मंगळवार, २९ डिसेंबर, २०१५

११ अशा गोष्टी ज्या भारतीय रेल्वेबद्दल

११ अशा गोष्टी ज्या भारतीय रेल्वेबद्दल तुम्हांला माहित नाही

मुंबई :  भारतीय रेल्वे ही जगातील तिसरी सर्वात मोठी रेल्वेचे जाळे असणारी रेल्वे आहे. रेल्वेच्या माध्यमातून काही जण दररोज, काही जण आठवड्यातून एकदा, काही जण महिन्यातून एकदा किंवा वर्षातून एकदा प्रवास करतात, त्यांना रेल्वे संदर्भातील या २३ गोष्टी माहित आहे का.

१) भारतीय रेल्वेने सर्वात उंच पूल हा चिनाब नदीवर जम्मू काश्मिरात बांधला आहे. हा कुतूब मिनार पेक्षा पाचपट मोठा आणि आयफिल टॉवरपेक्षा उंच आहे.

२) रेल्वे चालकाला एका सॉफ्टवेअर इंजिनिअरपेक्षा अधिक पगार असतो. त्याचा महिन्याचा पगार १ लाख रुपयांच्या आसपास असतो.

३) कोणत्याही लोको पायलटने आतापर्यंत समोर मृत्यू पाहून रेल्वे सोडून दिली नसल्याची घटना अद्यापपर्य़ंत घडलेली नाही.

४) भारतीय रेल्वेच्या वेबसाइटला एका मिनिटाला १२  लाख जण भेट देतात. आयआरसीटीसी.कॉम या वेबसाईटचे तासाचे ट्रॅफिक कोणत्याही प्रसिद्ध वेबसाइट वार्षिक ट्रॅफिकपेक्षा अधिक आहे. एकावेळेस ५० लाख लोक लॉगिंन केले तरी ती हँग होत नाही अशी व्यवस्था केली आहे.

५) भारतीय रेल्वेमध्ये सर्वात हळू ट्रेन डोंगरावर जाणारी आहे. तिचा वेग ताशी १० किलोमीटर आहे. ही ट्रेन मेट्टूपलायम उट्टी निलगिरी पॅसेंजर ट्रेन आहे.

६) भारताच्या रेल्वेचे रूळ काढले तर ते पृथ्वीला दीड वेळा प्रदक्षिणा मारतील

७) भारतीय रेल्वेला ५० वर्ष पूर्ण झाल्यावर ट्रेनमध्ये टॉयलेट आलीत. त्या अगोदर टॉयलेट्स नव्हते. प्रवाशाला पुढील स्टेशन येईपर्यंत वाट पाहावी लागत होती.  ओखिल चंद्रा यांचे विशेष आभार मानावे लागतील त्यांनी भारतीय रेल्वेला पत्र पाठविले आणि ही मागणी केली. त्यानंतर १९०९मध्ये भारतीय रेल्वेमध्ये टॉयलेट्स आले.

८) जुन्या जमान्यात रूळ मांडण्यासाठी हत्तींचा वापर केला जात होता.

९)  भारतीय रेल्वे १६२ वर्ष जुनी आहे. १६ एप्रिल १८५३ रोजी पहिली रेल्वे धावली होती. मुंबई ते ठाणे असा तिचा प्रवास होता. त्या काळीही मुंबई ते ठाणे हे ५३ मिनिटात पोहचत होते, आताही तंत्रज्ञान वाढले, स्टेशन वाढले तरी स्लो ट्रेनने तेवढचा वेळ लागतो.

१०) भारतीय रेल्वेच्या स्टेशनचे सर्वात लांब नाव 'वेंकटनरसिंहराजवारिपटा' असे आहे.

११) भारतीय रेल्वच्या स्टेशनचे सर्वात छोटे नाव 'इब' असे आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा