---असं म्हटलं जात की तिन्हीसांजेच्या वेळेस काही अशी कामे आहेत जी वर्ज्य असतात. यामुळे लक्ष्मी घरापासून दूर राहते. ही कामे तुम्ही संध्याकाळी केली नाहीत तर घरात देवदेवतांची कृपादृष्टी राहते.
ही आहेत सात कामे जी संध्याकाळी करु नयेत
१. तुळशीजवळ दिवा लावा मात्र संध्याकाळी तुळशीला पाणी घालू नका. दिवा लावल्याने घरात सुख-समृद्धि कायम राहते. मात्र संध्याकाळी तुळशीला पाणी घालू नये
२. संध्याकाळच्या वेळेस घर झाडू नका. यामुळे घरातील सकारात्मक उर्जा बाहेर निघून जाते आणि घरात दारिद्र्यता येते. संध्याकाळ होण्याआधी घर झाडून घ्या
३. दुसऱ्याबाबत वाईट बोलणे अथवा चुगली कऱण्याची सवय नेहमी वाईट असते. विशेषकरुन संध्याकाळच्या वेळेस कोणाबद्दलही वाईट बोलू नका. काहीजणांना लोकांची निंदा करण्याची सवय असते. मात्र यामुळे कोणतेही लाभ होत नाहीत उलट समाजात प्रतिमा कमी होते.
४. संध्याकाळच्या वेळेस पती-पत्नींनी प्रेमसहवासापासून दूर राहावे. संध्याकाळी घरातील वातावरण धार्मिक आणि पवित्र ठेवले पाहिजे. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस पती-पत्नीने शरीरसंबंध ठेवू नये
५. तिन्हीसांजेच्या वेळेस कधीही झोपू नये. हे स्वास्थ्यासाठी चांगले नाही. जे लोक नियमित संध्याकाळच्या वेळेस झोपतात ते लठ्ठपणाचे शिकार होतात. आजारी, वृद्ध अथवा गर्भवती स्त्रियांनी संध्याकाळी झोपल्यास चालते. मात्र निरोगी लोकांनी संध्याकाळी झोपू नये त्यामुळे आळस वाढतो. ज्या घरातील लोक संध्याकाळी झोपतात त्यांच्या घरात लक्ष्मी वास करत नाही.
६. संध्याकाळी कधीही जेवू नका. असे म्हटले जाते की संध्याकाळच्या वेळेस कधीही जेवू नये. यामुळे पोटाच्या समस्या वाढतात.
७. अभ्यासाची योग्य वेळ सकाळी असते. संध्याकाळच्या वेळेस कधीही अभ्यासाला बसू नये.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा