बुधवार, १८ नोव्हेंबर, २०१५

विचार - नीलेश रामचंद्र गुरव, धुळे


कितीही म्हटलं तरी,
मला तितकसं व्यवहारीपणे वागता येत नाही..,
आभाळावर केलेल्या त्या बेहिशोबी प्रेमाचं
या चातकाला व्याज मागता येत नाही.

_________________

काही मिळवलं होतं, काही गमावलं होतं.
फक्त ह्याच विचाराने, मन खुप रडलं होतं…..
पण ??
आज ह्याच विचाराने, मी शांत आहे कि
जे गमावलं होतं, खरचं ते मी कधी…..
मिळवलं होतं का ???

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा