नवी आशा, नवी दिशा
नमस्कार मित्रानो आज 31 डिंसेबर 2015, या वर्षातला शेवटचा दिवस
काय प्लाँन आहे 31 डिसेंबरचा? कोठे जाणार आहे ? कोठे जायाचे? तु काय घेणार ? कोणती घेणार ? आई आज घरी जेवण करु नको? मला उशिर होईल ?
दारु पिऊन घरी उशिरा येऊन बायकोला मारहाण ? आज मी मित्राकडे राहणार आहे माझी वाट पाहु नको ?
हे आलास का लवकर ये ? दारु पिऊन गाडी चालवत आहे जोरात?
अँक्सीडंट , गंभीर जखमी तर कधी वेगवान गाडी चालवण्यामुळे जागेवरच मृत्यु ? रडारड चालु
बायको पोर उघड्यावर
म्हताऱ्या आईबापाची काय आवस्था होत असेल ..
असे एक ना अनेक प्रश्न सर्वसामान्यपणे मनात येतात
दारु, बिअर, रम ,हातभट्टी
31 डिसेंबर जवळ आला कि काहीना वेध लागते पार्टीचे मग जसे वर्षभर मित्र मित्र कधी एकत्र भेटलेच नाही कधी एकत्र जेवण केलेच नाही अशी जणु, अशी आपल्या समाजातील युवकाची पंरपरा झाली असे वाटते .
31 डिसेंबर म्हणजे पार्टी झालीच पाहिजे ही परंपरा रूढ झाली आहे, कारण एकच, हे वर्ष संपले म्हणून ?
मग कधी आपल्या मित्रानी विचार केला का?
आपण रात्री उशिरा पार्टी करुन घरी जातो त्या आपल्या आईला विचारला का कधी मी घरी येत आहे तोपर्यत तुझी अवस्था काय होत होती ?
आपल्या बायकोला विचारले का कधी, आपण घरी पिऊन येई पर्यत तुझी अवास्था कशी होती ?
कि आपल्या मोठी झालेल्या मुलांना विचारा कि मि रात्री उशिरा घरी आल्यावर तुमची अवस्था कशी होत आहे ?
आज 31 डिसेंबर आहे आणि जे घरी उशिरा येणार आहे पार्टी करुन दारु पिऊन त्यांनी फक्त घरातुन बाहेर जाण्यासाठी निघण्यापुर्वी फक्त 5 मिनिट वेळ काढावा आणि त्यातील प्रत्येकी फक्त एक मिनिट आपल्या आईसाठी, एक मिनिट आपल्या बायकोसाठी, आणि एक मिनिट आपल्या मुलासाठी द्यावा त्यांना वरील प्रश्न विचारुन त्यांना काय वाटते ते विचारा आणि
एक मिनिट तुम्ही त्या सर्व गोष्टीचा विचार करा
आणि एक मिनिट आपल्या नंतर याची काय अवस्था होईल याचा विचार करा
आणि ठरवा पार्टीला जायाचे कि आपल्या फँमिली सोबत 31 चे जेवण करायचे आपणच ठरवा
कारण आपण शिक्षण घेतो पण त्या बरोबरच व्यसन ही करु लागलो आणि व्यसन कधीही चांगले नसते आणि दारु बिअर पिल्यामुळे सुरवातीला आपण स्वतः ला सांगत असतो मी व्यसनी नाही पण अशा प्रकारचे मद्य हे आपल्या शरीराला अपायकारक तर आहेच पण कितीतरी घर संसार उध्दस्त झाले आहेत. आपणच ठरवा पण ज्या युवकाच्या घरातील पहिली पिढि आता कोठे शिकत आहे त्यांची मागील पिढी ने ज्या चुका केल्या आहे त्या चुका सुधारल्या पाहिजे असे वाटते कारण आपल्या समाजातील 90% पेक्षा जास्त युवक हा सध्या व्यसनाच्या आहारी गेला आहे
आणि एक निर्णय घ्या कि
31 डिसेंबर ला मी माझ्या फँमिली सोबत जेवण करणार आणि कोणतेही व्यसन न करता दुसरया दिवसी सकाळी उठा आणि पहा किती फ्रेश वाटेल मनाला, खुप काही गमावण्या पेक्षा खुप काही कमवल्याचा आंनद मिळेल.
किमान थोडा तरी विचार कराल. ही अपेक्षा.
. येणाऱ्या नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा !!!
अन येणारे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीने, व् भरभराठीचे व् आरोग्यदायी जाओ. हिच ईश्वर चरणी प्रार्थना। !!!
आपला
अँड.सुरेन्द्र सोनवणे, नाशिक
9422264829
http://sainikdarpan.blogspot.in/
http://adharvad.blogspot.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा