बुधवार, १८ नोव्हेंबर, २०१५

सेवा- भामरे आण्णा


सेवा परमोधर्माहः!
बघा सेवा करणं किती चांगल असत.
सेवा कोणी कुणाची करावी ; हा प्रश्न या गतिमान युगात गहन बनत चालला.
  कारण परवा वृद्धाश्रमात जायचा योग आला.
फलाहार वाटप ; फोटो काढणे हे सर्व ठिक होते.
एका मातेने हात जोडले. डोळे पाणावले.
कार्यवाहक धनगर बोलतांना सहज म्हणाले ---
४/५ वर्ष वडिल जीवंत आहेत की नाही याची शुध्द नसणाय्रा मुलांनी तेच वडिल वारल्यावर डि जे लावून गावात अंत्य यात्रा काढली.
कुठे आहे आमचा श्रावण बाळ!!!
राज्य कर्त्यानी शिक्षण प्रणालीचा खेळ मांडलाय.
बाबा साहेंबानी १४ वर्ष वयोगटाला कायद्याने प्राधान्य दिले .त्यात फक्त कपडे ;पुस्तके वा अल्पोपहार अपेक्षीत नसून या वयोगटापर्यंचा बालक --देश; कुटूंब या बाबतित परिपूर्ण संस्कारक्षम होवून ;सेवा व्रताचा महिमा त्याच्या मनावर ठसवून ;पुढिल आदर्श नागरिक घडला
पाहिजे.
शिक्षण तज्ञांनी  या बाबत परिपूर्ण नागरीक घडविणेकामी सरकारवर दडपण आणले पाहिजे.अथवा गुरूदेवाय नमः म्हणून पुर्विसारखे शिक्षकांना प्राधाऩ् दिले पाहिजे.
अन्यथा परकिय ईग्रज शासनातील शिक्षण प्रणाली संस्कारक्षम होती असे म्हणण्यची वेळ येईल.अन तिच खरी देश सेवा ठरेल.
शुभ प्रभात!!
जय शंभो!!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा