आई असते जन्माची शिदोरी.. सरतही नाही उरतही नाही!
'आई' हा शब्द पहिल्यांदा उच्चारणं असते एक आठवण...
आईचं बोट धरून रांगणारा पोर चालू लागतो ती असते आठवण...
भुकेलेल्या पिलाला घास भरवते आई... ती एक आठवण...
आईच्या डोळ्यांदेखत मुलं आकाशात उंच झेप घेतात ती असते आठवण...
सरतेशेवटी "आई तुला नाही गं कळत यातलं काही" असं म्हणण्याजोगी मोठी होतात मुलं..
ती एक आठवण...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा