शुक्रवार, ४ डिसेंबर, २०१५

नागरिक हो......आता तरी...

.

Please Stand Up in Honor of the National Anthem .......
हे काही आता आपल्याला नवीन नाही..

सिनेमा बघायला गेल्यावर प्रत्येक थिएटर मध्ये राष्ट्रगीत लावण्यात येतं, आणि त्यानंतरच सिनेमा सुरु होतो..

काल का परवा एका सिनेमाघरात एक कुटुंब उभं राहिलं नाही आणि त्यांना सिनेमा घरातून हाकलवून देण्यात आलं...ते निमित्त साधून थोडीशी माझ्या मनातली ' भडास ' काढतोय इतकंच..
आपण ' भारतीय ' वर्षातले फक्त तीनच दिवस असतो..एक म्हणजे भारत पाकिस्तान क्रिकेट सामना, मग २६ जानेवरी आणि १५ ऑगस्ट..हे तीन दिवस सोडले, तर उरलेले ३६२ दिवस,आपण सगळे हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, ब्राम्हण, मराठा, दलित, कोकणस्थ, ९६ कुळी, शिया, सुन्नी, रोमन आणि काथलिक असतो..' भारतीय ' मात्र फक्त वर नमूद केलेले तीनच दिवस..

फ्रांस मध्ये दहशतवादी हल्ला झाला त्याला अजून महिना सुद्धा व्हायचा असेल..तेव्हा मात्र प्रत्येकांनी फ्रांसच्या समर्थांना प्रित्यर्थ फ्रांसचा झेंडा आपला DP म्हणून ठेवला..भारतात हल्ला जेव्हा किती लोकांनी आपला DP बदलून भारताचा तिरंगा ठेवला ? फ्रांस मधल्या माणसाने आपला DP बदलला ? मुळात फ्रांस आणि भारत ह्या दोन देशात कमालीचा फरक आहे..त्यांच्याकडे दहशतवादी हल्ला होऊन ४८ तास सुद्धा झाले नव्हते, कि त्यांची विमानं घुसवून त्यांनी ISIS च्या ठिकाणांचा धुव्वा उडवला..एका रात्रीत २६ कायदे बदलले..आमच्या इथे एका अतिरेक्याला फाशी द्यायला ५ वर्ष आणि एक कायदा बदलायला १५ वर्ष लागतात..फ्रांस चे लोक, जेव्हा त्या स्टेडीयम मधून बाहेर पडत होते, तेव्हा त्यांच्या देशाचं ' राष्ट्रगीत' म्हणत बाहेर पडत होते..हे किती जणांना माहित आहे ? ह्याला म्हणतात राष्ट्प्रेम आणि राष्ट्रासाठी निष्ठा..

आपण स्वतःला इतर फुटकळ बाबीत इतकं अडकवून घेतलंय, कि राष्ट्राचा विचार करायला वेळ आहे कुणाला ? युरोप मधले हेच सगळे देश,दुसऱ्या महायुद्धात बेचिराख झाले होते..आज बघा, ते कुठे आहेत आणि आपण कुठे आहोत..आपण अजूनही इथेच का आहोत ? का नाही अजूनही आपण 'प्रगत राष्ट्र ' होऊ शकलो..दोष जेवढा आपल्या ' नाकर्त्या सरकारचा आहे किंवा होता तेवढाच..किंबहुना त्यापेक्षा जास्त दोष हा आपल्या जनतेचा आहे.. ह्याची कारण शोधायची झाली तर खालील प्रमाणे वर्गवारी करता येईल..
धार्मिक : मासिक पाळी असताना स्त्रियांनी मंदिरात जावं कि जाऊ नये..स्त्रियांनी अमुक धार्मिक ठिकाणी प्रवेश करावा कि न करावा...सोंड उजवी असावी कि डावी असावी ह्यासारख्या धार्मिक विषयांत आपण खूप वेळ घालवतोय असं वाटतं...अजूनही जिथे ' नरबळी ' दिला कि पैसा मिळेल सारख्या गोष्टीत जनता विश्वास ठेवते, ते राष्ट्र प्रगत होईल कसं ? ' अंधश्रद्धेचं निर्मुलन करणारी मंडळी, गल्लीतले भोंदू बुवा आणि बाया पकडून देण्यातच धन्यता मानत आहेत.. आणि स्वतःला ' पुरोगामी ' म्हणवणारी, टुकार विचारसरणीची, आणि ' शिवाच्या पिंडीवर लघवी करून दाखवीन ' असं जाहीरपणे म्हणणारी भिकारडी मंडळी, त्यांचे खून आणि 'अजूनही खुनी सापडत नाहीत ' असा कांगावा करणारी त्यांची समर्थक मंडळी,हे ह्या देशाला लागलेली कीड आहे..स्वतःला 'पुरोगामी 'म्हणवनाऱ्या लोकांची ह्या पलीकडे Vision च नाही ?
राजकीय : नेते मंडळी, ही जनतेची कामं करण्यापेक्षा एकमेकांना 'टोले ;लगावण्यात खूप वेळ घालवतात..साहेबांचं स्मारक, महाराजांचा पुतळा,रस्त्याचा नामकरण, राष्ट्रीय पुढाऱ्यांचे पुतळे सारख्या गोष्टीत नको तेवढे वितंडवाद घालून आपला पैसा आणि शक्ती दोन्ही फुकट घालवतात..आमचं सरकार किती चांगलं होतं, आम्हाला गरीबांचा आणि शेतकऱ्यांचा किती कळवळा होता आणि तुमचं सरकार कसं कामचुकार आहे, ह्या भांडणात आपल्या राजकीय नेत्यांनी ६८ वर्ष फुकट घालवली..फडतूस विषय घेऊन चर्चा आणि महाचर्चा करत बसायचं, चिखलफेक करायची आणि 'टोले ' लागावायचे..
कौटुंबिक : तुरडाळ किती महाग झाली,Maggi परत आली आणि ' जान्हवीची डिलिवरी ' कधी होणार सारख्या कौटुंबिक गोष्टीत आपण स्वतःला किती त्रस्त करून घेतो...आपली बुद्धी आपण कशात आणि किती फुटकळ गोष्टीत खर्च करतो आहोत हे का कुणाच्या लक्षात येत नाही ? टीव्ही वर दाखवण्यात येणारे कार्यक्रम किती सुमार दर्जाचे होत चाललेत..ते सुद्धा आपण किती चवीने 'Time pass ' च्या नावाखाली बघतो.." बाबा चा तुरुंगवास आणि "भाई " ची शिक्षा सारख्या गोष्टीत आपण इतके का उलथलोय ?

नागरिक : मी भारताचा नागरिक आहे, म्हणजे मला कुठेही थुंकायला,भुंकायला, कुठेही कुणाकडेही बघायला,आणि वाट्टेल तिथे हगायला परवानगी आहे हा आपला दृष्टीकोन झाला आहे.." पटलेल्या आयटम " साठी चांद-तारे तोडून आणणारे ,रस्त्यात पडलेली पिशवी उचलून कचरा-पेटीत टाकणार नाहीत.." मी का म्हणून " हा प्रश्न जोवर आपण विचारतो आहोत, तोपर्यंत आपण प्रगत राष्ट्र होऊ शकत नाही..देव दर्शनासाठी आपण तासंतास रांगेत उभं राहू शकतो, पिझा जॉइन्ट च्या बाहेर आपला नंबर लागेपर्यंत केविलवाणा चेहरा करून भिकाऱ्यासारखं तासंतास उभं राहू शकतो..पण राष्ट्रगीत चालू असेल तर एक मिनिट वेळ काढून उभं राहू शकत नाही..
हा आहे आपल्यातला आणि प्रगत राष्ट्राटला फरक..

B positive , O positive सारखा " भारतीय " Positive हा आपला ब्लड -ग्रूप होत नाही, तो पर्यंत आपण प्रगत राष्ट्र व्हायची स्वप्न सुद्धा बघायला नालायक आहोत.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा