[
रांगोळी पुसली जाणार हे माहीत असूनही ती जास्तीत जास्त रेखीव काढण्याचा आपला प्रयत्न असतो. तसेच, आपले जीवनही पुसले जाणार आहे हे माहीत असूनही आपण ते रांगोळीप्रमाणेच जास्तीत जास्त सुंदर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.माणूस कधीच छोटा किंवा मोठा नसतो.. प्रत्येक माणूस आप-आपल्यापरीनं निसर्गाची एकमेव अप्रतीम कलाकृती असतो..कधीही कोणाची कोणाशी तुलना करू नये..अगदी स्वतःचीही..!!
मुलगी म्हणजे मायेचा आगर आहे,मुलगी म्हणजे प्रेमाचा सागर आहे,लहानपणी आई वडिलांचा सांभाळ करणारी मुलगीच असते,आई बाबांच्या कामात मद्त करणारी मुलगीच असते, भावाचं अतूट नातं जपणारी मुलगीच असते, सासर आणि माहेर यांना प्रेमानं जोड्णारी मुलगीच असते,आणि शेवट्च्या क्षणी बाबा.... ...म्हणून आर्त किंकाळी फोड्णारी सुद्धा मुलगीच असते.मुलगी वाचवा,देश वाचवा
मला माझ्या मित्राने विचारले कि प्रेम म्हणझे नेमके काय ? मी त्याला सागितले की, कितीही जवळ जाणार असेल तरी गाडी सावकाश चालव आणि पोहचल्यावर फोन कर असे आईचे काळजीचे बोल म्हणजे प्रेम... दिवाळीला स्वतःसाठी कपडे न घेता मुला- मुलीसाठी त्यांच्या पसंतीचे महागातले जीन्स आणि कपडे घेणारे बाबा म्हणजे प्रेम... कितीही मस्ती केली व रात्री लेट झाले तरी आई- बाबाना न सांगता हळूच दार उघडणारे आजी-आजोबा म्हणजे प्रेम... कितीही वाद झाले तरी दादा जेवलास का अशी विचाणारी बहिण म्हणजे प्रेम... पगार कितीही कमी असेल तरी दिवाळी भाऊ भीजला बहिणीच्या पसंतीचे घड्याळ घेणारा भाऊ म्हणजे प्रेम... आणि या सर्वांची काळजी घेवून स्वतःची काळजी नकरता सकाळी पहाटे उठून जेवणाचा डबा बनवणारी बायको म्हणजे प्रेम.
इंग्रजीच्या नादापाई झाला मराठीचा डब्बा गोल मराठी मानसा आता तरी तू मराठीतून बोल... इंग्रजीच्या पेपरात होऊन जाते वर्ग सारा पास पण मराठीचा पोरगा होतो मराठीत नापास... प्रेम करतो तुझ्याशी म्हटले की पोरगी समजते हेंबाड्या अन आय लव यु म्हटल्यावर मनात मारते उड्या... माय झाली मॉम आणि बाप झाला आता डयाड रेव्ह पार्टीत नाचून श्यान पोर झाली मॅड... भांडण करते बायको घरात बाबुला इंग्रजी शाळेत टाका मराठी माणसापासून आहे खरा मराठी भाषेला धोका... मराठी इसरत चालल शाळेतले शिक्षण मराठी औक्सीजनवर अन चालू आहे इंग्रजीचे रक्षण... ज्ञानोबा तुकोबाची अभंगवाणी, आठवा मराठीचा गोडवा मराठी माणसाचे नवीन वर्ष म्हणजे असतो गुडी पाडवा... सावध व्हा मित्रहो, जपा मायबोली मराठी... :
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा