गुरुवार, ३ डिसेंबर, २०१५

गुणकारी पालक


पालकला गुणकारी मानले जाते कारण पालकमुळे हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते. जेव्हा कधी आपण आजारी पडतो तेव्हा डॉक्टर आपल्याला पालेभाज्या खाण्याचा सल्ला देतात. कारण त्यामुळे आपल्या शरीरातील कमतरता भरून निघते.? पालकमध्ये विविध गुणधर्म आढळून येतात.

1.पालकच्या पानांचा रस आणि नारळाचे पाणी समान मात्रामध्ये मिसळून सकाळ-संध्याकाळ घेतल्यास मूतखडा विरघळून बाहेर पडतो.

2.कच्चे पालकही खूप गुणकारी आहे. त्यामुळे पाचन तंत्र व्यवस्थित राहते. खोकला किंवा फुप्फुसामध्ये सूज असल्यास पालकच्या रसाने गुळण्या केल्यास लाभ होतो.

3.ताज्या पालकचा रस दररोज प्यायल्यास स्मरणशक्ती वाढते. यामध्ये आयोडीन असल्यामुळे मेंदूवरील ताण कमी होतो.

4.लो ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी दररोज पालकच्या भाजीचे सेवन करावे.

5.कावीळ झालेल्या रुग्णाला पालकचा आणि कच्च्या पपईचा रस एकत्र दिल्यास आराम मिळेल.

6.हृदयाचा आजार असलेल्या लोकांनी दररोज एक कप पालकच्या रसाचे २ चमचे मध घालून सेवन करावे.

7.रक्ताची कमतरता असल्यास दररोज एक ग्लास पालकचा ज्यूस प्यायल्यास कमतरता भरून निघते.

8.पालकच्या रसाने गुळणी केल्यास तोंडाची दुर्गंधी जाते व दातांच्या समस्या दूर होतात.

9.पालकमुळे केस दाट व लांब होतात.

10.पालकमुळे दात मजबूत होण्यास मदत होते.

अशा प्रकारे विविध आजारांवर पालक गुणकारी ठरते, मात्र फक्त त्याचा उपयोग कशासाठी व कसा केला जातो हे माहीत असणे आवश्यक असते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा