मंगळवार, २२ डिसेंबर, २०१५

भगवत गीता


आज म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. कदाचित गीता हा जगाच्या पाठीवर एकमेव ग्रंथ असावा ज्याची जयंती साजरी केली जाते. प्राथमिक दृष्टीने पाहता गीता म्हणजे काय तर - भारतीय युद्धाच्या वेळी कुरूक्षेत्राच्या रणभूमीवर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला निष्काम कर्मयोगाचा केलेला उपदेश. सर्वसामान्य माणसाला वाटते की गीता म्हणजे काहीतरी मोठे गौडबंगाल असून ते आपल्या बुद्धीच्या पलिकडे आहे.मात्र खरे पाहता गीता ही आपल्याला अवघड असे ज्ञान अत्यंतसोपे करून सांगते. वेदांचे सार उपनिषदे आहेत आणि उपनिषदांचेही सार म्हणजे श्रीमद्भगवद्गीता होय.गीता हा स्मृतीग्रंथ आहे खरा, पण त्यातील तत्वज्ञानामुळे तो श्रुतीग्रंथाच्या योग्यतेचा आहे.
गीतेची स्तुती करताना माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात-
"हा वेदार्थ सागरू । जया निद्रिताचा घोरू ।
तो स्वयें सर्वेश्वरू । प्रत्यक्षे अनुवादिला ।।"
अर्थात वेद हे ईश्वराचे झोपेतील घोरण्याचे शब्द आहेत, तर गीता ही त्या ईश्वराने जागृतावस्थेत स्वमुखाने सांगितली आहे.
गीते मध्ये एकूण १८ अध्याय असून ७०० श्लोक आहेत.१८ अध्यायात ज्ञान, कर्म,भक्ती,योग, विज्ञान, विश्वरूप, ईश्वराच्या विभूती, प्रकृती,पुरूष इ. वर विस्तृत चर्चा आहे.
माणसाने जीवनात येऊन एकदा तरी गीता वाचावीच. त्याच्या दुःखाचे मुळ खरोखरच नाहीसे होईल.
५००० वर्षा पूर्वी कृष्ण महाराजांनी अर्जुनाला गीता सांगितली होती विद्वान् लोक मानतात की त्यांच्यातील संवाद जो मानवी इतिहासातील सर्वात महान तत्वज्ञानाविषयक व धर्म विषयक संवादापैकी 1 आहे.
    ज्यांना गीता वाचताना संस्कृत व नंतर मराठी भाषा तिहि शुद्ध मराठी समजत नाही म्हणुन गीता वाचत नाहित त्यांनी ज्यांना  याची माहिती आहे त्यांच्या कडून समजून घ्यावी .          

ज्यांचे विचार विज्ञान वादी आहेत व जे देवाला मानत नाहीत  व गीता धर्म ग्रंथ असल्याणे ती देवाणे सांगितली  असल्याणे न वाचताच ती चुकीची किंवा त्यात घेन्या सारखे काहीही नाही असे माणतात त्यांनी विज्ञानाच्याच् नजरेने पहावे व समजून घ्यावे . 
" विज्ञान म्हणते कुठलीही गोष्ट पूर्ण समजून घेतल्याशिवय त्याचा निष्कर्ष काढू नये "

म्हणुन जरूर १ दा तरी गीता
वाचावी याची १८ कारणे अध्यायामधे आहेत.   
    भगवतगीता वाचताना अर्जुन आपण स्वता आहोत व तो जे प्रश्न विचारतो ते आपण विचारतो आहोत्त असे समजावे..तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे जरूर मिळतील.
     
गीतेच्या 18 अध्ययानुसार  त्या त्या अध्यायात काय काय आहे अशी 18 कारणे दिली

1) अर्जुनविशादयोग - यामधे तूमचे जेवढे प्रश्न असतील यामधे असतील . तसेच आपले मन आपल्या ताब्यात नसते . द्विविधा मनस्थिति, राग, एकाद्या गोष्टीचा मोह  अश्या परिस्थितीत आपले मन जशी प्रतिक्रिया देते ते या अध्ययात आहे.

२)  सांख्ययोग - यामधे  आपले शरीर व आत्मा या दोघांमधे काय अंतर आहे
आत्मा हा अमर आहे व शरीर (मन/बुद्धि) कोणतीही घटना घड़ताना कशी टप्या  टप्या प्रतिक्रिया देते याचे वीस्तृत वर्णन यामधे केले आहे.                       

३) कर्मयोग -प्रत्येकाला कोणते ना कोणते तरी कर्म ( काम ) करावेच लागते. काही करने व काहीही न करने हेही 1 कर्म (काम) च आहे. जे आपल्या हातात आहे . तसेच इन्द्रिय ,मन व बुद्धि यांचा परस्पर कसा समंध येतो हे यात सांगितले आहे.
( मन व बुद्धि यांचे विज्ञान जे इन्द्रियाणां  चालवते)    

४)  ज्ञानकर्मसंन्यासयोग -
मागील 2 अध्यायांच्या अभ्यसाने मन , बुद्धि व इन्द्रिय यांच्या पूर्ण अभ्यासानेच या अध्ययात "कर्म "
(कोणतेही काम),
"विकर्म" (निषिद्ध कर्म/काम),
"अकर्म"(फलरहित कर्म/काम) या कर्मान्चे ज्ञान घेतल्यानंतर शारीरिक संन्यास
( कधीही दुःख होणार नहीं , राग , समोह निर्माण होनार नाही थोडक्यात बुद्धि स्थिर राहते) 

५) कर्मसंन्यासयोग - माणसाला हे दिव्य ज्ञान मिळाल्यानंतर तो फ़क्त वरकरणी सर्व प्रकारची कर्मे करतो व आतून कर्माचा त्याग करून शांती , विरक्ति आणि आनंद प्राप्त करतो.

६) ध्यानयोग - वरील सर्व  ज्ञान मिळाल्यानंतर देवाने संगीतलेले 1 योगासन ज्या मधे मन व इंद्रिय नियंत्रित करुण यामधे परमेश्वराचा  साक्षात्कार होतो.

७) ज्ञानविज्ञानयोग - देवाचे अस्तित्व आहे कारन जे काही भवतिक व आध्यात्मिक आहे त्या सर्वांचे आदिकारण व पोषणकरते आहेत तसेच ज्या देवांचे अस्तित्व वेद व पुराण यामधे  दिले आहेत तेच खरे आहेत पन काही लोक अंधश्रद्धा पसरावत असतात.

८) अक्षरब्रह्मयोग - देवाचे नामस्मरण आविषभर केले तर व विशेषकरुण  मरणाच्या वेळी नामस्मर केल्याने माणसाला परमधाम प्राप्त होते व या भवतिक जगात पुनः यावे लगत नाही.

९) राजविद्या राजगुह्य योग -
भक्तीच्या माध्यमातुन आत्मायाचा देवाबरोबर शाश्वत समंध आहे व ते परम धाम प्राप्त करता येते.

१०) विभूतियोग - या भौतीक   जगामधे बळ  सवन्दर्य  वैभव तसेच सर्व सजीव व निर्जीव गोष्टीत देव आहेत व सर्व गोष्टींचे आदिकारण आहेत.

११) विश्वरूप दर्शनयोग -  भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला दिव्य दृष्टी देतात व विराट रूप दाखवतात व देव असल्याचे सिद्ध करून दाखावतत तसेच मानवसदृश्य  शरिर हेच परमेश्वराचे मूळ रूप आहे.

१२)भक्तियोग -  देवाचे प्रेम प्राप्त करन्यासाठी भक्तियोग हे सुलभ व श्रेष्ट साधन आहे

१३) क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग - प्रकृति ,पुरुष आणि चेतना यांचे विज्ञान तसेच यांच्या
पलिकडिल स्थित असलेला परमात्मा यांच्यातील फरक ....

१४)गुणत्रयविभागयोग - प्रत्येक माणसात सत्व (देव माणूस), रज ( असंख्य वासना ) , तम ( निद्रा व आळशी ) हे तिन गुन असतात व ज्यात यापैकी 1 गुण जास्त प्रभल असेल यावरून त्यचा स्वाभाव समजतो व या  प्रत्येक गुणांची  विस्तार पने माहिती व लक्षणे यांची पूर्ण ज्ञान दिले आहे.

१५) पुरुषोत्तमयोग - ज्याला देवाचे परम स्वरुप समजते तो त्याना शरण जातो व या भवतिक जगातून मुक्त होतो.

१६) दैवासुरसंपविभागयोग -   शास्त्राचे नियम
झुगारुण लहरिप्रमाने जीवन जगणारे व आसुरी गुण असणाऱ्या व्यक्ति नीच योनीत जन्म घेतात यांचे विज्ञान

१७)  श्रध्दात्रयविभागयोग -  मानसातल्या 3 गुनानुसार त्यांच्यात 3 प्रकारच्या श्रद्धा असतात या श्रद्धाचे विस्तृत ज्ञान

१८) मोक्षसंन्यासयोग - वैराग्य आणि मानवी चेतना व कर्म यावर प्रकृतिच्या तिन 3 गुनांचा  परिणाम याविषयी कृष्ण विवेचन करतात .
          ब्रह्म-साक्ष्यातकर , गीतेचा महिमा , गितेचा अंतिम निष्कर्ष याविषयी उपदेश या सर्व ज्ञानाची प्राप्ति झाल्यानंतर मानुस मुक्त होतो.

ही 18 कारणे आहेत ज्यामुळे भगवतगीता वाचावी.

थोडक्यात 1 प्रयोग करुन पहा
जर कोणाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तो मानसिक असो वा शारीरिक किवा कोणताही असो गीतेतील 2 ते 18 अध्याया पर्यंतच्या कोणत्याही 1 पानामधील कोणत्याही 1 श्लोकावर बोट ठेवा आणि तो वाचा त्यचा मराठीतून अर्थ पहा ते तुमच्या त्रासाचे / प्रश्नाचे उत्तर असेल.

" माणसाच्या प्रत्येक क्रिया प्रतिक्रियांचे कारन   " मन " आहे आणि मनाचे शास्त्र विज्ञान म्हणजे " भगवतगीता "
  
मन चालते कसे आणि त्याला कंट्रोल करायचे कसे  याचा उलघडा आणखी विज्ञानाने केला नाहीं जो भगवतगीतेत करुण ठेवला आहे.
 
भगवतगीता ही फ़क्त हिंदुचिच नाही तर जो माणुस आहे त्याची भगवतगीता आहे.
       मी असे का म्हणतोय याचे कारण तुम्हला भगवतगीता वाचल्यानंतर कळेल.
         मन हे माणसाला च असते तो कोणत्यही जातीचा किवा धर्माचा असो मग मनाबदल 2 श्लोक भगवत गितेच्या 2 अध्ययाच्या 62 आणि 63 हे दोन श्लोक वाचा आणि समजून घ्या 
(वाईट प्रसंगी बुद्धि सुद्धा ब्रह्ष्ट होत असते पण मन नाही )
गीता जयंतीच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा!

।। कृष्णं वन्दे जगद्गुरूम् ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा