सरकारी कर्मचारीसाठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सरकारी कर्मचारीसाठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १७ फेब्रुवारी, २०१६

पोलीस

पोलीस

सिग्नलजवळ उभ्या असलेल्या पोलिसांना बघुन बरीच मंडळी बगळा, मामा, रिश्वतखोर आशा उपमा देऊन हसत असतात..
मित्रांनो जरा डोळे बंद करून त्यांच्या जागी स्वतःला ठेवून बघा तुम्हाला समजेल की आठ तास एका जागी उभे असणे काय असते ?
हजारो वेगवेगळ्या प्रवृत्तींना तोंड देणे काय असते? गाडयांचा, हाॅर्नचा कर्कश आवाज तसेच धुळ सोसणे काय असते? कट मारुन जाणाऱ्या प्रवृत्तीची कशी चीड येते? सिग्नल तोडून एखादा पुढारी कसा आव आणतो, ट्रिपल शिट बसून शेंबडी पोर शिव्या देऊन पळतात तेव्हा मनस्थिती कशी असते, आणि हे सर्व सोसत असताना घरच्या आठवणीनां जागा सुद्धा नसते, कामाची चिडचिड स्वभावात आल्यामुळे कुटुंबाची वाताहत होते. .
हे सगळ डोळे उघडल्यावर तुम्ही निमुटपणे सोसु शकलात तर तुम्हाला पोलिसांवर हसण्याचा अधिकार आहे आणि त्यांच्या लाचखोरीबद्दल बोलायचच तर आपल्यापैकी एकही व्यक्ती नसेल की ज्याने गाडी पकडल्या नंतर पोलीसांना आॅफर केली नसेल, गाडी पकडली की आपण बकरी सारखे शरण जाऊन साहेब घ्या मिटवून म्हणतो मग त्यांच्या हया लाचखोरीला जबाबदार कोण? 
जुने लोक सांगतात पुर्वीच्या पोलिसांना खूप मान असायचा आणि सामान्य माणसाला त्यांची आदरयुक्त भिती वाटायची..
मित्रांनो माणूस नोकरीत, व्यवसायात दोन गोष्टी शोधत असतो पैसा आणि सन्मान.  आपण त्यांचा सन्मान हिरावून घेतला आहे आणि आपण त्यांच्याकडून १०० % प्रामाणिकपणाची अपेक्षा करतो..
म्हणूनच चला आज असा निश्चय करूया कि पोलिसांना त्यांचा हरवलेला सन्मान परत मिळवून देण्यासाठी काम करू, उन्हात ड्युटी करणार्‍या पोलीसांना किमान पाणी तरी विचारू, आपुलकीने त्यांची चौकशी करू, सुजाण नागरिक म्हणून पोलिसांना सहकार्य करू, नेत्यांनी आपला रूबाब दाखवण्यासाठी पोलिसांशी अरेरावी करू नये,
पोलीस ही मानव निर्मीत शक्ती आहे ह्या शक्तीबद्दल आदरयुक्त भिती तयार झाली तरच येणाऱ्या काळात देशाची अंतर्गत सुरक्षा सक्षम राहील.
हया गोष्टींची सुरूवात आजपासून महाराष्ट्रामध्ये करू.

बुधवार, १० फेब्रुवारी, २०१६

महागाई भत्त्याच्या दरात 2006 पासून सुधारणा

महागाई भत्ते
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर
करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात 2006 पासून सुधारणा with date D.A.***********
1) 1.1.2006. Nil
2) 1.7.2006 2%
3) 1.1.2007. 6%
4) 1.7.2007. 9%
5) 1.1.2008. 12%
6) 1.7.2008. 16%
7) 1.1.2009. 22%
8) 1.7.2009. 27%
9) 1.6.2010. 35%
10) 1.11.2010. 45%
11) 1.5.2011. 51%
12) 1.10.2011. 58%
14) 1.1.2012. 65%
15) 1.7.2013. 72%
16) 1.1.2013. 80%
17) 1.7.2013. 90%
18) 1.5.2014.100%
19) 1.7.2014 107%(feb-15)
20) 1.1.2015 113% (Oct-2015)
21) 1.7.2015 119% (feb-16,)
संग्रही ठेवा