मंगळवार, २९ डिसेंबर, २०१५

प्रिय सौ.तुला वजा केल्यावरती मागे काही उरेल काय

����

माझे शेजारी गायतोंडे बायकोवर नेहमी वैतागलेले असतात.

सारखी वॉच ठेऊन असते म्हणे माझ्यावर.
ऑफीसमध्ये मी कितीही कामात असलो तरी एकदा तरी फोन केला पाहीजे असा तिचा दंडक आहे.

मी फोन करायला विसरलो तर तिचा फोन येणार.
घरी यायला उशीर झाला तर लगेच मोबाईल वाजला म्हणून समजा. ‘कुठे आहात? ट्रेन चालू आहेत ना व्यवस्थित.
बाहेर काहीतरी खाऊन घ्या.

तुमची शुगर कमी होते ना.’ मित्रांबरोबर पिकनिकला निघालो की हिने लेक्चर लावलंच म्हणून समजा,
‘जास्त पिऊबिऊ नका.
एकच प्याला एकच प्याला म्हणताना व्यसन लागत माहीताय ना.
’ वैताग नुसता…!.

मी म्हटलं, ‘गायतोंडे साहेब, आपली कुणीतरी काळजी करतंय ही जगण्याचा विश्वास देणारी किती सुंदर भावना आहे हो.

एक चित्र डोळ्यासमोर आणा,

एक दिवस तुमच्या विश्वातून तुमची बायको डिलीट झालीय.
मग लक्षात येईल.

सकाळी उठून गरम चहा करुन द्यायला कुणी नाहीय.

स्वत:चं वेळापत्रक सांभाळून पोळीभाजीचा डबा भरून द्यायला कुणी नाहीय.

घरी यायला उशीर होणार होतो तेव्हा बाहेर काहीतरी खाऊन घ्या,

शुगर कमी झाली तर चक्कर येईल असं व्याकुळ होऊन सांगायला कुणी नाहीय.

आपण करुन ठेवलेला पसारा आवरायला कुणी नाहीय.

घर सजवायला कुणी नाहीय, कुंडीतल्या गुलाबाला पाणी घालायला कुणी नाहीय.
शेअर करायला कुणी नाही,
केअर करायला कुणी नाहीय.

गायतोंडे वरमले.
माझं बोलणं त्यांना लागलं.

त्यांनी लज्जित व्हावं हा माझा उद्देश नव्हता.
पण
बायको त्यांची काळजी घेते
आणि
त्याला ते त्रास समजतात ह्या गोष्टीने मी व्यथित झालो होतो.

आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांचा आपल्याला उपद्रव वाटावा हा केवढा मोठा दैवदुर्विलास.

ज्या माणसांना आयुष्यात प्रेम लाभलं नाही ती माणसं दुर्दैवी
आणि
लाभूनही ज्यांना ते कळलं नाही ती माणसं कपाळकरंटी.

गायतोंडेंचं हे कपाळकरंटेपण मला अस्वस्थ करणारं होतं.

शहरात आता बायकाही नोकरी करु लागल्यायत.
आठ तासांची ड्यूटी,
दोन तीन तासांचा जातायेता प्रवास,
उबग आणणारी गर्दी,
प्रदूषित वातावरण,
याने घरी जाईपर्यंत आपण थकून जातो.

पण

तिला मात्र थकून चालत नाही. तिला घर सांभाळायचं असतं. जेवणखाण करणं,
मुलांसाठी आई होणं,
नवऱ्यासाठी पत्नी होणं, आल्यागेल्यांचा पाहुणचार करणं, डाळ तांदूळ भरण्यापासून कुठे डिस्काउंट सेल लागलाय त्याची खबरबात ठेवणं हे सारं प्राधान्याने तीच पहात असते.

ही चतुरस्त्र सिद्धी कुठून येते तिच्याकडे…?
जन्मजात असते….
की लहानपणापासून बिंबवलेल्या संस्कारातून येते….
की जबाबदारीच्या जाणीवेतून…..?

लग्नाकार्यात, देण्याघेण्यात, पाहुणचारात तीच जातीनिशी लक्ष घालत असते.

मान तेवढा आपण घेत असतो.

चर्चगेट ते विरार आणि बोरीबंदर ते कल्याण या ऑफीस सुटल्यानंतर परतीच्या प्रवासात ट्रेनमध्ये रात्रीच्या जेवणासाठी भाजी मोडणाऱ्या बायका मी पहातो तेव्हा त्यांना मनोमन नमस्कार करतो.

गंमतीची गोष्ट अशी की एवढी सगळी मेहनत,
ओढाताण
आणि
तारेवरची कसरत करुनही तिला जगण्याची ओढ असते.

तिला हौस मौज कराययला आवडते.

आनंदाने जगण्याचा कोणताही क्षण ती सोडत नाही.

तिला सणसमारंभ साजरे करायला आवडतात.
तिला नटायला आवडतं.

नाकात नथ घालून लग्न समारंभात मिरवायला आवडतं.

तिला गोडधोड करायला आवडतं, रांगोळी घालायला आवडते.

अणि

आपण मात्र बायकोला नेहमीच अंडर एस्टिमेट करत असतो. ग्रुहित धरत असतो.
तिला स्वत:चं मत असतं,
स्वत;च्या भावभावना असतात,
हे आपण विसरतो.

आपल्याला तिच्यातले दोष दिसतात.

पण

आपणही काही शत प्रतिशत सद्गुणाचे पुतळे नाही आहोत हे आपण विसरतो.

तिला स्वत;ची दुखणी खुपणी असतात.

परमेश्वराने तिला दिलेल्या मात्रुत्वाच्या हक्काचा अधिभार म्हणून तिला दर महिन्याला वेदनांना सामोरं जावं लागतं.

आपण पुरुष माणसं त्याची कल्पनाही करु शकत नाही.

मी गायतोंडेंना म्हटलं, ‘गायतोंडे, आज घरी जाल ना,
तेव्हा बॅगेतून एक मोगऱ्याचा गजरा आठवणीने घेऊन जा.

(घरी गेल्यावर बॅग लगेच उघडू नका. कारण मोगऱ्याला चुगली करायची वाईट खोड आहे.)

गेल्या गेल्या ऑफीसमधला राग तिच्यावर काढण्याऐवजी आज जरा हलक्फुलकं बोला,

पुलंचे जोक तिला ऐकवा.
तिचा थकवा थोडा सुसह्य होईल.

पदर खोचून ती कामाला लागेल तेव्हा मंद आवाजात तिच्यासाठी लताचं ‘रमया वस्तावैया…’ लावा.

आपला थकवा विसरुन तिने रांधलेलं जेवताना जेवण खूप चवदार झालंय हे तिला सांगा.

ती भांडी आवरताना तिला थोडी मदत करा.

उद्याच्या डब्यासाठी ती भाजी चिरायला बसेल तेव्हा तिचा हात हातात घेऊन त्यावर पडलेल्या चिरा बघा. तुम्हाला हळवं व्हायला होईल.

‘किती कष्ट करतेस तू’ एवढे चार शब्द बोला,
तिला गहिवर येईल.
तिची आवराआवर होईपर्यंत आज तुम्ही अंथरुणं घाला.

ती नव्हती तेव्हा आयुष्य किती निरस होतं
आणि
तिच्या येण्याने आयुष्याला कसं पूर्णत्व आला हे आठवा.!!

मग ती आवरुन अंग टाकायला येईल तेव्हा मघापासून लपवून ठेवलेला मोगऱ्याचा गजरा तिच्या केसात माळा..!!

ती मोहरेल,
ती गहिवरेल,
लहान मुलीसारखी तुमच्या कुशीत शिरेल,
तिच्या पाठीवर हळुवार थोपटा, तिच्या केसातून हात फिरवा आणि  चार ओळी तिला ऐकवा,

तू आहेस म्हणून माझ्या आयुष्याला अर्थ आहे...
तुझ्याविना माझ्या जीवा उभा जन्म व्यर्थ आहे...

मेघावाचून नभामधनं पाणी कधी झरेल काय...
तुला वजा केल्यावरती मागे काही उरेल काय…!

प्रत्येक पुरुष हा भाग्यवान असतो.
फक्त त्याला त्याचा इगो हे कधी समजून घेण्यास तयारच होत नाही.
वग
जे आपल्या अर्धांगिणीला समजूनच घेत नाहीत ते सर्व नवरे खरंच दुर्दवी असतात.

जे जे आपल्या पत्नीवर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतात अशांनी हा  मेसेज नक्की पुढे पाठवा...

कळू द्या या उभ्या जगाला,

स्त्रीयांचे आपल्या घरासाठी असणारे प्रेम,आपुलकी व त्यांचे महत्व..
������नारी शक्ति नमन������

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा