अव्यक्त परमेश्वर व्यक्त होण्यासाठी उपाधी धारण करतो तेव्हा त्या उपाधीच्या अपेक्षेत त्या परमेश्वराला ईश्वर असे म्हणतात,
निसर्ग नियमांसहित, नैसर्गिक , स्वयंचलित , नियंत्रण व्यवस्था म्हणजे परमेश्वर ,
ईश्वर हा परमेश्वराचा अंश आहे असे म्हणतात , त्याचे कारण तेच होय , चैतन्याचे शुद्ध स्वरुप म्हणजे ईश्वर , प्रत्येकाच्या हृदयात ईश्वर वास करतो असे सांगितले जाते , त्याचे कारण सुद्धा तेच होय , ईश्वर आणि देव हे शब्द सामान्यपणे एकाच अर्थाने वापरले जातात, परंतु ही प्रथा चुकीची आहे, ज्याप्रमाणे हवा आणि वारा यात मोठा फरक आहे , हवा हलविली की हवेतून वारा प्रगट होतो हे जरी खरे असले तरी हवा म्हणजे वारा नाही हेही तितकेच खरे , त्याचप्रमाणे ईश्वरातून देव प्रगट होतो याचा भावार्थ असा की , शुद्ध चैतन्य स्वरुपातून दिव्य स्वरुपाची जाणीव उदयाला येते आणि ही दिव्य जाणीवच माणसाला सुख, शांती, समाधान प्राप्त करुन देण्यास समर्थ ठरते, विशीष्ठ प्रकारच्या सदगुरुप्रणित दिव्यसाधनेचा अभ्यास करुनच शुद्ध चैतन्य स्वरुपात दिव्यस्वरुपाची जाणीव निर्माण होत असते , हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे ,
पंचमहाभुते, तीन गुण व चैतन्य अशा नवरंगाने भरलेल्या या देहाच्या पिचकारीतून रंगाची उधळण करीत हृदयस्थ श्रीहरी विश्वात नित्य रंगपंचमी साजरी करीत असतो ,
देव हे तत्व वास्तविक अलौकिक परंतु मात्र देव या शब्दाचा वापर ढसाळपणे केला जातो ,
'हृदयात ईश्वर वास करतो ' हा गीतेतील शोध सर्वात मोठा असून असा दिव्य शोध आतापर्यंत लागला नाही व यापुढे लागेल असे वाटत नाही ,
" आत आहे मा " याचे नाव आत्मा ,
स्वस्वरुपाचा आत्मसुर्य म्हणजे , सतत सातत्याने तेवत राहणारा भगवंताचा नंदादीप आहे,
प्रभुचे प्रत्यक्ष प्रगटरुप म्हणजे सूर्यदेव होय,
आत्मरुपाने ईश्वर निर्गुण , 'मी' रुपाने सगुण व देहरुपाने तो साकार आहे,
देह हे देवाचे देऊळ असून त्यातील आत्मदेव हाच खरा जागृत गणपती आहे , गणपतीची मनोभावे प्रार्थना केली व त्याचे नामस्मरण केले व योग्य दिशेने प्रयत्न केले तर आपल्या सर्व अडीअडचणी निवारण करण्यास व सर्व संकटांचा नाश करण्यास तो पुर्ण समर्थ आहे,
आपल्याच हृदयात प्रचंड ईश्वरी शक्तीचा वास असून आपले सर्व संकल्प सिद्ध करण्याचे विलक्षण सामर्थ्य त्या शक्तीत आहे याची यथार्थ जाणीव होणे , हा तर मन मजबूत करण्याचा उत्कृष्ट मार्ग आहे,
।।सदगुरु श्री वामनराव पै माऊली ।।
*संदर्भ ग्रंथ ;- जीवनविद्या दर्शन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा