, नक्की वाचा :
----------------------------------------------
स्पेशल मासे खरेदी संबंधित
काही महत्वाच्या टिप्स :
कोणत्याही प्रकारचे मासे घेताना घट्ट बघून घ्यावेत. मासे बोटाने दाबल्यास खड्डा पडला तर तर ते शिळे, खराब समजावेत.
• पापलेट :
----------------
रंगाने सफेद व चमकदार दिसणारी पापलेट ताजी असतात. पापलेट घेताना त्यांच्या डोळ्याखालील भाग दाबून पाहावा. सफेद पाणी आल्यास ती ताजी असतात, लाल पाणी आल्यास ती पापलेट शिळी असतात.तसेच पापलेट शिळी व खराब होत आल्यास त्याना पिवळसर रंग येऊ लागतो.
• भिंगी, सुरमई, रावस, कारली, हलवा :
----------------------------------------------
विकत घेण्यापूर्वी घट्ट बघून घ्यावे.
माशाचे तोंड उघडून पाहिल्यास लालसर
भाग दिसल्यास मासे ताजे समजावेत व
काळसर दिसल्यास मासे शिळे व खराब
समजावेत.
• कोलंबी :
---------------
कोलंबी लाल व पांढरी अशी दोन प्रकारची येते.
•लाल कोलंबी : लाल कोलंबी मध्ये काळसर
लाल व पांढर्या हिरवट रंगाची लाल कोलंबी ताजी असते. हि कोलंबी रंगाने ऑरेंज कलरची होऊ लागली कि ती शिळी व खराब
झाली असे समजावे. तसेच शिळ्या व खराब
कोलंबीची डोकी तुटलेली असतात.
ताजी कोलंबी घट्ट व कडक सालीची असते. शिळ्या व खराब कोलंबीचे साल मऊ पडलेले असते व घाण वास येतो.
•पांढरी कोलंबी :
पांढरी कोलंबी पचायला हलकी व जास्त
चांगली असते. पांढरी कोलंबी हि पांढर्या स्वच्छ रंगाची, घट्ट व चमकदार असते.
पांढर्या कोलंबीत जर पिवळसर काळा रंग
येऊ लागला तर ती शिळी व खराब होत आली आहे असे समजावे. तसेच कोलंबीची डोकी तुटू लागलेली व डोक्याला काळा रंग येऊ लागलेली व साल मऊ पडलेली कोलंबी शिळी व खराब झालेली असते. ती घेऊ नये.
• करंदी :
-------------
तांबूस सफेद रंगाची व घट्ट सालीची करंदी ताजी असते.
• बांगडे :
-----------
काळसर सफेद रंगाचे चमकदार व घट्ट बांगडे ताजे असतात. तोंड उघडून पाहिल्यास लालसर रंग दिसणारे बांगडे ताजे असतात. बांगडे शिळे व खराब झाल्यास
त्याना पिवळसर रंग येऊ लागतो व मऊ
पडतात दाबल्यास खड्डा पडतो.
• बोंबील :
--------------
ताजे बोंबील पांढऱ्या स्वच्छ रंगाचे, घट्ट व
चमकदार दिसतात.त्यांच्या तोंडाच्या आतील भाग लाल असतो. बोंबील खराब होत आले
कि त्याना पिवळसर रंग येऊ लागतो.
• मुडदुशा (रेणवे) :
---------------------------
पांढऱ्या स्वच्छ व चमकदार दिसणाऱ्या मुडदुशा ताज्या असतात. त्यांच्या तोंडाच्या आतील भाग लाल असतो. मुडदुशा शिळ्या व खराब झाल्या कि त्याना पिवळसर रंग येतो व त्या मऊ पडतात.
www.kedarlyrics.com
• मांदेली :
-------------
पिवळसर सोनेरी रंगाची, घट्ट व
तोंडाच्या आतील भाग लाल असलेली
मांदेली ताजी असतात.मांदेली शिळी व
खराब होऊ लागली कि तिला ऑरेंज रंग
येऊ लागतो व त्या मऊ पडतात.
• बोय :
-----------
काळसर चमकदार रंगाची व घट्ट बोय
ताजी असते.जास्त मोठी बोय चवीला उग्र
असते व हिरमुस वास असतो.
www.kedarlyrics.com
• शेवंड (Lobster ), खाडीची मोठी कोलंबी :
--------------------------------------------------------
शेवंड व खाडीची मोठी कोलंबी विकत
घेताना घट्ट, कडक सालीची बघून व ताजी बघून घ्यावी.
• ओला जवळा :
-----------------------
ओला जवळा घेताना पांढऱ्या स्वच्छ
रंगाचा ताजा घ्यावा.
• शिंपल्या (तिसर्या) :
-----------------------------
शिपल्या घेताना काळसर रंगाच्या व तोंड
मिटलेल्या घ्याव्यात, किंवा जिवंत
असणाऱ्या, तोंडे उघडझाप
करणाऱ्या घ्याव्यात. शिपल्या खराब व
शिळ्या झाल्या कि त्यांची तोंडे उघडी पडलेली असतात मिटत नाहीत.
• कालवे :
--------------
कालवे घेताना पाढर्या रंगाची, मोठी व
ताजी पाण्यात ठेवलेली घ्यावीत.
छोटी कालवे साफ करायला व आतील
खडकाची कच काढायला त्रास होतो व
कचही जास्त असते. मोठी कालवे पटकन
साफ करता येतात.
• चिंबोरी (खेकडे/ Crab) :
-----------------------------------
चिंबोऱ्या घेताना काळसर रंगाच्या,
जिवंत व चालणार्या बघून घ्याव्यात.
खेकडे घेताना खेकड्याची पाठ दाबून
पहावी. पाठ कडक असल्यास खेकडे आतून
मांसाने भरलेले असतात. जर खेकड्याची पाठ दबली गेल्यास खेकडे आतून पोकळ असतात व खायाला काही मिळत नाही
तसेच अमावास्येला खेकडे मांसाने भरलेले
असतात व पौर्णिमेला आतून पोकळ असतात असे म्हणतात.
• भक्तांनो, या अमुल्य माहितीची पुरेपुर
आनंद घ्यावा...!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा