दिवाइना दिन, 
धाबेधाबे दिवा, 
भाऊ कसा म्हणे, 
आज बहिनना येना
दिवाइ-दसरा, 
खेती बाइना पसारा, 
भाऊ कसा म्हणे, 
बहिणी दिवाई इसरा
दिवाइना दिन, 
मना ताटमा नथ, 
ओवाइज ऊनू, 
मनं धनभर गोतं
दिवाइना दिन, 
मना ताटमान येल्या, 
ओवाई ऊनू, 
पिता तुन्या बोरसान्या गल्ल्या
दिवाइना दिन 
मन ताट जडजड..
नवस्या बंधू मना 
टाके येलीसना जोड...
दिवाइना मुयी
 वाटे लाई द्या सासरा, 
मना भाऊस्ले ओवायाले 
सण नही रे दुसरा..
 दिवाईनं मुई 
नका फिरावा सासूबाई...
बंधूले ववयाले 
सन दुसरा नही ..
दिवाइना मुयी 
वाटे लाई दे सासूबाई, 
भाऊ मना फिराले फिरी जाई,
 माय मनी रत्ना वाट पाही...
 सासू आत्या बाई 
पाया पडू दया भागात, 
दिवाइनं मुयी भाऊ
 मना फिरी ग्या रागात
माय तव माहेर, 
बाप तवं येरझार 
भाऊ-भाऊजाइनं राज, 
वाट दखू मी निरधार
मायबापनं राज 
राज पानीमा चाले जहाज .
भाऊ भवजाईनं राज 
लेकी मनले समज...
मायबापनं राज 
खाऊ शिकावरनं दही 
भाऊ भवजाईनं राज 
ताक पानीनी सता नही.
मोठं म्हनं घर 
मोठा घरनी नवाई..
नही ऊन्यात बहिणी 
सुनी लागस दिवाई 
भाऊ नी बहिण 
येक येलनं वाईक ..
उनी पराई भवजाई 
ईनी तोडूनी करं लोक..
                  
हाई दिवायी तुमले बठ्ठासले आनंदमा जावो, हाई त्या जग निर्माता ले इनंती.
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा