गुरुवार, ३ डिसेंबर, २०१५

श्री सप्तशृंग निवासिनि राजराजेश्वरी सप्तशृंगी देवीबाबतचे काही रहस्य...

1.गडावर साग ,काग,नाग दिसत नाही ,गडाच्या आजुबाजुला भरपुर सागाची झाडे असुन सुध्दा
जंगल परीसर आहे तरी नाग दिसत नाही
आणि कावळयाचे दर्शन फार दुर्मीळ
2. देवी मध्ये महासरस्वती, महाकाली,महालक्ष्मी ह्या त्रिगुणात्मिका आहेत
ह्या मीळुन देवीचे स्वरुप आहे
3. वणी गडावर सप्त मातृका हि आहेत
1 शिवा 2 चामुण्डा 3 वाराही 4 वैष्णवी 5 इंद्राणी 6 कार्तिकेयी 7 नारसिंही
ह्या सात योगमाया गडाच्या सात शिखरावर क्रमाने विराजमान आहेत
4. गडावर मच्छिंद्रनाथाना देवीने शाबरी विद्येचे धडे दिलेत त्याची समाधी ही गडावर आहे
5.सप्तशृंग गडा द्रोणागीरी पर्वताचाच एक भाग आहे
राम —रावण युध्दात लक्ष्मण जखमी झाले तेव्हा हनुमंताना द्रोणागीरी आनण्यास सांगीतले
द्रोणागीरी आणतांना त्याचा काही भुभाग सह्याद्री पर्वतात पडला तोच भुभाग म्हणजे सध्याचा
सप्तशृंग गड
6. गडावर संजिवनी बुटी आहे पण कलियुगात आईसाहेबांनी ती गुप्त स्वरुपात ठेवली आहे
7. देवीच्या दारी औदुंबराची छाया आहे तेथे दत्त दिगंबर भेटीसही येतात
त्या औदुबंराखाली शुभ्र नागराज लअसुन त्याच्या मस्तकात शक्तीशाली हिरा आहे
8. राम सिता लक्ष्मण वनवास काळी पंचवटीत आले तेव्हाग गडावर आईसेबांचे नित्य दर्शनास येत असत
9. देविच्या द्वारी कासव आहे, कासवीन जसी प्रेमळ नजरेन आपल्या पिलांचे पालन पोषन करते
तसे आई भगवती आपल्या भक्तांचा सांभाळ करते
आणि कासव गती ने दर्शनास यावे असेही सांगते
घाई गर्दि करु नये हाही त्यामागील उद्देश आहे
10. ज्ञानेश्वराची ही कुलस्वामिनी आहे ,त्याचे मोठे बंधु निवृत्तीनाथ हे समाधी घेण्यापुर्वी वणी गडावर आले होते.
भगवती च्या आदेशानुसार त्यानीं त्रंबकेश्वर येथे समाधी घेतली
त्याना सप्तशृगी माते मध्ये त्याची विठुमाउली दिसली होती
11. नाथ सांप्रदायाची ही कुलस्वामिनी आहे नवनाथाची शाबरी विद्या हीचीच देणगी आहे
12. गडावर तीर्थराज शिवालय आहे ,ब्रम्हदेवाच्या कमंडलु मधुन जे पाणी वाहीले त्याचा मोठा प्रवाह तयार झाला तीच गीरिजा(सध्याची गिरणा नदी) नदी आणि त्यापासुन हे तीर्थ तयार झाले ह्यास गीरीजा तीर्थ ही म्हटले जाते
ह्या कुंडात सर्व देवानीं स्नान केले होते असे हे पापविनाशक तीर्थ आहे
13. ह्या तीर्था शेजारी श्री शंभुराज विराजमान आहेत
तसेच कुंडावरती अर्धनारी नटेश्वर आहे त्याचा संबध किन्नरांशी आहे
14. किन्नर येथे कोजागीरी ला खुप मोठया प्रमाणात हजेरी लावतात,
देवीच्या सेवे साठी कृष्णाने किन्नराना धरती वर पाठवले आणि सांगितले त्या आदिमायेच्या कृपेन तुम्ही भक्ताची संकटे स्वत:वर घ्याल आणि तुमची सेवा श्री भगवती पर्यंत पोहचेल तुमचा उध्दार होइल
(स्रि ला मासिक धर्म असतो पुरूषास त्याची कामे
किन्नर हा सर्व काम पाशापासुन मुक्त असतो त्यात शिव आणी शक्ती दोघांचा एकत्रीत मीलन असते (अर्धनारीनटेश्वर) म्हणुन त्यानी केलेली सेवा लवकर आईसाहेब चरणी रुजु होते )
तसेच शरद पौर्णिमा ही शापमुक्ती देणारी पौर्णिमा आहे आणि आईचा जागर घालण्यासाठी ही मंडळी येते
आणि आईकडे मागणे मागते पुढचा जन्म व्यवस्थित द्यावा आणि ह्या जन्माचे सार्थक व्हावे.
15.गडावर 108 कुंड होती काही बुजली गेली सध्यस्थितीत काहीच कुंडे अस्तीत्वात आहेत
16. कालीका तीर्थ हे कुंड कपारीत असुन ह्याचे पाणी थंड आहे
17.तांबुल तीर्थ जेथे भगवती ने पानाचा वीडा खाउन थुकंली होती..
आणि चुळ भरली होती ते तीर्थ
गडाच्या पश्चिमेला आहे
तसेच ह्या कुंडाचे पाणी ही तांबडे आहे
देवीच्या मुखातील विडयाला खुप मान आहे खुप कमी देवी आहेत ज्याना विडा भरवला जातो
गडावर दैनंदीन देवीला वीडा भरवला जातो आणी दुसर्‍या दिवशी
तो वीडा भक्ताना दिला जातो
भाग्यवान भक्ताला वीडा मीळतो
आणि तो वीडा खायला सांगतात पण थुंकायचा नसतो.
18. सुर्यतीर्थ ह्या कुंडाचे पाणी उष्ण असते.कायम
19. काजळ तीर्थ देवीने डोळ्यातील काजळ येथे धुतले होते ,ह्या कुंडाचे पाणी काळेभोर आहे.
20. सप्तशृंग पर्वताशेजारी नादुंरी गावानजीक एक पर्वत आहे त्यास खिंडार आहे असे सांगतात की देवी दैत्य युध्दात देवीने त्रिशुलाने ते खिंडार पाडले आहे.
21. दैत्याला नाचवत नाचवत दैत्य पळत पळत वणी गडावर आला तेथे देवीने महिषासुराचा वध केला अशी ही मान्यता आहे

२ टिप्पण्या:

  1. टिशयूकलचर बर्मा सागवान रोपे, प्रत्यक्ष लॅब पहाण्यासाठी, टिश्यू कल्चर डाळिंब, केळी इत्यादी रोपे. ,बर्मा सागवान 1 वर्षात 15 ते 18 फूट वाढणारे ,सरळ वाढ ,आंतरपिके घेता येतात, ऊस ,मका ,केळी ,चारा पिके अशी कोणतीही, कमी पाणी लागते, बारा महीने लागवड़ करीता येते ,9 ते 10 वर्षात तोड़णीस ,लाखात उत्पादन, सल्ला व मार्गदर्शन, संपर्क - सिमा बायोटेक कोल्हापूर मो न - 9822050489 / 8830336625

    उत्तर द्याहटवा
  2. टिशयूकलचर बर्मा सागवान रोपे, प्रत्यक्ष लॅब पहाण्यासाठी, टिश्यू कल्चर डाळिंब, केळी इत्यादी रोपे. ,बर्मा सागवान 1 वर्षात 15 ते 18 फूट वाढणारे ,सरळ वाढ ,आंतरपिके घेता येतात, ऊस ,मका ,केळी ,चारा पिके अशी कोणतीही, कमी पाणी लागते, बारा महीने लागवड़ करीता येते ,9 ते 10 वर्षात तोड़णीस ,लाखात उत्पादन, सल्ला व मार्गदर्शन, संपर्क - सिमा बायोटेक कोल्हापूर मो न - 9822050489 / 8830336625

    उत्तर द्याहटवा