शुक्रवार, ४ डिसेंबर, २०१५

वकील म्हणजे काय ………

वकील म्हणजे फीरता वारा
वकील म्हणजे वाहता झरा।
वकील म्हणजे रात्री एकटाच
अंधारात चमकनारा तारा।।
  वकील म्हणजे अंगावरील शहारा
  वकील म्हणजे रात्रीचा पहारा।
       फक्त  वकील आहे
       सुख अन दु:खाचा सहारा।।
वकील जन हिताचा नारा
वकील आहे अनमोल हिरा।
वकील म्हणजे धाक दराराv
       त्याचाच आहे वचक सारा।
       काहीही करु शकतो वकील
       जर असेल तो नितीनं खरा।।
वकीलावर प्रेम करुन पहा
एकदा तरी  वकीलावर
प्रेम करुन पहा।
मनापासुन त्याच्यावर
तुम्ही मरुन पहा।।
         जीवाला जीव देईल तुमच्या
         त्याचा हात धरुन पहा।
         त्याचं नाव काळजावर
         एकदातरी कोरुन पहा।।
कसा जगतो एकटा
तुम्ही चोरुन पहा।
प्रेमाचे दोन शब्द
त्याच्याशी बोलून पहा।।
          त्याच्या सारख्या यातना
         एकदा तरी सोसुन पहा।
          अनोळखी जगात तुम्ही
           एकटे बसुन पहा।।
दु:ख असुन मनात
तुम्ही हसुन पहा।
त्याच्या सारखे तुम्ही
ऊन्हात ऊभे राहुन पहा।।
         एकदा तरी वकीलावर
          प्रेम करुन पहा।
          तो रोज मरतो तुम्ही
          एकदातरी मरुन पहा।।
लेकरासाठी झुरतो तो
तसं भेटीसाठी झुरुन पहा।
तुम्हाला काय वाटतं तुम्ही
वकिलाच्या यातना सोसुन पहा।।
     एकदा तरी  वकीलावर
          तुम्ही प्रेम करुन पहा………

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा