> कर्तबगार अधिकारी जावेद अहमद यांचा आदर्श
मुंबई, दि. १२ (पीसीबी) - मुंबईचे पोलीस आयुक्त जावेद अहमद यांची सौदी अरेबियातील भारताचे राजदुत म्हणून नियुक्ती झाली आहे. आपल्या कर्तबगारीने पोलीस दलात स्वतःचा वेगळा ठसा उमटविणारे आणि उत्तर प्रदेशातील श्रीमंत नवाब असलेले अहमद गेल्या ३५ वर्षांपासून अवघा १ रुपया पगार घेतात.
भारत सरकारकडून काल रात्री उशिरा अहमद यांची सौदी अरेबियातील भारतीय राजदुतपदी नियुक्ती करण्यात आली. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शिफारस केली होती. मोदींनी अनुकूलता दर्शविल्यानंतर सौदी सरकारला जावेद यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. सौदीने हिरवा कंदील दाखविल्यानंतर याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली.
जावेद यांचा जीवनपट आदर्शवत असा आहे. उत्तर प्रदेशातील एका नबाबी कुटुंबातील तसेच वारशानेच अहमद हे कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. त्यामुळे त्यांच्या अनेक पिढ्यामध्ये कुणी नोकरी केली नाही. आताही या कुटुंबातील सदस्य राजेशाही थाटात जगतात. मात्र, जावेद यांनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीच्या प्रसिद्ध सेंट स्टीफन्स कॉलेजमधून त्यांनी पदवीचे घेतले. १९८० च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असलेले जावेद यांचे नाव पोलीस दलात विविध पदांवर काम केले. त्यांनी १९८३ ते ८५ पर्यंत दिल्ली पोलिस दलातही सेवा केलेली आहे.
मुंबईच्या गुन्हेगारी जगतात जावेद यांना गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ओळखले जाते. मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त असताना गेटवे ऑफ इंडिया आणि झावेरी बाजारात झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपासही त्यांनीच केलेला आहे. होमगार्ड पोलीस महासंचालक असतानाही त्यांनी आपल्या कार्याची चुणूक दाखविली. जावेद यांची पोस्टिंग झाल्यापासून ते केवळ एक रुपयाच वेतन घेतात. आपला उर्वरित पगार ते पोलिस कल्याण निधी म्हणून आतापर्यंत दान करत आलेले आहेत. विशेष म्हणजे ते सरकारी वाहनाचा वापर न करता स्वतःचे वाहन वापरतात. आता त्यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन सौदीच्या राजदुतपदी नियुक्ती झाली आहे. तेथेही ते १ रुपयाच पगार घेणार आहेत.
गुरुवार, १७ डिसेंबर, २०१५
कर्तबगार अधिकारी जावेद अहमद यांचा आदर्श
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा