--------------------------
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याने मुलगी झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ ९९ टक्के शेअर्स दान करण्याचा निर्णय घेतला. आपल्याकडे मुलगी झाली की नाके मुरडली जातात , तोंड वाकडे केले जाते. एव्हढेच काय तर सर्रास तिची गर्भातच हत्या केली जाते. मुलीला जन्म देणाऱ्या मातेला अनंत यातना भोगाव्या लागतात. मार्क म्हणतो की, माझ्याकडे एव्हडे पैसे आहेत त्याचे मी करू काय? ज्या समाजाने मला हा पैसा मिळवून दिला त्यालाच मी तो परत करीत आहे. आणि उरलेल्या १ टक्के शेअर्सच्या रकमेवर मी व्यवस्थित जगु शकतो आणि त्यावर मी अधिक पैसा देखील यापुढे मिळवू शकतो.३१ वर्षीय मार्कचे हे विचार आपल्या देशातील शेकडो , हजारो धनिक तसेच काळा पैसा जमा करणाऱ्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारे आहेत. मार्क ही सर्व रक्कम टप्प्याटप्प्याने दरवर्षी जगभरातल्या महिला व मुलींच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांना दान करणार आहे. मार्कचा हा आदर्श खरोखरीच कौतुकास्पद आहे.
***मार्क तुला सलाम***........
शुक्रवार, ४ डिसेंबर, २०१५
***मार्क झुकेरबर्गचा आदर्श घ्या***
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा