
जो सोफ्यावर लोळतो - गव्हाचं पोतं जसं.
ताट वाढले ---हे हि चारदा सांगाव लागत.
प्रवासाची आवड कसली ? - कामावर  जाऊन घरी परत येतो नशीब .
वर्षभर सांगतेय , महबळस्वरला जाऊ - तर उत्तर म्हणून फक्त जांभया देतो. कसले ३२ गुण जुळले देव जाणे. उरलेले न जुळलेले ४ कुठले ते
कळले असते तर........
.......न जुळलेल्या गुणांशीच खर तर लग्न असत. तिथं जमवून घेणं ज्या व्यक्तीला जमलं, तीच व्यक्ती टिकली. नाही जमलं कि विस्कटली ...... अन्याय -शोषण सहन न करणं , हा पहिला भाग झाला ---- पण न जुळलेल्या गुणांमध्ये एकमेकांच्या वेगळ्या क्षमतांचा शोध घेऊन -- नात जुळतंय का हे पाहण्याची
सहनशीलता दोघांमध्ये हवी .
आज हे स्त्री -पुरुषांना प्राण पणाने
सांगितलंच जात नाहीये ; नाही जुळलं -
मोडा ;
व्हा विभक्त - आणि मग करा काय??
आपल्याला 'हवी तशी ' व्यक्ती मिळणं हे १ परीकथेतील स्वप्न असेल; पण वेगळ्या रंगाच्या धाग्याने टाके घालीत आयुष्य जोडत ठेवावं लागतं ---- हेच एक सत्य आहे.
धुमसत राहणाऱ्या राखेत कसली फुल फुलणार ?
एकमेकांचे काही गुण जुळणारच नाहीत, ते मी स्वीकारणार आहे का?
या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर स्वतःशी
देऊनच संसार मांडायला हवा.
आपल्यापेक्षा कोणत्याही वेगळ्या
व्यक्तीच वेगळेपण सहज स्वीकारणं हे या
वाटेवरच पाहिलं पाऊल...... ते पाऊल योग्य विश्वासाने पडलं कि इतर सहा पावलं सहज
पडत जातात..
Fact of couple life..

खर प्रेम काय असत?

2
एक धनगर मेढया चरायला सोडुन ढोल वाजवत बसला होता.

त्याने
पाहीलं की ढोलच्या आवाजाने एक
हरीणी त्याच्या शेजारी येऊन
बसली,
जसजशी त्या ढोलवर धनगराची थाप
पडायची तसतसं त्या हरीणीच्या डोळ्यांतुन अश्रु यायचे,
एक दिवस गेला,

दोन दिवस
गेले, तीन, चार, पाच दिवसांमागुन दिवस गेले.

पण परिस्थिती काही बदलत नव्हती,

धनगर जसजसं
ढोल वाजवायचा ती हरीणी तिथे येऊन जवळ बसुन रडु लागायची..

एक दोनवेळा त्या धनगराने त्या हरीणीला हाकलले
देखील पण जसजशी ती थाप ऐकु
यायची ती पुन्हा त्या आवाजाने तिकडे ओढली जायची...

मग एक दिवस धनगर ढोल
वाजवता वाजवता मध्येच थांबला,

ती हरीणी रडणं
थांबवुन निघुन जाऊ लागली.

त्याने
पुन्हा वाजवायला सुरुवात
केली.

हरीणी पुन्हा जवळ आली,

धनगराने हरीणी समोर हात जोडले आणि म्हणाला,

माझं काही चुकतं का गं?

मी कित्येक दिवस बघतोय
जेव्हा जेव्हा मी ढोल वाजवतो तेव्हा तेव्हा तु ईथे येऊन रडतेस.

कारण काय आहे.

सांगना माझं
काही चुकतं का गं?

तेव्हा ती हरीणी म्हणाली,

तुम्ही कोण आहात
मला माहीती नाही,

हे काय वाद्य आहे मला माहीती नाही,

पण जेव्हा तुम्ही हे वाद्य
वाजवता,

यावर पडणारी तुमच्या हाताची प्रत्येक थाप माझ्या काळजावर घाव घालते हो, कारण
याला जे कातडं लावलंय ना,

ते माझ्या आयुष्याचा साथीदार,माझ्या नवर्याचं आहे..

हे ऐकुन धनगर निशब्द झाला..

हरीणी पुढे म्हणाली,

माझी एक विनंती आहे तुम्हाला॥

माझ्या मृत्युनंतर
या वाद्याच्या एका बाजुला माझं कातडं लावा,

कारण या वाद्यातुन मनाला परमोच्च सुख
देणारे संगीत तेव्हाच बाहेर पडेल


जेव्हा दोन्ही बाजुंनी ढोल तितक्याच लयमध्ये
वाजवला जाईल.

म्हणजेच त्याच्या एवढंच दुःख
मलाही सहन करावं लागेल..

असं म्हणुन
त्या हरीणीने जागीच प्राण सोडले..

दुःखी मनाने त्या धनगराने त्या हरीणीचं कातडं
ढोलच्या एका बाजुला लावलं. आज तो ढोल
वाजवताना त्या हरीणीच्या डोळ्यातुन पाणी येत
नाही

पण तो ढोल
वाजवणार्या धनगराच्या डोळ्यांत मात्र अश्रु दाठुन येतात कारण जेव्हा तो ढोल दोन्ही बाजुने
वाजतो तेव्हा त्याला वाटतं ते जोडपं एकमेकांशी बोलुन आपली सुख दुःखं वाटुन घेत
आहेत.

ज्यांनी जन्मच नाही तर मरण देखील वाटुन घेतलं.......

Its call True Love