बुधवार, २३ डिसेंबर, २०१५

. दत्त जयंतीचे महत्त्व

१. दत्त जयंतीचे महत्त्व

दत्त जयंती या दिवशी दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे नामजपादी उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यास साहाय्य होते.

२. जन्मोत्सव साजरा करणे

गुरुचरित्र
दत्त जयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही. या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्रसप्ताह 77 म्हणतात. भजन, पूजन आणि विशेषकरून कीर्तन वगैरे भक्तीचे प्रकार प्रचारात आहेत. महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असते. तामिळनाडूमध्येही दत्त जयंतीची प्रथा आहे. दत्त जयंती या दिवशी काही ठिकाणी दत्तयाग केला जातो.

दत्तयाग

दत्तयाग यामध्ये पवमान पंचसूक्ताच्या आवृत्त्या (जप) आणि त्याच्या दशांशाने किंवा तृतीयांशाने घृत (तूप) आणि तीळ यांनी हवन करतात. दत्तयागासाठी केल्या जाणार्‍या जपाची संख्या निश्चित नाही. स्थानिक पुरोहितांच्या समादेशानुसार जप आणि हवन केले जाते.

जन्माचा इतिहास

पुराणांनुसार

अत्रीऋषींची पत्नी अनसूया ही पतीव्रता होती. पातिव्रत्यामुळे तिच्या अंगी एवढे सामर्थ्य आले की, इंद्रादी देव घाबरले आणि ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांकडे जाऊन म्हणाले, ‘‘तिच्या वराने कोणालाही देवांचे स्थान मिळू शकेल किंवा कोणीही देवांना मारू शकेल; म्हणून तुम्ही काहीतरी उपाय करा, नाहीतर आम्ही तिची सेवा करू.’’ हे ऐकून त्रिमूर्ती म्हणाले, ‘‘एवढी काय मोठी पतीव्रता, सती आहे, ते आपण पाहू.’’

एकदा अत्रीऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेल्यावर अतिथींच्या वेशात त्रिमूर्ती आले आणि अनसूयेकडे त्यांनी भिक्षा मागितली. त्यावर अनसूयेने सांगितले, ‘‘ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले आहेत. ते येईपर्यंत थांबा.’’ तेव्हा त्रिमूर्ती अनसूयेला म्हणाले, ‘‘ऋषींना परत यायला वेळ लागेल. आम्हाला खूप भूक लागली आहे. लगेच अन्न द्या, नाहीतर आम्ही दुसरीकडे जाऊ. `आश्रमात आलेल्या अतिथींना तुम्ही इच्छाभोजन देता’, असे आम्ही ऐकले आहे; म्हणून इच्छाभोजन करण्यास आम्ही आलो आहोत.’’ मग अनसूयेने त्यांचे स्वागत केले आणि जेवायला बसण्याची विनंती केली. त्याप्रमाणे ते जेवायला बसले. ती जेवण वाढायला आल्यावर ते म्हणाले, ‘‘तुझे सुंदर रूप पाहून आमच्या मनात अशी इच्छा झाली आहे की, तू विवस्त्र होऊन आम्हाला वाढावेस.’’ त्यावर ‘अतिथीला विन्मुख पाठवणे अयोग्य होईल. माझे मन निर्मळ आहे, मग कामदेवाची काय बिशाद आहे ? माझ्या पतीचे तपफळ मला तारील’, असा विचार करून ती अतिथींना म्हणाली, ‘‘मी तुम्हाला विवस्त्र होऊन वाढीन. तुम्ही आनंदाने भोजन करा.’’ मग स्वयंपाकघरात जाऊन पतीचे चिंतन करून तिने विचार केला की, ‘अतिथी माझी मुले आहेत’ आणि विवस्त्र होऊन वाढायला आली. पहाते तो अतिथींच्या जागी रडणारी तीन लहानबाळे ! त्यांना कडेवर घेऊन तिने स्तनपान करवले आणि बाळांचे रडणे थांबले. इतक्यात अत्रीऋषी आले. तिने त्यांना सर्व वृत्तान्त सांगितला. ती म्हणाली, ‘‘स्वामिन् देवेन दत्तं ।’’ याचा अर्थ असा आहे – ‘हे स्वामी, देवाने दिलेली (मुले).’ यावरून अत्रींनी त्या मुलांचे नामकरण ‘दत्त’ असे केले. बाळे पाळण्यात राहिली आणि ब्रह्मा, विष्णु आणि महेश त्यांच्यासमोर उभे राहिले आणि प्रसन्न होऊन ‘वर मागा’, असे म्हणाले. अत्री आणि अनसूयेने ‘बालके आमच्या घरी रहावी’, असा वर मागितला. पुढे ब्रह्मदेवापासून चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शंकरापासून दुर्वास झाले. तिघांपैकी चंद्र आणि दुर्वास तप करण्यास जाण्यासाठी अनुमती घेऊन अनुक्रमे चंद्रलोकी आणि तीर्थक्षेत्री गेले. तिसरा दत्त विष्णुकार्यासाठी भूतलावर राहिला.

दत्त जयंती उत्सव भावपूर्ण होण्यासाठी हे करा !

अ. स्त्रियांनी नऊवारी साडी अन् पुरुषांनी सदरा-धोतर/पायजमा अशी सात्त्विक वस्त्रे परिधान करून उत्सवात सहभागी व्हावे.

आ. विद्यार्थ्यांसाठी ‘श्रीदत्तात्रेयकवच’ पठण ठेवावे, दत्ताचा नामजप करवून घ्यावा.

इ. उत्सवाच्या ठिकाणी कर्णकर्कश संगीत लावणे, विद्युत रोषणाईचा झगमगाट यांसारख्या रज-तम निर्माण करणार्‍या कृती करू नयेत.

ई. दत्त जयंतीच्या मिरवणुकीत टाळ, मृदुंग अशी सात्त्विक वाद्ये वापरावीत.

श्रीमद्भागवताच्या अकराव्या स्कंधात यदु आणि अवधूत यांचा संवाद आहे. `आपण कोणते गुरु केले आणि त्यांपासून काय बोध घेतला', हे यात अवधूत सांगतो. (येथे ‘गुरु’ हा शब्द वापरला असला, तरी तो ‘शिक्षक’ या अर्थाने वापरला आहे.) अवधूत म्हणतो, जगातील प्रत्येक गोष्टच गुरु आहे; कारण प्रत्येक गोष्टीपासून काहीना काही शिकता येते. वाईट गोष्टींपासून कोणते दुर्गुण सोडायचे आणि चांगल्या गोष्टींपासून कोणते सद्गुण घ्यायचे, हे शिकायला मिळते. वानगीदाखल पुढे दिलेल्या चोवीस गुरूंपासून थोडे थोडे ज्ञान घेऊन मी त्याचा समुद्र बनवला आणि त्यात स्वतः स्नान करून सर्व पापांचे क्षालन केले.

दत्ताचे गुण-गुरु

१. पृथ्वी

पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि द्वंद्वसहिष्णू असावे.

२. वायू

सुमन गंध वेचणें । दशदिशास वाटणें ।
अनिल-नीती मधुरतरा । मानवे न तुज कशी ।।

भावार्थ : वारा सुगंधी फुलावरून वहातांना सुगंधाने आसक्त होऊन तो तेथे थांबत नाही, त्याचप्रमाणे द्रव्यासारख्या वस्तूला मोहित होऊन आपण आपले व्यवहार थांबवू नयेत.

३. आकाश

आत्मा हा आकाशाप्रमाणे सर्व चराचर वस्तूंना व्यापून राहिला आहे, तरी निर्विकार, एक, सर्वांशी समत्व राखणारा, निःसंग, अभेद, निर्मळ, निर्वैर, अलिप्त आणि अचल आहे.

४. पाणी

मनुष्याने पाण्याप्रमाणे सर्वांसमवेत स्नेहभावाने वागावे. कोणाचाही पक्षपात करू नये. (पाणी मधुर असते, ते मनुष्याची तहान शांत करते. त्याप्रमाणे ज्ञानतृष्णा पूर्ण करावी.)

५. अग्नि

मनुष्याने अग्नीप्रमाणे तप करून प्रकाशित व्हावे आणि जे मिळेल ते भक्षण करून कोणत्याही दोषांचे आचरण न करता आपले गुण कार्यकारणप्रसंगीच योग्य ठिकाणी वापरावे.

६. चंद्र

अमावास्येची सूक्ष्म कला आणि पंधरवड्याच्या पंधरा कला मिळून चंद्राच्या सोळा कला मोजण्यात येतात. ज्याप्रमाणे चंद्राच्या कलेत उणे-अधिकपणा असून त्याचा विकार चंद्रास बाधक होत नाही, तद्वत् आत्म्यास देहासंबंधीचे विकार बाधक होत नाहीत. (आपला आत्मा वाढत नाही आणि मरतही नाही, तर वाढतो किंवा मरतो, तो आपला देह.)

७. सूर्य

सूर्य भविष्यकालाचा विचार करून जलाचा संचय करतो आणि योग्य काळी परोपकारार्थ त्याचा भूमीवर वर्षाव करतो. त्याप्रमाणे मनुष्याने उपयुक्त वस्तूंचा संचय करून, देश, काल, वर्तमानस्थिती लक्षात आणून निष्पक्षपातीपणाने सर्व प्राण्यांस त्यांचा लाभ द्यावा; पण त्याचा अभिमान बाळगू नये.

८. कपोत

जसा बहिरीससाणा कपोताला (कबुतराला) परिवारासहित भक्षण करतो, तसे जो मनुष्य स्त्री-पुत्रादिकांचे ठायी आसक्त राहून संसार सुखमय मानून वागतो, त्याला काळ भक्षण करतो. यास्तव मुमुक्षूने या सर्वांपासून मनाने अलिप्त असावे.

९. अजगर

जसा अजगर मनात भय न बाळगता प्रारब्धावर विश्वास ठेवून एका ठिकाणी पडून रहातो आणि ज्या ज्या वेळी जे जे मिळेल ते ते भक्षण करून संतोष पावतो, त्यात अल्प-अधिक किंवा कडू-गोड असा विचार करत नाही, काही काळ खावयास मुळीच मिळाले नाही, तरी घाबरत नाही आणि अंगात शक्ती असतांनाही तिचा उपयोग करावयास जात नाही, तद्वत् मुमुक्षूंनी प्रारब्धावर विश्वास ठेवून अल्पस्वल्प जे काही मिळेल, ते भक्षण करून, प्रसंगी काही मिळाले नाही, तरी स्वस्वरूपी लय लावून बसावे.

१०. समुद्र

जसा समुद्र वर्षाकालात अनेक नद्यांनी अपरिमित जल आणल्यास सुखी होत नाही किंवा न आणल्यास दुःखी होत नाही आणि त्यामुळे वर्धमान किंवा क्षीणतनू (कृश) होत नाही, त्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याने स्वधर्माधीन राहून सुखोपभोगांचा लाभ झाल्याने सुखी होऊ नये किंवा दुःखपरंपरा कोसळल्याने दुःखी होऊ नये, सदैव आनंदभरित असावे.

११. पतंग

पेटवलेल्या दिव्याचे विस्तारलेले मोहक तेज पाहून पतंग मोहित होतो आणि त्यावर झडप घालून जळून मरतो. त्याचप्रमाणे जो मनुष्य स्त्रीविलासाकरता, स्त्रीची लावण्यता आणि युवावस्था पाहून मोहित होतो, तो पतंगाप्रमाणे आपला नाश करून घेतो.

१२. मधमाशी आणि मधुहा

अ. मधमाशी

मधमाशी पुष्कळ कष्ट करून अडचणीच्या ठिकाणी, उंच वृक्षावर पोळे बनवून त्यात मध साठवते. तो ती स्वतःही खात नाही आणि दुसर्‍या कोणास खाऊ देत नाही. शेवटी मध जमा करणारे मधुहा अचानक येऊन, तिचा प्राण घेऊन पोळ्यासह मध घेऊन जातात. त्याप्रमाणे जो कृपण महत्प्रयत्न करून द्रव्यार्जन करून त्याचा संग्रह करतो, तो ते द्रव्य अग्नी, चोर किंवा राजा यांनी एकाएकी हरण करून नेल्यामुळे शेवटी दुःख पावतो किंवा त्यास अनीतीमान संतती प्राप्त होऊन ती त्या द्रव्याचा अपव्यय करते किंवा तो निपुत्रिक मरण पावतो. याप्रमाणे तो कालवश झाल्यावर ते द्रव्य जेथल्या तेथे रहाते अगर भलत्याला प्राप्त होते. मरते वेळी त्याची त्या द्रव्यावर इच्छा राहिल्यास तो पिशाच किंवा सर्प होऊन ते द्रव्य वापरणार्‍याला उपद्रव देतो. याप्रमाणे धनसंचय केल्यामुळे अचानक मरणाची प्राप्ती होते, हा उपदेश मधमाशीपासून घेऊन द्रव्यसंचय करण्याचे

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

दत्ताची नावे आणि त्यांचा अर्थ

१] दत्त : दत्त म्हणजे ‘आपण आत्मा आहोत’याची अनुभूती देणारा. प्रत्येकात आत्मा आहे; म्हणून प्रत्येकजण चालतो, बोलतो आणि हसतो. यावरून ‘आपल्यात देवआहे’, हेच सत्य आहे. त्याच्या विना आपले अस्तित्वच नाही.आपल्याला याची जाणीव झाली, तर आपणप्रत्येकाशी प्रेमानेच वागू. या दत्त जयंतीला ही जाणीवजागृत करण्याचा आपण निश्चय करूया..

२] अवधूत : जो अहं धुतो, तो अवधूत ! अभ्यासकरतांना आपल्या मनावर ताण येतो ना ? खरेतर अभ्यासकरण्यासाठी बुद्धी आणि शक्ती देणारा देवच आहे. पण‘अभ्यास करणारा मी आहे’, असे वाटल्याने ताण येतो. हाचआपला अहंकार आहे. दत्त जयंतीला आपण प्रार्थना करूया, ‘हेदत्तात्रेया, माझ्यातील अहं नष्टकरण्याची शक्ती आणि बुद्धी तूच मला दे....’

३] दिगंबर : दिक् म्हणजे दिशा हेच ज्याचे अंबर, म्हणजे वस्त्र आहेअसा ! जो सर्व व्यापी आहे, ज्याने सर्वदिशा व्यापल्या आहेत, तो दिगंबर ! जरही देवता मोठी आहे, तर आपल्या सारख्या सामान्यजिवांनी त्याला शरणच जायला हवे. तसे केल्यासचआपल्यावर त्याची कृपा होईल. आपण प्रार्थना करूया, ‘हेदत्तात्रेया, शरण कसे जायचे ?

ते तूच आम्हाला शिकवा….’************************ दत्ताच्या परिवाराचा भावार्थ

४] गाय : दत्ताच्या मागे असलेली गायही पृथ्वी आणि कामधेनू यांचे प्रतीक आहे. कामधेनूआपणाला जे हवे, ते सर्व देते.पृथ्वी आणि गायही आपल्याला सर्व काही देतात.…

५] ४ कुत्रे : हे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या ४वेदांचे प्रतीक आहेत.…

६] औदुंबर वृक्ष : दत्ताचे पूजनीय रूप ! या वृक्षात दत्त तत्त्वअधिक आहे.…

७] मूर्तीविज्ञानदत्ताच्या मूर्तीतील वस्तूंचा भावार्थ पुढील प्रमाणेआहे

८] कमंडलू आणि जपमाळ : हे ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे.…

९] शंख आणि चक्र : श्री विष्णूचे प्रतीक आहे.…

१०] त्रिशूळ आणि डमरू : शंकराचे प्रतीक आहे.…

११] झोळी : ही अहं नष्ट झाल्याचे प्रतीक आहे. झोळी घेऊनदारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहं नष्ट होतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा