गुरुवार, १० डिसेंबर, २०१५

दिनविशेष : १० डिसेंबर

जागतिक मानवी हक्क दिवस

हा या वर्षातील ३४४ वा (लीप वर्षातील ३४५ वा) दिवस आहे.
अल्फ्रेड नोबेल दिवस

⭐महत्त्वाच्या घटना⭐

२०१४:भारताचे कैलाश सत्यर्थी आणि पाकिस्तानची मलाला युसुफझाई यांना संयुकतपणे नोबेल शांति पुरस्कार प्रदान करण्यात आला.
२००८:प्रा. अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले.
१९७८:ईस्त्रायलचे अध्यक्ष मेनाकेम बेगिन आणि सीरीयाचे अध्यक्ष अन्वर सादात यांना संयुकतपणे नोबेल शांति पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१९१६:’संगीत स्वयंवर’ या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
१९०६:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांना नोबेल शांति पुरस्कार देण्यात आला. नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले अमेरिकन होत.
१९०१:नोबेल पारितोषिकांचे प्रथमच वितरण करण्यात आले.
१८६८:पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर, लंडन येथे पहिले वाहतुक नियंत्रक दिवे (traffic signals) बसवण्यात आले. सुरुवातीला हे रेल्वेच्या सिग्नल्स (semaphore) सारखे होते आणि रात्री प्रकाशित करण्यासाठी लाल व हिरव्या रंगाच्या गॅसच्या दिव्यांचा वापर करण्यात येत असे.

⭐जन्मदिवस/जयंती/वाढदिवस⭐

१८९२:व्यंकटेश बळवंत ऊर्फ बापूराव पेंढारकर – रंगभूमीवरील अभिनेते व गायक (मृत्यू: १५ मार्च१९३७)
१८८०:डॉ. श्रीपाद कृष्ण बेलवलकर – प्राच्यविद्यातज्ञ, संस्कृत पंडित. अमेरिकेच्या हॉर्वर्ड विद्यापीठात भवभूतीच्या उत्तर रामचरितावर प्रबंध लिहून त्यांनी डॉक्टरेट मिळवली. (मृत्यू: ८ जानेवारी १९६७ - पुणे)
१८७८:चक्रवर्ती राजगोपालाचारी – भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल, मद्रास इलाख्याचे मुख्यमंत्री, स्वातंत्र्यसेनानी, कायदेपंडित, मुत्सद्दी आणि लेखक (मृत्यू: २५ डिसेंबर १९७२)
१८७०:सर यदुनाथ सरकार – औरंगजेबाचे पाच खंडात विस्तृत चरित्र लिहिणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहासकार (मृत्यू: १९ मे १९५८)

⭐मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतिदिन⭐

२००९:दिलीप पुरुषोत्तम चित्रे – लेखक, कवी आणि टीकाकार (जन्म: १७ सप्टेंबर १९३८)
२००३:श्रीकांत ठाकरे – संगीतकार (जन्म: ? ? ????)
२००१:अशोक कुमार गांगूली ऊर्फ 'दादामुनी' – चित्रपट अभिनेते, पद्मश्री (१९६२), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९८९), ५३ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत सुमारे ४०० चित्रपटांत भूमिका केल्या (जन्म: १३ आक्टॊबर१९११)
१९६४:शंकर गणेश दाते – ग्रंथसूचीकार (जन्म: १७ ऑगस्ट १९०५)
१९६३:सरदार कोवालम माधव तथा के. एम. पणीक्‍कर – भारताचे चीन, इजिप्त आणि फ्रान्समधील राजदूत, इतिहासपंडित (जन्म: ३ जून १८९५)
१९५५:आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर – लेखक व गांधीवादी तत्त्वचिंतक (जन्म: २६ सप्टेंबर १८९४)
१९२०:होरॅस डॉज – ’डॉज मोटर कंपनी’चे एक संस्थापक (जन्म: १७ मे १८६८)
१८९६:अल्फ्रेड नोबेल – स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते (जन्म: २१ आक्टॊबर१८३३)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा