बुधवार, १८ नोव्हेंबर, २०१५

एक जमवले गेलेले नाते ...

एक जमवले गेलेले नाते
नवरा बायको ..पती पत्नी
पूर्वी कधी एकमेकांना पाहिलेही नसते
आता जन्मभर एकमेकांसोबत
एकत्र रहाणार
आधी अनोळखी ..मग.
.हळूहळू होत जाणारी ओळख
हळूहळू होत जाणारे स्पर्श
मग येणारे...
रुसवे... फुगवे... हट्ट...
भांडण... अबोला...
हळूहळू घट्ट होत जाणारी वीण
मग... एकजीवता... तृप्तता
लग्न मुरायला थोडा वेळ लागतो
हळूहळू मूरत जाते
एकमेकांना निट ओळखले जाते
वृक्ष वाढत जातो
वेल बिलगते घट्ट
फुले येतात... फळे येतात
नाती घट्ट होतात
हळूहळू एकमेकांशिवाय करमत नाही
वय वाढत जाते
ओढ वाढत जाते
एकमेकांवर अवलंबून रहाणे
वाढत जाते
एकमेकांशिवाय चुकल्या चुकल्या सारखे होते
......नंतर मनात हळूहळू भीती वाटत रहाते
"ही गेली तर मी कसा जगू "
"हा गेला तर मी कशी जगू "
इतके एकमेकात गुंततात.... अन ....
स्वताचे स्वतंत्र अस्तित्व विसरून जातात ..
किती अजब नाते ..कोण कुठले ..
एक जमवले गेलेले नाते ...
नवरा-बायको ...पती-पत्नी...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा