गुरुवार, १० डिसेंबर, २०१५

पत्नीची गरज का आहे..?

पत्नीची गरज का आहे..? अवश्य वाचा व मग चिंतन करुन स्वत:ला बदला
******************************
कारण, ती दुःखात तुम्हांला कधीच
एकाकी सोडत नाही.
******************************
ती नेहमीच वाईट सवयी / व्यसनांपासून परावृत्त होण्यासाठी विनवण्या करते.
****************************
ती छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडण करते, मात्र अल्पकाळात तिचा राग शांत होतो..
*****************************
ती तुम्हांला आर्थिक फायद्यांबाबत जागृत करते..
***************************
काळजी करण्यासारखे खूप काही असले तरी ती सांत्वनपर धीर देते, "काळजी करू नका, सर्व काही ठीक होईल".
******************************
ती तुम्हांला सतत आशावादी होण्यास
प्रोत्साहित करते..
******************************
ती दररोज काळजीपूर्वक 10/15 वेळेस विचारते की, "तुम्ही काय करत आहात?"
त्यावेळेस निश्चितच तुमचा राग
उफाळून येत असेल.
पण शांत डोक्याने विचार करा, तिचे काळजी करणे खरोखरच तापदायक आहे काय?
******************************
वास्तविक तिच्याशिवाय तुम्हीं काहीच करु शकत नाही!
******************************
पत्नी ही ईश्वराची नितांत सुंदर देणगी आहे. त्यामुळे तिचे मूल्य, महत्त्व जाणा तिचा आदर करा, तिची काळजी घ्या !
****************************** तिला पायाखाली तुडवू नका.........व डोक्यावरही घेवु नका.....खांद्याला खांदा लावून जीवनाची वाटचाल करा बघा काय होतेय.....                  *****************************तिच्या मनात आले तर ती तुम्हास जगाच्या सर्वोच्च स्थानावर सुध्दा पोचवेल.....नाहीतर सर्वात खाली तळाला गाडुनही टाकेल...अशा या मातृशक्तिचा आदर व सम्मान करा   
----------------------------------
"बायको डोकं खाते"

प्रत्येक नव-याला वाटते की,
त्याची बायको डोक खाते..
का खरच ती अशी असते..??
पण दिसते तसे मुळीच नसते..!!

घरात आणखी कोण असते..
ज्याच्यावर ती हक्क गाजवते..
एक नवराच तिचा असतो..
ज्याच्या कडे ती मनातले बोलते..!!

तिच्या बोलण्या मागे खरे..
सा-यांबद्दल आत्मियता असते..
नाहीतर दाखवा मला..
घरात आणखी कोण राबते..!!

ऑफिस मधे तुमच्याकड़े....
एक आघाडी (डिपार्टमेंट) असते..
पण घरात मात्र ती..
अनेक आघाड्या एकाकी लढते..!!

सहाजिक तिची मदार तुमच्यावर असते..
भरवश्यावर तुमच्या ती सारे करते ..
मग जराश्या बोलण्याने सांगा..
तुमचे का हो तारतम्य सुटते..!!

क्षणाचा असतो रुसवा तिचा..
एका गज-यात पहा विरघळते..
दिवसभराचा क्षीण विसरून..
कुशीत रात्री कशी विसावते..!!

इतके सारे करून सांगा..
तिच्या हातात काय उरते..
आपण मात्र नेहमीच म्हणतो..
ही बायको सारखे डोक खाते..!!
  ******************************
सर्व विवाहितांपर्यंत हा संदेश पोचवा
*****************************

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा